Pakshi - Maze Jivlag Mitra... books and stories free download online pdf in Marathi

पक्षी- माझे जिवलग मित्र...

पक्षी- माझे जिवलग मित्र...

काऊ आणि चिऊ लहानपणीचे खूप आवडणारे पक्षी आणि अगदी पहिले मित्र होते माझे......लहान असतांना कावळा चिमणी ला भेटल्याशिवाय जेवण जायचंच नाही मला... ते समोर असतील तर किती जेवतिये तेही कळायचं नाही...पण काऊ किंवा चिऊ,कोणीच नसेल बागेत तर मी जेवण बंदच करायचे... मग आई त्यांच्या गोष्टी सांगून जेवण भरवायची....लहानपणी काऊ आणि चिऊ फक्त तिथपर्यंतच मजल गेली होती माझी.... त्यांना पाहून आणि त्यांच्या गोष्टी ऐकून मोठी झाले खरी पण नंतर अभ्यास आणि इतर गोष्टीमध्ये मी इतकी रममाण झाली कि माझ्या आयुष्यातून पक्षी कुठेतरी हरवूनच गेले...बागेत कितीतरी पक्षी यायचे...पण कोणत्याही पक्ष्याकडे पाहायला मला वेळच न्हवता... पक्षी माझ्या आयुष्यातले अविभाज्य घटक होते आणि मी त्यांना कशी काय विसरले काय माहित...आणि ती गोष्ट कधी माझ्या लक्षातहि नाही आली... एकदा वेळ मिळाला म्हणून निवांत बसले होते बाल्कनीत...काऊ आणि चिऊ बरोबर खूप छोटे पक्षी दिसले..मला कल्पनाही न्हवती,आमच्या बाहेत इतके पक्षी येतात आणि तेव्हा मला आश्चर्यच वाटल होत बागेत इतके पक्षी पाहून......खर तर ते पक्षी नेहमीच तिथे असायचे पण मी त्यांना कधी नीट पहिलाच न्हवत... त्या एका निवांत क्षणामुळे माझी पक्ष्याशी असलेली मात्री परत एकदा चालू झाली...आणि तेव्हा पासून पक्षी पाहण्याच वेडच लागल मला...तस मला नीट आठवत नाही,मोठी झाल्यावर मला पक्षी निरीक्षणाची आवड परत कधीपासून निर्माण झाली. पण हे नक्की आठवतंय,मी ब्राह्मिणी मैनेला पहिल्यांदाच इतक्या शांतपणे पाहायला वेळ मिळालेला मला...त्या छोट्याश्या पक्ष्याकडे पाहून मी इतकी आनंदून गेले होते....किती सुंदर पक्षी!!! नंतर बरेच पक्षी दिसायला लागले आणि ओळखता हि यायला लागले... त्या क्षणापासून वेगवेगळे पक्षी पहायची माझी ओढ वाढतच गेली..... त्यादिवसानंतर पक्षी पाहण माझ्या दिनचर्येचा एक महत्वाचा भाग बनला होता... ...जेव्हा जेव्हा वेळ मिळायाचा तेव्हा पक्ष्यांच्या शोधात माझा वेळ जायला लागला...मला तेव्हा निसर्गाकडे आणि पक्ष्यांकडे पाहून जगण्याची सवय लागली तेव्हा मी खऱ्या अर्थानी आनंद मिळवतीये अस मला जाणवायला लागल होत.... मी जेव्हा बाल्कनी मध्ये जाते आणि पक्ष्यांना पहाते तेव्हा मी कोणत्यातरी वेगळ्याच जगात जाते.. पक्ष्यांना पाहिलं कि सगळ्या चिंता,सगळी दुख...कुठेतरी धूसर होऊन अस्पष्ट व्हायला यला लागतात... किती सुंदर असत त्याचं जग..इतक्या असंख्य प्रकारचे पक्षी पाहून आवक व्हायला होत..पक्ष्यांकडे काहीतरी जादू नक्कीच असते..त्यांना एकदा पाहिलं कि परत परत पहायची इच्छा होते...आणि त्यांचा शोध काही थांबत नाही...आधी माझी मजल फक्त घराबाहेरचे पक्षी पाहण्यापर्यतच होती....पण नंतर हळू हळू पक्षी पहायची ओढ इतकी वाढायला लागली कि जिथे जमेल तिथे जायला सुरवात झाली...प्रथमदर्शनी काऊ,चिऊ,पोपट,वेडा राघू हे त्यातल्यात्यात ओळखीचे वाटले होते मला..पण चष्म्या,सूर्य पक्षी,शिंपी पहिले आणि लक्षात आल,प्रत्येक पक्ष्याची काहीतरी वेगळी ओळख आहे...आधी नुसते पक्षी पाहून मी खुश ह्यायाचे..पण नंतर त्यांची नाव काय,त्यांची थोडी फार माहिती,त्यांच्या घरटी कुठे असतात हे पाहायला माझी सुरवात झाली...पक्ष्यांची घरटी फार नाही दिसली..पण घरासमोरच शिंपी घरट बांधत होता....योगायोगानीच तिथे घरट आहे हे मला कळल...शिंपी चा तिथला वावर खूप वाढला होता आणि खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा नजर अचानक घरट्या वर पडली...मी कितीतरी वेळा बाहेर पाहिलं होत,पण ते घरट माझ्या नजरेतून सुटलेलं...घरट बांधण्याच त्याचं काम चालू आहे हे कळल्यावर मात्र मी त्याच्याकडे लांबूनच लक्ष ठेवायला सुरवात केली...इतक्या सुबकातेनी तो त्याच घरट बांधत होता..किती हुशारीनी कोणाच्या नजरेस पडणार नाही अस घरट त्यानी बांधल होत...त्याची तन्मयता पाहून मी आवक झालेले...मी पाहिलेलं पाहिलं घरट होत ते...मी प्रचंड खुश झालेले..घरटी सहज नजरेस पडत नाहीत...पण आता माझा घरटी दिसतायत का ह्याचा शोध चालू झाला आहे ...

हळू हळू आवाजावरून थोडे फार पक्षी कळायला लागले...सगळे पक्षी नाही...पण घराच्या आजूबाजूला असलेले पक्षी मी आवाजावरून ओळखायला लागले...कोणाचा आवाज आला तर तो पक्षी हाक मारून मला बोलावतोय असा भासही मला व्हायला लागला...पक्ष्यांचा आवाज आला तरी धावत जाऊन त्यांना पाहायचा असा कार्यक्रम चालू झाला...पक्ष्यांशी परत एकदा मैत्री करून मी भयंकर खुश झालेले...आणि आता आमची हि मैत्री आता कधीच तुटणार नाही...हे नक्की!

खरच,किती असंख्य प्रकारचे पक्षी आहेत.. दूरवरून प्रवास करून येणारे पक्षी,घराजवळ आढळणारे पक्षी...किती किती प्रकारचे पक्षी..प्रत्येक नवीन पक्षी पहिला कि माझ्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो शब्दात सांगता येणारच नाही.. कितीही वेळा त्याच त्याच पक्ष्यांना पाहिलं तर त्यांना परत पहायची ओढ संपत नाही!! ते त्याचं काम करत असतात आणि न कळतपणे आनंदाचा वर्षाव करत असतात...मी त्यांच्या दिनक्रमात कधी लुडबुड करणार नाही फक्त लांबूनच त्यांना पाहणार...मी हाताच्या बोटावर मोजाण्याएतकेच पक्षी पहिले आहेत....अजून खूप पक्षी पाहायचे आहेत...कितीही पक्षी पहिले तरी अजून पक्षी पहायची ओढ आता कधीच संपणार नाही हे निश्चित...कारण समुद्रासारखे अथांग आहे पक्ष्यांच जग...कितीही पक्षी पहिले तरी फक्त समुद्रातल्या ओंजळभर पाण्याइतकेच पक्षी पाहिलेले असतात...लहानपणी झालेली काऊ आणि चिऊ ह्यापासून पक्ष्यांशी मैत्री आता सगळ्या पक्ष्यांबरोबर चालूच पाहणार...आता फक्त एक निश्चय,वेळ मिळेल तेव्हा आणि जमेल तिथे जाऊन पक्षी पहायचे..पण त्यांना लांबूनच पाहायचं..त्यांना काही त्रास न होऊन देता...

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED