Akalpit - 8 books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित - 8

(वाचकांनी हा अध्याय वाचण्या आधी सुरुवातीचे सात अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)

Chapter 8

दुसऱ्या दिवशी मी हॉटेल ब्लु डायमंडमध्ये पोहोचलो. माझ्या येण्याआधी तो तिथं पोहोचला होता. तो मला हॉटेलमधल्या एका रुममध्ये घेऊन गेला. हा तोच माणुस होता जो माझ्या घरी आला होता आणि त्याला पोलीस कॉन्स्टेबल दिसताच तो पळून गेला होता. सुरुवातीला मी त्याला ओळखलं नव्हतं. पण रुममध्ये प्रवेश करण्याआधी मी त्याला ओळखलं.

तू तर तोच आहे ना. ज्याने त्या मुलीचा खुन केला¿”

तो घाबरून मागे वळाला आणि म्हणाला.

मी कोणाचाही खुन केला नाही. त्या दिवशी जे काही झालं, ते चुकून झालं.

तो मला सगळं काही सांगू शकतो असं वाटलं म्हणून मी त्याच्या सोबत रुममध्ये गेलो.

त्या चुकीसाठी मी तुम्हाला मागाल तेवढे पैसे द्यायला तयार आहे.

त्याने रुमच्या बेडवरील पडलेली बॅग उघडली. त्यात बॅग भरून पैसे होते.

... तुम्ही फक्त सांगा किती पैसे पाहिजे¿”

मला पैसे नकोत. मला फक्त त्या दिवशी खरं काय झालं होतं ते सांगा. जर तुम्ही मला खरं सांगितलं तर पैसेही घेणार नाही आणि पोलीसांनासुध्दा सांगणार नाही.

त्या दिवशी माझा मुलगा खुप आजारी होता. त्याची परिस्थिति इतकी खराब झाली होती की त्याला बेडवरून उठतासुध्दा येत नव्हतं. त्या रात्री मी माझ्या मुलाला घेऊन हॉस्पीटलमध्ये जात होतो. तुम्ही अचानक रस्त्याशेजारच्या झुडपांमधून रस्त्यावर आला. मला गाडीची गती आवरली नाही आणि गाडीने तुम्हाला उडवले. काही अंतरावर जाऊन जेव्हा गाडी थांबली तेव्हा मी गाडीतून उतरलो आणि पाहिलं की तुम्ही रस्त्यावर पडला होता. तुम्ही रस्त्यावर एखाद्या मृतदेहाप्रमाणे पडलेला होता. मला वाटलं तुम्ही मेला असालं. मी खुप घाबरलो होतो. म्हणून मी तिथून निघून गेलो. आठवड्याभरापुर्वी मी तुम्हाला एका घरासमोर तुमच्या मित्रसोबत बोलताना पाहिले. तेव्हा मला कळालं की तुम्ही जिवंत आहात. तुम्ही जिवंत आहात याचा मला आनंद होता. मी त्याच वेळी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येणार होतो. मी घरा समोरही पोहोचलो. पण मी पाहिलं की पोलीस तुमच्या घरापासून काही अंतरावरून तुमच्या घरावर नजर ठेऊन होते. तेव्हा मला कळालं की तुम्ही त्या अपघाताची पोलीसांकडं तक्रार केली आहे. मी त्या दिवशी तिथून गेलो आणि दोन दिवसांनी तुमच्या घरी आलो. तुम्हाला पैसे देऊन केस मागे घेण्यासाठी सांगणार होतो. मला वाटलं तुम्ही मला पाहिल्याबरोबर ओळखाल. पण तुम्ही मला तेव्हा ओळखलं नाही. कदाचित अंधारामुळं असं झालं असेल. तुमच्या घरात पोलीसांना पाहून मी काही बोलू शकलो नाही आणि तिथून पळालो. पण कुठंतरी मला माहित होतं की तुम्ही मला पाहिलं नसलं तरी पोलीस मला शोधून काढतील. म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलंय... हे पैसे घ्या आणि माझ्या विरोधात केलेली केस मागे घ्या.

