Nisargachya Sahavaasaat ... books and stories free download online pdf in Marathi

निसर्गाच्या सहवासात ...

निसर्गाच्या सहवासात...

धकाधकीच्या आयुष्यात निवांत वेळ मिळतच नाही.. पण रविवार ची दुपार माझ्या हक्काची असते... पाऊसाण्यात रविवार आणि दुपारचा चहा बाल्कनी मध्ये हे बरीच वर्ष कटाक्षानी पाळती आहे. पाउसाच्या दिवसात दुपारचे ३ वाजले कि माझा मुक्काम असतो बाल्कनी त! मी आणि माझा मसाला चहा ज्याच्या शिवाय माझी रविवार दुपार चा विचारही करू शकत नाही! आलं,सुंठ,वेलची,तुळस,बेल असेल तर गवती चहा घालून चहा बाल्कनी त बसून पिण्याची मजा काही औरच आहे! खर सांगते, बाल्कनी चहा पिला कि तो अजून जास्त “चवदार” लागतो! तो चहा अजून जास्त चवदार का लागतो याचं कारण मला आजवर कळलेलं नाहीये! शोध चालू आहे,आणि लवकरच उत्तर मिळेल अशी आशा आहे!

बाहेर मस्त पाऊस पडत असेल आणि बाल्कनी त बसून चहा पिणं म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः स्वर्ग सुखाचं! मला वेध लागतात बाल्कनी चे आणि माझी नशीब बलवत्तर असेल, बाहेर पाऊस पडत असेल तर काय सांगू? बाहेर मस्त पाऊस,मी बाल्कनी त आणि हातात गरम गरम वाफाळलेला चहा असेल तर त्यापेक्षा सुख अजून काय असेल? पाऊस पडला कि आसमंतात नवचैतन्य येत.. झाड टवटवीत होतात आणि माणसाची मन सुद्धा!!! आणि त्यात मला सगळ्यात आवडतो तो पाऊस पडल्यावर येणारा सुवास...मस्त !!!!

पाऊस पडून गेला आणि ऊन आल कि हळूच येणारा इंद्रधनुष्य मनाला एकदम तरतरीत करून जात आणि माझी ते इंद्रधनुष्य कॅमेरात टिपण्याची गडबड सुरु होते! कधी कधी मस्त फोटो मिळाला कि मी प्रचंड खुश होऊन जाते. मागे एकदा पाऊस पडून गेल्यावर इंद्रधनुष्य आल होत तेह्वा एक कविता सुचलेली -

ऊन पावसाच्या खेळात, हळूच येत इंद्रधनुष्य,

सुखावून जात साऱ्यांचीच मन!

आयुष्यही आहे असाच,सुख दुःखाच्या खेळात,

एक क्षण आनंदाचा बदलून टाकतो सारच जीवन!

एकदा असाच पाऊस पाहत चहा पीत होते त्याक्षणी माझ्या मनात एक विचार चमकून गेला,आणि मला प्रश्न पडला,सुख माझ्या आजूबाजूला असतांना मी सुख इकडे तिकडे का शोधात असते? डोळे उघडे ठेवून पाहिलं कि लक्षात आल, मी जे सुख शोधतीये ते माझ्या शेजारीच आहे, अजून खोल विचार केला तर अस लक्षात आल ते माझ्या अंतरंगात पण आहे. फक्त मी ते दूरवर कुठेतरी शोधत बसलीये आणि मला कळून चुकल, तो सुख शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न होता!!!

माझ आणि बाल्कनी च नक्कीच काहीतरी नात नक्कीच आहे! बाल्कनी त बसलं कि अक्षरशः सगळ जग विसरायला होत! कणा कणात चैतन्य असल्याची खात्री पटते! मस्त झाडांशी,पक्ष्यांशी गप्पा मारता मारता वेळ कधी अन कसा निघून जातो कळतंच नाही! फुलांनी,फळांनी लगडलेली झाड पहिली कि मन एकदम प्रसन्न होत आणि स्वतःची दुख विसरले तर त्यात काही नवल वाटत नाही! आणि अगदी रोजच, झाडांकडे पाहता पाहता एक विचार मनाला चाटून जातोच! झाडं त्यांच्याकडे जे आहे ते सगळ देतात,अगदी फळ,फुलांबरोबरच जळणासाठी खोड पण देतात अन ते हि की अपेक्षा न करता, तेह्वा लक्षात येत आपण किती छुल्लक आहोत! झाड फक्त देत, काहीही अपेक्षा न ठेवता. मला खात्री आहे, देव किंवा ज्यांनी कोणी ( मला देव आहे कि नाही या गोष्टीबद्दल वाद घालायचा नाहीये..) जीवन निर्माण केल आहे त्यामध्ये सगळ्यात विचार करून,निस्वार्थी अस कोणाला बनविल असेल तर ते नक्कीच झाडं असेल ह्यात मला काही शंका नाहीये!

सुक्ष्म निरीक्षण केल तेह्वा माझ्या एक गोष्ट लक्षत आली, झाडांबरोबर पक्षी,प्राणी,फुलपाखर आणि माझ्यासाठी अगदी सापापर्यंत सगळेच आपल्याबरोबर एक सकारात्मक उर्जा घेऊन जगत असतात! आपण रोजच मुंग्या पाहत असतो.. खूप वेळा आपण सहजपणे मुंग्यांना मारून टाकतो पण कधी विचार केलाय? दिसायला एकदम छोट्या पण वेळ पडली तर चावणाऱ्या मुंग्या! त्या काही झाल तरी हार मानत नाहीत आणि आपण स्वतःला बुद्धिमान समजणारे जीवनाला कंटाळून स्वतःला संपवायचा प्रयत्न करत असतो आणि सतत कोणत्यातरी दुखाला ओंजारत बसलेलो असतो! मला मुंगी नी शिकवलंय, आयुष्यात हार मानायची नाही आणि समोर कितीही प्रश्न उभे राहले तरी पुढे चालत राहायचं न घाबरता!

निसर्गात जे आहे ते सगळ खूप सुंदर आहे! निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचा विसर पडला नाही तरच नवल! पाहता पाहता वेळ कसा निघून जातो काही काळात पण नाही! हि दुपार कधी संपूच नये अस वाटत असतांना बघता बघता ४ वाजतात मग इतर उद्योगांची आठवण यायला लागते! जायची इच्छा नसते पण जाव तर लागताच पण एकदम ताजतवान होऊन,प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकून,प्रसन्न मनानी पुढचा आठवडा सुरु करायला तयार होते परत पुढच्या रविवारी परत यायला......

अनुजा कुलकर्णी.

Email id-

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED