सत्य स्वीकारलं कि आयुष्य नक्की बदलत... Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सत्य स्वीकारलं कि आयुष्य नक्की बदलत...

सत्य स्वीकारलं कि आयुष्य नक्की बदलेल..

आयुष्य एकदम सुरळीत चालू असत...पण आयुष्याच्या कोणत्या तरी एखाद्या टप्प्यावर संकट न सांगताच समोर उभे ठाकत.. कधी कधी आयुष्यात अश्या काही दुर्दैवी घटना घटतात की त्या घटना पूर्ण आयुष्य बदलून टाकतात... कधी कधी लहान लहान प्रसंग आयुष्यात न सांगून येतात आणि काही कळायच्या आत आयुष्य बदलवून टाकतात.... म्हणजे प्रत्येकवेळी अगदी जीवन मरणाचा प्रश्न असेल अस नाही...पण तरीही छोट्या छोट्या संकटं सुरळीत चालू असलेल आयुष्य बदलून टाकण्यात यशस्वी होतात... आयुष्यातल्या काही घटना तर इतक्या भयानक असतात की सगळ आयुष्य बदलायची शक्यता असते! आणि मग आता आयुष्य बदलून जाणार हे सत्य स्वीकारून पुढे जाताच येत नाही.. सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात..त्याच क्षणात आपण अडकून राहतो आणि आयुष्य दुखी करून घेत असतो... खरच आहे कि, सत्य परिस्थिती स्विकारण सोप्प नसतच...पण सत्य न स्वीकारता आल्यामुळे जीवन अवघड होऊन बसत.. इतक अवघड कि जगण्यातला आनंदच हरवून जातो! मनावर नैराश्याचे ढग जमा होतात आणि मन निराशेच्या गर्तेत पूर्णपणे अडकून जात... डोक्यात सतत विचारचक्र सुखानी जगण थांबवून टाकत.. "मलाच का..मी काय केल होत आणि मला इतका त्रास होतोय,माझ्याच नशिबात अस का,मीच का इतकी दुर्दैवी..” असे बरेच प्रश्न सारखे सारखे समोर येऊन ठाकतात...सतत तेच विचार...त्यातून बाहेर पडण अशक्य व्हायला लागत....विचारांमध्ये भर पडते ती स्व:ताची दुःख नेहमीच इतरांच्या दुखापेक्षा मोठीच असतात ह्या विचारानी पदरी अजुनच निराशा येते...मन कमकुवत झाल कि आयुष्यातला रस संपायला लागतो.... आयुष्य बेरंग व्हायला लागत! पण तस पाहायला गेल तर कोणतीही समस्या/संकट छोटी किंवा मोठी नसतेच ना...संकट,दुःख येतात आणि जातात पण त्यानी आयुष्य जगण थांबवायचं तर नसत.... आपल्या समोर येणाऱ्या संकटाला किंवा दुःखाला आपण कश्या पद्धतीनी समोर जात असतो ते त्याचा प्रभाव कमी किंवा जास्त करण्याला कारणीभूत असत..समजायला इतक सोप्पा पण तेही समजायच्या मनस्थितीत नसतोच आपण...सगळी दार बंद झालीयेत आणि समोर फक्त अंधाराचाच साम्राज्य उरणार ह्या विचारांनी मन आणि आपण अधिकाधिक कमकुवत व्हायला लागतो..हळू हळू मनाच खच्चीकरण व्हायला लागत...चक्रव्यूहत अडकल्यासारख वाटायला लागत...ते चक्रव्यूह कधी भेदता येणार नाही आणि जन्मभर निराशेतच जगणार ह्या विचारांनी मन अधिकाधिक कोमेजायला लागत... काही उपाय मिळत नाही! मन कोमेजायला लागल कि काहीच करावस वाटत नाही..पण मनाच कोमेजण थांबवता येतच आणि ते आपल्याच हातात असत...सगळ्यात महत्वाचच म्हणजे सत्य परिस्थिती स्वीकारून जगण चालू करायच...जे झाल ते होणार होत, मग जे झाल त्याच दुःख का करायच...असा साधा सरळ विचार आयुष्य पूर्व पदावर आणायला पुरेस असत...गरजेच असत ते फक्त सत्य स्वीकारण्याची!!!! सत्य स्विकारण म्हणल तर खूप सोप्पा म्हणल तर खूप अवघड....खर सांगायचं झाल तर कटू सत्य स्वीकारण हे कधीहि अवघड असत....एका प्रसंगामुळे जेव्हा सगळ आयुष्य बदलत ते सत्य स्वीकारण सोप्पा नसतच .. पण स्वताला वाटल कि ते पुरेस आहे! इच्छा शक्तीच्या जोरावर सत्य स्विकारण शक्य होत! त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो.. पुढे जायचं असेल आणि भूतकाळात अडकायचं नसेल तर सत्य स्वीकारायच ते स्वताला वेळ देऊन!...स्वतासाठी दिलेला वेळ...स्वताची समजूत काढून कधी स्वतालाच रागावून सत्य परिस्थिती मान्य करवून घ्यावी...त्याला वेळ लागतो..सत्य स्विकारण म्हणजे स्वतःशी लढाई करण्यासारखाच... इच्छेविरुद्ध आहे ते मान्य कराव लागत..त्याशिवाय काही पर्यायही नसतो...त्रास होणार हे नक्की असत..पण ज्याक्षणी आपण सत्य स्वीकारू, त्या क्षणापासून मग परत एकदा मोकळा श्वास घ्यायला सुरवात होते... नवीन दरवाजे उघडतात आणि दुःख मागे पडायला लागतात आणि आयुष्य पुन्हा एकदा रुळावर यायला लागत्...नवीन गोष्टीत रस वाटायला लागतो.. फक्त एक क्षण महत्वाचा असतो,जेव्हा सत्य स्वीकारतो...तो क्षण अत्यंत महत्वाचा असतो...मन एकदा का रुळावर आल की परत मागे फिरून अंधारात जात नाही आणि प्रकाशाकडे धावत सुटत...सगळे प्रश्न आपोआप सुटायला लागतात...झाल त्याच दुःख वाटण बंद होत...सगळ्या समस्या..आणि समस्येमुळे आलेल्या दुःखाच काही वाटेनासाच होत... होणार होत आणि झाल... ते बदलता येणार नाहीये हे एकदा मान्य झाल कि परत आयुष्याची गाडी रुळावर आणून ठेवायची आणि जगण परत एकदा चालू होत अगदी आनंदानी...आयुष्य परत पहिल्या सारख चालू होत,एकदम मजेत आणि आनंदात....त्या आनंदासाठी फक्त सत्य स्वीकारायाच मग सगळे प्रश्न आपोआप सुटणार हे नक्की...

अनुजा कुलकर्णी.

Email - anuakulk@gmail.com