आणि त्या हत्येचं काय¿”

कोणाची हत्या¿ मी कोणालाही मारलं नाहीये. माझ्या हातून फक्त एवढीच एक चुक झाली होती. बाकी मी कोणालाही मारलं नाही.

त्याच्या गाडीमुळे माझा अपघात झाला, या व्यतिरीक्त त्याचा आणि माझा कसलाही संबंध नव्हता. त्यालातर हे सुध्दा माहित नव्हते की माझी स्मृती नष्ट झाली होती. त्याने नकळत माझी मदत केली होती म्हणून मी त्याला सगळं काही खरं सांगितलं.

हे बघा, मला माहित नाही की तुम्ही कोण आहात आणि त्या दिवशी काय झालं होतं. मी तुमच्या किंवा कोणाही विरूध्द पोलीसांकडे तक्रार केली नाहीये. कारण त्या अपघातात माझ्या डोक्यावर मार लागला आणि मी माझ्या भूतकाळातल्या सगळ्या आठवणी गमावून बसलो. माझी स्मृती नष्ट झाली. ज्या रात्री माझा अपघात झाला, त्याच दिवशी अपघात होण्याआधी, एका महिलेचा खुन झाला होता आणि त्या संदर्भात मी पोलीसांना पत्रसुध्दा लिहिले होते. कोणाचा खुन झाला आणि कोणी केला, याच्याच शोधात पोलीस माझ्या घरी आले होते. त्यामुळे त्या रात्री काय झालं होतं, एवढंच फक्त मला माहिती करून घ्यायचं होतं. त्यापेक्षा जास्त मला काहीही नको.

माझं बोलणं ऐकल्यावर त्याची भिती काही प्रमाणात कमी झाली. पण त्याच्या मनात अजुनही शंका होतीच.

मग त्या रात्री तुम्ही माझ्या मागे पोलीसांना का लावलं¿”

त्या रात्री तुम्ही पोलीसांना पाहून पळाला. त्यामुळे पोलीसांना असं वाटलं की तुम्हीच खुनी असाल. म्हणून ते तुम्हाला पकडण्याच्या प्रयत्नात होते.

मला वाटलं... जाऊद्या. तुमचा हॉस्पीटलचा जेवढा काही खर्च झाला तेवढा किंवा त्याच्या पेक्षा जास्त माझ्याकडून घ्या. पण मला या प्रकरणातून मुक्त करा.

पैशाने भरलेली बॅग माझ्या समोर धरून तो बोलत होता.

याची गरज नाहीये.

असं म्हणून मी तिथून निघून आलो. त्याने मला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही. शेवटी हॉटेल बाहेर येताच तो माझ्या समोर येऊन उभा राहिला.

“हे बघा, जे झालं ते झालं. कदाचित तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास बसत नसेल. पण यापुढं मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्हीसुध्दा मला ओळखत नाही, असंच समजा. आपण दोघंही आपापलं आयुष्य जगुया.”

असं बोलून मी त्याच्यासोबत हात मिळवला आणि तिथून निघून आलो.

*****

मी माझ्या बेडरुममध्ये भिंतीवर कोरा कागद चिटकवला. त्यावर मला मिळालेली माहिती तारखांनुसार लिहित गेलो. जी माहिती अजूनही मला मिळाली नव्हती त्यासाठी जागा सोडली.

मी माझ्या कामात व्यस्थ असताना बेल वाजली. दारात रशमी होती. ती माझ्यावर चिढली आहे, हे तिच्या चेहेऱ्यावरून दिसत होतं. दार उघडताच ती सरळ घरात घुसली.

अरे...

सुरूवातीला मी तिला ओळखलं नाही. पण तिचा चेहेरा निट पाहिल्यावर तिचा फोटो मी माझ्या फोटो स्टुडीओत फोटोमध्ये पाहिल्याचे मला आठवले.

तू रशमीच आहेसना¿”

बघा. मला निट ओळखतंही नाहीस आणि माझ्या विरूध्द पोलीसात तक्रार केली.

सॉरी रशमी. माझ्याकडून चुक झाली मी मान्य करतो. मला तुझी आधीच माफी मागायला पाहिजे होती. पण त्याला आता बरेच दिवस होऊन गेले. तू इतक्या दिवसानंतर त्या गोष्टीचा राग मनात धरून आली आहेस का¿”

तुझ्या डोक्यावर लागलंय, तुझ्या नशिबी मेमरी लॉसचा प्रॉब्लम आलाय, या गोष्टींचा विचार करून त्यावेळी तुझ्या हातून झालेल्या चुकीला मी माफ केलं होतं. पण तुझ्या एका चुकीमुळं पोलीसांनी आमचं जगणं अवघड केलेय. सारखे येतात नव नवीन प्रश्न घेऊन... कालसुध्दा आले होते, कसलीतरी सही घ्यायला.

मी हसत म्हणालो.

अरे, ती सही केस बंद करण्यासाठीची होती. त्यामुळे केसशी निगडीत जेवढी माणसं होती त्या सगळ्यांची सही ते घेत आहेत. मला सुध्दा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. खरतर ते माझ्या घरी सुध्दा आले होते. पण मी घरी नव्हतो म्हणून त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्येच बोलवलं.

मी काय बोलत होतो, ते समजण्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला.

पण जे काही झालं ते तुझ्यामुळंच झालं ना. तू जर पोलीसांसमोर माझं नाव घेतलंच नसतंस तर आमच्या घरी सारखे पोलीस आलेच नसते.

त्यासाठी मी तुझी पुन्हा एकदा माफी मागतो. पण या नंतर ते नाही येणार याची गॅरेंटी मी देतो. हे सगळं जाऊदे. तू काय घेणार ते सांग. कॉफी की चहा.¿

चहा घेईन.

असं म्हणत ती सोफ्यावर बसली. पाच मिनीटांमध्ये मी चहा तयार करून बाहेर आलो. चहा पिता पिता आमच्या गप्पा रंगल्या.

पण तू तुझ्या आजीला सांगून का गेली नव्हती¿ किमान जिथं गेलीस तिथून एक फोन तरी करायचंस.

मी रशमीला म्हणालो.

मी आई बाबांसोबत बाहेर देशी गेले होते. आम्ही आजीला सांगितलं होतं की आम्ही महिन्याभरासाठी बाहेर जातोय म्हणून. आजींसोबत आम्ही काकांना घरी थांबवलं होतं. पण काकांना काय काम निघालं, तर ते सुध्दा दोन दिवसांसाठी दुसऱ्या गावी गेले. या दोन दिवसात आजीने मी दहा बारा दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं आणि पोलीसांना मिळालेल्या डेड्बॉडीला मी समजून पुरुन आली.

तुझ्या आजीमुळं पोलीस आम्हाला जेलमध्ये टाकणार होती.

“आजीने काकांनाही पोलीसांबद्दल काहीच सांगितलं नाही. काका दोन दिवसांनी घरी आल्यावर शेजाऱ्यांकडून त्यांना कळालं आणि त्यांनी झालेला सगळा प्रकार आम्हाला फोन करून सांगितला. आम्हाला आमची ट्रिप मध्येच कॅन्सल करून परत यावं लागलं.”

“मग या सगळ्या प्रकाराबद्दल आजीचं काय म्हणणं आहे¿”

“आजींना वाटतंय मी स्वर्गातून परत आले.”

आम्ही दोघं त्या गोष्टीवर हसलो. हसता हसता तिची नजर सहज खुडचीवर ठेवलेल्या पाकिटाकडे गेली.

हे पाकिट कसलं¿”

त्यात माझे फोटो आहेत.

मी खुडचीवरचं पाकिट रशमीला दिलं आणि पुढं बोलू लागलो.

काही जुण्या आठवणी होत्या. करीश्माच्या आईने मला दिलेत.

त्याने पाकिटातून फोटो बाहेर काढले आणि आश्चर्याने पाहू लागली.

काय झालं¿”

हे फोटो तुला करीश्माच्या आईने दिलेत¿”

हो. मला त्यांनीच दिले¿”

“पण हे कसं शक्य आहे¿ करीश्माची आई इथं कधी आली¿”

“एक आठवडा झाला त्यांना येऊन. पण हे शक्य नाही, असं तू का म्हणालीस¿”

“कारण गेल्या आठ वर्षात त्या इथं आल्याच नाही. जेव्हापासून त्यांच आणि करीश्माच्या वडीलांच डिव्हॉर्स झालाय तेव्हापासून त्या इथं आल्याच नाहीयेत.”

“डिव्हॉर्स¡ पण त्या तर म्हणत होत्या की करीश्माच्या बाबांसोबतच त्या बाहेर गेल्या होत्या आणि त्यांना काम निघालं म्हणून ते इथं येऊ शकले नाही.”

काही वेळ विचार केल्यावर रशमी म्हणाली.

“मला तर करीश्मा म्हणाली होती की गेल्या आठ वर्षात तिचं तिच्या आईशी फोनवर बोलणंसुध्दा झालं नाहीये. मग ती तिच्या आईला कधी भेटली आणि कधी बोलली¿”

“कधी बोलली म्हणजे¿ तुझ्या हातात फोटो आहेत. त्यामध्ये बघ. मी, करीश्मा आणि तिची आईसोबत बसुन फोटो काढले आहेत. आणि हे फोटो दोन महिन्यापुर्वीचे आहेत.”

“कुठं¿ यात तू, करीश्मा आणि सोनाली काकू आहे. त्या काकू आमच्या ऑफिसमध्ये काम करतात.”

मी त्याच्या हातातून फोटो घेतला आणि करीश्माच्या आईसारखी दिसणाऱ्या महिलेकडे बोट दाखवत विचारले.

“मी यांच्याबद्दल विचारतोय.”

“मीसुध्दा त्यांच्याबद्दलच सांगत आहे. ह्या बऱ्याच वर्षांपासून आमच्या ऑफिसमध्ये काम करत आहेत. म्हणून मी यांना ओळखते. पण ही करीश्माची आई नाही. पण तू यांना करीश्माची आई का म्हणतोय¿”

त्यावेळी मी टेंशनमध्ये आलो होतो. मी घरात गोलाकार मार्गात फेऱ्या मारू लागलो आणि विचार करु लागलो. नकळत माझ्या तोंडातून निघालं-

“ज्याच्याशी ती लग्न करणार आहे. त्याच मानसाला ती अंधारात ठेवत आहे.”

“लग्न¡ कोणाचं¿”

असं बोलत रशमी जाग्यावरून उभी राहिली.

“माझं आणि करीश्माचं.”

“कधी ठरवलं¿”

“दिड - एक महिन्यापुर्वीच ठरलं.”

“दिड - एक महिन्यापुर्वी¡... कसं होऊ शकतं. तुमची ओळख गेल्याच महिन्यात झाली आहे आणि ती ओळख मीच करुन दिली होती.”

बोलता बोलता ती मध्येच थांबली आणि काहीतरी विचार करू लागली.

“याचा अर्थ माझं आणि तिचं लग्न सुध्दा खोटं आहे¿”

मी तिला विचारलं.

“मला आता सगळं कळतंय, त्या दिवशी करीश्मा असं का म्हणाली... काही दिवसांपुर्वी करीश्मा मला ऑफिसमध्ये भेटली आणि मला पैसे देऊन म्हणाली की मी तुला या पुढं भेटायचं नाही. मी तिला विचारलं, का भेटायचं नाही, तर ती म्हणाली - डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्याच्या भूतकाळाशी निगडीत जेवढी माणसं आहेत त्यांना आदित्यला भेटू देऊ नका. त्याने त्याच्या मेंदूमध्ये तणावाची निर्मीती होईल आणि त्याचा त्रास वाढेल. मी तिला सांगितलं की आदित्यला जर त्रास होणार असेल तर मी त्याला का भेटायला जाईन. मग त्यासाठी पैसे का द्यायचे. त्यावर ती म्हणाली – पोलीसांमध्ये तक्रार केल्याबद्दल माफी मागायची होती आणि मानहाणी म्हणून तिने पैसे दिले होते... आता कुठं मला समजतंय, तिने असं का केलं ते. गेल्याच महिन्यात आम्ही ऑफिसमध्ये लंचच्या वेळी गप्पा मारत असताना मी सगळ्यांसमोर तुझा उल्लेख केला होता. मी म्हणाले होते की तुझ्या इतका श्रीमंत आमच्यात कोणीच नाही. पण सगळ्यांपेक्षा सामान्य आयुष्य जगणारासुध्दा तुच आहेस. तुझ्या आजोबाकडं करोडोंची प्रॉपर्टी आहे. मी असं सांगितल्यावर करीश्मा म्हणाली होती की असा कोणीतरी करोडपतीच नवरा म्हणून तिला हवा आहे. त्या नंतर तिने तुझ्याशी भेटवण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली आणि मी सुध्दा तिला तुझ्याशी भेटवलं...”

“आणि तिने मला फसवलं... पैशांसाठी.”

“एक काम कर आदित्य. तू तिच्या विरूध्द पोलीसांत तक्रार कर.”

करीश्माने मला फसवलं हे सिध्द झाल्यावर मला क्रोध येण्याऐवजी आनंद झाला. असं का होत होतं, मला सुध्दा समजत नव्हतं.

“जाऊदे. एवढं सगळं कळ्यानंतर मला तिच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीयेत आणि खोटं बोलल्याबद्दल पोलीस कोणालाही शिक्षा देत नाही.”

“मग काय तू तिला असंच सोडून देणार आहेस का¿”

मी त्यावेळी फक्त होकारार्थी मान डोलवली. त्या दिवशी मी स्वतंत्र झाल्यासारखं वाटत होतं.

*****

त्या संध्याकाळी राहुल माझ्या घरी आला आणि मी त्याला बाहेर जेवायला घेऊन गेलो. माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती म्हणून मी खुश होतो. मी त्याला करीश्माचं खरं रुप काय आहे ते सांगितलं. त्यावर तो रागावला. पण नंतर तो माझ्यासाठी खुश झाला. शेवटी सगळं माझ्या मनाप्रमाणे झालं होतं. पोलीस केस मधून माझी सुटका झाली होती, करीश्मासोबत लग्नसुध्दा करावं लागणार नव्हतं.

जेवन करून घरी आल्यावर राहुल पुन्हा एकदा त्याचा हॅलमेट आणि स्कुटरची चावी घेऊन घराबाहेर आला.

“कुठं निघालास¿”

मी त्याला विचारलं.

“कुठं म्हणजे¿ घरी आणि कुठं.”

“एवढ्या रात्रीच¿”

“दहा तर वाजलेत.”

असं म्हणून तो दारुपर्यंत गेला. मी त्याला दारातच अडवत म्हणालो.

“थांब की आजची रात्र. तसंही तुझ्याशी मला बोलायचं होतं.”

“बोल की मग आता.”

“तू आधी तो हेल्मेट आणि चावी ठेव. खुप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे.”

मी त्याला पुन्हा घरात घेऊन आलो आणि सोफ्यावर बसवत म्हणालो.

“जसं तुला माहित आहे की माझं लग्न मोडल्यातच जमा आहे. मग आता मी सायलीला माझ्या मानतली गोष्ट सांगितली तर¿”

“तुला वेड लागलंय का¿ तुझं लग्न मोडलं म्हणून काय तू तिचं लग्नसुध्दा मोडणार का¿”

“मला तिचं लग्न मोडायच नाहीये. मला तर फक्त माझ्या मनातली गोष्ट तिला सांगायची आहे. त्या नंतर तिला काय वाटेल ते बघू. आणि तसही ती लग्न फक्त घरच्यांच्या सांगण्यावरून करत आहे. घरच्यांनी तिचं लग्न पैसे देऊन ठरवलं आहे.”

“त्याला पैसे देऊन लग्न ठरवणं म्हणत नाही. ती एक प्रथा आहे की मुलीकडच्यांना मुलाला काहीतरी द्यावंच लागतं. मग ते सोना, चांदी, पैसे काहीही असो.”

“पण जर मी तिला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या तर काय बिघडतं¿”

“अरे तुला समजत कसं नाहीये, तिचं लग्न तिन चार आठवड्यावर आलंय आणि तू तिला हे सांगणार आहेस का, की तू तिच्यावर प्रेम करतो आणि तुला तिच्यासोबत लग्न करायचं आहे¿”

मी नाराज होऊन शांत बसलो. बराच वेळ मी काहीच बोललो नाही हे पाहून राहुल म्हणाला.

“एक काम कर. तिला एकांतात भेटायला बोलव आणि तुला काय सांगायचंय ते सांग. पण ही गोष्ट दुसऱ्या कोणाला कळणार नाही, याची काळजी घे.”

मी आनंदाने होकारार्थी मान डोलवली.

“पण जपुन. तुमची मैत्री आणि तिचं लग्न, या दोन्ही गोष्टी मोडू देऊ नकोस.”

“हो रे. मी काळजी घेईन.”

मी राहुलला आनंदाने मिठी मारून म्हणालो.

*****

दुसऱ्याच दिवशी मी सायलीच्या घरी गेलो. सायलीच्या आईने दार उघडलं.

“आदित्य... ”

कदाचित मी दारावर असल्याची त्यांनी अपेक्षा केली नसावी. घरात माझा स्वागत करत त्या म्हणाल्या.

“मला वाटलं सायलीचे बाबा असतील. काल त्यांचा फोन आला आणि म्हणाले की मी उद्या सकाळी घरी येतोय.”

“सायलीचे बाबा कुठं बाहेर गेलेत का¿”

“तू डॉ. रामेश्वर यांच नाव ऐकलंय का¿”

“काकू... ते मेमरी लॉस्...”

मी हसत म्हणालो.

“अरे हो, सॉरी. तेच सायलीचे बाबा आहेत. ते सुप्रसिध्द संशोधक आहेत. ते सलग दोन तिन आठवडे त्यांच्या रिसर्च सेंटरमध्येच घालवतात. त्यानंतर एक दोन दिवसासाठी घरी येतात आणि पुन्हा दोन तिन आठवड्यासाठी जातात.”

“खुप कठीन असेल त्यांचा जॉब¿”

“कठीन आहे की नाही, माहित नाही. पण एकदा का ते एखाद्या विषयात घुसले. मग ते घर-दार, कुटूंब, पैसा-पाणी सर्व काही विसरून जातात.”

मला खुडचीवर बसायला सांगून त्यांनी सायलीला आवाज दिला. आवाज दिल्या बरोबर सायली हॉलमध्ये आली.

“अरे, आदित्य. अचानक काय काम काढलंस¿”

“असं काही काम तर नाहीये. इथून जात होतो तर म्हटलं भेटून जावं आणि काही गोष्टी सांगायच्या होत्या तुला.”

“सांग की, काय सांगायचं आहे.”

“अं... परवा मला रशमी भेटायला आली होती आणि तिने सांगितलं की करीश्मा मला गेल्या महिन्यातच भेटली आहे. कारण आमची भेट तिनेच घालून दिली होती आणि आमचं लग्न कधी ठरलंच नव्हतं. करीश्मा मला फसवत होती.”

पण तिने असं का केलं¿”

पैशांसाठी.

पण तू करीश्माला विचारलंस का¿”

नाही. मला त्याची गरज वाटली नाही.

गरज वाटली नाही¡ अरे रशमी तुला खोटं बोलत असेल तर. एकदा करीश्माशी बोलून तर घे.

तिला काय विचारायचं. ती पुन्हा काहीतरी खोटं सांगणार. तिने मला त्याच्या ऑफिसमधल्या वयस्कर महिलेशी भेटवलं आणि सांगितलं की ती महिला तिची आई आहे. तिला आता काहीही विचारलं तरी ती खोटंच सांगणार. मग तिला विचारण्याचा काय फायदा.

आतापर्यंत शांतपणे आमचं बोलणं ऐकणाऱ्या सायलीच्या आईने मला विचारले.

मग तू काय करायचं ठरवलंय¿”

कशाबद्दल काकू¿”

तुमच्या लग्नाबद्दल.

सगळं काही संपलंय.

फक्त रशमीच्या बोलण्यावरून तू असं सर्व काही संपवू शकत नाहीस.

सायलीची आई मला समजवत म्हणाली.

फक्त रशमीच्या बोलण्यावरूनच नाही काकू, तिला खोटं सिध्द करणारे माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. तिने मला सांगितलं होतं की माझं या जगात कोणी नाही. खरतर तिला माझ्या आजोबांबद्दल माहित होतं, तरीसुध्दा तिने मला त्यांच्याबद्दल सांगितलं नाही. तिला माझ्या आजोबांनी माझ्या नावावर केलेल्या पैशांबद्दलसुध्दा माहित होतं पण ते सुध्दा तिने मला सांगितलं नाही, माझा फोन बंद नसून तिने तो बंद पडल्याचं सांगितलं, एक नाही अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या तिने माझ्यापासून लपवल्या आणि बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या. अशा मुलीवर मी का विश्वास करायचं, का मी तिच्याशी बोलायचं¿”

जुण्या गोष्टी आठवून मी काहीसा चिढलो होतो. पण काही वेळासाठई माझं बोलणं थांबवून स्वतःला शांत करत पुन्हा बोलू लागलो.

“... आधी मी खुप टेंशनमध्ये होतो. पण आता मी टेंशन-फ्री झालोय. मी तिच्यासोबत लग्नाचा विषय मनातून काढून टाकलाय आणि त्या महिलेच्या मृत्युच्या प्रकरणात मी तो पत्र पाठवून स्वतः अडकवलं होतं, तो केससुध्दा पोलीसांनी बंद केलाय. त्यामुळे मी त्यातून सुध्दा मुक्त झालोय.”

“जाऊदे. आता हे सगळं तू विसरून जा आणि नव्याने आयुष्याला सुरुवात कर... तुम्ही बोला मी तुच्यासाठी काहीतरी आणते.”

असं बोलून सायलीची आई किचनच्या दिशेने निघाली.

“काकू काही नको मला.”

“काही नको काय. इतक्या लांबुन आलास आणि...”

त्यांना थांबवत सायली म्हणाली.

“आई, आधी चहा बनव. नाश्ट्याचं नंतर बघू.”

सायलीची आई चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. मी खुडचीवर पुढं सरकत सायलीला हळू आवाजात म्हणाला.

“सायली, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय.”

“बोल की मग.”

ती मोठ्या आवाजात म्हणाली. मी तिला आवाज कमी करण्याचा इशारा केला आणि म्हणालो.

“मला खुप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय तुला. पण इथं नाही सांगू शकत.”

“काय सांगायचंय¿”

“आहे काहीतरी. पण महत्त्वाचं आहे.”

काही क्षणासाठी आमच्यात शांतता राहिली. या वेळेत आम्ही फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत होता. मला विश्वास होता की ती मला एकांतात भेटायला नक्की येणार. पण हिच गोष्ट मला तिच्या तोंडून ऐकायची होती. म्हणून मी विचारलं.

“येशील का¿”

“उद्या संध्याकाळी पाच वाजता, तुझ्या घरापासून टेब्स् या शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रिक् हिल्सजवळ एक कच्चा रस्ता फुटतो. त्या रस्त्यावर अर्ध्या किलोमीटरवर लाकडी पुल आहे. तिथं भेटूया.”

सायली स्मितहास्य करत म्हणाली. तेवढ्या सायलीची आई तिथं आली.

चहा पिऊन मी निघणारच होतो तेवढ्यात सायलीने विचारले.

“पत्ता लक्षात राहिल ना¿”

मी होकारार्थी मान डोलवली.

“कसला पत्ता सायली¿”

काकूंनी तिला प्रश्न विचारला.

“काही नाही गं आई. मी याला सांगितलं की फ्रेश होण्यासाठी एखादा चित्रपट पाहून ये. त्यासाठी मी त्याला चित्रपटगृहाचा पत्ता सांगितला होता.”

“मग त्याला एखाद्या कागदावर लिहून देना.”

सायलीच्या आईने सांगितल्या बरोबर सायलीने एका कागदावर पत्ता लिहून तो कागद मला दिला. मी तो कागद खिशात टाकून तिथुन निघालो

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED