Akalpit - 3 books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित - 3

(वाचकांनी हा अध्याय वाचण्याआधी सुरुवातीचे दोन अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)

Chapter 3

बेल वाजली. दार उघडलं तर समोर तरून मुलगी उभी होती. साधारण वय माझ्या एवढंच, हातात चौकोणी बॉक्स. तिला पाहताच असं वाटलं तिला कुठंतरी पाहिलं असावं.

“आपण कोण्¿”

ती माझ्याकडं एकटक पाहतच राहिली.

“माफ करा, पण एका अपघातात माझी स्मृती पुर्णपणे गेली आहे, म्हणजे मेमरी लॉस. त्यामुळे तुम्हाला मी ओळखलं नाही. पण असं वाटतंय की मी तुम्हाला कुठंतरी पाहिलंय.”

“तुम्ही मला आणि मी तुम्हाला या आधीसुध्दा पाहिलंय. आपण दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकलो...”

“तुम्ही सायली का¿”

तिने आश्चर्याने पाहत विचारले.

“हो, पण तू कसं ओळखलंस¿”

“मला राहुलने सांगितलं होतं की कॉलेजच्या काळात माझे दोनच तर बेस्टफ्रेंड होते.”

तिला पाहून मला आनंद झाला होता. ज्या मुलीबद्दल मी राहुलकडून ऐकलं, ती आज माझ्या समोर उभी होती.

“आता कशीये तुझी डोक्याची जखम¿”

“जखम... डॉक्टर म्हणालेत की जखम बाहेरून नाही आतून आहे आणि आतल्या जखमेचं मला माहित नाही.”

मी हसत हसत उत्तर दिलं.

“मला आत बोलवणार नाहीस¿”

मी दारातून बाजूला झालो आणि तिला आत बोलवले.

“... बोलण्याच्या नादात तुला आत बोलवायलाच विसरून गेलो.”

घरात आल्यावर ती घराला सगळ्या बाजून पाहू लागली. जणू ती घरात काहीतरी शोधत होती.

“काय झालं. घराकडं असं का पाहताय¿”

“तू खुप बदललास.”

“माझ्यात काय बदल झालाय¿”

“म्हणजे आधी तू खुप घान राहायचास. तुझ्या रुममध्ये नुसता पसारा असायचा. एकही वस्तु जाग्यावर नसायची.”

तिला सोफ्यावर बसायला सांगून, मी सोफ्या समोरच्या खुडचीवर बसलो. तिने तिच्या हातातला चौकोणी बॉक्स् माझ्या हातात देत म्हणाली.

“तुझ्यासाठी आणलंय.”

“काय आहे यात¿”

“आहे काहीतरी. ४ डिसेंबरला उघडून बघ.”

“असं का¿”

“अपघातात तुझी स्मृती नष्ट झाली नसती तर नक्कीच तुला कळालं असतं. पण आता जर तू हा बॉक्स उघडलास तर तुला काही कळणार नाही.”

“असं काय आहे यात¿”

“कळेल दोन दिवसात. ते जाऊदे, मला हे सांग तू इतका सुधरला कसा¿ एक्सीडेंटमध्ये डोक्याला मार लागला, त्याचाच तर परीणाम नाही ना¿”

“असं म्हणता येईल. पण आता चांगलं तर रहावं लागेलच ना. व्यवस्थीत राहिलो नाही तर लग्न कसं होईल. तसं करीश्मानेसुध्दा मला मदत केली, घर व्यवस्थीत करायला.”

“करीश्मा¿”

“माझी होणारी बायको.”

“अच्छा. तर करीश्मा होती ती.”

“कोण¿ मी तुला आधी सांगितलं होतं का करीश्माबद्दल.”

“हो. फक्त नाव नव्हतं सांगितलं...”

बोलता बोलता ती अचानक थांबली.

“बोल.”

“काय बोलू¿”

“काहीही सांग... माझ्या भूतकाळाबद्दल सांग काहीतरी. तसही मी माझ्या हरवलेल्या आठवणी गोळा करतोय. त्यासाठी माझी मदत कर. तू मला भूतकाळ म्हणून जे काही सांगशील त्यावर मी संशय न घेता विश्वास ठेवेन.”

“भूतकाळावरून आठवलं, एक्सीडेंट झाला कसा तुझा¿”

“माहित नाही अपघात झाला कसा. कारण मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा हॉस्पीटलमध्ये होतो. तेव्हा मला माझं नाव काय आहे ते सुध्दा माहित नव्हतं. त्यानंतर मला कळालं की माझं नाव आदित्य आहे आणि पोलीसांना मी रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत सापडलो आणि ते मला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले.”

माझ्याकडं सांगायसाठी काहीही उरलं नव्हतं. म्हणून मी काय बोलावं त्याचा विचार करत शांत बसलो होतो.

“तुला माझ्याबद्दल योगशने काय सांगितलं¿”

ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजकेनं पाहत होती.

“काही खास सांगितलं नाही... त्याने फक्त एवढंच सांगितलं... की कॉलेजच्या काळात आपण तिघं एकमेकांचे बेस्टफ्रेंड्स होतो.”

मी अडखळत बोलोत होतो.

“खोटं नको बोलू. त्याने आणखी काहीतरी सांगितलं असणार माझ्याबद्दल. बरं ते राहूदे. मी आल्यापासून तू मला विचारलं नाहीस की मला तुझ्या एक्सीडेन्टबद्दल कसं कळालं ते¿”

“मी तुला विचारणारच होतो... अं... तुला माझ्या एक्सीडेन्टबद्दल कसं कळालं¿”.

“राहुलने मला सांगितलं. तो काल माझ्या ओफिसमध्ये आला होता. त्याच्याकडून कळालं.”

“पण तो तर मला तुझ्याबद्दल विचारत होता. जणू त्याला तुझ्याबद्दल काहीच माहित नसावं.”

“आणखी काय सांगितलं¿”

“आणखी काय... हेच की कॉलेज नंतर तो तुला भेटलाच नाही आणि मी सुध्दा त्याला गेल्याच वर्षी भेटलो, वगैरे.”

“आमची भेटसुध्दा गेल्या वर्षी आपल्या क्लासमेटच्या लग्नात झाली.”

मी खुडचीवरून उठलो आणि तिला विचारलं.

“तू चहा घेणार की कॉफी¿”

आधी तिने स्मितहास्य केलं आणि नंतर म्हणाली.

“चहा.”

मी किचनमध्ये गेलो. चहाची तयारी घेतली. ती किचनच्या दाराला टेकून उभी राहिली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी तिला टाळत होतो.

“तू उत्तर दिलं नाहीस.”

“कोणत्या प्रश्नाचं¿”

“हेच की राहुलने माझ्याबद्दल आणखी काय सांगितलं¿”

“त्याने एवढंच सांगितलं की आपण तिघं बेस्टफ्रेंड होतो आणि कॉलेज संपल्यावर मी कुठंतरी निघून गेलो आणि त्याला गेल्या वर्षीच भेटलो... बस.”

“त्याने हे नाही सांगितलं की आख्ख्या कॉलेजमध्ये आपण बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड म्हणून प्रसिध्द होतो¿”

“अं... म्हणजे... तसं तरी काही सांगितलं नाही.”

तिची नजर चुकवत मी बोलत होतो.

“त्याने सांगितलं नसलं तर मी तुला सांगते. कॉलेजमध्ये आपल्याला सगळे बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड समजत होते. पण फक्त मला माहित होतं की तुझी गर्लफ्रेंड कोण आहे ते. फक्त तिला कधी पाहिलं नव्हतं. तू कधी तिचं नाव सांगितलं नाही किंवा कधी तिचा फोटो दाखवला नाहीस. तुझ्या प्रेमासाठी तू कॉलेज संपल्यावर तू कोणालाही न सांगता मुंबईला निघून गेला होतास.”

तिचं मनमोकळेपणानं माझ्याशी बोलणं मला आवडलं. चहा बनवून झाल्यावर चहा कपमध्ये टाकून कप तिला दिला.

“थँक्स्.”

“मी करीश्माला कॉलेजच्या काळापासून प्रेम करत होतो, हे तर मला तू सांगितलं तेव्हा कळालं आणि बघं ना, आता महिन्याभरात आमचं लग्न होतंय.”

“लग्नाची तारीख कोणती काढली¿”

“माहित नाही. लग्नाच्या तारखेबद्दल मला करीश्माने काही सांगितलं नाही... पण मग राहुल मला असं का म्हणाला की मी त्याला करीश्माबद्दल कधी काहीच सांगितलं नाही म्हणून.”

“तिच्याबद्दल तू मला तरी कुठं सांगितलं होतंस. ते तर मी हुशार होते म्हणून मला कळालं.”

“कसं काय¿”

“मला एकदा तुझ्या बॅगमधून लव्ह लेटर सापडलं होतं. मी ते वाचलं आणि तुला त्या लव्ह लेटरबद्दल विचारलं. तेव्हा तुला सांगावच लागलं. पण तेव्हा सुध्दा तू तिचं नाव नव्हतं सांगितलं.”

आम्ही बोलता बोलता बाहेरच्या खोलीत आलो.

“अरे तुला आणखी एक गोष्ट सांगायाची होती...”

तिने सोफ्यावरच्या पर्समधून पत्रिका बाहेर काढली आणि माझ्या दिशेने पुढं करुन म्हणाली.

“पुढच्या महिन्यात २८ तारखेला माझं लग्न आहे. बरं झालं आता लक्षात आलं. नाहीतर मी विसरूनच गेले असते.”

पत्रिका वाचताना माझ्या मनात एक विचार आला.

“अं... सायली. एक विचारू¿”

“विचार काय विचारायचं आहे ते.”

“तुझ्या लग्नाला दोन महिने राहिली आहेत. आता तुला बरीच कामं असतील, लग्नाची अनेक तयारी करायची असतील.”

“हो. ते तर आहेच.”

“त्यामुळं तू खुप बिझी होशील... पण तरी सुध्दा या सगळ्यांमधून तू एक दिवस काढून मला भेटशील¿”

“भेटायला काही हरकत नाही. पण काही विशेष काम आहे का¿”

“नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण... तू म्हणालीस ना की आपण खुप बेस्टफ्रेंड होतो, ज्या गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या, त्या गोष्टी फक्त मी तुला सांगितल्या होत्या. तर मला माझ्याबद्दलच्या त्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.”

“हो सांगेन की. पण आज नाही. आज मला थोडं काम आहे.”

“तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा...”

“ओके, चालेल. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटूया. तेव्हा मी तुला सांगेन.”

आम्ही बोलत असताना करीश्मा कधी दारातून आत आली कळालंच नाही. ती आमच्या जवळ पोहोचल्यावर माझं लक्ष तिच्यावर गेलं.

“करीश्मा¡ तू¿”

“दार उघडंच होतं...”

बोलता बोलता करीश्माने सायलीकडे पाहिले.

“ही माझ्या कॉलेजची फ्रेंड, सायली. राहुलने हिला माझ्या एक्सीडेन्टबद्दल सांगितलं. म्हणून मला भेटायला आली.”

खुडचीला माझ्या जवळ सरकवून करीश्मा शेजारच्या खुडचीवर बसली आणि सायलीला पाहून “हाय” म्हणाली. तिने माझ्या हातातली पत्रिका पाहिली आणि माझ्या हातून ती घेत तिने विचारले.

“कोणाची पत्रिका आहे¿”

“सायलीच्या लग्नाची पत्रिका आहे. पुढच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला लग्न आहे तिचं.”

करीश्मा पत्रिका सविस्तर वाचू लागली.

“माझ्या लग्नाला जोडीने यायचं.”

मी सायलीला प्रतिउत्तर देत म्हणालो.

“नक्की येऊ आम्ही.”

करीश्माची पत्रिका वाचून झाल्यावर तिने पत्रिका माझ्या हातात दिली आणि तिनेसुध्दा माझंच वाक्य पुन्हा उच्चारले.

“नक्की येऊ आम्ही.”

सायलीच्या हातातला चहाचा कप खुप आधीच रिकामा झाला होता. पण ते मला खुप उशीराने समजले. पण समजल्याबरोबर तिच्या हातून कप घेऊन मी आमचे कप किचनमध्ये ठेऊन आलो.

“चला, मी निघते आता.”

सोफ्यावरून उठून, आमच्या दोघांकडं पाहत सायली म्हणाली.

“अरे थांब की...”

मी सायलीला थांबवण्याचा प्रयत्न केला. करीश्मासुध्दा खुडचीवरून उठली.

“नाही मला अजून चार जणांना पत्रिका द्यायला जायचं आहे. त्यामुळे मला निघायला हवं.”

“पुढच्या वेळी येशील तेव्हा वेळ काढून ये.”

“नक्कीच.”

आणि सायली निघून गेली. करीश्माने मला बोलायचा काही चान्सच दिला नाही. मी दारापर्यंत जाऊन जाणाऱ्या सायलीला हात हलवून “बाय” म्हणालो.

ती जाताच करीश्माने मला घरात ओढत आणले.

“करीश्मा¡ काय झालं. होणाऱ्या नवऱ्याला कोणी असं ओढतं का¿”

मी माझा शर्ट निट करत म्हणालो.

“तू केलेल्या एका चुकीमुळे मला आता पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागत आहेत.”

“का¿ मी असं काय केलं¿”

“तू पोलीसांना पत्र लिहून हे सांगितलंस की तू तुझ्या मैत्रिणीचा खुन होताना पाहिलं आहेस. तू सांगितल्याप्रमाणे नदीतून काल एका महिलेची बॉडी सापडली आहे. ती कोणाची आहे ते ओळखण्यासाठी पोलीसांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते. आता या पोलीसांना शहरात कुठंही डेड्बॉड्या सापडल्या की पहिलं मलाच बोलवणार. काय गरज होती तुला पोलीसांना सांगायची की तू खुन होताना पाहिलं आहेस म्हणून. आणि पत्र लिहून सांगितलंस ते सांगितलंस, वरून काय स्वप्न बघीतलं ते सांगायची काय गरज होती¿ मला या सगळ्याचा किती त्रास होतोय माहित आहे का तुला.”

“याचा अर्थ डेड् बॉडी सापडली¿”

“मी तेच सांगितलं आता. पोटाला दगड बांधून कोणीतरी तिला पाण्यात फेकलं होतं... खरंच, कोणी फेकलं की तिने स्वतः पोटाला दगड बांधून आत्महत्या केली, कोणाला माहित. ती डेड्बॉडी इतकी सडली होती आणि त्या डेड्बॉडीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी मला बोलवलं... सगळं तुझ्यामुळं.”

“पण पोलीसांनी तुला का बोलवलं¿ ... म्हणजे कोणाच्या डेड्बॉडीशी तुझा काय संबंध¿”

“संबंध कसा नाही. तू म्हणालास ना की तुझ्या मैत्रिणीचा खुन झालाय. पण तू आता सगळं विसरलास. तू कोणालाही ओळखू शकत नाहीस. म्हणून मग डेड्बॉडी तुझ्या मैत्रिणीची आहे की नाही हे ओळखण्यासाठी मला बोलवलं.”

करीश्मा माझ्यावर चिढली होती. पण मी तिच्या रागाकडे दुर्लक्ष केले आणि पोलीसांना सापडलेल्या डेड् बॉडीचा विचार करू लागलो.

“आता तू कसला विचार करतोय¿”

“मी राहुलला सांगितलं होतं की सलील आणि रशमी, हे एकमेकाचे शत्रू आहेत आणि त्यांच्यापैकी कोणी एक व्यक्ती दुसऱ्याची हत्यासुध्दा करू शकतो. त्या एका संशयावर आम्ही रशमीच्या घरी गेलो. रशमी गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता आहे. आम्हाला पुर्ण खात्री आहे की पोलीसांना मिळालेली डेड्बॉडी रशमीची असणार.”

करीश्मा माझ्याकडे एकटक पाहू लागली.

“काय झालं¿”

“काय झालं¡ एकतर प्रॉब्लेममध्ये अडकवलं आणि आता विचारतोय की काय झालं... तुझ्या एका चुकीमुळं माझ्या डोक्याला ताप झालाय.”

करीश्मा डोक्याला हात लाऊन बसली.

“पण तुझ्या डोक्याला ताप कसा झाला, म्हणजे प्रॉब्लम काय आहे¿”

“मी त्या डेड्बॉडीला ओळखलं नाही.”

“पण तू कशी ओळखणार, तुला कुठं माहित होतं रशमीबद्दल.”

“मी रशमीला ओळखते. ती माझ्याच ओफिसमध्ये काम करते. जेव्हा पोलीसांनी मला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं तेव्हा मी खुप वैतागले होते. पोलीसांनी मला दहा वेळा सांगितलं की डेड्बॉडी आणि त्याच्या सोबत मिळालेल्या वस्तुंना निट पाहा. पण मी नुसतं पाहिल्यासारखं केलं आणि त्यांना म्हणाले की मी तिला नाही ओळखंत.”

“हे सगळं जेव्हा त्यांना कळेल. तेव्हा तू त्यांना सांग, की त्यावेळी मला ओळखता आले नाही कारण सगळ्या गोष्टी खराब झाल्या होत्या.”

तिला माझ्या वाक्यांनी काहीसा दिलासा मिळाला.

“हे बघं आदित्य. या वेळी पोलीसांना काहीच सांगायचं नाहीस. जर तू त्यांना सांगितलं नाहीस तर कदाचित त्यांना कधी कळणारच नाही की ती डेड्बॉडी कोणाची आहे.”

“मी पोलीसांनाच काय, मी कोणालाही सांगणार नाही की ती डेड् बॉडी रशमीची आहे म्हणून. आता तू रिलॅक्स होऊन बस. मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो.”

मी तिच्यासाठी कॉफी बनवण्यासाठी किचनच्या दिशेने निघालो. किचनच्या दारापर्यंत जाऊन मी थांबलो आणि करीश्माकडं पाहिलं. सोफ्यावर डोकं टेकवून ती माझ्याकडंच पाहत होती. मी तिच्याकडे पाहताच तिने मला छोटीशी स्माईल दिली.

*****

४ डिसेंबर १९९४,

घरासमोरच्या अंगनात काही झाडे मी हवसेने लावली होती, असं करीश्माने मला सांगितलं. म्हणून आदल्या रात्रीच मी झाडानां पाणी देण्याचे ठरवले. बाथरूमच्या नळाला पाईप जोडला आणि त्या दिवशी सकाळी झाडांना पाणी देत बसलो. मी झाडांना पाणी देत असताना, तिस - पस्तीस वर्षाचा व्यक्ती काही अंतरावरून माझ्याकडं पाहत होता. त्याला काय हवं होतं माहित नाही. तो फक्त लांबुन माझ्याकडे एकटक पाहत होता. मी त्याच्याकडं पाहिल्यावर तो स्मितहास्य करायचा. पण तो जवळ येत नव्हता. शेवटी मीच त्याला बोलवले. तो माझ्या जवळ आला. त्याच्या हातात मिठाईचा बॉक्स होता. त्याच्या चेहेऱ्यावरून तो खुप खुश दिसत होता. मी त्याला काही बोलणार त्या आधी त्याने माझ्या समोर मिठाईचा बॉक्स उघडला आणि मला त्यातून पेढा उचलण्याचा इशारा केला.

“पण तुम्ही कोण....¿”

मी पुढं काही बोलणार त्या आधी त्याने बॉक्स मधला एक पेढा उचलला आणि माझ्या तोंडाजवळ आणला.

“पेढा घ्या.”

“पण मी...”

“पण बिन काही नाही. आधी तुम्ही पेढा खा.”

त्यांच्या आग्रहाला मान देत मी पेढा खाल्ला आणि म्हणालो.

“पेढ्याबद्दल धन्यवाद, पण सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही.”

माझ्या वाक्यानी नक्कीच त्यांना वाईट वाटलं होतं. त्याचा हसरा चेहेरा काहीसा उतरला. त्यांच्या मनात गैरसमज जन्म घेण्याआधी मी त्यांना म्हणालो.

“त्याचं काय आहे ना. आठवड्या आधी माझा अपघात झाला. त्या अपघातात माझ्या मेंदूला मार लागला. त्यात माझी स्मृती नष्ट झाली. मेमरी लॉसबद्दल तुम्ही ऐकलंच असेल... त्यामुळे भूतकाळात घडालेल्या सगळ्या घटना, नातेवाईट, मित्र मैत्रिणी, मला कोणाबद्दल काहीच आठवत नाहीये. मी तुम्हाला न ओळखण्या मागचं, हेच कारण आहे.”

मी त्यांना सर्व काही सवीस्तर सांगितलं. माझं बोलण्यामुळे ते विचारात पडले.

“काय झालं¿”

“खरंच तुम्हाला भूतकाळातलं काहीच आठवत नाही का¿”

“मला खरंच काहीच आठवत नाहीये.”

त्यांनी माझ्याकडे हसून पाहिले आणि म्हणाले.

“जाऊदे. कदाचित जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं असावं. मी स्वतःची ओळख करून देतो. माझं नाव एकनाथ आहे. आपली ओळख जास्त दिवसांपुर्वीची नाही...”

मी पाण्याचा पाईप लॉनमध्ये ठेवला आणि बोलता बोलता आम्ही अंगना बाहेरच्या रस्त्यापर्यंत पोहोचलो.

“तुम्हाला डोंगर - दऱ्यांचे, झाडा – झुडपांचे, शेत आणि शेतकऱ्याचे फोटो हवे होते. म्हणून तुम्ही आमच्या गावी आला होता. पण पावसामुळे तुम्हाला निट फोटो काढता आले नाही. तुम्हाला खुप उशीर झाला होता आणि त्यात तुमची गाडी खराब झाली. ती रात्र तुम्हाला आमच्या गावात काढायची होती. त्यावेळी मी तुम्हाला आमच्या घरी घेऊन गेलो होतो. तुम्ही दिवसभराचे उपाशी होता. त्या दिवशी तुम्ही आमच्या घरी जेवला आणि ती रात्र आमच्या घरीच राहिलात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जसे फोटो पाहिजे होते तसे फोटो, कुठं मिळतील त्यासाठीची जागा मी तुम्हाला दाखवली. तुम्ही फोटो काढले. आपण मिळून तुमची गाडी दुरुस्त केली आणि त्या संध्याकाळी तुम्ही निघून गेला. काही महिन्यानंतर जेव्हा मी शहरात आलो तेव्हा आपली पुन्हा भेट झाली. त्यावेळी तुम्ही जी मदत माझी केली, त्या उपकाराची परतफेड मी पुढच्या सात जन्मात सुध्दा करू शकणार नाही.”

“त्यावेळी मी असं काय केलं¿”

“ती खुप मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट मी तुम्हाला सांगणं योग्य होणार नाही. तुम्ही माझ्या घरी चला. तिथं तुमची कोणीतरी वाट बघत आहे. एकदा तिला भेटा. मग मी तुम्हाला सगळी गोष्ट सवीस्तर सांगेल.”

ते मला स्वतःसोबत घेऊन जात होते. पण अशा अनोळखी मानसासोबत घरापासून लांब जाणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांना टाळत म्हणालो.

“सॉरी पण आज जमणार नाही. आज लग्नाचं थोडं काम आहे. ते करायला जायचं आहे...”

“लग्न कोणाचं¿”

“माझं.”

“कधी ठरलं¿”

“महिन्याआधी ठरलं होतं.”

“महिन्याआधी¡ शक्यच नाही. असं असतं तर तुम्ही मला सांगितलं असतं.”

“माझ्या लग्नाबद्दल खरतर मी कोणालाच सांगितलं नव्हतं.”

“कोणत्या तारखेला आहे¿”

“अजून तारीख ठरवली नाही.”

“ठिक आहे. तुम्ही आज नका येऊ, पण आमच्या घरी लवकर या. लक्षात असुद्या की तुमची तिथं कोणीतरी वाट पाहतंय आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ती स्वतः देईल.”

त्याचे डोळे भरून आले होते. ते जे काही पाहत होते ते मी पाहू शकत नव्हतो. आम्ही चालत घरापासून लांब आलो होतो. ते जाग्यावर थांबल्यावर मी सुध्दा थांबलो.

“चला मग. मी निघतो. मी या मार्गाने रेल्वेस्टेशनकडे जातो आणि तुम्ही या दिशेने पुला शेजारच्या बागेत जावा.”

“मी बागेत का जाऊ¿”

“याचा अर्थ तुम्हाला कोणी सांगितलं नाही. त्या बागेत तुम्ही नेहेमी जायचा. तुम्ही म्हणायचा तिथं गेल्यावर तुमच्या मनातले वादळ शांत होतात. प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण काही वेळेसाठी प्रश्नांच्या जाळ्यातून तुम्ही बाहेर येता. मला वाटतं त्या अपघातानंतर तुम्हाच्या मनात बरेचसे प्रश्न असतील की ज्यांचा विचार करून तुम्ही परेशान झाला असाल. म्हणून म्हटलं बागेत जाऊन बसा.”

त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं कितपत योग्य होतं¿ त्यात त्यांचा काही डाव तर नसेल ना¿ असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मेंदूत त्या क्षणी निर्माण झाले खरे. पण त्यांच्या डोळ्यात पाहून मला त्यांच्या बोलण्यावर मनापासून विश्वास बसला होता. त्यांनी शर्टच्या खिशातून एक कागद काढले. त्यावर त्यांच्या घराचा पत्ता लिहून तो कागद त्यांनी मला दिला.

“हा माझ्या घराचा पत्ता आहे. नक्की या... चला तर मी निघतो आता.”

असं बोलून ते त्यांच्या मार्गाने निघून गेले. मी हळूहळू त्या रस्त्यावर पुढं जात होतो. समोर नाल्यावरचा पुल दिसला. पुलाच्या पलीकडे बागेत जाण्यासाठीचा गेटही नजरेस पडला. मी मंद गतीने त्या बागेत पोहोचलो. त्या बागेला पाहून मला असं वाटलं, जणू मी त्या बागेला आधीही कुठंतरी पाहिलं असावं. बागेत त्या वेळी जास्त गर्दी नव्हती. चार दोन जोडपी आपापली जागा ठरवून बसले होते. मी बागेत आणखी आत जाऊ लागलो. बागेच्या शेवटच्या टोकावर काही दगडं, आणि त्याच्या पुढं दरी सारखा मोठा खड्डा होता. खड्ड्यात छोटासा नाला. मी त्यातल्याच एका दगडावर बसलो. दगडाच्या डाव्या बाजूला काही झाडं होती, ज्यांवर फुलं लागली होती. मी त्या झाडांना पुन्हा पुन्हा पाहत होतो. मी त्यांना आधीही कुठंतरी पाहिलं होतं आणि अचानक मला आठवलं की मी त्यांना कुठं पाहिलं होतं. मी आसपास लाकूड शोधू लागलो. जवळंच एक लांब लाकडाचा तुकडा मला सापडलासुध्दा. मी त्या लाकडाच्या सहाय्याने माझ्या जवळची जमीन खोदू लागलो. दोन ठिकाणी खड्डा खोदून झाल्यावर तिसऱ्यां वेळी मला हवं होतं ते मिळालं. मातीमध्ये चौकोणी लोखंडी पेटी लपवलेली होती. ती पेटी घेऊन मी बागेच्या मागच्या बाजूने नाल्या शेजारून बाहेर आलो आणि झपाझप पावले टाकत घरी पोहोचलो.

घरी जाऊन मी ती पेटी उघडली. पेटीमध्ये तिन - चार, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकारांची पत्रे होती. पत्रांवरचे अक्षर मला माझ्या अक्षराप्रमाणेच वाटत होते. कदाचित त्या पत्रांमध्ये माझ्या भूतकाळातील काही गोष्टी मी लिहून ठेवल्या असतील, असं समजून मी ते सगळे पत्र वाचायचे ठरवले. त्या पत्रां खाली फुलपाखराच्या आकाराचे लाकडी वस्तू ठेवली होती. त्या फुलपाखरावर विशिष्ट आकारांचे नक्षीकाम केले होते. त्या कोरीव कामाला पाहताना मी एका वेगळ्याच विश्वात हरवलो.

*****

तिन चार दिवसांसाठी राहून माझ्या घरी राहायला आला होता. सलग तिन दिवस सुट्ट्या मिळाल्यामुळे त्याने काही प्लॅन बनवले होते. त्या तिन दिवसांत त्याने मला शहरात बऱ्याच ठिकाणी फिरवलं. जेव्हा तो चौथ्या दिवशी कामावर गेला तेव्हा कुठं मला एकांत मिळाला. त्यावेळी मी पेटीमधून एक पत्र बाहेर काढले आणि वाचायला सुरुवात केली.

“प्रिय मैत्रीण,

तुला वाटत असेल, टेलीफोनचा जमाना आला तरी हा व्यक्ती अशा जुनाट पत्रव्यवहारात का अडकला आहे. पत्रात लिहून सांगण्यापेक्षा समोरासमोर बसून का बोलत नाही. तर त्याचं कारण असं आहे की मी तुला किती प्रेम करतो हे मी तुला समोरासमोर नाही सांगू शकत आणि काही गोष्टी अशा असतात की त्या लिखीत शब्दातून व्यक्त व्हाव्या असं मला वाटतं. म्हणून मी तुला पत्र लिहिलं. तुझ्याकडे पाहिलं तर तुझ्याकडेच पाहत राहावसं वाटतं. माझ्या मनात काय आहे हे मी तुला तुझ्या समोर उभा राहून कधी सांगणार, मला माहित नाही. पण एक मात्र नक्की सांगू शकतो की मी तुला कधीही सोडून जाणार नाही. माझ्यासाठी माझं स्वप्न तू आहे आणि या जगात मला माझ्या स्वप्ना शिवाय दुसरी कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही. माझ्या मनात काय होतं ते मी तुला सांगितलं.

तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे, हे तू मला या पत्राच्या उत्तर स्वरूपात सांग. जर तुझ्या मनात माझ्याबद्दल कोणत्याही भावना नसतील तर त्याची मला एकदातरी जाणीव करून दे. तुझ्या उत्तराची मी वाट पाहणारा....

 • तुझा मित्र.”
 • कागदाच्या अवस्थेवरून ते पत्र बऱ्याच वर्षांपुर्वीचा वाटत होता. पाठवणाऱ्याच्या जागी “तुझा मित्र” एवढंच लिहिलं होतं. पण अक्षरावरून ते पत्र मीच लिहिलं असणार, याची मला खात्री होती. मी त्या पत्राला डोळ्याजवळ घेऊन एक-एक गोष्ट बारकाईने पाहू लागलो.

  जर ते पत्र मी लिहिले असेल, तर दोन शक्यता होत्या. एक म्हणजे ते पत्र मी माझ्या एखाद्या मित्रासाठी लिहिलं असावं. पण हा प्रश्न सुध्दा निर्माण होतो की माझं अक्षर तितकंस चांगलं नसून, मी ललित लेखात निपुण नसूनसुध्दा, कोणताही व्यक्ती त्याचे वैयक्तीक प्रेमपत्र माझ्याकडून का लिहून घेईल¿ आणि दुसरी शक्यता म्हणजे ते पत्र मी स्वतःसाठी लिहिले असावे. ही शक्यता मला जास्त योग्य वाटत होती. कारण सायलीनेही मला हेच सांगितलं होतं. करीश्मा आणि माझ्यातलं प्रेमप्रकरण कॉलेजच्या काळापासून चालू होतं.

  बराच काळ विचार करण्यात घालवल्यावर मी या निष्कर्षावर पोहोचलो की तो पत्र मी करीश्माला कॉलेजच्या काळात लिहिला असणार. पण जर मी ते पत्र करीश्मासाठी लिहिले होते, तर त्या पत्राला असं पेटीत बंद करून का ठेवलं असेल¿ मला वाटलं होतं की जुन्या पत्रांच्या सहय्याने मला माझा भूतकाळ समजायला मदत होईल. पण त्या पत्रांनी तर मला आणखी गुंत्यात अडकवलं.

  मी माझ्या प्रश्नात गुंग असताना दाराची बेल वाजली. ते पत्र आणि लाकडी फुलपाखरू मी त्याच पेटीत ठेवले आणि त्या पेटीला बेडरूमध्ये ठेऊन दार उघडलं. दारात करीश्मा होती. काही न बोलता ती घरात आली. तिला पत्राबद्दल प्रश्न विचारणं योग्य होईल का¿ याचा विचार करत मी दार लावत होतो.

  “काय झालं¿ दारातच उभा राहणार आहेस का¿”

  “असंच... विचार करत होतो...”

  “कसला विचार¿”

  “आपला विचार... आपल्या प्रेमकथेला कुठून सुरुवात झाली असेल त्याचा विचार. सुरुवातीला आपण भेटलो असणार, त्यानंतर आपण एकमेकांचे मित्र झालो असणार, त्यानंतर मी तुझ्या प्रेमात पडनं, नंतर माझं तुला पत्र लिहून प्रपोझ् करनं, त्यानंतर तुझं होकार दिलं, आपलं प्रेम वाढत गेलं, आपण घरच्यांकडं जाऊन लग्नाची परवानगी काढली आणि घरच्यांनी हो – नाही, हो – नाही करत परवानगी दिली असणार. किमान पाच सहा वर्षांचा हा प्रवास...”

  माझं बोलणं तिला आवडलं. ती हसून “छान” असं म्हणाली.

  “असंच झालं होतं ना¿”

  “तुझी कल्पना शक्ती चांगली आहे. पण असं काही झालं नव्हतं. आपली भेट याच वर्षी २० जानेवारीला झाली. आपण एका पार्टीमध्ये भेटलो होतो. तुला त्या पार्टीचे फोटो काढायचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. त्यानंतर दोन वेळा असंच कुठंतरी भेटलो आणि त्यानंतर आपल्यात मैत्री झाली. प्रेमाबद्दल मी तुला विचारलं होतं. जेव्हा तू होकार दिलास त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण माझ्या घरी गेलो आणि माझ्या आई वडीलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं. त्यांनी कसलाही विरोध न करता आपल्या लग्नाला होकार दिला.”

  तिचं बोलणं ऐकून मी काहीसा नाराज झालो. काही क्षणासाठी शांत राहिलो आणि नंतर तिला विचारलं.

  “मी तुला प्रेमाने काय म्हणायचो¿”

  “तू मला करीश्माच म्हणायचास.”

  या सगळ्याच्या पार्श्व भागी माझा विचारचक्र जोरजोरात फिरत होता. ज्या मुलीसाठी मी ते पत्र लिहिले होते, ती मुलगी करीश्मा नव्हती. जर करीश्मा आणि माझ्या भेटीला वर्षसुध्दा नव्हता, तर मी कॉलेजच्या काळात ज्या मुलीवर प्रेम करायचो ती मुलगी कोण होती¿

  मी विचारात मग्न असताना करीश्माने मला विचारले.

  “आदित्य... तुला काहीतरी विचारायचं होतं¿”

  “विचार की.”

  “तू त्या राहुलची चावी घरात सगळीकडं शोधायलीस, त्यावेळी तुला घरात कोणती वेगळी गोष्ट सापडली नाही का¿ अशी एखादी गोष्टी ज्याची तू घरात असण्याची अपेक्षाच केली नसशील.”

  “कसली गोष्ट¿ तू कोणत्या गोष्टीबद्दल विचारत आहेस¿”

  “वेगळी गोष्ट म्हणजे तिजोरी वगैरे¿”

  “माझ्या घरात आणि तिजोरी¿ मी लखपती होतो का तिजोरी ठेवायला¿”

  “अरे तुझ्याकडे होती. तिजोरी म्हणजे एक लॉकरसारखं होतं ते. पण तू त्याला तिजोरी म्हणायचास.”

  मी आठवण्याचा प्रयत्न केला, पण अशी कोणतीही गोष्ट सापडल्याचा मला आठवत नव्हतं.

  “नाही. अशी कोणतीच गोष्ट मला सापडली नाही. पण काय होतं त्यात¿”

  “माहित नाही काय होतं त्यात. तू मला फक्त एकदा दाखवलं होतंस. ते जाऊदे, मी इथं आपल्या लग्नाबद्दल बोलायला आले होते. मला वाटतं तुझ्या सोबत जे काही झालं त्यानंतर आपल्या लग्नची तारीख काही दिवस पुढं ढकलावी.”

  “पण का¿ तारीख पुढं का ढकलायची¿”

  “लग्नाची काहीच तयारी आपण केली नाहीये. तुझ्या एक्सीडेंटमुळं दोन आठवडेतर वायालाच गेले आणि आता तुला आधीच्या गोष्टी समजुन घेण्यासाठी वेळ लागेल. अशा परिस्थितित लग्न करणं... आणि आता जर लग्न केलं तर लोकं काय म्हणतील, अजून तू पुर्णपणे बरा झाला नाही आणि यांना लग्न करायची घाई आहे. म्हणजे एक – दिड महिना लग्न पुढं ढकललं तर...”

  “कोण आहेत तरी कोण ही लोकं¿ त्यांच आपण का ऐकायचं. राहिला प्रश्न लग्नाच्या तयारीचा. त्यासाठी जास्त वेळ नाही लागणार आणि आपण तयारी...”

  “आदित्य. मी लग्नाची तारीख दोन महिन्यानंतरची ठरवली आहे आणि तसं मी सगळ्यांना सांगून आली आहे.”

  “तू ठरवलंस... ठरवण्याआधी मला एकदा तरी विचारायचंस.”

  “तुला काय विचारायचं. तुला दहा दिवसांपुर्वी काय झालं ते आठवत नाहीये. तुला परिस्थिति काय आहे याची कल्पना नाहीये, तुला लग्नासाठी काय काय तयारी करावी लागते ते माहित नाहीये, तुला काहीच माहित नाहीये आणि तुला असं वाटतं की मी तुला विचारून लग्नाची तारीख ठरवायला पाहिजे होती.”

  मला तिचं असं वागणं योग्य वाटलं नाही. पण काही अर्थी ती बोलत होती ते योग्यच होतं. कदाचित ती तेवढंच सांगायला आली होती. तिने तिची उघडलेली पर्स बंद केली आणि खांद्याला अडकवून दाराच्या दिशेने निघाली. जाण्याआधी किंवा जाताना ती माझ्याशी काहीच बोलली नाही. किमान ती “बाय” तरी म्हणेल, या आशेने मी जाणाऱ्या करीश्माकडे पाहत होतो. ती दारापर्यंत पोहोचली पण तिने साधं वळून सुध्दा पाहिलं नाही. दार उघडलं आणि समोर राहुल दिसला. तो करीश्माकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याने बेल वाजवण्या आधीच करीश्माने दार कसं उघडलं¿ हा प्रश्न कदाचित त्याला पडला असावा. त्याच्या हातात पांढरी पिशवी होती आणि त्या पिशवीत चौकोणी बॉक्स होता. करीश्माने दारातून बाजूला सरकत तिने राहुलला आत येण्यासाठी जागा दिली. राहुल आत येताच जोर जोरात ओरडू लागला.

  “हॅपी बर्थ डे टु यू. हॅपी बर्थ डे टु यू. हॅपी बर्थ डे टु डिअर आदित्य. हॅपी बर्थ डे टु यू...”

  ते ऐकून करीश्मा जागीच थांबली. तिने वळून माझ्याकडे पाहिले. राहुलने केकची पिशवी टेबलावर ठेवून मला मिठी मारली आणि म्हणाला.

  “वाढ दिवसाच्या हार्दीक सुभेच्छा.”

  “आय एम् रिअली रिअली सॉरी आदित्य.”

  माझी माफी मागत करीश्मा पुन्हा आत आली. “... मी विसरूनच गेले. मला काल रात्रीपर्यंत लक्षात होतं पण अचानक काय झालं, माहित नाही, पण मी विसरूनच गेले. खरतर मी इथं त्यासाठी आले होते. पण इथं आल्यावर मी कशी विसरले. सॉरी आदित्य.”

  “अरे यात सॉरी काय¿ तू तर फक्त माझा वाढदिवस विसरलीस... मी तर सगळंच विसरलो. मग मी किती वेळा सॉरी म्हणायला पाहिजे होतं.”

  “ते सोडा. मी केक आणलाय. आपण केक कापू आणि पार्टी करू.”

  राहुल पिशवीतून केक काढत म्हणाला. केक कापला, वाढदिवस साजरा केला. त्या गोंधळात अचानक मला सायलीचं वाक्य आठवलं.

  “... ४ डिसेंबरलाच याला उघडून बघायचं.”

  त्या क्षणी मी विचार सुध्दा केला नव्हता की सायली माझ्या वाढदिवसासाठी गिफ्ट घेऊन आली असेल म्हणून. पण तो गिफ्ट मी सगळ्यांसमोर उघडणार नव्हतो. मी वाट बघत होतो की कधी करीश्मा आणि राहुल आपापल्या घरी जातील आणि मी सायलीचा गिफ्ट उघडेन.

  संध्याकाळचं जेवण मी आणि राहुल हॉटेलमधून पार्सल घेऊन आलो. जेवायला सुरुवात करण्याआधी बेल वाजली. मी खुडचीवरून उठणार त्याआधी राहुल उठला आणि धावत दारावर गेला. दारात पुन्हा तेच दोन पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यांना पाहताच मी आणि करीश्मा उभे राहिलो. त्यांना घेऊन राहुल आमच्याजवळ आला. त्यातला एक कॉन्स्टेबल माझ्या जवळ येऊन माझ्या दिशेने हात पुढं करत म्हणाला.

  “थँक्यु आदित्य. तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीमुळे आम्ही केस अर्धा सॉल्व केला आहे.”

  मी त्यांच्याशी हात मिळवला. पण ते कोणत्या मदतीबद्दल बोलत होते ते मला समजले नाही.

  “पण मी तुमची कोणती मदत केली¿”

  “तुम्ही आम्हाला पत्र लिहून हे सांगितलं की तुमची मैत्रीण रशमी आणि सलील हे एकमेकांचे वैरी आहेत आणि ते एकमेकांचा खुनही करू शकत होते. सलीलने रशमीची हत्या केल्याची तुम्हाला शंका होती. तुम्हाला कळालं की रशमी गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता आहे. तर कदाचित तिचा खुन सलीलने करुन तिला नदीत फेकलं असेल. तुमच्याकडून अशी माहिती मिळाली आणि दुसरीकडे शहराच्या नदीतून साधारण तुमच्याच वयाच्या मुलीचा मृतदेह सापडलंय. तुम्ही दिलेल्या माहिती नुसार आम्ही त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रशमीच्या आजीला बोलावले. मृतदेह खुप खराब झाले होते म्हणून तिच्या कपड्यांवरून आणि सोन्याच्या चैनीवरून तिच्या आजीला तिची ओळख पटली. आमच्या औपचारीक कामानंतर आम्ही मृतदेह आजींना देऊन टाकलं आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे त्या सलीलचा शोधसुध्दा सुरू केलाय. असं वाटतंय केस आता शेवटच्या टप्प्यावर आहे.”

  कॉन्स्टेबल बोलत असताना मी त्यांच्याकडे, आणि राहुल आणि करीश्मा माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. कॉन्स्टॅबल पुढं बोलू लागला.

  “... पण आम्हाला एक गोष्ट कळाली नाही की तुम्ही ही सगळी माहिती आम्हाला पत्राद्वारे का दिली¿ तुम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये येऊन ही माहिती देऊ शकला असता.. जाऊद्या. पुढच्या वेळी तुमच्याकडे कोणतीही माहिती असेल तर तुम्ही बिनधास्तपणे पोलीस स्टेशनमध्ये या आणि आम्हाला माहिती द्या.”

  त्या कॉन्स्टेबलने रागात करीश्माकडे पाहिले आणि अप्रत्यक्षरित्या तिला उद्देशून म्हणाले.

  “.... आणि जर कोणी तुम्हाला असं करून देत नसेल किंवा अडवत असेल, तर तसं आम्हाला सांगा. आम्ही कायद्याने त्याची खबर घेऊ.”

  “हे तुम्ही माझ्याकडे पाहून का म्हणाला¿”

  करीश्माने सुध्दा चिढून विचारले.

  “हे पहा मॅडम्. मी आदित्यला ही गोष्ट माहिती म्हणून सांगतोय. पण तुम्ही या गोष्टीला चेतावणी म्हणून समजा.”

  “चेतावणी¡ तुम्हाला काय वाटतं मी आदित्यला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नकोस असं सांगितलं का¿”

  “तुम्ही असं करता, असं मी कुठं म्हणालो¿ तसंही तुमची मेमरी चांगली असून सुध्दा पोलीसांना तुमची काडीची मदत झालेली नाहीये आणि यांची पुर्णपणे मेमरी जाऊनसुध्दा हे आम्हाला मदत करत आहेत.”

  “त्याला मी तरी काय करणार. मला जेवढ्या गोष्टी माहित होत्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. पण ज्या गोष्टी मला माहित नाहीत, त्या मी तुम्हाला कशा सांगणार¿”

  “मॅडम्, म्हणून तर मी तुम्हाला काही बोलत नाहीये. पण ज्या दिवशी आम्हाला असं कळालं की तुम्हाला माहित असून तुम्ही पोलीसांकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न केलाय. तर त्या वेळी ....”

  कॉन्स्टेबल त्याचं वाक्य अर्ध्यात सोडून माझ्याकडे वळला आणि बोलू लागला.

  “तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली तर आम्हाला नक्की द्या. मला तर वाटतंय इतक्या दिवसांपासून आम्ही ज्याला शोधत होतो तो लवकरच तुरूंगात दिसणार आहे.”

  एवढं बोलून ते निघून गेले. काही वेळ घरात शांतता राहिली. सर्वजण मानसीक धक्क्यात होते. पण धक्क्याचा परीणाम कमी झाल्यावर राहुल माझ्याकडे रागात पाहून म्हणाला.

  “हे काय केलं आदित्य. वाढदिवसाच्या दिवशी चांगलाच सरप्राईझ दिलास. तुला मी सांगितलं होतं ना की पोलीसांना ही बातमी नको सांगू म्हणून. तरी तू सांगितलीस. अरे पोलीसांच्या नादी नसतं लागायचं...”

  राहुलचं बोलणं मधून थांबवत करीश्मा बोलू लागली.

  “अरे मुर्खा, हे काय केलस¿ मला अडकवायची पुर्ण तयारी केलीस.”

  करीश्मा माझ्या जवळ येत ओरडून म्हणाली.

  “मला सुध्दा माहित नाही की मी कधी त्यांना पत्र लिहिलं.”

  “तू नाही लिहिलं, तर मग कोणी लिहिलं¿”

  “मला काय माहित कोणी लिहिलं¿ पत्र टपाल पेटीतून पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी किमान तिन ते चार दिवस लागतात आणि हा राहुल माझ्या सोबत काल संध्याकाळपर्यंत होता. काल संध्याकाळ नंतरच मला एकट्याला सोडलंय घरात. पण त्याआधी हा राहुल माझ्या सोबत होता की. याला विचार मी गेल्या तिन चार दिवसांत घराच्या बाहेर गेलोय का¿ बाहेर फक्त एकदा गेलो होतो आणि त्या वेळी माझ्या सोबत राहुल होता. मग मी कधी पत्र लिहिणार आणि कधी पोलीसांना पाठवणार¿”

  माझ्या तर्काने त्या दोघांनाही माझ्यावर काहीसा विश्वास बसला. त्या तर्काने मी स्वतःला तर वाचवले, पण प्रश्न मात्र तसाच राहिला.

  “पत्र कोणीही पाठवला असेल. पण त्याच्यामुळे मी अडकलेना. आता पोलीसांना समजलं की मी रशमीला ओळखत होते आणि तरी सुध्दा मृतदेह ओळखलं नाही. तर मी तुरूंगात जाणार.”

  ती डोक्याला हात लाऊन रडू लागली.

  “अरे तू रडू नकोस. काहीतरी मार्ग निघेल. तसंही रशमीची बॉडी आजींना मिळाली. आतापर्यंत तिचा अंतीम संस्कारसुध्दा झाला असेल. पोलीसांनी सलीलला शोधायला सुरुवात केली आहे. आता परत रशमीचा विषय निघणारच नाही. त्यामुळे त्यांच तुझ्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. पण मला एक सांग, तू त्या सलीलला तर ओळखत नाहीस ना¿”

  “मी त्याला ओळखत नाही आणि कधी पाहिलं सुध्दा नाही. फक्त तू मला दोन तिन वेळा त्याच्याबद्दल सांगितलं होतंस.”

  “हो. तू मला सुध्दा बरेचदा सलीलबद्दल सांगितलं होतंस. पण कधी मी त्याला पाहिलं नाही.”

  माझ्या आणि करीश्माच्या संभाषणामध्ये राहुल बोलू लागला. पण मला त्याच्यावर संशय येत होता.

  “तू माझा एवढा जवळचा मित्र आहेस आणि तू कधी सलीलला पाहिलं नाहीस¿ पोलीसांच्या भानगडीत पडू नये म्हणून तू खोटं बोलतोय ना¿”

  “खरंच. तू मला कधीच सलीलसोबत भेट घालून दिली नव्हतीस... आणि जवळच्या मित्राला तू तुझ्या होणाऱ्या बायकोबद्दलसुध्दा सांगितलं नव्हतंस. त्याचं काय¿”

  तिथं जे काही चाललं होतं त्यामुळे करीश्मा आणि राहुल, या दोघांवरचा माझा विश्वास कमी होत चालला होता.

  “हे पहा, तुम्ही दोघं माझ्याशी खोटं बोलू नका. तुमच्यापैकी ज्याला कोणाला सलीलबद्दल माहित असेल त्याने मला त्याच्याबद्दल सांगा.”

  राहुल पुढं सरकला आणि मला चिढवत म्हणाला.

  “कशाला¿ पोलीसांना सांगायला¿”

  “मी सांगितलं ना, की मी नाही सांगितलं पोलीसांना.”

  माझ्यात आणि राहुलमध्ये वाद विवाद चालू झाला. आमचा गोंधळ ऐकून करीश्मा ओरडली.

  “तुम्ही दोघं शांत बसा. आता तो विषय नका काढू. माझं डोकं दुखायला लागलं.”

  ती काही वेळासाठी सोफ्यावर बसून राहिली. अचानक तिला काहीतरी आठवलं आणि ती सोफ्यावरून उठत म्हणाली.

  “मी घरी जाते.”

  मी तिला थांबायला सांगितलं, पण ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. काही वेळानंतर राहुलही त्याच्या घरी निघून गेला. झालेल्या प्रकाराचा काहीवेळ विचार केल्यानंतर मी तो विषय बाजूला ठेवला आणि सायलीने मला काय गिफ्ट दिलंय ते पाहण्यासाठी तिचा गिफ्ट उघडला. त्या बॉक्समध्ये काचेचा छोटासा पुतळा होता. आकर्षक आणि सुंदर असा. दिसण्यावरून तो खुप माहागाचा दिसत होता. त्याच्या खाली कागदाचा तुकडा ठेवला होता. त्यावर “वाढदिवसाच्या हार्दित शुभेच्छा” असं लिहिलं होतं.

  इतक्या वर्षानंतरही तिला माझा वाढदिवस माहित होता. कदाचित यालाच फ्रेंडशिप म्हणतात. पण बरेचदा व्यक्ती आपल्या इतक्या जवळ आलेला असतो की त्याला अशा गोष्टी लक्षात राहत नाहीत. असंच काही करीश्मासोबत झालं असणार.

  *****

  इतर रसदार पर्याय

  शेयर करा

  NEW REALESED