Jannu, Swargatali Apsarach Jaminivar Avtarli... books and stories free download online pdf in Marathi

जणू, स्वर्गातली अप्सराच जमिनीवर अवतरली...

जणू, स्वर्गातली अप्सराच जमिनीवर अवतरली...

कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबईच्या बाहेर पनवेल तालुक्यात आहे. तिथे बरेच पक्षी दिसतात अस वाचनात आल आणि कर्नाळा पक्षी अभयारण्यात जाण्याची मी आतुरतेनी वात पाहत होते. पण बरेच दिवस ठरवूनही आमचा कर्नाळा पक्षी अभयारण्यात जायचा योग येत न्हवता.. एक दिवस योग जुळून आला आणि आम्ही कर्नाळाल्या जायचं नक्की झाल...आणि त्याक्षणापासुन माझी स्वप्न रंजन करायला सुरवात झाली.. कर्नाळ्यात गेल्या गेल्या काय करायचं याची जय्यत तयारी चालू झाली.. कर्नाळ्यात काय काय दिसू शकेल ह्याची थोडी माहिती बघून ठेवली.. माझी स्वर्गीय नर्तक (PParadise flycatcher) पहायची खूप दिवसांपासून इच्छा होती.. बरिच ठिकाण पालथी घालूनही स्वर्गीय नर्तक दिसला न्हवता...माहिती पाहता पाहता कर्नाळ्यात स्वर्गीय नर्तक दिसतो अस माझ्या वाचण्यात आलेलं आणि कर्नाळ्यात नर्तक पाहिला अशी स्वप्न पाहायला लागले.....मला खूप मनापासून स्वर्गीय नर्तक पाहायचा होता..… खूप मनापासून!!! आणि गम्मत म्हणजे, मला नेहमी असा वाटत...मी कोणत्या अभयारण्यात गेले कि,तिथे गेल्या गेल्या तिथले सगळे पक्षी,प्राणी,साप स्वागतासाठी उभे असतील आणि वेगवेगळे फोटो द्यायला आतुर झाले असतील अश्या समजुतीत मी असते...त्याचप्रमाणे कर्नाळ्यात शिरल्या शिरल्या स्वर्गीय नर्तक मला दर्शन देईल अश्या गोड समजुतीत वावरत होते मी! तो फक्त माझा गोड गैरसमज आहे हे माहित असूनही मी प्रचंड खुश झाले होते!! आणि गोड समजुतीतच राहायला आवडत होत मला! त्यातली मजा ही औरच होती...

ठरल्याप्रमाने आम्ही कर्नाळ्यात जायला निघालो... कर्नाळ्याला जाता जाता खंड्या दिसला आणि आमच्या ट्रीप ची मस्त सुरवात झाली.. कर्नाळ्यात सगळे नाही पण थोडे तरी पक्षी दिसणार अशी एक आशा पल्लवित झाली. आम्ही कर्नाळ्यात पोह्चलो त्यादिवशी वातावरण एकदम आल्हाददायी होत... गेस्ट हाउस मध्ये राहण्याची सोय झाली होती..गेस्ट हाउस मस्त होत.....आजूबाजूला मस्त झाडी होती! जंगलाचा वास आला आणि मी ताजीतवानी झाले...गेस्ट होउस मध्ये आत शिरता शिरता माकडांनी आमच जंगी स्वागत केल....स्वागत केल म्हणण्यापेक्षा माकडांनी मला घाबरवल हे म्हणण हे जास्ती योग्य ठरेल.... हेहे! अर्थात मी घाबरले होते पण थोडी शूर होऊन त्यांना त्यांना कॅमेरात टिपलच. गळ्यातला कॅमरा बाजूला काढून निवांत बसायला लागले तितक्यात समोर शिक्रा पक्षी दिसला! आणि मग परत घाई घाई नी कॅमेरा गळ्यात अडकवून शिक्रा ला माझ्या कॅमेरात कैद करायची माझी लगबग चालू झाली.....फोटो काढून झाले आणि मग तो उडाला. पक्ष्यांनी मस्त पोसेस दिल्या आणि फोटो चांगले आले कि जग जिंकल्याचा आनंद होतो मला!! पण फोटो काढण्या आधीच पक्षी उडाले कि प्रचंड त्रास होतो मला!! आमच्या रूम च्या बाहेरच भरपूर बगळे होते.... हिरव्या गालिच्यावरचे पांढरे शुभ्र बगळे. इकडे तिकडे बिनधास्त हिंडत होते! पिवळी चोच आणि पांढरे शुभ्र बगळे.... देखणं रूप! मी फोटो काढत होते पण त्यांना त्यानी काही फरक पडल्यासारखा वाटत न्हवता!!! मनासारखे फोटो काढून झाले पण माझी नजर न पाहिलेल्या पक्ष्यांच्या शोधात होती....तेह्वाच जास्ती त्रास न होता झाडात लपून बसलेल्या नीलिमा (Verditer flycatcher ) च दर्शन झाल.. निळ्याशार रंगाचा आकर्षक पक्षी.....त्याला इकडे तिकडे उडतांना पाहून धुंद ह्यायला होत होत..कार्नाळ्यातला मुक्काम मी एन्जॉय करत होते. जंगलाची शांतता अनुभवत हिंडन चालू होत....आणि स्वर्गीय नर्तक पहायची ओढ उत्कट होत होती!!!! पण पहिल्या दिवशी स्वर्गीय नर्तक काही दिसला नाही...दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे उठून पक्षी पाहायला बाहेर पडलो...खूप हिंडलो..स्वर्गीय नर्तक काय, पण दुसरा एकही पक्षी दिसला नाही...पक्षी दिसला नाही पण वाटेत मस्त २ फुलपाखरू दिसली..निवांत बसली होती...निवांत बसलेली फुलपाखर म्हणजे क्वचित दिसणार दृश्य होत...निवांत बसलेली फुलपाखर पाहून माझे हात आपोआप कॅमेरा कडे वळले आणि किती फोटो काढू अस झालेल मला... मनसोक्त फोटो मिळाले त्यांचे... मध्ये मध्ये चुकून नर्तक दिसतोय का ह्याचा शोध चालू होताच!! पण नर्तक सोडाच, कोणत्याही पक्ष्याचा आवाजही येत न्हवता! ह्यावेळी पण नर्तकाला न पाहताच जाव लागणार ह्या विचारांनी मी खट्टू झालेल. विचारात गुंग झालेले तितक्यात समोर छोटा निखार (Scarlet Minivet) दिसला..आणि माझ्या तोंडून आहा बाहेर पडल!!! त्याचे रंग इतके मनमोहक होते...त्याच्यावरून नजर हलत न्हवती..मग भानावर आले आणि फोटो काढायची धावपळ चालू झाली...पुढून मागून मस्त फोटो मिळाले. त्याचे फोटो काढताना मला आता लगेच नर्तक दिसेल अशी काडीमात्र आशा हि न्हवती ...पण त्यादिवशी मला नर्तक दिसणार होताच!!! आता नर्तक काही दिसणार नाही आणि रूम वर जाऊन बसू अश्या विचारांनी वळले आणि अनपेक्षित पणे समोर स्वर्गीय नर्तक!!!! दिमाखात एका फांदीवर बसला होता!! जगाची पर्वा त्याला न्हवतीच मुळी... तो स्वताच्या विश्वात बुडालेला होता.. स्वर्गीय नर्तक न पाहताच पुण्याला परत जाव लागणार अस वाटत असतांनाच नर्तक समोर आलेला पाहून मला काय वाटल हे शब्दात सांगण जरा कठीणच!! नर्तक पहिला आणि त्याक्षणी मला वाटल, “जणू, स्वर्गातली अप्सराच जमिनीवर अवतरली.....” त्याच्या सौंदर्याला किती उपमा दिल्या तरी त्या कमीच पडतील....मी किती दिवस नर्तक पहायची वाट पाहत होते.. आणि नर्तक माझ्या समोर होता!!! आधी माझा डोळ्यांवर विश्वास बसत न्हवता...मग हा भास नसून खरच नर्तक समोर आहे हे कळल्यावर १ क्षण मी कुठे हरवले मला कळलच नाही....काय करू काय नको अशी विचित्र स्थिती झालेली माझी! ओरडायच होत पण मी ओरडले असते आणि घाबरून नर्तक उडून गेला असता तर काय म्हणून फक्त मनातच ओरडले!!! किती सुंदर पक्षी!! पुस्तकात पाहिलेला त्यपेक्षा किती तरी पटींनी सुंदर!! एक नजर नर्तकाला पाहिल तेह्वा अंगावर काटा आला...माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती....अंगातून एक लहर गेल्याचा आभासही झाला....प्रत्येक पक्षी प्रेमिला स्वर्गीय नर्तक पहायची ओढ हि असतेच...मला हि होती!!! जेह्वापासून पक्षी निरिक्षनचि आवड निर्माण झालेली तेह्वापासूनच नर्तकाला पहायची मी वाट पाहत होते...आणि नर्तक दिसला तेह्वा मी अक्षरश: वेडी झालेले.... एकटाच निवांत बसलेला नर्तक...त्याच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतात!!! त्याच नाव त्याच्या रुपाला साजेसाच आहे....सुंदर तुरा,सुंदर रंग..त्याची लांब लचक शेपूट हलत होती!! त्याला पाहून कोणीही तरी भान हरवल्याशिवाय राहणारच नाही.. त्याला डोळे भरून पाहून घेतलं...नर्तकाला पाहतांना मी कुठल्या जगात आहे ह्याचाही मला भान न्हवत...शेजारी कोण काय बोलताय त्यातलं एकही अक्षर मला ऐकू येत न्हवत. फक्त दिसत होता सौंदर्याची देणगी मिळालेला नर्तक... मी भान हरपून त्याच्या कडे पाहत बसलेले! ह्या सगळ्यात गळ्यात कॅमेरा आहे हे हि विसरून गेलेले...भानावर आले आणि फोटो काढायला कॅमेरा डोळ्यावर लावला पण हात अक्षरशः थरथरत होते....पटापट २-४ क्लीक केले...पण फोकस करायलाही विसरून गेले!! फोटो निट नाही आले हे लक्षात आल आणि कॅमेरा परत डोळ्याला लावला पण त्याक्षणी तो उडाला....तो उडतांना तर काय दिसत होता! अप्रतिम!! त्याची शेपूट लहारीसारखी उडत होती! समुद्राच्या लाटच जणू....ते दृश्य तर इतक अप्रतिम होत.. शब्दात वर्णन करता येणारच नाही अस काहीस ते दृश्य होत ते!!! तो उडून गेला पण मला प्रचंड आनंद देऊन गेला!! माझ्या मनातून आता तो कधीच जाणार न्हवता! त्याचा फोटो माझ्या मनावर चिकटवला गेला..किती तरी वेळ मी नर्तकाला आठवत...स्मित हास्य करत बसले होते! कोणाशी बोलायची इच्छा न्हवती...मी किती वेळ त्या देखण्या नर्तकाचाच विचार करत बसले होते कोण जाणे!!!! तो सतत डोळ्यापुढे असल्याचा भास होत होता मला...काय कराव काही सुचत न्हवत.. जरा वेळानी भानावर आले... जेवायची वेळ झालेली पण भूकेच भान तर न्हवतच...माझी पोट भरल होत नर्तकाला पाहून!! स्वर्गीय नर्तकाला पहायची माझी इच्छा पूर्ण झाली होती..आता वेध लागलेत पुढच्या वेळी कर्नाळा गाठायचे.....आणि परत स्वर्गीय नर्तकाला पाहून हरवून जायचे!!!

अनुजा कुलकर्णी.

Email id- anuakulk@gmail.com

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED