Akalpit books and stories free download online pdf in Marathi

अकल्पित

अल्मोरा शहर, डिसेंबर २०१७...

“आदित्य देसाई आपणच का¿”

मनीषने आदित्यला विचारले.

“हो, मीच आदित्य देसाई. बोला काय काम आहे¿”

“मला तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत¿”

महाविद्यालयात शिकणारा मनीष २६ वर्षीय आदित्यला भेटायला त्याच्या घरी आला होता.

“कोणत्या गोष्टी¿”

आदित्यने समोरच्या खुडचीवर बसत विचारले.

“मलीसाच्या मृत्युबद्दल विचारायचे आहे. खरंतर तिच्या मृत्युला अपघाती मृत्यु म्हणून घोषीत केलं आणि त्या केसची फाईल बंद झाली आहे. पण त्या केसमध्ये तुमचं नाव वारंवार येत राहिलं. तर...”

“तर त्यासाठी तुम्ही पोलीसांकडं जावा, त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारा. ते तुम्हाला हव्या त्या प्रश्नांची उत्तरं देतील... आणि राहिला प्रश्न माझं नाव त्या केसमध्ये येण्याचा, तर पोलीसांच्या कोणत्याही रेकॉर्डमध्ये माझं नाव नाहीये. काही वर्तमान पत्रांनी माझं नाव त्या केसमध्ये टाकलं ते फक्त त्यांच्या वर्तमान पत्राची खप वाढवण्यासाठी.”

“मी तेच करणार होतो. पण मला वाटलं जर तुमच्याकडून सत्य जाणून घेतलं, तर तुमच्यावर जे आरोप लावले होते. ते मिटवता येतील.”

“पहिली गोष्ट माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत. आणि जरी असती तरी त्यांना मिटवण्याची मला गरज वाटत नाही.”

“पण मलीसाच्या मृत्यु मागचं सत्य जगासमोर यावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी तिच्या जिवनावर पुस्तक लिहायचे ठरवले आहे आणि त्यासाठी तिचा मृत्यु नक्की कसा झाला ते मला जाणून घेणे खुप गरजेचे आहे.”

“कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. कोणीतरी माझं नाव त्या केसमध्ये छापलं म्हणून तुम्ही मला शोधत माझ्या घरी आलात.”

“मलाच काय, तुमच्याबद्दल कोणालाही काहीही माहित नव्हतं, तुमच्यापर्यंत मी कसा पोहोचलो, ते माझं मलाच माहित... तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तुमच्या जिवनातला मलीसा सोबतचा एखादा प्रसंग किंवा तुमचा एखादा अनुभव... काहीही सांगितलं तरी चालेल.”

काही वेळासाठी आदित्य शांत राहिला. एका क्षणासाठी मनीषच्या मनात आलं की आदित्य त्याला काहीसुध्दा सांगणार नाही. पण काही वेळाने आदित्यने मलीसाच्या मृत्युबद्दल सांगायला सुरवात केली.

“देश परदेशात फिरत असताना ती टेब्स या शहरात आली. ती ब्लु डायमंड या हॉटेलमध्ये थांबली. तिला त्या शहराचा आणि त्या हॉटेलचा इतिहास माहित होता. कदाचित ती इतिहासाला जवळून पाहण्यासाठीच तिथं आली होती. तिथं आल्यावर तिने एक दिवस रुममध्ये तर दुसरा दिवस फिरण्यात घालवला आणि तिसऱ्या दिवशी ती हॉटेलमधून गायब झाली. तिला शोधण्याचा सर्वांनी खुप प्रयत्न केला. पण ती सापडली नाही. दोन आठवड्यानंतर तिचा शव त्याच हॉटेलच्या पाणीच्या टाकीत सापडला. तिच्या मृत्युपुर्वीचा व्हिडीयो जेव्हा प्रसारमाध्यमांसमोर आला, तेव्हा संपुर्ण जगाची नजर या केसकडे वळाली.”

“पण या गोष्टी मला माहित आहेत. मलाच काय आख्ख्या जगाला माहित आहेत. मग तुम्ही वेगळं काय सांगितलं. या सगळ्या घटनेत तुम्ही कुठंच नव्हता.”

“मी या सगळ्या घटनेत तिथंच होतो. या सगळ्या घटना माझ्या समोरच घडाल्या.”

“तुम्ही जर तिथंच होता तर तुम्हाला माहित असेलच की मलीसा सोबत नक्की काय झालं होतं ते¿ कारण सगळ्या सुरक्षा यंत्रना तोडून पाण्याच्या टाकीपर्यंत जाणं, विस फुट उंच टाकीवर शिडी शिवाय चढणं आणि टाकित पडल्यानंतर टाकीचे लोखंडी झाकण बाहेरून बंद करणं, तिच्यासारख्या बावीस वर्षाच्या मुलीला शक्यच होणार नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली, हे चुकीचं आहे आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आणि पोलीस चौकशीत तिचा अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होणं, सि.सि.टि.व्ही. कॅमेऱ्यात तिचं एकटीचं दिसणं, हे या प्रकरणाच्या उत्तराला अनंत अंधारात ढकलतात. जर तुम्ही तिथेच होता तर तुम्हाला माहितच असेल की तिच्या सोबत काय झालं होतं¿”

“माहित आहे.”

“मग तुम्ही सांगितल का नाही¿”

“ज्या दिवशी तुझ्यावर माझा पुर्ण विश्वास बसेल. त्या दिवशी मी तुला सर्व काही खरं सांगेन.”

“पण तुम्हाला माझ्यावर कधी विश्वास बसणार¿ म्हणजे तुम्हाला माझ्यावर कधी विश्वास बसलाच नाही तर काय तुम्ही मला कधीच सांगणार नाही का¿”

“ज्यावेळी माझ्या बोलण्यावर तुला विश्वास बसेल त्यावेळी समजायचं की माझासुध्दा तुझ्यावर विश्वास बसला म्हणून.”

“तुम्ही मला जे काही सांगाल, त्यावर मी थोडासुध्दा अविश्वास दाखवणार नाही. त्यामुळे तुम्ही मला सर्व काही सांगू शकता.”

“तू माझ्या बोलण्यावर आणि माझ्यावर किती विश्वास ठेवतोस ते काही क्षणात स्पष्ट होणारंच आहे.”

“ठिक आहे. ज्यावेळी तुम्हाला माझ्यावर पुर्ण विश्वास बसेल त्यावेळी तुम्ही मला सांगा. पण या क्षणी तुम्ही मला एवढं तर सांगूच शकता की मलीसा आणि तुमच्यात काय संबंध होता¿ म्हणजे तुम्ही तिला कोणत्या संदर्भात ओळखता¿”

“मी तिच्या बॉयफ्रेंडला ओळखतो आणि त्याच्यामुळेच माझी आणि मलीसाची भेट झाली होती.”

“तुमची आणि मलीसाची भेट कशी झाली किंवा मलीसा स्वभावाने कशी होती ते सांगाल का¿”

“खुप मोठी गोष्ट आहे.”

“तुमच्याजवळ वेळ असेल तर... जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं.”

“माझ्याजवळ फक्त तिन तास आहेत. बघू तिन तासात मी किती सांगू शकतो ते... आणि या तिन तासात जर तुला माझ्यावर विश्वास बसला तर ठिक.”

“का¿ तिन तासानंतर काय होणार आहे¿”

आदित्य सुटकेसच्या दिशेने इशारा करत म्हणाला.

“तिन तासानंतर मला हे डायल डॉ. रामेश्वर यांच्या लॅबमध्ये ठेवायला जायचं आहे.”

“हे तेच संशोधक आहेत ना, ज्यांच आज सायन्स् फ्रिक्शन विषयावर लेक्चर आहे¿”

“तो विषय सायन्स् फ्रिक्शन नाहीये. असो, तो आपला सध्याचा विषय नाही. चल मी तुला माझी गोष्ट सांगतो, तुझ्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करूया. या प्रकरणाची सुरुवात त्या दिवशी झाली...

*****

अल्मोरा शहर, २१ नोव्हेंबर १९९४,

सर्व काही अस्पष्ट आणि अंधूक असं दिसत होतं. रात्रीची वेळ. एक मुलगी, जिच्या डोळ्यांमधले आश्रृ गालावरून खाली पडत होते. चेहेऱ्यावर भिती होती आणि ती फक्त “नाही – नाही” एवढ्याच शब्दांचा उच्चार करत होती. आजूबाजूला कोणीही नाही. त्या मुली समोर उभ्या मानसाच्या हातात मोठे धारदार शस्त्र होते. पुढच्याच क्षणाला सर्व काही अंधारात. त्या अंधाराच्या पार्श्व भागी त्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज. तो आवाजही हळूहळू कमी झाला आणि डोळ्यासमोर वेगळे दृश्य उभे राहिले.

नदीच्या मध्यभागी एक व्यक्ती होडीत उभा आहे. नदीच्या किनाऱ्यावरून एक फ्लॅश लाईट त्या मानसावर पडते. फ्लॅशचा प्रकाश त्याच्यावर पडताच त्याने किनाऱ्याकडे पाहिले. तिथे त्याला एक व्यक्ती कॅमेरा हातात घेऊन उभा असल्याचे दिसले. पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. नदीच्या पृष्ठभागावरच्या लाटांनी होडी शेजारीचे पाणी अस्थिर झाले आणि त्या लाटांनी होडी हलू लागली. होडीवरच्या मानसाने होडीत ठेवलेल्या दगडाकडे पाहिले. दगडाला जाड दोरखंड बांधला होता आणि त्या दोरखंडाचे दुसरे टोक पाण्यात होते. त्याने होडीतला दगड पाण्यात फेकला. ते पाहिल्यानंतर किनाऱ्यावरचा माणुस धावत किनाऱ्यापासून लांब जाऊ लागला. पाण्यावर तरंगणाऱ्या होडीसोबत ती घटणासुध्दा अंधारात कुठेतरी हरवली.

नंतर त्याने लाकडाच्या सहाय्याने मातीत खड्डा खोदला. हाताने माती बाजूला केली आणि त्या जागी काहीतरी पुरले. ते ठिकाण पुन्हा होते तसे करून तो बराच वेळ तिथेच बसून राहिला. शेजारी काही झाडं आणि त्यांवर लागलेली रंगीबेरंगी फुलं. वेगवेगळ्या प्रजाती आणि अकाराच्या झाडांवरून आणि बसण्याच्या जागेवरून तो बागेत असल्याचा भास झाला. ते दृश्य हळूहळू अस्पष्ट होत गेले आणि पुन्हा एकदा सर्वत्र अंधार पसरला. त्या अंधारात जुनाट पंख्याच्या फिरण्याचा आवाज येत होता. मी डोळे उघडले. तो आवाज माझ्या डोक्यावरती फिरणाऱ्या फॅनचा होता.

जुनाट पांढरा पंखा, ज्याच्यावर धूळीचे जाड थर तयार होण्यासाठी कित्तेक वर्ष गेले असतील. दोन्ही बाजूला फिक्कट निळसर पडदे, गोळ्यांचा वास, आजूबाजूला फिरणारी म्हतारी माणसं. हे चित्र होते जेव्हा मी पहिल्यांदा डोळे उघडले. पहिल्यांदा डोळे उघडले म्हणजे मी तुला माझ्या जन्माची गोष्ट सांगतोय की काय, असं तुला वाटत असेल. पण नाही. तो अनुभव माझ्या जन्माचा नव्हता. पण एका प्रकारे पुन्हा एकदा जन्म घेण्याचा अनुभव होता असं तू समजू शकतोस. त्या वेळी मी २६ वर्षाचा होता. मी डोळे उघडल्या बरोबर जे काही पाहिलं त्यावरून ते हॉस्पीटल असल्याचे मला समजले. मी उठण्याचा प्रयत्न केला. पण मला उठता येत नव्हतं. त्या प्रयत्नात मला बऱ्याच गोष्टी समजल्या. माझ्या एका हाताला सलाईनची सुई लावलेली, डोक्यावर काहीतरी गुंडाळलं आणि संपुर्ण अंगदुःखी. ज्याच्या वजनामुळे मला उठताना त्रास होत होता. डोक्याला जणू बांधून ठेवलं असावं, इतकं डोकं जड झालं होतं.

नर्स हातात इन्जक्शनचा ट्रे घेऊन वॉर्डमध्ये फिरत होती. ती नर्स कामाप्रती अतीशय समर्पीत असावी. आल्याबरोबर ती सरळ चार नंबरच्या बेडजवळ जाऊन इन्जेक्शनची तयारी करू लागली. तिने आजुबाजूला काय घडतंय याच्याकडे पाहिलेसुध्दा नाही. चार नंबर बेड माझ्या बेडच्या समोर होता. त्यामुळे मी त्याला पाहू शकत होतो.

“ओ... शुश्... सिस्टर...”

मी नर्सला बोलवले. पण तिने माझ्याकडे पाहिले नाही. आधी वाटलं माझा आवाज तिथंपर्यंत पोहोचला नसेल. म्हणून मी दोन तिन वेळा तिला आवाज दिला. माझा आवाज ऐकून चार नंबर बेडवर झोपलेल्या काकांनी माझ्याकडे पाहिले आणि भुवया उंचावून “काय झालं¿” असं इशाऱ्यात विचारले. मीसुध्दा इशाऱ्यात काकांना नर्सला बोलवायला सांगितले. त्या काकांनी फिरून नर्सकडे पाहिले आणि म्हणाले.

“आहो... नर्स...”

काका काही बोलणार त्या आधी त्या नर्सने काकाच्या खांद्याला धरून एका कुशीवर वळवले आणि म्हणाली.

“बाबा. शांत राहून इन्जेक्शन घ्या.”

पण काकांनी पराभव मान्य केला नाही. त्यांच तोंड दुसऱ्या बाजूला असताना ते नर्सला म्हणाले.

“तो बोलवतोय.”

काकांनी माझ्याकडे हात दाखवून इशारा केला.

नर्सने माझ्याकडे एक नजर टाकली. एका क्षणासाठी तिने माझ्याकडे पाहिले आणि दुसऱ्याच क्षणाला ती काकांच्या दिशेने वळाली. तिने तिचं इन्जेक्शन देण्याचं काम केलं. त्यावेळी काकांचा चेहेरा पाहण्यासारखा होता. त्यांना इन्जेक्शन देऊन झाल्यावर त्या नर्सने दाराकडं पाहून आवाज दिला.

“शिल्पा ... डॉक्टरांना सांग, बेडनंबर आठच्या पेशन्ट शुध्दीवर आलाय.”

ट्रे तिथंच ठेवून नर्स माझ्याजवळ आली.

“माझ्या डोक्यावर काय बांधलंय¿”

“तुमच्या डोक्यावर काहीही बांधलं नाहीये. तुम्ही गरजेपेक्षा जास्त वर्ती गेलाय. तुमचं डोकं खाटेच्या हॅन्डलमध्ये अडकलंय... खाली सरका.”

ती मला कर्कश अशा आवाज म्हणाली. एक ते दोन मिनीटांनंतर डॉक्टर तिथे आले. त्यांनी माझे डोळे, हृदयाचे ठोके वगैरे तपासले. त्यांच्या तपासण्या करून झाल्यावर त्यांनी मला विचारलं.

“नाव काय तुमचं¿ कुठं राहता तुम्ही¿”

मी त्यांना जे प्रश्न विचारणार होतो, ते प्रश्न त्यांनी मला विचारले.

“मी तुमच्या हॉस्पीटलमध्ये आहे. तुम्हाला माहित असेल मी कोण आहे ते.”

“तुम्हाला पोलीस घेऊन आले होते. त्यांनी सांगितलं तुमचा अपघात झाला होता. त्यामुळे आम्हाला माहित नाही तुम्ही कोण आहात ते. पण तुम्हाला आठवत नाहीये का तुम्ही कोण आहात, तुमचं नाव काय आणि कुठं राहता ते¿”

त्यावेळी मला कळालं की मला भूतकाळ आठवत नव्हता.

“मला काहीच आठवत नाहीये.”

मी घाबरलेल्या आवाजात म्हणालो.

“काळजी करू नका. अपघातात तुमच्या डोक्यावर आघात झाला आहे आणि त्यामुळं तुम्ही दोन दिवस बेशुध्द होता. तुम्हाला आता लगेच काही आठवणार नाही. पण काही वेळा नंतर हळूहळू सर्वकाही आठवेल.”

मला हिम्मत देऊन डॉक्टर निघून गेले. मात्र त्यांच्या चेहेऱ्यावर वेगळेच भाव होते.

रात्री ११ वाजता,

चार तासानंतर एक मुलगी धावत वॉर्डमध्ये आली. तिने सगळ्या बेडवरून नजर फिरवत माझ्याकडे पाहिले. मला पाहताक्षणी “आदित्य” म्हणून संबोधले आणि धावत माझ्या बेडजवळ आली.

“आदित्य, काय झालं तुला¿”

“अं... तसं काही आठवत नाहीये की माझ्या सोबत काय झालं ते.”

“पोलीस म्हणाले तुझा एक्सीडेंट झाला आहे. म्हणून मी धावत इथं आले.”

“हां. तो डॉक्टरसुध्दा असंच काहीतरी सांगत होता.”

मी काही वेळ शांत राहिलो. मला शांत पाहून तिला माझ्यावर संशय आला असणार. तिला वाटलं असणार की जो व्यक्ती स्वताःचा अपघात विसरू शकतो, तो व्यक्ती भुतकाळातल्या गोष्टी किंवा मुख्यतः तिला तर विसरला नसेल ना¿ कदाचित याच प्रश्नाच्या उत्तरासाठी तिने माझ्याकडे प्रश्नार्थन नजरेनं पाहत मला विचारले.

“तू मला ओळखतोस ना¿”

“अं...”

तिला काय सांगावं सुचत नव्हतं. त्या संभाषणा नंतर “ मी तुला ओळखलं नाही” असं सांगणं मला योग्य वाटलं नाही. पण मला सुध्दा माझ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं म्हणून मी तिला खरं खरं सांगितलं.

“खरंतर मला भूतकाळातल्या कोणत्याच गोष्टी आठवत नाहीये.”

“काय¡... पण तू मला ओळखतोस ना¿”

“नाही. जर मला भूतकाळातल्या कोणत्याच गोष्टी आठवत नसतील तर मी तुम्हाला कसं ओळखणार¿”

ती काहीशी नाराज झाली.

“मी तुझी बेस्टफ्रेंड...”

माझ्या नातेवाईकांना बोलवायचं सोडून पोलीसांनी हिला का बोलवलं असेल, या विचाराने मला काही क्षणासाठी पोलीसांवर संशय येऊ लागला.

“तू माझी बेस्टफ्रेंड आहेस ना, तर माझ्यासाठी एक काम करशील का¿ माझ्या नातेवाईकांपैकी कोणालातरी इथं बोलव. मला स्वतःच्याच या परिस्थितिवर दया येत आहे.”

“मी तुझी फक्त बेस्टफ्रेंडच नाही तर तुझी होणारी बायकोसुध्दा आहे.”

तिच्या तोंडून ‘बायको’ हा शब्द ऐकून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला.

“बायको¡ पण हे कसं शक्य आहे¿”

त्याक्षणी मला माझ्या वयाचा अंदाज लावता आला नाही. मला वाटलं की मी अठरा विस वर्षाचा, कॉलेजमध्ये जाणारा कोणी तरूणच होतो.

“कसं शक्य आहे म्हणजे¿ तुझी बायको होण्याची माझी लाईकी नाही, असं तुला बोलायचं आहे का¿”

“माझा तो अर्थ नव्हता. इतकी महत्त्वाची व्यक्ती.... आणि मी विसरलो. हे कसं शक्य आहे...”

मी बोलत असताना तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला अर्ध्यात थांबवून ती बोलू लागली.

“जाऊदे, जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं असं समज.”

“चांगल्यासाठी कसं¿ आणि तुमचं नाव काय आहे¿”

“माझं नाव करीश्मा आहे. गेल्याच महिन्यात आपलं लग्न ठरलं. आपल्या भूतकाळात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आठवून खुप त्रास होतो.”

तिचे डोळे भरून आले. ती डोळ्याच्या कोपऱ्यातून आश्रृ रुमालाने टिपत असताना माझं लक्ष वॉर्ड्च्या दाराकडे गेलं. दोन पोलीस त्या वॉर्डमध्ये आले. मी करीश्माला इशारा केला. माझा इशारा कळताच तिने मागे वळून पाहिले.

“मॅडम, तुम्हाला तुमचा आणि या सरांची ओळख पटवणारे कागद पत्र दाखवावे लागतील. ते दाखवल्यानंतर तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता.”

करीश्माने पर्समधून काही कार्डस् काढले आणि त्यांना दिले. पोलीसांनी ते पाहिले आणि त्यांच्याकडे त्याची नोंद करून घेतली. त्यांना हवं होतं ते मिळाल्यावर ते निघून गेले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED