Akalpit - 4 books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित - 4

(वाचकांनी हा अध्याय वाचण्या आधी सुरुवातीचे तिन अध्याय वाचावे. अन्यथा वाचकांना या अध्यायाचा अर्थ लागणार नाही.)

Chapter 4

सकाळी १० वाजता घराच्या पायऱ्यांवर मी आणि राहुल बसलो होतो. बऱ्याच वेळापासून आम्ही दोघंही शांत बसून विचार करत होतो.

“ “रशमी गेल्या दहा बारा दिवसांपासून बेपत्ता होती आणि कदाचित तिचाच खुन झाला असेल हे कोणा कोणाला माहित होतं¿”

राहुलने मला विचारले.

“मला, तुला, करीश्माला, रशमीच्या आजीला, रशमीला आणि ज्याने तिचा खुन केला त्याला, म्हणजे आपल्या अंदाजानुसार सलीलला. एवढ्यांना माहित होतं. मला नाही वाटत यापेक्षा जास्त कोणाला माहित असेल.”

“म्हणजे, प्राथमिक अंदाजानुसार रशमीला सोडून चार जणांना ती बेपत्ता झाल्याबद्दल माहित होतं. रशमीची आजी तुझ्या नावाने पत्र पाठवणार नाही. कारण आजीला तुझं नाव लक्षात राहिलं नसणार. राहिलो आपण तिघं. मी तर पुर्ण वेळ तुझ्याच सोबत होतो. त्यामुळे मी ते पत्र पाठवू शकत नाही.”

“तू माझ्या सोबत होतास, म्हणून तू पाठवलं नाही. मी तुझ्यासोबत होतो, म्हणून मी पाठवलं नाही. पत्रमुळे करीश्मा अडकली, म्हणून करीश्माने पाठवलं नसणार. मग ते पत्र पोलीसांना पाठवलं कोणी¿”

आम्ही पुन्हा विचारात मग्न झालो. विचार करताना पत्रांवरून मला पेटीतल्या प्रेमपत्रांची आठवण झाली.

“ए राहुल, ऐक ना. मला सांग कॉलेजच्या काळात मी कोणावर प्रेम करायचो¿”

“तू कोणावर प्रेम करायचास¿

“अरे तेच तर मी तुला विचारतोय.”

“माहित नाही. आम्हाला तर तुझ्या आणि सायलीवर संशय होता.”

“नाही रे. तिच्याशी माझं बोलणं झालं. तिला मी एवढंच सांगितलं होतं की मी एका मुलीवर प्रेम करतो. पण कोणावर करतो ते मी तिलासुध्दा सांगितले नव्हते. अरे हो, तुला सांगायचंच राहून गेलं. काल मला एक माणुस घरी भेटायला आला होता. त्याने मला त्याच्या घरी बोलवलंय.”

“त्याने तुला घरी बोलवलं. पण का¿ आणि कोणी बोलवलं, नाव काय त्याचं¿”

“नाव त्याने सांगितले होते पण आता ते आठवत नाहीये. घरी पेढे घेऊन आला होता. मला म्हणाला मी त्याची खुप मदत केली होती. पण त्याने सांगितलं नाही की मी त्याची कशी आणि काय मदत केली होती. तो म्हणाला की त्याची मी कशी मदत केली होती, ती सांगणारी त्यांच्या गावाला आहे आणि ती माझी वाट पाहत आहे.”

“कोण ती¿ कोण वाट पाहत आहे¿”

“माहित नाही.”

“कॉलेजच्या काळात तू जिच्यावर प्रेम करायचास, ही तिच तर नाही ना¿”

“माहित नाही. कदाचित असेल.”

“तुला हे माहित नाही, तुला ते माहित नाही. मग तुला माहित तरी काय आहे¿”

“मला एवढंच माहित आहे की त्याला माझ्या भूतकाळाबद्दल काहीतरी महत्त्वाची गोष्ट माहित आहे.”

“महत्त्वाची गोष्ट¿ अशी कोणती महत्त्वाची गोष्ट जी तू मला न सांगता त्या अनोळखी मानसाला सांगितली¿”

“ते तर त्याच्या घरी गेल्यावरच समजेल. आपल्याला त्याच्या घरी जायला हवं.”

“चल मग आताच जाऊया.”

त्याने सुध्दा जास्त काही विचार न करता गाडी काढली आणि मला घेऊन एकनाथ काकांच्या गावाच्या दिशेने निघाला. दिड ते दोन तासा नंतर, शहरापासून खुप लांब एका गावात आम्ही पोहोचलो. ते घर गावाच्या मध्यभागी हाते. त्यामुळे घरात जाण्याची आम्हाला भिती वाटली नाही. आम्ही दारावरची कुंडी वाजवली. एका महिलेने दार उघडले. आमच्या सारख्या अनोळखी माणसांना पाहून तिने विचारले.

“कोण आपण¿ काय पाहिजे आपल्याला¿”

ज्यावर पत्ता लिहिला होता तो कागदाचा तुकडा मी तिला दाखवला. तिने तो कागदाचा तुकडा हातात घेतला आणि त्यावर लिहिलेला पत्ता बारकाईने पाहू लागली. पण ती पत्ता वाचत नव्हती हे आम्हाला नंतर कळालं. ती फक्त पत्ता वाचण्याचं नाटक करत होती. काही वेळ तिथंच उभं राहून, वाचल्यासारखं करून तिने एकनाथला “आहो ऐकाता का¿” असा आवाज दिला. तिच्या आवाजाला उत्तर देत एकनाथ तिथे आला. त्याने मला पाहता क्षणी स्वतःच्या बायकोला बाजूला सरकवले आणि आमचे त्यांच्या घरात स्वागत केले.

आम्ही आत आल्यावर ते त्यांच्या बायकोला म्हणाले.

“हेच ते आदित्य साहेब. ज्यांच्याबद्दल मी तुला सांगितलं होतं.”

त्यांच्या बायकोला त्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्यांच्या चेहेऱ्यावर खुशी दिसून आली. जणू त्यासुध्दा माझ्या येण्याची वाट पाहत होत्या. त्या आनंदाने किचनमध्ये गेल्या. छोटंसं असं कवलारू घर होतं त्यांचं. खाटेवचे कपडे बाजूला करत त्यांनी आम्हाला बसायला जागा केली. आम्ही बसल्यावर काकूंनी ( एकनाथांच्या बायकोने ) ग्लासमध्ये पाणी आणून दिले.

“काका, तुम्ही म्हणाला होता ना की कोणीतरी माझी वाट बघत आहे आणि मी तुमची मदत कशी केली त्याबद्दल सांगणार आहे.”

मला उत्सुकता होती म्हणून मी काकांना विचारले.

“हो – हो, मी आताच बोलवतो.”

काका आतल्या खोलीत गेले. दहा मिनीटांनी ते व्हिलचेअरवर बसलेल्या सात आठ वर्षाच्या मुलीला घेऊन आले. तिच्या दोन्ही पायांमध्ये प्लास्टर लावलेले होते. तिच्या हातात ताट आणि ताटेत राखी ठेवलेली होती. काका तिला माझ्या समोर घेऊन आले.

“काका ही...¿”

“ही माझी मुलगी, माधवी.”

तिने मला ओवाळले आणि माझ्या हातावर राखी बांधली.

“काका, आधी का नाही सांगितलं. मी काहीतरी आणलं असतं. आता माझ्याकडं हिला देण्यासाठी काहीच नाही.”

“तुम्ही आम्हाला आधीच खुप काही दिलंय. आम्हाला आणखीन काहीही नकोय.”

“पण, आता... डिसेंबरमध्ये राखी¿ याबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाही... आणि हिच्या पायाला काय झालं¿”

माझं बोलणं संपल्याबरोबर माधवी बोलू लागली.

“दादा. माझा आणि आदिचा ना एक्सीडेंट झाला. आदि दादा तर त्यात गेला, आणि मी सुध्दा वाचले नसते पण तुम्ही मला वाचवलंत.”

मी काकांकडं पाहिलं. काकांचे डोळे पुन्हा एकदा भरून आले होते.

“दिड दोन महिन्यापुर्वी हा अपघात झाला. माझा मुलगा आदित्य जागेवरच गेला. पण माधवी त्यात वाचली. पण जास्त काळासाठी नाही. कारण दोन्ही पाय मोडले होते. शरीरातलं बरंच रक्त वाहून गेलं होतं. हिला ओपरेशन करून वाचवण्याची गरज होती आणि पहिल्या ओपरेशनसाठी दिड लाख रुपये मागितले. त्यावेळी तुम्ही आम्हाला पैसे दिले आणि ओपरेशन झालं. नंतरच्या दोन ओपरेशनचा खर्च, हॉस्पीटलचा खर्च सगळ्याचे पैसे तुम्ही भरलेत. तुम्ही आमच्यासाठी देवासारखे धावून आलात.”

काकांनी माझ्याबद्दल दिलेल्या माहितीला ऐकून राहुलला ठसका लागला.

“काय झालं¿”

काकांनी त्यांच बोलणं थांबवत राहुलला विचारलं.

“काका, तुमची मदत करणारा कोणीतरी दुसरा असेल. याच्याकडे एवढे पैसे नाही. हा तर साधा फोटोग्राफर आहे. याचा फोटोस्टुडीयो आहे. पण तो सुध्दा जास्त चालत नाही. महिन्याला मिळणाऱ्या पैशातून हा टुव्हीलर सुध्दा घेऊ शकत नाही. मग हा तुमच्या मुलीच्या खर्चाचे पैसे कसा भरू शकतो¿”

मी राहुलच्या बोलण्याशी सहमत होतो.

“यांची आर्थीक परिस्थिति काय आहे, मला माहित आहे. तरी या मानसाने मला एवढी मदत केली. दुसऱ्या कोणाकडं एवढा पैसा असता, तर त्याने स्वतःसाठी गाडी, बंगला घेतला असता. पण या मानसाने स्वतःची परिस्थिति खराब असताना मला एवढी मोठी मदत केली. म्हणून तर हे आमच्यासाठी देव आहेत.”

राहुल आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले. हे कसं शक्य झालं, हेच आम्हाला समजत नव्हतं. तिथून घरी येण्याच्या मार्गावर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा करू लागलो.

“हे कसं शक्य आहे. माझ्याकडे एवढे पैसे आले कुठून¿ मी करीश्माकडून उधार तर घेतले नाहीत ना¿”

मी राहुलला विचारले.

“नाही रे. मला नाही वाटत की तू तिच्याकडे पैसे मागितले असतील आणि जरी मागितलेस तरी करीश्मा तुला एवढे पैसे देईल, हे तर मुळीच शक्य नाही.... मला असं वाटतंय की तू तुझ्या आजोबांकडून उधार घेतले अतली. एवढे पैसे तेच देऊ शकतात.”

“काय¡ माझे आजोबा कुठून आले¿ म्हणजे मी तर अनाथ होतो ना. मग माझे अजोबा.”

“हो, तू अनाथ आहेस. तुला आई वडील नाहीत. पण अजोबा आहेत. ते बालान्गीर शहरात राहतात. ते खुप पैसेवाले आहेत. त्यांना फक्त एकच मुलगा होता. ते म्हणजे तुझे बाबा. तुझ्या बाबांनी प्रेमविवाह केल्यामुळे त्यांनी तुझ्या बाबांना घरातून काढून टाकलं. पण तुझ्या जन्मानंतर त्यांनी तुझ्या बाबांना स्विकारलं. पण तुझे बाबा तुझ्या आजोबांकडे गेले नाही. ते इथंच राहिले. तू जेव्हा पंधरा वर्षाचा होतास तेव्हा तुझे बाबा आणि तुझी आई दोन्ही वारले. त्यांच्या गेल्यानंतर तुझं शिक्षण तू इथंच राहून पुर्ण केलंस. त्यासाठीचे पैसे तुझ्या आजोबांनीच दिले होते. तू नेहेमी त्यांना भेटायला जायचास.”

“एवढी महत्त्वाची बातमी तू मला आता सांगतोय¿”

“मला वाटलं करीश्माने तुला सगळं सांगितलं असेल. पण तिने तुला नाही सांगितलं, याचा अर्थ तिला सुध्दा तुझ्या आजोबांबद्दल तू सांगितलं नसणार.”

“तिला सुध्दा म्हणजे¿”

“म्हणजे तुझ्या आजोबांबद्दल फक्त मला आणि सायलीलाच माहिती होतं. तू बाकी कोणालाच तुझ्या आजोबांबद्दल सांगितलं नव्हतंस आणि मला असं वाटतंय की तुला पैसे त्यांनीच दिले असणार.”

“पण जर माझे आजोबा एवढे श्रीमंत आहेत. तर मी असा फटीचर का¿”

“ते तर मला सुध्दा माहित नाही. आम्हाला तर असं वाटायचं की तू आमच्याशी खोट बोलत असशील पण...”

मी काही वेळ विचार करण्यात घालवला आणि नंतर म्हणालो.

“राहुल. मला माझ्या आजोबांना भेटायचंय. त्यांचा पत्ता मिळू शकेल.”

“पत्ता मला माहित आहे... त्यावेळी जर तू मला खरा पत्ता सांगितला असशील तर.”

तिथून आम्ही माझ्या आजोबांकड जायचं ठरवलं. राहुलला माहित असणाऱ्या शहरात आम्ही पोहोचलो. त्याला जो पत्ता मी बऱ्याच वर्षांपुर्वी सांगितला होता त्यावरून आणि माझ्या आडनावावरून मी माझ्या आजोबांच्या घरापर्यंत पोहोचलो. माझे आजोबा भल्यामोठ्या अशा वाड्यात राहत होते. वाड्यात प्रवेश केल्यावर आम्ही वाड्याची रचना पाहण्यात इतके गुंग झालो की आम्ही तिथं कोणत्या कामासाठी गेलो होतो तेच विसरलो. आम्हाला वाड्याच्या चौकात उभं राहून वाड्याकडे पाहताना बघून एक वृध्द महिला आमच्या दिशेने आली आणि आम्हाला आवाज देत म्हणाली.

“कोण पाहिजे तुम्हाला¿”

“अं... आजी. इथं कोणी...”

राहुल माझ्या आजोबाबद्दल आजीला विचारणार, त्याआधी आजीने त्यांचा चश्मा लावत माझ्याकडे पाहिले.

“आदित्य बाळा तू¿”

आजीने मला ओळखलं. याचा अर्थ होता, मी राहुलला आणि सायलीला जे काही माझ्या आजोबांबद्दल सांगितलं होतं ते सत्य होतं.

“खरंच. या जगात तुझ्यासारखी मुलं जिवंत आहेत म्हणून हे जग चाललंय.”

आजी पुढं बोलू लागली. “... आजकालची मुलं एकदा का शहरात निघून गेली तर परत म्हाताऱ्यांना भेटायला येत नाहीत. पण आमचा आदित्य त्यातला नाहीये... चला बाळांनो, घरी या.”

आजी पुढं चालू लागली आणि आम्ही त्यांच्या मागं. त्या आम्हाला खालच्या मजल्यावरच्या एका खोलीत घेऊन गेल्या. आम्हाला बसायला सांगून आजी किचनमध्ये जाऊन आमच्यासाठी पाणी घेऊन आल्या.

“आजी, आजोबा कुठं... म्हणजे कोणत्या खोलीत राहतात¿”

मी आजीला विचारले. पण माझ्या प्रश्नाला ऐकून आजी माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागली. मला वाटलं त्यांना आश्चर्यतर होणारच. आपल्याकडे नेहेमी येणारा व्यक्ती जेव्हा अचानक आपलाच पत्ता विचारतो तेव्हा आश्चर्य होणं सहाजीक आहे. त्यांचा गैरसमज दुर करत मी त्यांना सांगितले.

“त्याच काय झालं ना आजी की अकरा बारा दिवसांपुर्वी माझा एक्सीडेंट झाला आणि त्या एक्सीडेंटमध्ये माझ्या डोक्यावर मार लागला. त्यामुळे माझी स्मृती नष्ट झाली. मी एक्सीडेंटच्या आधीच्या सगळ्या गोष्टी विसरलो. मला तर हे सुध्दा माहित नव्हतं की मी कोण आहे. हा माझा मित्र राहुल. भूतकाळातल्या बऱ्याच गोष्टी यानेच मला सांगितल्या. आजोबांबद्दल सुध्दा यानेच सांगितलं की मला एक आजोबा आहेत, ते इथं राहतात आणि मी त्यांना भेटायला मधून मधून येत राहतो... त्याने मला आज दुपारी सांगितलं. मी हे ऐकल्याबरोबर इथं त्यांना भेटायला आलो... तर, कुठं आहेत अजोबा¿”

आजी अजूनही माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती.

“तुला काहीच आठवत नाहीये का रे¿”

“खरंच आजी मला काहीच आठवत नाहीये.”

आजी आमच्या समोर ठेवलेल्या खुडचीवर बसली आणि आम्हाला सांगू लागली.

“तुझे अजोबा तिन महिण्यांपुर्वीच वारले.”

ते ऐकल्यावर राहुल आणि मला धक्काच बसला. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. आम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आलो होतो, त्या उत्तराचा स्रोतच राहिला नव्हता.

“आजी हे कसं झालं आणि मी त्यावेळी कुठं होतो¿”

“तुला तुझ्या आजोबांबद्दल कळाल्यावर तू इथं आला होतास.”

माझे आजोबा होते, पण आता ते नाहीत. असा विचार करत मी शांत बसलो. मी विसरून गेलो की आम्ही तिथं का गेलो होतो ते. पण राहुल मात्र विसरला नाही. त्याने आजीला विचारले.

“आजी, आदित्यने त्याच्या अजोबांकडून काही पैसे उधार घेतले होते, याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का¿”

“उधार¡ आदित्यचं त्याच्या आजोबांच्या पैशांवर तर त्याचाच हक्क होता. आदित्यच्या आजोबाला एकच मुलगा होता आणि तो सुध्दा वाडा सोडून निघून गेला. आदित्यच्या वडलांचा अपघातात मृत्यु झाल्यानंतर आदित्यच्या आजोबाने त्याला इथं बोलवलं. पण याने त्याच्या वडीलांच्या आदेशाचं पालन केलं. हा इथं राहण्यासाठी आला नाहीस. पण त्याच्या अजोबाला भेटायला नेहेमी येत राहिला. आदित्यच्या अजोबांनी त्याला शिक्षणासाठी पुर्ण करण्यात मदत केली. पण पुढंच्या आयुष्यासाठी याने त्यांची मदत नाकारली. आदित्यने त्याच्या मेहेनतीवर पैसे कमवायचे ठरवले आणि तिथंच कुठंतरी फोटोचं दुकान टाकलं. जेव्हा आदित्यच्या अजोबांची तब्बेत जास्तच खराब झाली तेव्हा हा इथंच राहिला होता. जोपर्यंत त्यांच अंतीमसंस्कार झालं नाही तोपर्यंत तो कुठंच गेला नाही. आदित्यच्या अजोबांचं याच्या शिवाय या जगात कोणीही नव्हतं. मी फक्त त्यांची मोलकरणी होते. तरी त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टी मधला काही भाग माझ्या नावी केलं आणि बाकीची सगळी प्रॉपर्टी आदित्यच्या नावावर केली. त्यांनी माझ्या नावावर ही खोली आणि दोन लाख रुपये सोडले. बाकी सगळं आदित्यच्या नावावर. हा वाडा खुप मोठा आहे. या वाड्याचीच किम्मत करोडोंमध्ये आहे. सोबत त्यांनी याच्या नावावर एक कोटी रोख रक्कम केली. पण हा काहीही न घेता तसाच निघून गेला. पण दिड दोन महिण्यांपुर्वी आदित्य परत आला. माझ्यासारख्या मोलकरणीच्या नावावर याने हा वाडा केला आणि फक्त पंन्नास लाख रुपये घेऊन हा निघून गेलास. त्यानंतर एकदा हा मला भेटायला आला होता. पण त्यानंतर हा आज आला आहे.”

“आजी मी त्या पंन्नास लाख रुपयांचं काय केलं¿ मी तुम्हाला सांगितलं होतं का त्याबद्दल¿”

मी आजींना विचारलं.

“त्याबद्दल तू मला काही सांगितलं नाहीस.”

आजींनी सांगिलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. त्या पन्नास लाखमधले काही पैसे मी एकनाथ काकांना दिले असणार. पण बाकिचे पैसे मी कुठं ठेवलेत किंवा कोणाला दिलेत याबद्दल अद्यापही मला माहित नव्हतं.

त्या रात्री आम्ही वाड्यावरच राहिलो आणि दुसऱ्या दिवशी घराच्या दिशेने निघालो.

*****

संध्याकाळी ५ वाजता,

घरातल्या सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्थ केल्या होत्या. मी आणि राहुल वेगवेगळ्या दिशांमध्ये घरात पैसे कुठं ठेवलेत ते शोधत होतो.

“काही सापडलं का¿”

राहुलने दमून सोफ्यावर बसत विचारले.

“नाही. अजून तरी काही खास सापडलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव. करीश्माला काल जे काही झालं त्याच्याबद्दल काहीही सांगू नकोस.”

“मला तुझी हिच गोष्ट आवडत नाही. महत्त्वाच्या गोष्टी आपल्या माणसांपासून तू लपवतोस. गेल्या वर्षापासून मला सांगत आलास की तू सायलीच्या टच् मध्ये नाहीस, तुला माहित नाही की सायली कुठं आहे ते आणि सायलीकडून कळालं की तू अजूनसुध्दा तिला भेटत होतास. एवढंच नाही तर तिच्या लग्नाबद्दल कळताच तिला लग्नाचा गिफ्ट महिनाभर आधीच दिलास. करीश्मा होणारी बायको आहे, तिला अजोबांबद्दल काहीच सांगितलं नाहीस. अजोबा वारले, त्यांनी एवढी संपत्ती तुझ्या नावावर केली, तू त्यांच्या संपत्तीचा त्याग केलास, नंतर पंन्नास लाख घेऊन आलास. यातली एकही गोष्ट तू मला सांगितली नाहीस. तू असा का वागतोस¿”

“हे बघं, भूतकाळात मी तुमच्यापासून या सगळ्या गोष्टी का लपवल्या ते मला माहित नाही. पण करीश्मा आधीच खुप टेंशनमध्ये असते. त्यात तिला जर काल झालेली गोष्ट सांगितली, तर ती आणखी टेंशन घेऊन बसेल. आधीच तिने आमच्या लग्नाची तारीख दोन महिने पुढं ढकलली आहे आणि...”

“म्हणून काय करीश्माला काहीच सांगायचं नाही का¿”

“मी असं म्हणत नाहीये की तिला काहीच सांगायचं नाही. आपण करीश्माला एवढंच सांगायचं की माझ्या अजोबांनी मला पंच्वीस लाख रुपये दिले होते आणि ते पैसे मी कुठं ठेवले ते मला आठवत नाहीये. मी आजोबांच्या वाड्यावरून पंन्नास लाख घेऊन आलो होतो, हे सांगायाचं नाही. मी एकनाथ काकांना त्यांच्या मुलीसाठी पंन्नास लाखातले किती पैसे दिले असतील¿ सहा लाख¿ दहा लाख¿ जास्तीत जास्त विस लाख... याचा अर्थ उरलेले तिस ते पंच्वीस लाख माझ्याकडेच कुठंतरी असणार...”

मी बोलत असताना बेल वाजली. दारा बाहेर करीश्मा असण्याची दाट शक्यता होती. आम्ही जाऊन दार उघडले. आमचा संशय खरा ठरताच राहुल आणि मी एकमेकांच्या तोंडाकडं पाहले.

“काय झालं¿ तुम्ही असं एकमेकांकडं का पाहाताय¿ आणि काल कुठं गेला होता¿ मी काल सकाळी आले तेव्हा घराला कुलूप आणि संध्याकाळी आले तेव्हासुध्दा दाराला कुलूप...”

“त्याचं काय झालं करीश्मा....”

मी दारातून बाजूला होऊन करीश्माला कारण सांगायला सुरुवात केली. पण आत येताच करीश्माने घराची अवस्था पाहून ती मला मध्येच थांबवत म्हणाली.

“हे काय आहे¿ घर परत घान का केला¿”

“तेच तर मी तुला सांगतोय करीश्मा. त्याचं काय झालं ना की आम्ही काहीतरी शोधत होतो. त्यामुळे थोडा घान झाला घर.”

“थोडा घान नाही, खुप घान झालाय. असं काय शोधत होता तुम्ही¿”

“पैसे शोधत होतो. माझे थोडे पैसे हरवलेत.”

“थोडे म्हणजे किती पैसे हरवलेत¿”

“पंच्वीस लाख.”

“काय¡ पंच्वीस लाख¿ आणि तुझ्याकडून पैसे हरवायला तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून¿”

“मला माझ्या अजोबांनी दिले होते.”

माझ्या वाक्यात ‘अजोबा’ हा शब्द ऐकून जणू ती माझ्या अंगावर धावूनच आली. माझ्या खांद्यांना धरून तिने मला गदागदा हलवले आणि म्हणाली.

“तुझ्या अजोबांनी त्याच्या प्रॉपर्टीतली जी रोख रक्कम तुझ्या नावावर केली होती हे ते पैसे आहे का¿”

“हो हे तेच पैसे आहे. पण ...”

“आणि तुला कोणी सांगितलं की त्यांनी तुला पंच्वीस लाख रुपये दिले होते¿”

“मी काल बालान्गीरला अजोबांच्या वाड्यावर गेलो होतो. तिथल्या एका आजीने सांगितलं. पण मला...”

“आजी¡ कोण आजी¿”

“वाड्यावर एक वृध्द महिला, मोलकरीन म्हणून काम करत आहे. त्यांनी सांगितलं.”

करीश्मा प्रश्नावर प्रश्न विचारत होती. मला पुढं काही विचारण्याची संधीच देत नव्हती.

“अरे वेड्या. मोलकरणीला काय माहित तुझ्या अजोबांनी तुला किती पैसे दिले होते. तुझ्या अजोबांनी तुला एक कोटी रुपये दिले होते.”

“पण हे तुला कसं माहित¿”

शेवटी मला जो प्रश्न विचारायचा होता तो मी तिला विचारला.

“तुच मला एकदा सांगितलं होतंस. ते पैसे तू घरी घेऊन आला होता.”

“मी घरी एक कोटी रुपये आणले होते¿”

“हो, तू एक कोटीची रक्कम आणली होती आणि ती रक्कम तू तुझ्या लॉकरमध्ये ठेवली होतीस. तो लॉकर अजूनही तुझ्या किचनमध्ये असेल. म्हणून तर मी तुला त्या लॉकरबद्दल विचारत होते.”

तिच्या बोलण्यावर मी विचार करू लागलो. करीश्माच्या मागे उभा राहुल तिला खरं सांगण्यासाठी मला इशाऱ्यात सांगत होता. मी त्याला गप्प राहण्यासाठी इशाऱ्यातच सांगितलं.

“मला सांग तू पुर्ण घरात पैसे शोधलेस. तुला तो लॉकर सापडला नाही¿”

“आम्हाला कोणताही लॉकर किंवा त्याच्यासारखी वस्तू सापडली नाही.”

करीश्माच्या मागे उभा राहुलने करीश्माच्या प्रश्नाचे उत्तर दिले. करीश्मा आम्हाला घेऊन किचनमध्ये आली. किचनच्या एका कोपऱ्यात भिंतीमध्ये लाकडी कप्पा केला होता. त्याचा रंग भिंतीच्या रंगाप्रमाणे असल्याने तिथं कप्पा आहे हे कळून आलं नव्हतं. तिने तो कप्पा उघडला. आत स्टिलचा चौकोणी लॉकर होता.

“काय खत्तरनाक आयडी केलीस आद्या.”

माझ्या शेजारी उभा राहुल माझ्या पाठीवर थाप मारत म्हणाला. करीश्माने माझ्याकडे पाहून “पुढं ये” असं सांगितलं. मी पुढं आलो.

“हा लॉकर साधासुधा नाहीये. यावर फिंगर-प्रिंट लॉक आहे. म्हणजे हा लॉकर आदित्य शिवाय कोणालाही उघडता येणार नाही.”

“फिंगर-प्रिंट लॉक¡ आणि माझ्या फिंगर-प्रिंट शिवाय हा उघडत नाही¿”

“मी तेच सांगितलं ना. आता वेळ वाया घालवू नकोस. बघ तू यात किती पैसे ठेवले आहेस.”

मी पुढं आलो आणि लॉकरच्या स्क्रिनवर बोट ठेवायला हात पुढं केला.

“असं वाटतं मी १९९४ मध्ये नाही, २०३० मध्ये आहे. अशा गोष्टी मी फक्त पिक्चरमध्येच पाहिल्या आहेत. हा आद्या अशा गोष्टी कुठून आणतो माहित नाही.”

माझ्या मागे उभा राहुल बोलत होता.

तो लॉकर उघडताच करीश्माला कळणार होतं की त्यात फक्त पंच्वीस ते तिस लाखच आहे. ते पाहिल्यावर तिला माझ्या संशय होणार आणि त्यावेळी मला करीश्माला खरं काय ते सांगावं लागणार होतं. मी माझ्या हाताची बोटं लॉकरच्या स्क्रिनवर ठेवली. काही क्षणातच माझ्या बोटांच्या ठशांना ओळखून लॉकर उघडला. लॉकरचा दार उघडताच आम्हा तिघांना धक्का बसला. मला आणि राहुलला छोटा धक्का आणि करीश्माला मोठा धक्का. आपण करीश्माच्या धक्क्याची तुलना हार्ट अटॅक सोबत करु शकू, एवढी त्याची तिव्रता होती. लॉकर रिकामे होते. काही सेकंदांसाठी करीश्मा सुन्न झाली. मी हळूहळू मागे सरकलो आणि राहुलला खांदे उडवून घडालेल्या प्रकाराबद्दल काही समजलं का असं विचारले.

“पैसे कुठंय¿”

अचानक करीश्मा ओरडली. तिच्या आवाजाने आम्ही दोघं दचकलो.

“आम्हाला काय माहित. आम्ही सुध्दा पैसेच शोधतोय.”

करीश्मा घाबरलेली आणि गोंधळलेली दिसत होती.

“आताच्या आता पोलीसांत जाऊन तक्रार करूया.”

करीश्मा माझ्याशी बोलत होती. शेजारी उभा राहुल म्हणाला.

“असंही होऊ शकतं ना की आदित्यने ते पैसे कोणाला दिले असतील.”

“एक कोटी रुपये होते. आदित्य एवढी मोठी रक्कम कोणाला देणार¿”

“मी माझ्या बँक अकाऊंटमध्ये ठेवले असतील कदाचित.”

मी माझी शंका तिच्यासमोर व्यक्त केली.

“तुझ्याकडं बँक अकाऊंटच नाहीये आदित्य. आपल्याला आता लगेच जाऊन पोलीसांना पैसे चोरीला गेल्याची तक्रार केली पाहिजे.”

नाईलाजाने आम्ही तिच्या सोबत पैसे चोरीला गेल्याची तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो आणि सोबत तो लॉकर सुध्दा घेऊन गेलो.

पोलीस स्टेशनमध्ये...

मी, करीश्मा आणि राहुल. आम्ही तिघं एका लाईनीत पोलीस इन्स्पेक्टर समोर बसलो होतो. टेबलावर लॉकर ठेवला होता आणि त्या लॉकरचे पोलीस इन्स्पेक्टर निरीक्षण करत होते.

“सर, या लॉरमध्ये एक कोटी रुपये ठेवले होते. ते चोरीला गेलेत.”

करीश्मा इन्स्पेक्टरला सांगत होती. तिचं वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टरने पुन्हा एकादा लॉकरकडं पाहिलं.

“तुम्हाला असं म्हणायचं की तुम्ही टेबलावर ठेवलेल्या या चौकणी डब्यात एक कोटी रुपये ठेवले होते आणि ते कोणीतरी चोरले¿”

“हो, असचं झालं होतं.”

“नाही सर. यात एक कोटी रुपये नव्हते. यात तर फक्त पंच्वीस लाख रुपये होते.”

राहुल मध्येच बोलला. त्याचं बोलणं ऐकून करीश्मा त्याच्याकडे रागाने पाहू लागली.

“एक मिनीट. या मॅडम् म्हणत आहेत की या लोखंडाच्या डब्यातून एक कोटी रुपये चोरीला गेले आणि हे मिस्टर म्हणत आहेत की यातून पंच्वीस लाख रुपये चोरीला गेलेत.”

“सर, माझं ऐका. या लॉकरमध्ये एक कोटी रुपयेच होते.”

“मॅडम् , तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का¿ या लोखंडी चौकोणी डब्यात एक कोटी रुपये बसणार कसे¿ आता यात एक कोटी रुपयांचा चेक असता तर गोष्ट वेगळी होती...”

इन्स्पेक्टर बोलत असाना राहुल मध्येच म्हणाला.

“सर, मी सांगतोय ना की यात पंच्वीस लाख रुपये होते.”

“तुम्ही दोन मिनीटं शांत बसाल का¿ एक कोटी काय, पंच्वीस लाख काय, तुमच्या तिघांचा वर्षभराचा पगार जरी जोडला तरी तुम्ही एक लाख रुपये कमवू शकणार नाही. मग तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले¿”

“माझ्या आजोबांनंतर त्यांच्या प्रोपर्टीचा मी एकटा वारस आहे. त्यामुळे त्यांच्याकडे होते त्यातले पंच्वीस लाख रुपये मी घरी आणले होते...”

मला मध्येच थांबवत करीश्मा म्हणाली.

“आदित्य, काय बोलतोय¿”

“मी खरं बोलतोय. यात एक कोटी नव्हते.”

आम्हाला थांबवत इन्स्पेक्टर आम्हाला म्हणाले.

“पण हा लॉकर तर बंद आहे. तुम्हाला कसं कळालं की यातून पैसे चोरीला गेलेत म्हणून¿”

मी लॉकरच्या स्क्रिनवर बोट ठेवलं आणि त्या लॉकरचा दार उघडून इन्स्पेक्टरला दाखवला. पोलीस आणि त्यांचे कॉन्स्टेबल्स् त्या लॉकरकडं आश्चर्याने पाहू लागले.

“हे काय होतं¿”

“फिंगर-प्रिंट लॉक.”

मी पोलीसांना सांगितले.

“मी असं काही पहिल्यांदाच पाहिलं आहे...” बोलताना त्यांना अचानक काहीतरी आठवलं आणि ते पुढं बोलू लागले. “... एक मिनेट. तुमच्या या लॉकरमधून पैसे काढायला तुमच्या फिंगर प्रिंटची गरज आहे आणि तुमच्या शिवाय दुसरं कोणीही पैसे काढू शकत नाही. या लॉकरवर याला जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्याचे निशान सुध्दा नाहीये. त्यामुळे याला तोडून कोणीतरी पैसे चोरलेत असंही म्हणता येणार नाही. मला वाटतं तुम्हीच या लॉकरमधून पैसे काढून कोणाला तरी दिले असणार किंवा दुसरीकडं कुठंतरी ठेवले असणार आणि त्याबद्दल तुम्ही यांना सांगितलं नसणार. त्यामुळे तुमच्या पैशांबद्दल यांना कोणाला माहित नाहीये. राहिला प्रश्न तुमचा तर तुम्ही कोणाला पैसे दिले किंवा कुठं ठेवले हे तुम्हाला आठवणार नाही. कारण तुमची मेमरी तर कायमची गेली आहे. त्यामुळे माझं ऐका, घरात, घराच्या आजूबाजूला, नातेवाईकांमध्ये, मित्र मैत्रिणींकडे पैशांबद्दल विचारा. जर सगळ्यांना विचारल्यानंतर, सगळीकडं शोधल्यानंतरसुध्दा पैसे सापडले नाही तर आम्ही तुमची रिपोर्ट लिहून घेऊ...”

इन्स्पेक्टरांचं बोलणं योग्यच होतं. पण इन्स्पेक्टरचं बोलणं संपण्याआधी करीश्मा जाग्यावरून उठली आणि माझं हात धरून मला उठवत म्हणाली.

“आदित्य चल.”

“थोडं थांब. इन्स्पेक्टर योग्य तेच बोलत आहेत.”

यावेळी मी करीश्मावर आवाज वाढवून बोललो. माझ्या नजरेतून माझ्या मनातला तिच्याबद्दलचा राग मी दाखवून दिला होता. काही क्षणासाठी आम्ही फक्त एकमेकांकडं पाहत राहिलो. तिने तिथून जाण्याचा निर्णय घेतला होता. पण जाण्याआधी ती मला म्हणाली.

“आदित्य, आज तुला कदाचित माझा राग आला असेल. पण मी तरी काय करणार. माझ्याकडं दुसरा मार्ग नाहीये. फक्त आज तू माझ्यावर विश्वास दाखव.”

एवढं बोलून ती निघून गेली. तिच्या मागोमाग आम्हीसुध्दा निघोलो. पण ती तिच्या मार्गाने आणि आम्ही आमच्या मार्गाने.

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED