Kantala Aalaya koi Baat Nahi books and stories free download online pdf in Marathi

कंटाळा आलाय कोई बात नही

कंटाळा आलाय? कोई बात नही!!!

खरच, “नेमेची येतो पाऊसाला” तसाच “नेहेमीच येतो कंटाळा” अस काहीस झालाय!!! कश्या कश्याचा कंटाळा आलाय ते कळतच नाही..भूत मागे लगाव तसा कंटाळा पाठ सोडत नाहीये हल्ली....तस पाहायचं तर लहानपणीपासूनच कंटाळा मागे लागलाय. लहानपणी कंटाळा क्वचितच यायचा कंटाळा.. पण आता कंटाळ्याच गाण रोजचच झालाय!! सगळ्याचाच कंटाळा येतो हल्ली!!! दिवसातून नाही तर २ दिवसातून एकदातरी “कंटाळा आलाय आता!!” हे वाक्य येताच! रोज तेच तेच जगायचं ..आयुष्यात काही नवे पण राहिलाच नाहीये अस वाटतंय ... रोज तेच रुटीन....सकाळी लवकर उठायचं ...व्यायाम करायचा मग चहा पितांना पेपर वाचायचा...पेपर मध्ये काहीही नवीन नाहीच...त्याच ठरलेल्या बातम्या...मग काय,पेपर वाचायाचाही कंटाळाच!!! पेपर वाचून झाला कि अंघोळ आवरायची...पण थंडीत अंघोळीचा हि कंटाळा येतो तरी मन मारून, अंघोळ आवरून ऑफिस गाठायचं ..अगदी रोजच!! शनिवार रविवार सुट्टी असली तरी काम पिच्छा सोडतात कुठे...मग घरी पण काम!!! ऑफिस मध्येहि रोज तोच तोच पणा ...कामाचा कंटाळा आला तरी ते काम करायचं....कधी कधी काम बदलल तरी ऑफिस तेच आणि आजूबाजूची लोकही तीच ...फिरतीच काम असेल तर शेवटी हिंडायचाही कंटाळा येतोच... कंटाळा आला म्हणून मित्रांना भेटलं कि तेच तेच विषय..शेवटी काय? कंटाळाच!!! दमून निवांत बसले तरी स्वताशी किती वेळ बोलणार? त्याचाही कंटाळाच!!! खादाडपणा माझ्या अंगी मुरलेला..नवीन नवीन पदार्थ आवर्जून खायची माझी आवड पण हल्ली नवीन कश्याची चव पाहायला सुद्धा कंटाळा येतो मला!! हवापालट म्हणून कुठे ट्रीप ला जायचं ठरवते मी.. कुठे जाता येईल ह्याची खूप नाव डोळ्यासमोर येतात मग त्यातलं एक ठिकाण नक्की करून मी ट्रीप ला जाते..तिथे ४ दिवस मजा करते पण पाचव्या दिवशी मजेचा देखील कंटाळा येतो!!! नवे पण आल तरी त्या नवेपणाचाही लवकरच कंटाळा हा येतोच!!! उन्हाचा कंटाळा..उन्हाळा गेल्यावर पाऊस येतो पण खूप पाऊस आला तरी कंटाळाच,रविवार नंतर सोमवार चा कंटाळा,आनंदानंतर दुखाचा कंटाळा,नवीन नंतर जुन्याचा कंटाळा....आणि नवेपणाचाही कंटाळाच!!! एकूण काय,”नव्याचे नऊ दिवस”!! १०व्या दिवशी कंटाळा मागे मागे येतोच!!! ह्या कंटाळ्या च्या यादीला अंत नाहीचे अस वाटतंय!! म्हणजे काय,कंटाळा पाठ सोडणार नाही....काय कराव काही सुचत नाही ..भरपूर पैसे ..भरपूर मित्र ..सगळाच भरपूर आहे पण त्याचाही कंटाळाच आलाय मला ...कधी कधी अति सुखाचाही कंटाळा येतो.... खर तर,आता कंटाळा येण्याचाही कंटाळाच आलाय ...आता बघू काय करून आलेला कंटाळा घालवता येईल...कंटाळा जाईल पण त्या परत नवीन गोष्टीचाही कंटाळा आला नाही म्हणजे मिळवलं ... शेवटी काय,कंटाळा आयुष्यातून जाईल अस वाटत नाही पण परत कंटाळा आला तरी “कोई बात नहि”, म्हणायचं आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं!! कंटाळा येतो म्हणून तर नवीन नवीन काही करण्याची उर्मी तर जागृत होते. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येतो आणि म्हणूनच नव्याचा शोध लागतो...म्हणजे कंटाळा येण फार काही वाईट नाही!! हो ना? कंटाळा आला,तर येऊ द्या...त्यातूनहि काहीतरी नवीन मिळेलच ज्याचा कंटाळा येणार नाही! अगदी छोटीसी नवीन गोष्ट सुद्धा मन टवटवीत करेल आणि उत्साहानी नेहमीच काम करायला उर्मी येईल! कंटाळा आल्यावर काहीतरी नवीन केल्यानी जुन्या गोष्टीतला उत्साह परत मिळण्यात यश मिळेल आणि आयुष्य कांटाळ मुक्त होण्यात मदत होईल ने नक्की!!!

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED