टॉक टू यु लेटर... सिया! Anuja Kulkarni द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

टॉक टू यु लेटर... सिया!

टॉक टू यु लेटर... सिया!

रविवारचा दिवस होता... आज काय करायचं ह्या विचारांनी ती तिच्या खोलीत एकटीच बसून राहिली होती... खर तर,आरोहीला रोजच्या रुटीन चा कंटाळा आला होता. त्याच त्याच मित्र मैत्रिणींशी बोलून सुद्धा तिला कंटाळा आला होता.. फेसबुक,तेच तेच मित्र याच्याशिवाय काहीतरी नवीन ट्राय करू असा तिनी विचार केला... तेह्वाच तिला चॅट रूम बद्दल कळल... तिच्या मनात विचार आला.. चॅट रूम वर जाऊन बघाव का? अनोळखी लोकांशी बोलता येईल आणि एखादा मित्र पण मिळून जाईल... पण तिनी विचार केला नको,कश्याला डोक्याला ताप.. उगाच नसत्या भानगडी नको! त्यामुळे तिनी चॅट रूम वर जायचा विचार मनातून काढून टाकला... आणि बेड वर पडून राहिली... तेह्वाच तिला फोन आला..रिया चा फोन!

रिया आणि आरोही शाळेपासूनच्या जिवाभावाच्या मैत्रिणी....एखादी नवीन गोष्ट केली तर ती लगेच एकमेकांशी शेअर करायच्या...रिया हि त्याच वेळी चॅट रूम जॉईन झाली आणि तिला ते आरोही ला कधी एकदा सांगते अस झाल........म्हणून तिनी आरोही ला फोन केला,

“हॅलो आरोही.. काय करतीयेस? आज भेटायला वेळ आहे?”

“हे रिया, आहे कि वेळ.. आज रविवारच आहे.. आणि मला जाम बोअर होतंय! काहीतरी इंटरेस्टिंग हवाय ग... आणि तुला काय सांगयचय? होप ते इंटरेस्टिंग असेल..”

“येस येस.. इंटरेस्टिंग सांगायचं आहे...”

“ओह.. ग्रेट!! कुठे भेटायचं?”

“तुझ्याकडे भेटूयात का? तुझे आई बाबा नाक खुपसत नाहीत... आमच्याकडे आई लगेच येऊन नसत्या चौकश्या करत बसते... सो मी येते तुझ्याकडे...”

“ओके... ये! भेटू!! आणि काका काकूंना तुझी काळजी वाटते म्हणून ते चौकशी करतात.. नाक खुपसतात काय म्हणतेस?”

“तुला नाही कळणार अग.. ते सोड! मी येते तुझ्याकडे मग बोलू निवांत!”

“ओके.. वाट पाहते...”

“बाय..”

इतक बोलून दोघींचं संभाषण संपल... जरा वेळात रिया आरोही कडे आली.. ती खूप उत्साहित होती!!

“हे आरोही,कशी आहेस?”

“मी मस्त..तू? आणि आज अचानक माझी आठवण कशी आली ग? फोन करून भेटायला आलीस?..काही स्पेशल सांगायचय का??” आरोही म्हणाली...

“हो अग... तुला गम्मत सांगायची आहे! होल्ड युअर ब्रेथ! मी चॅट रूम ला जॉईन झालीये!! तू कधी चॅट रूम मध्ये कोणाशी गप्पा मारल्या आहेत?” रिया नी आरोही ला विचारलं... ती चॅट रूम ला जॉईन झाल्यापासून एकदमच हवेत गेली होती.. आणि तिला तिचा आनंद आपल्या जिवलग मैत्रिणीशी शेअर करायचा होता....

रियानी तिच्या मनातला विषय काढला.. तरी तिनी ठरवल्याप्रमाणे चॅट रूम ला न जायचा निर्णय पक्का ठेवला...“नो नो.. वेडी आहेस हा.. चॅट रूम वगैरे मी नाही जाणार! मला वाटल होत आपण पण चॅट रूम ला जॉईन होऊन बघू पण मी तो विचार मनातून काढला.. खर सांगू का, आज सकाळीच माझ्या मनात तो विचार आला होता! पण महतप्रयासानी मी तो विचार बाजूला टाकला आणि बोअर परत रुटीन जगण चालू केल! कोण कुठली लोकं... उगाच कशाला बोलायचं...उगाच प्रॉब्लेम....” नकारार्थी मान हलवत आरोही बोलली...

“तुला पण वाटल होत चॅट रूम ला जॉईन होऊ? ग्रेट! वी थिंक अलाईक!!! म्हणूनच आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत!! आणि घाबरू नकोस! मज्जा येते! तू पण जॉईन हो एखाद्या चॅट रूम ला... आणि खरी माहिती द्यायचीच नाही ना... काही प्रॉब्लेम नाही येत! मी आत्ताच काही दिवसांपूर्वी एका चॅट रूम ला जॉईन झाले... अनोळखी लोकांशी बोलतांना इतकी मज्जा येते! तू पण हो ना जॉईन!”

“अग, मलाही अनोळखी लोकांशी बोलायचं होत पण नंतर मी विचार केला... फेसबुक, जीमेल वर इतकी लोक आहेत कि.. अजून कशाला कोणाशी बोलायला हवाय? आणि चॅट रूम वर जाण्याचा विचार आता मी तो विचार मनातून काढून टाकलाय... विकतची दुखणी नकोत उगाच!!”

“यु आर नॉट गेटिंग मी आरोही... काही प्रॉब्लेम येत नाही! काही विकतच दुखण बिखण नाही! एकदा जॉईन होऊन बघ... आवडल नाही तर सोडून दे! आणि तुला हव असेल त्याच्याशीच बोल ना... तुला कुणाबद्दल शंका आली तर त्याच्याशी बोलण बंद करून टाक! आणि खरी माहिती द्यायचीच नाही ना... टाइम पास होण्यासाठी फक्त थोडी खोटी माहिती द्यायची! म्हणजे माहिती वाचून आणि फोटो बघून लोकं बोलायला येतील!! आपल्याला कोणी ओळखत नसलेले लोक कसे बोलतात हे पाहिलं कि फूल ऑन मज्जा येते! एकदा जॉईन होऊन बघ.. आणि तुला बळजुबरी थोडी आहे... तू कधीही कोणाशीही बोलन बंद करू शकतेस... आणि चॅट रूम चा कंटाळा आला तर सोडून दे.. पण मजा आली तर?? आणि घरच्यांना अजिबात सांगू नकोस चॅट रूम बद्दल.. त्यांना उगाच टेन्शन यायचं...”

“हाहा..बघू विचार करते आणि ठरवते! आणि चॅट रूम जॉईन केली तर घरच्यांना सांगण अशक्य... आई घाबरेल...” मनोमन चॅट रूम जॉईन नाही करायची ठरवत पण रिया ला न दुखावता आरोही बोलली...

“नक्की जॉईन हो..आणि अनोळखी लोकांशी गप्पा मारून कस वाटत सांग मला... आता मी पळते!”

“हो हो...नक्की सांगते! ओके..भेटू परत असच!! मला पण थोडी काम आहेत ती करते.. आणि मी चॅट रूम जॉईन केली तर तुला सांगेनच!! पण मी काही सांगितलं नाही तर चॅट रूम जॉईन नाही केली अस समज.. जे करायचं नाही अस ठरवलंय मुद्दाम ते कश्याला करायच ना? उगाच अनोळखी लोकांशी बोलण्यात मला नाही रस... बाकी नंतर भेटून बोलू.. “

“हाहा... ओके! तुला वाटल तर हो जॉईन!! तुझा फोन आला नाही तर समजेन तू चॅट रूमला जॉईन नाही झालीस!! बोलू परत!!”

इतक बोलून आरोही रूम च दार बंद करून बसून राहिल... पण तिच्या मनातून चॅट रूम गेली न्हवती... रिया नी सांगितल्यामुळे आरोहीच्या मनात सुद्धा चॅट रूम बद्दल आकर्षण निर्माण झाल होत.. एकदा चॅट रूम वर जाऊन बघू असही वाटत होत पण ती तिचा निर्णय पक्का करू शकत न्हवती... शेवटी हो नाही करत ती चॅट रूम ला जॉईन झाली... तिला वाटल तिनी चॅट रूम जॉईन केल्या केल्या लोकं बोलायला येतील पण तिनी तिनी तिचा फोटो टाकला न्हवता..त्यामुळे फार कोणी बोलायला नाही आल... जे आले त्यांच्याशी तिला अजिबात बोलावस वाटल नाही! तिनी लगेच रिया ला फोन लावला..

“रिया... झाले जॉईन चॅट रूम ला! तू इतक कौतुक केल होतस चॅट रूम च कि मी स्वतःला थांबवू शकले नाही...”

“वा... आता मस्त जाईल तुझा वेळ! कोणी आल बोलायला? आणि एन्जॉय करतीयेस चॅट रूम वर अनोळखी लोकांबरोबर बोलण?”

“हाहा... कसल एन्जॉय? बरीच लोकं आली पण अजून मनासारखा कोणी बोलायला आलच नाहीये अग... म्हणजे बरीच लोक आली माझ्याशी बोलायला पण मलाच त्यांच्याशी बोलावस वाटल नाही! आणि यु नो,मी बळजुबरिनी कोणाशीच बोलू शकत नाही!”

“आय नो आय नो! तू लोकांशी बोलण्याबद्दल चूझी आहेस! तू सांग, तू फोटो ठेवला आहेस का नाही?”

“नाही...”

“ओह.. म्हणून असेल कदाचित... तू फोटो ठेव मग बघ,अजून किती लोक बोलायला येतात! खूप लोक आली कि त्यात तुला कोणाशीतरी बोलावस वाटेलाच! ट्राय करून बघ!”

“ओह... पण फोटो?” शंका घेत आरोही म्हणाली...

“तू बघ तर खर!”

“ओके.. ट्राय करते! पण हे तू आधी नाही सांगितलास... मला कस कळणार!”

“काही होत नाही अग.. तू घाबरण बंद कर! आता ठेव फोटो... तुझाच फोटो ठेव आणि जरा बरा फोटो ठेव!”

“ओके.. थॅंक्स! चल बोलते नंतर...”

इतक बोलून आरोही नी फोन बंद केला... आणि मनाविरुद्ध पण तिचा एक ठीक फोटो चॅट रूम मध्ये ठेवला... आणि नाव ठेवलं- प्रिन्सेस! फोटो ठेवल्या ठेवल्या बरीच लोक बोलायला आली... सगळ्या लोकांनी उत्तर देण आरोही नी टाळल. तिनी एक नाव पाहिलं गुरु आणि तो दिसायलाही चांगला होता... तिला अंदाज आला मे बी इंडियन असेल..त्यातल्या त्यात इंडियन मुलांशी बोललेलं बर म्हणून तिनी त्याला उत्तर दिल...

“हाय...” ती म्हणाली...

“हाय... प्रिन्सेस... इंडियन?”

“येस... आय अॅम इंडियन!! बट हाऊ डू यू नो?” आश्यर्यचकित होऊन आरोही म्हणाली..

“हाहा.. इंडियन गर्ल्स आर प्रीटी!”

“ओह.. आय डीड नॉट नो.. हाहा! यु अल्सो लुक इंडिअन! आर यु इंडियन? यु आर फ्रॉम? ”

“करेक्ट!!! आय अॅम इंडियन ओरिजिन... बट लिविंग इन अमेरिका! व्हेअर डू यू लिव?”

“आय लिव इन इंडिया..” आरोहिनी उत्तर दिल. तितक्यात तिला रिया चे शब्द आठवले... खरी माहिती द्यायची नाही.. आणि पुढे ती बोलली, “बट राईट नाऊ डुइंग जॉब इन अमेरिका!”

“ओह... यु आर डुइंग जॉब इन अमेरिका!!! नाइस..” त्यानी उत्तर दिल...

“बाय द वे, वॉट यू डू?”

“आय अल्सो अॅम डुइंग जॉब!”

“हे टेल मी, यू आर फ्रॉम व्हीच पार्ट ऑफ इंडिया?”

“ओरीजीनली आय अॅम फ्रॉम महाराष्ट्र!” तो म्हणाला...

“ओह ग्रेट! सो कॅन यु स्पीक मराठी?”

“ओब्विअसली आय डू स्पीक मराठी...”

“डॅट्स ग्रेट! इवन आय अॅम महाराष्ट्रीयन... सिम्स वी कॅन बी फ्रेंड्स! वी विल नॉट बी स्ट्रेन्जर्स आय सपोज!”

“हाहा... गुड गुड! आपण मराठीत बोललो तर तुला काही प्रोब्लेम? मला मराठी असल्याचा अभिमान आहे.. तुलाही असेल पण जस्ट कॉन्फर्मिंग..” मराठी असल्याच्या अभिमानानी गुरु नी उत्तर दिल...

“हाहा! मलाही मराठी असल्याचा अभिमान आहे... जगाच्या पाठीवर कुठेही जावा, मराठी लोकं भेटतातच!!!! फिल्स नाइस!! आणि खर संज्ञाच तर,इथे चॅट रूम वर मराठी मुलाशी मराठीत बोलेन अस मला चुकूनही वाटल न्हवत... बट मेट अ मराठी बॉय ऑन चॅट रूम... वॉव!!!”

त्यांच बोलण बराच वेळ चालल.. जाता जाता त्यानी आरोही ला खर नाव विचारलं पण ते सांगण तिनी शिताफिनी टाळल... आणि ती गुरु ला म्हणाली..

“नाव कळेलच गुरु.. पण त्यासाठी थोडा वेळ थांब! चॅट रूम वर मराठी मुलाशी बोलून चांगल वाटल...आता जाते... उद्या ह्याच वेळी बोलू.... इट वॉज नाइस टॉकिंग टू यू.. लूक फॉरवर्ड टू नो यू बेटर.. बाय अॅण्ड टेक केअर!”

“सेम हियर प्रिन्सेस.. उद्या बोलू... बाय..”

त्यांच बोलण बंद झाल्या झाल्या आरोही नी रिया ला फोन लावला...

“हे रिया.”

“हेलो... बोला मॅडम!!! आत्ता कसा फोन केलात?”

“गेस वॉट...”

“काय करू गेस? सांग लवकर... काय झाल आज? मला नाही करता येत गेस”

“आय मेट अ मराठी बॉय ऑन चॅट रूम.. हाहा! यू वर करेक्ट रिया.मजा येतीये अनोळखी लोकांशी बोलून...”

“हाहा..एन्जॉय! पण चुकूनही खरी माहिती सांगू नकोस.. ओके? समोरचाही खोट बोलत असेल हे गृहीत धरूनच आपण बोलायचं....”

“येस... मी खरी माहिती सांगितली नाहीये... डोंट वरी! आणि थँक्यू!!”

“थँक्यू काय आरोही ... मला मज्जा आली चॅट रूम वर म्हणून तुला पण सांगितलं!!!! मस्त टाइम पास होतो म्हणून म्हणल,तुलाही सांगू!”

“तुला माहितीये का? तू मला सांगायच्या जस्ट आधी मी पण चॅट रूम जॉईन करायचा विचार करत होते पण मी तो विचार मनातून काढून टाकला कारण मी विचार केला कश्याला उगाच माहित नसलेल्या लोकांशी बोला? पण तू म्हणालीस आणि मी चॅट रूम जॉईन झाले... खर्च मजा येतीये!!!”

“ग्रेट!!! बर झाल मी तुला सांगितलं आणि तू पण चॅट रूम जॉईन झालीस!! नेहमीपेक्षा काहीतरी नवीन! आयुष्यात नवीन ट्राय केलाच पाहिजे ना?”

“करेक्ट... भेटू कधीतरी.. आणि फोन वर बोलन होईलच!!!”

“येस!!! यू एन्जॉय आणि भेटू लवकरच!!! बाय..”

“येस भेटू लवकरच.. टाटा!”

-----------------------------------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आरोही चॅट रूम वर गेली!!! तिथे गुरु होताच!!! दोघ ऑनलाइन भेटले... ह्यावेळी संभाषण जरा मोकळ झाल...

“हाय प्रिन्सेस!... वेळेत आलीस!! मी तुझीच वाट पाहत होतो!!”

“हे गुरु!! वाट पाहत होतास?”

“काय चालूये?”

“आत्ताच काम संपवून आले चॅट रूम वर! तुझ काय चालूये?”

“आत्ताच जेवण झाल...”

“तू सकाळी जेवतोस? हाहा!”

गुरु ला आपण चुकीच काहीतरी बोलून गेलो ह्याची जाणीव झाली... त्यांनी सारवासारव करत उत्तर दिल,

“अग,म्हणजे ब्रेकफास्ट! चुकून जेवण बोलून गेलो... ब्रेकफास्ट इतका हेवी झाला कि मला वाटल कि जेवलोच आहे!”

“हाहा...ओके ओके!!” हसू आवरत आरोही बोलली!!

“ए, तुझ एज काय? फक्त माहिती साठी विचारतो आहे! बाकी काही नाही!”

“काय? मुलींना त्यांच वय विचारायचं नसत! इतकी साधी गोष्ट माहित नाही?” आरोही थोडी चिडली आणि बोलली..

“सॉरी सॉरी.. मी असच विचारलं! प्लीज चिडू बीडू नकोस!!!”

“ओके.. पण प्लीज असले प्रश्न परत विचारू नकोस!!”

“नाही विचारात..ओके?”

“गुड...” आरोहिनी उत्त्तर दिल!

“ए,चलो.. आता मी जातो! बोलू असच परत.. तू उद्या येणार आहेस का? तरच मी येईल चॅट रूम वर! तू येणार नसशील तर नाही येणार! आणि येणार नसशील तर प्लीज खर सांग!!”

“येस... मला पण जायच आहे! बोलू परत! उद्या आणि परवा मी नाही येणार चॅट रूम वर! वाट पाही नकोस!! पण त्याच्या नेक्स्ट डे मोस्टली येईल! नक्की नाही पण ट्राय करेन!”

“ओके.. बर झाल सांगितल.. मी पण नाही येत उद्या आणि परवा! मी येऊन बघेन... तू असशील तर बोलू!”

“ओके... टेक केअर! आणि बाय!!”

“यु टू टेक केअर!! बाय...”

इतक बोलून आरोहिनी कॉम्पुटर बंद केला आणि आपल्या कामाला लागली! तिनी विचार केला बर झाल... आपण रिया च ऐकून चॅट रूम वर आलो! तिला गुरूशी बोलतांना मजा येत होती! ती चॅट रूम वर बोलण एन्जॉय करत होती!!

-----------------------------------------------------------------------------------------------

आरोहि नी रिया ला फोन करून घरी बोलावून घेतलं... रिया हि लगेच तिला भेटायला आली...

“बोला.. आज का बोलावलस भेटायला?”

“असच ग.. आपण काही कारण असेल तरच भेटतो अस कुठे आहे?”

“पण काहीतरी आहे! सांग सांग!”

“हाहा..” आरोही मनापासून हसली आणि बोलली, “मला सांग, चॅट रूम वर अजिबातच खर बोलायचं नाही का ग? मी तुला सांगितलं ना... मला चॅट रूम वर गुरु नावाचा इंडियन भेटला! मला गुरु शी बोलतांना खर बोलावस वाटत पण तू सांगितलं आहेस खर काही सांगायचं नाहि म्हणून मी काही बोलत नाही!”

“शक्यतो खर सांगू नकोस! कारण उगाच तू सांगितलेल्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो ना? आणि वेळ जावा म्हणून फक्त बोलायचं चॅट रूम वर! बाकी फार खर सांगायच्या फंदात पडू नकोस! विश्वास ठेवावासा वाटला तरी आपण त्या माणसाला ओळखत नसतांना खरी माहिती देऊच नये!”

“बरोबर आहे.... मी तुला सांगितलं ना.. गुरु नावाच्या एका मराठी मुलाशी बोलतीये! मी मराठी,तो मराठी म्हणून एकदा वाटून गेल,बोलू कि खर! काय झाल... पण तू सांगितलं आहेस म्हणून स्वताबाद्दलची माहिती म्हणजे महत्वाची माहिती सांगणार नाही!! पण त्याच्याशी बोलतांना काहीतरी वाटत मला.. काय ते सांगू शकणार नाही मी पण ते पॉझीटीव असत हे नक्की ... मी त्याच्याशी बोलायची वाट पाहत असते! दिवसभराच्या कामानंतर त्याच्याशी बोलल कि माझा सगळा थकवा पळून जातो!”

“ओह.. तू त्याच्याशी बोलायची वाट पाहत असतेस? अस होत नाही शक्यतो! हाहा! म्हणजे माझ्या बाबतीत अस कधीच झाल नाहीये! आणि कितीही काहीही वाटल तरी नो म्हणजे नो! खरी माहिती सांगू नकोस! त्याला विचार... तो कदाचित सांगेलहि खरी माहिती पण खात्री नाही म्हणून उगाच नसत्या फंदात खरच पडू नकोस!!! आणि तुला अनपेक्षितपणे मराठी मुलगा चॅट रूम वर भेटला म्हणून कदाचित तुला पॉझीटीव वाटत असेल!! जास्ती विचार करू नकोस!”

“ओके... तू सांगितलं आहेस तसच करेन!! बाकी तू सांग! काय चालूये?”

“काही नाही.. जॉब चालूये! आणि आता आई लग्नासाठी मुल पाहती आहे..”

“ओह हो... तू लग्न करणार म्हणजे लवकरच!!”

“डोंट वरी! काकू तुझ्यासाठी पण मुल पाहायला लागतील लवकरच! हाहा..”

“हाहाहा...”

“आता मी निघते ग... तू एन्जॉय कर गुरु शी बोलण पण शक्यतो खरी माहिती देण टाळ!”

“येस येस... नाही सांगणार खरी माहिती!!! तू काळजी घे आणि भेटू असच!!! बाय!!”

“बाय..यु टू टेक केअर!”

-----------------------------------------------------------------------------------------------

२ दिवसांनी आरोही चॅट रूम वर गेली... तिची वाट पाहत गुरु थांबलाच होता! तिला ऑनलाइन पाहून तो बोलायला लागला,

“हाय.. सांगितल्या प्रमाणे आलीस! कशी आहेस?”

“मी मस्त!! तू कसा आहेस?”

“मी पण मस्त... तुला एक विचारू का?”

“काय?”

“परत चिडणार नसशील तर विचारतो!!”

“बघू... तू विचार!!”

“प्रिन्सेस हे तुझ खर नाव नाहीये!! मला माहितीये तुझ नाव प्रिन्सेस नाहीये..तुझ खर नाव काय सांगू शकतेस? आणि चिडू नकोस!!”

“हाहा... नाही चिडत!! माझ नाव अनिशा! हाहा... ” आरोही नी हसत उत्तर दिल...

“हसती आहेस म्हणजे हे नाव पण खोट आहे ना? हाहा! खर नाव सांगायला काय प्रॉब्लेम आहे?”

“स्मार्ट यू आर गुरु... पण मी खर नाव सांगीन ह्या संभ्रमात राहू नकोस... प्रॉब्लेम असा काही नाही पण खरी माहिती इथे सांगावीशी वाटत नाही! ” आरोही म्हणाली...

“ओके... जोपर्यंत तुझा विश्वास बसत नाही तोपर्यंत खर नाव सांगू नकोस!! पण प्रिन्सेस पेक्षा अनिशा नाव चांगलाय.. ते म्हणायला तरी ऑड वाटणार नाही! आता मी तुला अनिशा म्हणत जाइन.. प्रिन्सेस म्हणण काहीतरीच वाटत! हाहा!”

“हाहा.. बाय द वे,तू तुझ खर नाव लिहील आहेस का?”

“हाहा...चागंला प्रश्न आहे! आणि तुझ्या प्रश्नाच उत्तर आहे.. नाही! चॅट रूम मध्ये खऱ्याची अपेक्षा करण म्हणजे मूर्खपणा...”

“तरी तू माझ्याकडून अशी अपेक्षा का केलीस?”

“असच ग... तू मराठी आणि मी पण मराठी! मला वाटल इतकी ओळख पुरे आहे खर बोलायला.... तू खर नाव सांगितलं असतास तर मी हि सांगितलं असत! पण तू खर सांगत नाहीस मग मी हि सांगणार नाही...म्हणजे मी पण भाव खाणार! हाहाहा! भाव फक्त मुलींनीच खायचा अस थोडी असत!”

“ओह हो! भांडण? भांडायचं असेल तर प्लीज आत्ता नको! मला भांडायचं नाहीये!! प्लीज हा विषय नको..... तू सांग, तुझ्या हॉबीज काय?”

बोलता बोलता दोघाच हॉबीज वरून बोलन चालू झाल...

“भरपूर हॉबीज आहेत.. आणि सगळ्या खऱ्या बर का...” आरोही ला त्रास देत गुरु बोलला..

“हाहा... आय होप सो! बट व्हू नोज,खर आहे कि नाही!! सांग आता हॉबीज...”

“वाचन....पेंटिंग,लिहीण..कुकिंग इत्यादी इत्यादी! तुझ्या हॉबीज काय?”

“ओह नाइस! मी हि वाचते! पेंटिंग जमत नाही... शिकायची इच्छा आहे... बघू कधी!! मी हि लिहिते पण जास्त नाही!! आणि कुकिंग करायला अजिबात नाही आवडत... तुला कुकिंग कस आवडत?”

“येस.. आय लव कुकिंग! का आवडत ह्याला माझ्याकडे उत्तर नाही! पण हे निश्चित,बायकोला हव ते करून घालणारे मी.. तिच्यासाठीच शिकलोय!”

“ओह माय गॉड... एकदम भारी! खर सांगतो आहेस कि सांगायचं म्हणून? हाहा! आणि तू बायकोला जेवण करून घालणार? लग्नानंतर नवरा जेवण करतोय! नाइस! तुझ लग्न झालाय?”

“नो ग अनिशा तू नीट नाही वाचलस.. मी म्हणलो लग्न झाल्यावर बायकोला जेवण करून घालणारे!”

“ओह... बाय द वे, बर आहे तुझ्या बायकोच.... नवरा जेवण करतोय.. मस्त!!! आय विश, माझ्या नवऱ्याला पण जेवण बनवायची आवड असेल...”

“तुझ लग्न ठरलय अनिशा? लग्न झालय वाटत नाही कारण लग्न झाल असेल तर तू इथे चॅट रूम वर येऊन टाइम पास करणार नाहीस! हाहा!”

“नो नो.. हाहा! गुड १.. अस काही नाही! लग्न झाल्यावर पण मला वाटेल ते मी करणारच ना.. अस थोडी आहे, लग्न झाल म्हणजे जगाशी संबंध संपला आणि मी माझ्या मनानी आयुष्य जगू शकणार नाही?”

“करेक्ट!! तू स्वताच आयुष्य स्वताच्या टर्म्स वर जगतेस म्हणजे.. नाइस टू नो! स्वताच आयुष्य स्वताला हव तस जगल पाहिजे...”

“येस.. आयुष्य हव तस जगल पाहिजे दोघांनी फक्त नात्यात पारदर्शकता पाहिजे!!”

“आय अॅग्री!!... तुझ्याशी बोलून चांगल वाटल...”

“सेम हिअर!!”

चलो नाऊ नीड टू लिव... बोलू असच परत उद्या...सेम टाइम”

“येस.. मी पण जाते...बाय!”

“बाय”

इतक बोलून दोघांच संभाषण बंद झाल. तिनी कॉम्पुटर बंद केल्या तितक्यात तिच्या आईनी तिला हाक मारली.. आरोही आईशी बोलायला रूम च्या बाहेर पडली!

“काय ग आई... हाक का मारलीस?”

“जरा काम आहे.. तुला वेळ आहे का?”

“हो ग... मला वेळ नसायला काय झाल?”

“लग्नासाठी मुल पाहू का?”

“काय आई... तुला वेळ मिळाला कि लग्न लग्न करत असतेस.. हाहा! मला वाटल काहीतरी वेगळ बोलणार असशील!!”

“आत्ता वेगळ काय बोलणार? तुझ वय वाढतंय... हीच वेळ आहे लग्न करायची... तू कोणी पहिला आहेस? असेल तर सांग.... आम्हाला काही प्रॉब्लेम नाही..”

“नो आई... तू शोध! पण जरा बरी मुल शोध! बरी म्हणजे असा मुलगा शोध जो मला समजून घेईल!”

“नक्की ना आरोही...आत्ता हो म्हणती आहेस... पण नंतर चीडशील! तुझ काही सांगता येत नाही....”

“शोध आई.. मी नाही चिडणार! तुला माझा स्वभाव माहिती आहे.. माझ्या स्वभावला साजेशी मुल शोध...”

“म्हणजे बरी? बरी म्हणजे काय नीट सांग!!”

“आई.. समजून घे कि.. बरी मुल म्हणजे चांगली शिकलेली... वेल सेटल्ड... माझ्या योग्य मुल शोध! आणि मला समजून घेणारा मुलगा पाहिजे! आणि मी सांगितलं ना.... माझे विचार रिस्पेक्ट करणारा!!”

“हो आरोही .. मला माहितीये तू कशी आहेस.. तुझ्या योग्यच मुल पाहणार ना? तू बिझिनेस करतेस.. मग बिझिनेस करणारच हवाय अशी काही अट नाही ना?”

“नो नो... बिझिनेस करणारच मुलगा पाहिजे अस काही नाही..... फक्त भारतातच राहणारा पाहिजे.. कामासाठी उगाच जगभर हिंडत बसणारा नको...”

“ओके... शोधायलाच लागते आता मुल... शुभस्य शीघ्रम...” आरोही ची आई खुश झाली आणि हसत आरोही ची आई बोलली...

“हाहा... आता खुश असशील ना? कर मनासारखं आई...आणि मला तुझ्या चॉइस वर विश्वास आहे..”

“हो.. खुश! आणि तुझासाठी योग्य मुलगा शोधते.. डोंट वरी!”

आरोही ची आई तिच्यासाठी मुल बघायला लागली... आरोही च वय वाढायच्या आधीच एखाद चांगल स्थळ शोधू म्हणून सगळा खटाटोप तिनी चालू केला.... आरोहीनीही नकार न देता आईला मुल शोधायला परवानगी दिली... तिची आई आरोही च्या लगेचच्या होकारानी “शॉक” झाली पण तो शॉक पचवत ती मुल शोधायला लागली... १-२ मुल आईला बरी वाटली पण आरोही नी एकाला शिक्षणावरून आणि दुसऱ्याला दिसण्यावरून नापसंत केल... आईच काम आता वाढल...

-----------------------------------------------------------------------------------------------

आरोही च्या गुरु बरोबर गप्पा चालू होत्या.. अगदी रोजच! दोघ एकमेकांना व्यवस्थित ओळखायला लागले.... पण तरीही खरी नाव दोघांनीही सांगितली न्हवती... फोन नंबर..इमेल शेअर केला न्हवता.... एकदा दोघ बोलत असतांना भेटायचा विषय निघाला! आरोहीला गुरु किती खर बोलतो आहे ते पाहायचं होत आणि त्यासाठी तिनी त्याचा पत्ता मागितला!!

“गुरु,तू अमेरिकेत कुठे आहेस.. जवळ असलो तर आपण भेटू शकतो!”

“तुला मला भेटायचं अनिशा? का ग?”

“असच रे.. आता आपण दोघ एकमेकांना खूप ओळखतो.. तुला भेटायला मला काही प्रॉब्लेम नाहीये...”

“जमल तर नक्की भेटू.. मी तुला माझा पत्ता मेल करतो! तुझा इमेल दे...”

“नो नो.. मेल नाही देणार! हाहा”

“मग कस भेटणार आपण?” हसत गुरु म्हणाला..

“बघू... अजून काही दिवसांनी मेल देईन मग दे तुझा पत्ता...आणि भेटू”

“ओके.. चलो आता पळतो...”

“मी पण.. बोलूच उद्या! बाय”

“ओके..बाय!”

-----------------------------------------------------------------------------------------------

आरोही साठी मुल शोधता शोधता आरोही च्या आईला आरव नावाचा एक मुलगा फार आवडला... अगदी आरोही च्या विरुद्ध पण आरोही ला साजेसा... तिनी आरोही च्या परवानगीनी आरव ला घरी बोलावयाच ठरवलं.... ती आरोही च्या रूम मध्ये गेली आणि तिनी आरोही ला सांगितलं

“आरोही ,उद्या आपल्या कडे एक मुलगा येणारे तुला पाहायला... काही वेगळ ठरवू नकोस.. ओके?”

“ओके आई... कधी येणारे?”

“संध्याकाळी ठीके? ६ वाजता?”

“ओके... मला काही प्रॉब्लेम नाही..”

“आत्ताच त्याला फोन करते..”

इतक बोलून आई फोन करायला बाहेर गेली... आरोही नी लगेच कॉम्पुटर लावला.. चॅट रूम वर गुरु आहे का पाहिलं.. तो ऑनलाइन होताच,

“हे गुरु..तुला मुद्दाम सांगायला आले... उद्या मला तुझ्याशी बोलायला येता येणार नाही... जरा काम आहे.. तू वाट पाहत बसशील आणि माझ्याकडे तुझा फोन नंबर हि नाहीये.. म्हणून आत्ता ऑनलाइन आले तुला निरोप द्यायला...”

“२ मिनीट.. मला फोन आलाय.. बोलण झाल कि येतो...ओके? मी येईपर्यंत थांब!”

“ओके लवकर ये...”

गुरु फोन वर बोलून परत ऑनलाइन आला..

“बोल, काय म्हणालीस...”

“अरे सांगितलं कि उद्या मला ऑनलाइन येत येणार नाही.. वाट पाहू नकोस..”

“ओके. अग काय योगायोग आहे बघ.. मला आत्ता फोन आलेला कामासाठी आणि मी हि उद्या ऑनलाइन येऊ शकणार नाही...”

“हाहा.. गम्मत आहे ना... बोलू परवा”

“ओके.. यु एन्जॉय... भेटू लवकरच!!!”

“यु टू... टॉक टू यु लेटर... सिया!!”

इतक बोलून आरोही नी कॉम्पुटर बंद केला आणि आई शी बोलायला बाहेर गेली....

“आई कोण येणारे ग मला पाहायला? तू भेटली आहेस का? आणि मुल पाहण कसल वाटत... खर तर आम्ही हॉटेल ला भेटलो असतो पण तू म्हणालीस म्हणून घरी भेटतो आहे... ”

“नाही ग.. मी कुठे भेटणार... उद्या येईल तेह्वाच होईल भेट! पण त्याची माहिती आणि फोटो पहिला... तुझ्यासाठी एकदम योग्य वाटला मला तो मुलगा... आणि तू पहिल्यांदीच लग्नासाठी मुलाला भेटणार मग हॉटेल मध्ये कश्याला... घरीच भेट म्हणून तुला सांगितलं घरी भेटा.. ”

“ओके... तो काय करतो? आणि काय नाव आहे? अमेरिकेत जाणार नाहीये ना? मी स्पष्ट सांगते,मी अमेरिकेला जाणार नाहीये... अमेरिकेला जायचा प्लॅन असेल तर आत्ताच नकार कळव...”

“नो नो आरोही ... तो इथे बिझिनेस करतो.. अगदी कधी अमेरिकेला किंवा भारता बाहेर गेला तर थोडे दिवस त्याच्या मर्जिनी... आणि त्याच नाव आरव!! मुलगा चांगला वाटला.... म्हणूनच तुला बघ म्हणून सांगितलं!”

“ओह.. आरव!! आणि तो बिझिनेस करतो! जगभर हिंडतो? मग गुड... एक तरी साम्य आहे! हाहा! ”

“तुला फोटो पहायचाय का? माझ्याकडे त्याचा फोटो आहे..”

“नको..उद्याच भेटेन.. तू फोटो पहिला आहेस ना? मग बघणेबल नक्की असेल.. हाहा..”

“हे घे,त्याची माहिती वाचून घे...”

आरोही नी आरव ची माहिती वाचली.. माहितीवरून तो एक चांगला मुलगा वाटला... आणि त्याला भेटायसाठी ती उत्सुक झाली!

-----------------------------------------------------------------------------------------------

आरव आणि त्याच्या घरातले आरोही ला पाहायला आले... आरव नीट नेटका पेहराव करून आरोहीच्या घरात शिरला! आरव घरात आला आणि आरोही तिथेच होती.. तिनी आरव ला पाहिलं..तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आल आणि ती पुटपुटली,

“गुरु?”

आरव नी दारातूनच आरोही ला पाहिलं आणि आश्यर्य चकित होऊन तो पुटपुटला,

“अनिशा??”

दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि दोघ जोरजोरात हसायला लागले... दोघांच्या घरच्यांना कळल नाही दोघ का हसतायत म्हणून आरव च्या आईनी आरव ला आणि आरोही च्या आईनी आरोही ला विचारलं,

“का हसताय दोघ? तुम्ही एकमेकांना ओळखता का?”

आरोही तिच्या आईला म्हणाली,

“काही नाही आई.. आम्ही जरा माझ्या रूम मध्ये जाऊन बोलतो.. चालेल ना? वी नीड प्रायवसी! जरा बोलायचं आहे! आम्ही माझ्या रूम मध्ये भेटलो तर काही प्रॉब्लेम नाही ना?”

एकमेकांना फक्त बघूनच एकदम दोघांना काय बोलायचं असेल ह्या विचारात दोघांच्या घरचे पडले! पण नकार न देत आरोही आणि आरव च्या आई नी होकार दिला.. आरोही आणि आरव आरोही च्या रूम मध्ये गेले.. आरोही नी दार लाऊन घेतलं..आरोही आणि आरव जोरजोरात हसायला लागले..

“गुरु ह... अमेरिकेत राहतोस.. हेहे!” हसू आवरत आरोही आरव ला म्हणाली...

“आणि तू अनिशा. अमेरिकेत जॉब करतेस....” आरवला सुद्धा हसू आवरत बोलला...

दोघ परत जोरजोरात हसायला लागले... जरा वेळानी दोघ शांत झाले.. आणि आरोही बोलायला लागली...

“मी नेहमी बाय म्हणते पण काल चुकून सिया म्हणून गेले आणि आपण आज खरच भेटलो? हाहा! खरच, अनावधानानी मी सिया म्हणून गेले! किती छोट आहे ना जग.. बाय द वे मला तुझ नाव गुरु नाही हे सांगितलं होतस पण तूच आरव असशील अशी मला शंकाही आली नाही...म्हणजे मी माहिती वाचली होती पण तरी मला नाही वाटल तूच गुरु असशील! हाहा!”

“हाहाहा! नो वॉट, मलाही.. शंका आली नाही तू अनिशा म्हणजे आरोही आज मला भेटशील..”

“हाहा... मला हसू आवरता येत नाहीये.. मला वाटतंय जेह्वा मी तुला सांगितलं उद्या मी बोलायला येणार नाही तेह्वाच माझ्या आईनी तुला फोन केला होता... बरोबर?”

“हो हो.. तेह्वाच काकूंशी बोलत होतो..”

“सुरवातीला तू किती फेका मारल्यास... मला माहित होत खर कोणी बोलत नाही चॅट रूम! पण आपण दोघ मराठी म्हणून कळल तेह्वा जरा मोकळेपणानी बोललो...”

“बाकी कोणी असत तर मी अजून काहीही सांगितलं असत पण तुला नाव,कुठे राहतो आणि काम सोडलं तर मी काही खोट बोललो नाही.. माहित नाही... तुला पाहूनच काहीतरी वाटलेलं मला..”

“सिरिअसली?... ओ माय गॉड... सेम हिअर!! मला पण तुझ्याशी बोलून काहीतरी वाटल होत... आणि तू बाकीच खोट बोलला नाहीस? तस असेल तर भारीच!! मी तुझ्याकडून पेंटिंग शिकून घेईन!! आणि तू सांगितल्या प्रमाणे लग्न झाल्यावर तू मला खायलाही करून देशील? हो ना? कि ते खोत सांगितलं होतास? तुझ्या हॉबीज आणि बाकी माहिती काल मी वाचली पण फोटो नाही पहिला कारण मी विचार केला डायरेक्ट भेटूच...”

“आय टोल्ड यु.. फक्त नाव आणि कुठे राहतो हे खोट होत! बाकी सगळ खर! अगदी १००% खर... आपल लग्न झाल कि नक्की खायला बनवून तुला खायला देईन!! आणि मी पण विचार केला... कश्याला फोटो बघा... डायरेक्ट भेटूच! हाच विचार करून मी पण फोटो पहिला न्हवता.... म्हणजे मी पहिल्यांदीच असा मुलगी पाहायला आलो आज.. त्यामुळे जरा गोंधळलेला होतो! आणि फोटो पहायचे कष्ट न्हवते घेतले! ”

आरोही गोड हसली!

“तुला अजून काही प्रश्न असतील तर विचारून घे.. त्याची खरी उत्तर देईन... हाहा..” आरव म्हणाला

“हाहा... बर झाल तूच म्हणलास! मला आहेत काही प्रश्न! महत्वाचे प्रश्न! तुला कोणत व्यसन आहे? दारू किंवा स्मोकिंग?”

“नो नो.. माझ्याकडे पाहून मी असा वाटतो का तुला? डोंट वरी! मी दारू पीत नाही किंवा सिगरेट सुद्धा ओढत नाही! मला कधी असल्या गोष्टींची कधी गरज घ्यावीशी वाटत नाही!!”

“ग्रेट!!”

“बाय द वे, तू चॅट रूम वर असतोस का सारखा?”

“नो नो.. मला नाही आवडत आरोही आभासी जग... पण माझ्या एका मित्रानी मला फोर्स केला आणि मी चॅट रूम जॉईन झालो.. मी फक्त तुझ्याशीच बोलतो चॅट रूम वर! बाकी कोणाशी बोलावस पण वाटल नाही आणि इतका वेळहि नसतो! तू सारखी असतेस चॅट रूम वर? आणि लग्न झाल्यावर पण तू चॅट रूम वर असणार?”

“आपल्यातल अजून एक साम्य...मला पण नाही आवडत आभासी जग! त्यापेक्षा मी खरे मित्र करण्यात जास्ती इंटरेस्टेड असते! मला पण मैत्रिणीनी फोर्स नाही पण इंसिस्ट केल म्हणून चॅट रूम जॉईन केल.. आणि मी पण फक्त तुझ्याशीच बोलते चॅट रूम वर! आणि लग्न झाल्यावर पण चॅट रूम वर असेन हे मी ते असच म्हणाले होते! माझा ते सांगण्याचा उद्देश होता कि मला माझ आयुष्य माझ्या मनाप्रममाणे जगता आल पाहिजे! ”

“हो हो! जगण्याच स्वातंत्र मिळालच पाहिजे! मी हि त्याच विचारांचा आहे! आय थिंक वी कॅन नो इच अदर मोअर! म्हणजे आपण तसे एकमेकांना खूप ओळखतो पण मला तुला अजून जाणून घ्यायला आवडेल! मला तू आवडली आहेस! तुला भेटून मला अनोळखी वाटली नाहीस! मी तुला खूप ओळखतो अस वाटतंय! चॅट रूम वर बोलल्यामुळे असेल कदाचित!!! मला चॅट रूम चा हा फायदा माहित न्हवता!!! हाहा! आणि, फायनली.. मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवायला आवडेल!!! मग, घरच्यांना सांगायची पसंती?”

“येस येस.. व्हाय नॉट! मला हि तुझ्याशी अजून खूप बोलायचं आहे! पूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायला मी उत्सुक आहे! माझाही होकार आहे!” आरोही खुश होऊन म्हणाली!!

इतक बोलून दोघ रूम च्या बाहेर आले ते हातात हात घालून आणि चेहऱ्यावर स्मित हास्य घेऊन...त्यांचा होकार त्यांनी घरातल्यांना सांगितला... पहिल्या भेटीतच होकार कसा आला ह्याचा विचार सगळे करायला लागले! दोघ खोलीत काय बोलले ते घरच्यांना कळायला कोणतीही मार्ग न्हवता. इतक्या लगेच होकार आला ते चांगल झाल म्हणून पण होकार इतक्या लवकर कसा आला असेल अश्या विचारांनी सगळे जण त्या दोघांकडे आश्यर्यानी पाहात राहिले....

अनुजा कुलकर्णी.

Email id-