Parusatali Ratra, Maiya Kholitun... books and stories free download online pdf in Marathi

पाऊसातली रात्र, माझ्या खोलीतून...

“पाऊसातली रात्र, माझ्या खोलीतून…”

मस्त हवा पडली होती बाहेर!!! झोपायला जरा उशीर झाला होता!! बेड वर नुकतीच पडली होते... जास्त दमवणूक झाली म्हणून असेल पण झोप काही लागत न्हवती...रात्रीचे १२ वाजून गेले होते! रात्रीही खूप उकडत होत..पण बघता बघता हवा एकदम बदलली...खूप उकडून नुकताच पाऊस चालू झाला होता...ढगांचा गडगडाट आणि मधेच चमकणारी वीज थरकाप उडवत होते....तेह्वा पाऊसाचा जोर फार न्हवता पण पाहता पाहता पाउसाचा जोर वाढला...आणि एकदम गार वारा सुटला. इतरवेळी उठून खिडकीतून पाऊस पहाते..त्यादिवशीही खिडकीत पासून पाऊस पाहायचा होता पण दिवसभराच्या दमवानुकीनंतर बेड वरून हलायची सुद्धा अजिबात इच्छा होत न्हवती आणि अंगात ताकदहि न्हवती!!! आणि बेड वर झोपूनच खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस पाहत होते!!! अंगावर काटा आणणारा बोचरा वारा होता खिडकीतून आत येत होता!!! मी पांघरूणात स्वताला गुरफटून घेतलं....बोचऱ्या वाऱ्यांनी अंगावर काटा आणला होता....पण वातावरण एकदम आल्हाददायी झालेलं!! पाऊसामध्ये रात्रीची हवा इतकी मस्त असते. सतत बाहेरच्या पाउसाकडे पाहत बसावस वाटत!!! माझ्या बेड वर पडले कि खिडकीतून आकाश दिसत...आणि पाऊसात रपा रप पडणारा पाऊसही दिसतो. नेहमीच्या सवयीनी बाहेर पाहत होते....बाहेर पाहता पाहता झोपत होते. बाहेर पडणारा पाऊस बघत बघत मला डुलकी लागायला लागली तेह्वाच अन्पेक्षितपणे पाऊसाचे २-३ शिंतोडे तोंडावर उडाले….आणि होती न्हवती ती झोप पुरती उडवून गेले ते पाऊसाचे थेंब!!! खडबडीत जागीच झाले मी!! थोड्यावेळापूर्वी मरगळून गेलेली मी,पाउसाच्या थेम्बच्या स्पर्ष्यानी एकदम ताजीतवानी झाले..पाउसाच्या थेंबांचा थंडगार स्पर्ष्यानी मन प्रफ्फुल्लीत झालेलं....आणि दिवसभराचा शिणवठा कुठच्या कुठे पळवून गेलेला!! तेह्वा मला भास झाला, पाउसाचे शिंतोडे जणू काही मला उठवून जागा करतोय आणि म्हणतोय,”झोपतेस काय? बाहेर बघ,किती सुंदर दिसतंय”!!! मग बेड वर झोपून राहाण केवळ अशक्यच होत मला...मग काय,उठले आणि खिडकीतून बाहेर पाहत बसले!!!! किती तरी दिवस रात्रीच्या पाउसाची मजा अनुभवावयाची होती पण जमत न्हवत पण जमल... तेह्वा किती वाजले होते कोण जाणे...घड्याळ पहायलाही वेळ न्हवताच माझ्याकडे!! मला घाई झाली होती,पाऊसात हरवून जायची...ढगांच्या गडगडाटात धुंद होऊन जायची!!!

रात्रीचा पाऊस बघायला खरच किती मजा येते!!! रात्री फक्त बरसणारा पाऊस आणि मीच होते...किती मस्त!!! त्रास द्यायला कोणी न्हवत....पाऊसाच्या नृत्यात जणू हरवूनच गेलेलं मी....पाऊस पाहता पाहता चंद्राची आठवण झाली एकदम...बराच वेळ चंद्र शोधत होते पण तो चंद्र ढगांच्या आड कुठेतरी लपून बसलेला!!! किती शोधाल पण तो मिळालाच नाही...मग परत बरसणाऱ्या पाउसानी लक्ष वेधल..परत पाऊस पाहण्यात गुंग झाले मी..रस्त्यावरचे दिवे गेलेले..सगळीकडे अंधार गुडूप होता पण आकाशात एक प्रकारचा प्रकाश होता. कुठून येत होता तो प्रकाश कोण जाने...पण कोणीतरी आकाशात छोटासा दिवा लाऊन ठेवला आहे असच वाटत होत. अनपेक्षितपाने खूप काही अनुभवत होते मी...बाहेर सुन्न करणारी शांतता होती!! मला रात्रीची शांतता फार काही आवडत नाही पण नेहमीच्या रात्रीच्या वेळीची वाटणारी भयाण शांतता पाऊसात मात्र हवी हवी शीच वाटत होती!!! परत परत अनुभवावी अशी शांतता होती ती!! फक्त शांतता चिरणारा पाऊसाचा आवाज आणि मध्ये मध्ये रात किड्यांचा कीर कीर आवाज! बाकी लोकांची वर्दळ नाही कि गाड्यांचे आवाजही नाहीत..सगळीकडे अंधारच साम्राज्य..अंधारात हालणार नारळाच झाड पाहिलं कि छातीत होणारा धस्स!!! भीती वाटली तरी परत परत झाडाकडे पाहत बसावस वाटत होता. भीती वाटत असूनही झाडाकडे पाहण बंद केल न्हवत मी. बाहेर पडणारा पाऊस पहिला आणि पाऊसात हात घालायचा मोह थांबवू शकण अशक्यच होता मला!!! पाण्यात हात ओले केले आणि समाधानच हास्य चेहऱ्यावर उमटलं...किती मस्त अनुभव मी घेतले होते. खूप मस्त वाटत होता काळाकुट्ट अंधार आणि ती कधी न अनुभवलेली शांतता अनुभवतांना!!! रात्र अजूनच गडड होत होती आणि वातावरण अजूनच मस्त होत होता!!! मनात विचार येत होता, “आयुष्या असाच सुंदर असाव” तितक्यात समोर वीज चमकली. देवाकडून होकार आल्याचा कौल मिळाल्यासारख वाटल..आणि मन प्रफ्फुलीत झाल !! ढगांचा कडकदाट थरकाप उडवत होता पण त्याची हि वेगळीच मजा येत होती!! तितक्यात आकाशात काहीतरी चमकून गेल आणि उडती तबकडी पहिल्यासारखा वाटल मला... चुकून एखादी उडती तबकडी वाट चुकून पृथ्वी जवळ आली असेल आणि ती मला दिसली असेल अशी फक्त एक वेडी कल्पना होती ती!!! कधी कधी वेड्या कल्पनेत राहण्यातही किती मजा असते!! वेगळ्याच जगात गेल्याचा आभास होत होता मला! बराच वेळ पाऊस पडताच होता!!! रस्त्यावर पाण्याची नदी झालेली..बाहेर जाऊन होड्या टाकायचा मोह झालेला पण तो मोह आवरता घेतला!! पाऊसात न भिजाता पण मी चिंब भिजून गेले होते. मी पाऊसाचा प्रत्येक थेंब अंगावर घेतीये असा जणू भासच होत होता मला! हि रात्र कधी संपूच नये अस वाटत होता मला. माहित नाही किती वेळ झाला होता.... तेह्वा घड्याळाकडे लक्ष गेल.....खूप उशीर झाला होता! रात्रीचे २ कधी वाजून गेले ते कळलही न्हवत...डोळे जड ह्यायला लागलेले म्हणून बेड वर पडले. अगदी क्षणात झोपेनी मला घेरल आणि पाउसाच्या स्वप्नात मी हरवून गेले!!!

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED