ट्रीप ला जाताय ट्रीप स्मार्ट करायच्या काही युक्त्या- १ Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ट्रीप ला जाताय ट्रीप स्मार्ट करायच्या काही युक्त्या- १

ट्रीप ला जाताय? ट्रीप स्मार्ट करायच्या काही युक्त्या - १

ट्रीप सगळ्यांच्याच जिव्हाळ्याच्या विषय!!! मुलांच्या शाळेला सुट्टी लागली, किंवा पाऊसाळा जवळ आला ट्रीप चे बेत ठरायला सुरु होत. कधी कधी ट्रीप चे प्लॅन आधीच ठरवले जातात. सहलीला जायला सगळ्यांनाच आवडत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ट्रीप च नाव काढल कि सगळेच खुश होतात. ट्रीप छोटी असो किंवा मोठी, ट्रीप च नुसत नाव काढल कि सगळ्यांचे आपापले बेत ठरायला सुरु होत. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडीशी सुटका मिळण्यासाठी आणि त्याबरोबरच मनाचा तजेला परत मिळवण्यासाठी ट्रीप ला जाण हा एक उत्तम पर्याय असतो. ट्रीप ला गेल्यामुळे मन तर ताजतवान होतच पण त्याचबरोबर कुटुंबां बरोबर वेळ घालवायची संधी मिळते. रोजच्या आयुष्यात सगळे आपापल्या कामात मग्न असतात. पण ट्रीप मध्ये सगळ कुटुंब एकत्र असत त्यामुळे इतर वेळी वेगवेगळ्या दिशेला तोंड करून काम करणारे घरातले सगळे एकजूट होतात. आणि नात्यातला ओलावा टिकून राहतो. ट्रीप चे प्लॅन ठरले कि मुख्य जबाबदारी असते ती सामानाच्या पॅकिंग ची.. सगळ आठवणीने घेतलं तरी काही गोष्टी राहू शकतात. त्यात काही घ्यायचं विसरल तर वादाला वाचा फुटते... कधी कधी जर काही महत्वाची वस्तू घ्यायची विसरली तर वाद, दोष देण इत्यादी होऊ शकत. त्यात टोकांच म्हणजे,उगाच आलो सहलीला अस वाटून होणारी भांडाभांडी!! हे जर टाळायच असेल तर ट्रीप ला जातांना स्मार्ट पॅकिंग करण्यासाठी काही स्मार्ट टिप्स- ज्या टिप्स वापरून तुमची ट्रीप यादगार तर होईलच आणि ट्रीप चा मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकाल.

१. विदेशात प्रवासाला जात असाल तर-

हल्ली विदेशात ट्रीप ला जाण म्हणजे फार अवघड राहील नाहीये. जर तुम्ही विदेशात ट्रीप ठरवली असेल तर ट्रीप ला निघतांना सगळ्यात आधी तुम्ही तिकीट, पासपोर्ट, आणि महत्वाच सामान आहे का त्याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर पासपोर्ट ची झेरोक्स बरोबर ठेवा. तिकीट कधीच आहे, किती वाजता चेक इन आहे ते नीट पाहून घ्या. अस केल्यानी चुकून तुमच विमान मिस होणार नाही... आणि ट्रीप ची उत्तम सुरुवात होईल. जर ट्रीप ची सुरवात उत्तम हवी असेल तर दिवस आणि वेळ तपासून आधी खात्री करून वेळेच्या आधीच घरातून निघा!

२. ट्रीप मध्ये बॅग हरवली तर?

ट्रीप मध्ये बॅग हरवणे किंवा विमान प्रवासात बॅग वेळेवर न मिळणे हे घडू शकतच! कधी कधी आपल्याच चुकीमुळे बॅग चोरीला सुद्धा जाऊ शकते. एखादी बॅग हरवली तर त्याच बॅगेत आवश्यक सामान असण्याची दाट शक्यता असतेच कारण अडचणी आल्या कि त्या मोठ्याच येतात. हे टाळायच असेल तर सगळ्यांचा सगळ्या कपड्यांच्या एक सेट दुसऱ्या बॅग मध्ये ठेवायचा. म्हणजे चुकून एखाद्या बॅगेचा काही गोंधळ झाला तरी आवश्यक सामान दुसऱ्या बॅग मध्ये असल्यामुळे ट्रीप चा विचका होणार नाही. आणि बॅग वर तुमच नाव आणि पत्ता लिहिलेलं कार्ड लावायला विसरू नका. म्हणजे बॅग मिळाली नाही तर ती परत मिळण्याची शक्यता असते. त्याचबरोबर, जर बस किंवा रेल्वे नी जाणार असाल तर बॅगेला लावायला कुलूप घ्यायला विसरू नका. म्हणजे तुमच्या बॅगे मधल समान चोरीला जायची भीती राहणार नाही आणि तुम्ही प्रवासात आरामात झोपू शकाल.

३. सामानाची यादी-

ट्रीप मध्ये कोणत्या मध्ये काय ठेवलाय हे कधी कधी आठवत नाही. मग जे हवाय ते मिळवण्यासाठी सगळ्या बॅगा पाह्व्या लागू शकतात. अस झाल्यामुळे गोंधळ उडू शकतो आणि विनाकारण वाद होऊ शकतात. त्यामुळे कोणत्या बॅग मध्ये काय आहे त्याची यादी करून ती तुमच्या जवळ तुमच्या पर्स मध्ये ठेऊन द्या. अस केल्यानी कोणत्या बॅग मध्ये काय ठेवलय हे बरोबर कळेल आणि ते काढायची वेळ आली तर त्यात वेळ आणि शक्ती जाणार नाही. त्याचबरोबर वस्तू मिळाली नाही म्हणून चिडचिड सुद्धा होणार नाही. विमान प्रवासात किंवा अगदी जवळच्या प्रवासात सुद्धा आपल्याबरोबर हॅन्ड बॅग ठेवा ज्यात तुम्ही तुम्हाला लागणार आवश्यक समान ठेऊ शकता. आणि जे तुम्हाला हव तेव्हा लगेच मिळू शकत.

४. कॅमरा, मोबाईल इत्यादिंचे चार्जर-

ट्रीप मध्ये कॅमरा लागतोच! ट्रीप मधले फोटो काढले नाहीत तर त्या ट्रीप ची मजा राहातच नाही. फोटो हे भविष्यातल्या आठवणींसाठी महत्वाचे असतात. तुम्ही कॅमरा आठवणीने घेता पण जर चुकून चार्जर किंवा कॅमरा ची जास्तीची बॅटरी घ्यायला विसरला तर भांडाभांडी होऊ शकते आणि ट्रीप चा विचका व्हायची शक्यता बळावते. हे टाळता येऊ शकत. कॅमरा घेतलात कि तेव्हाच चार्जर आणि जास्तीची बॅटरी चार्ज करून घेतली आहे त्याची खात्री करून घ्या. म्हणजे ट्रीप च्या आनंदाबरोबरच फोटो काढण्याचा आनंद हि घेता येतो. त्याचबरोबर, हल्ली च्या जमान्यात मोबाईल शिवाय राहाण मुश्कील झाल आहे. मोबाईलचा चार्जर सुद्धा घेतलाय ते तपासून बघा. जर तुम्ही जाणार असाल तिथे वीज नसेल तर पॉवर बॅंक बरोबर ठेवा. त्यामुळे कधीही कुठेही मोबाईल चार्ज करू शकाल आणि मोबाईल बंद झाला कि होणाऱ्या चिडचिडी पासून तुमचा बचाव होऊ शकतो. जर तुम्ही देशाबाहेर जाणार असाल तर मोबाईलच सिम कार्ड बाहेर चालण्याची सोय आहे का त्याची खात्री करून घ्या.

५. लहानमुलांसाठी स्वतंत्र बॅग-

लहान मुलांच सामान बरच असू शकत. त्यांची खेळणी, त्यांची कलरिंग बुक्स, त्यांच सॉफ्ट टॉय आणि अजूनही बऱ्याच वस्तूंनचा समावेश त्यांच्या सामानात असू शकतो. त्यातल्या एखाद्या गोष्टीची आठवण जर लहान मुलांना झाली तर ते ती वस्तू मिळाली नाही तर मुलं रडारड करू शकतात. त्यामुळे मोठ्यांची चीड चीड होऊन विनाकारण ट्रीप ची मजा कमी होऊ शकते. हे सगळ सामान तुमच्या बॅग मध्ये ठेवण्यापेक्षा जर मुलांना त्यांची एक छोटी सॅक दिली तर त्यांना सुद्धा जबाबदारी घेतल्याचा आनंद मिळू शकतो आणि तुमच्या बॅग मधल वजन कमी होऊ शकत. त्याच बॅगेमध्ये तुम्ही तुम्हाला वाचायची १-२ पुस्तक सुद्धा ठेऊ शकता.

६. प्रवासात लागणारा खाऊ आणि पाणी-

प्रवासात वेळ जात नसेल तर खायची इच्छा होऊ शकते. त्यामुळे बरोबर सुकामेवा, गोळ्या, चॉकलेट इत्यादी हॅन्ड बॅग मध्ये ठेऊ शकता. म्हणजे भूक लागल्यासारखी वाटली तर प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर जर गाडी किंवा बस नी प्रवास करणार असाल तर आपल पाणी आपल्या बरोबर ठेवा. प्रवासात बाहेरच पाणी पिण्यापेक्षा आपल पाणी असण हितकारक असत. आणि प्रवासात पाणी बरोबर घेण ह्यात काहीही कमीपणा नसतो हे अजिबात विसरू नका. त्यामुळे तुमचा प्रवास सुखकर आणि चांगला होण्यास मदत होऊ शकते.

७. बॅग वर टॅग आणि नावाच लेबल-

प्रवासात गेल्यावर सेम प्रकारच्या बॅग बऱ्याच जणांकडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली बॅग कोणती हे ओळखायला गोंधळ होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आपली बॅग ओळखू येण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या रंगाचे टॅग लावा. म्हणजे आपली बॅग शोधन सोप्प जात आणि चुकून दुसऱ्याची बॅग घ्यायची शक्यता कमी होते. त्याचबरोबर बॅग वर आपल्या नावाची लेबल लावायला विसरू नका.

८ गाणी किंवा गेम-

प्रवास लांबचा असेल आणि बस किंवा गाडी किंवा रेल्वे मधून करणार असाल तर मोबाईल मध्ये किंवा तुमच्या आयपॅड मध्ये भरपूर गाणी घालून घ्या. आणि ती सगळ्यांना ऐकता येतील ह्या साठी हेडफोन स्प्लीटर आठवणीने घ्या. अस केल्यानी इतरांना सुद्धा त्रास होणार नाही. सगळ्यांना गाणी ऐकण्याचा आनंद घेता येऊ शकतो. आणि गाणी ऐकण्यासाठी होणारा वाद तुम्हाला टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला आणि मुलांना आवडणारे मोबाईल मधले गेम तुम्ही आधीच इंस्टॉल करून ठेऊ शकता. आणि प्रवासातचा आनंद घेता येऊ शकतो.

९. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड्स-

प्रवासात जातांना पैसे घेतले तर ते चोरीला जायची भीती असते. त्यामुळे पैसे बरोबर ठेवाच पण त्याबरोबर डेबिट आणि क्रेडीट कार्ड्स प्रवासात बरोबर ठेवा. कार्ड्स कॅरी कारण सोप्पा जात आणि पैसे घेण्यापेक्षा सुटसुटीत होत.

१०. बॅटरी-

ह्या सगळ्या बरोबरच जवळ एक बॅटरी ठेवून द्या. हल्ली मोबाईल मध्ये लाईट असतोच पण काही कारणांनी मोबाईल बंद पडला तर जवळ बॅटरी असलेली कधीही चांगलीच!

११. हवेला अनुसरून कपडे-

तुम्ही जिथे ट्रीप जाणार तिथे कोणत्या प्रकारची हवा असेल ह्याची चौकशी करा. आणि त्याप्रमाणे योग्य ते कपडे तुमच्या बॅग मध्ये घ्यायला विसरू नका. थंडी साठी कानटोपी आणि स्वेटर याचबरोबर हातमोजे आणि पायमोजे आठवणीने घ्या. आणि उन्हाळा असेल तर त्यासाठी तुम्हाला आवडणारे कपडे घ्या. म्हणजे ट्रीप च्या ठिकाणी अस वाटणार नाही कि "अरे हे कपडे घेतले असते तर..."

१२. सगळ्यात महत्वाच- औषधाच्या गोळ्या-

प्रवासात पोट बिघडलं, ताप आला किंवा जास्ती प्रवासामुळे अंग दुखायला लागल अस झाल तर प्रवासातला आनंद कमी होऊ शकतो. हे टाळता येऊ शकत. डॉक्टर च्या सल्ल्यांनी नेहमीच्या गोळ्या म्हणजे क्रोसिन इत्यादी जवळ ठेवा. जर तुम्ही रोज कोणत्या गोळ्या घेत असाल तर त्या न चुकता आणि आठवणीने आपल्या जवळच्या हॅन्ड बॅग मध्ये ठेऊन द्या. म्हणजे प्रवासात काही त्रास व्हायची शक्यता राहणार नाही. जर मुलं पडली किंवा त्यांना लागल तर बॅन्ड एड किंवा थोडा कापूस जवळ ठेवा. फर्स्ट एड च्या गोष्टी प्रवासात नेहमी बरोबर ठेवा. प्रवासात कानात घालायला सुद्धा कापूस घेऊन ठेवा म्हणजे जर तुम्ही जाणार तिथे किडे असतील तर ते कानात जायची शक्यता राहणार नाही.

शेवटी थोडस- जर ट्रीप ला जाणार असाल तर न चुकता स्वताजवळ सामानाची चेक लिस्ट ठेवा, आवश्यक ती सगळी कागदपत्र, स्वतःच ओळखपत्र त्याचबरोबर साबण, पाऊडर, साबण, पेस्ट, क्रीम्स, इत्यादी तुम्हाला लागणाऱ्या वस्तू आहेत ना याची खात्री करून घ्या आणि आपल्या प्रवासात काही अडचण येऊन चीड चीड होणार नाही याची खात्री करा आणि तुमचा प्रवास एन्जॉय करा.

अनुजा कुलकर्णी.