ट्रीप ला जाताय? ट्रीप स्मार्ट करायच्या काही युक्त्या- २
तुम्ही ट्रीप ला जायचं ठरवत असाल किंवा सगळे प्लॅन्स झाले आहेत. पण तुम्हाला केलेल्या पॅकिंग बद्दल मनात शंका असतील- चुकून एखादी बॅग जाती भरली आणि ती उघडली तर किंवा पाण्याच्या बाटली मधल पाणी बाहेर येऊन कपडे किंवा महत्वाच्या वस्तू खराब झाल्या तर? नुसत्या विचारांनीच अंगावर शहरा आला असेल ना? पण तुम्हाला ट्रीप ला जातांना शांतपणे आणि डोक्याला काही त्रास न देता जायचं? तर मग खालील दिलेले पर्याय ट्राय करून बघा-
१. पाण्याच्या बाटल्यांची काळजी-
प्रवासात पाण्याच्या बाटल्या घेण अत्यंत महत्वाच असत. पण त्याचबरोबर त्या बाटलीतलं पाणी बाहेर येईल अशी भीती सुद्धा वाटत असेल? घाबरू नका... तुम्ही पाणी न सांडता कोणत्याही टेन्शन शिवाय प्रवासात नेऊ शकता. त्यासाठी पाण्याच्या बाटलीच झाकण घट्ट बसत आहे ना याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर पाण्याच झाकण क्लिंग फिल्म किंवा मास्किंग टेप नी गुंडाळून घ्या. त्यामुळे पाणी बाटली बाहेर यायची शक्यता एकदम कमी होईल आणि तुमच टेन्शन सुद्धा कमी होईल. आणि तुमचा प्रवास तुम्ही एन्जॉय करू शकाल.
२. बॅगेतला इंच आणि इंच वापरा-
बॅगेत जास्तीत जास्त सामान माववायच आहे? त्याच्या काही सोप्प्या युक्त्या!
१. कापडे फोल्ड आणि रोल करून बॅगेमध्ये कमी जागेत जास्ती कपडे बसवू शकता.
२. मोइश्चराईझर किंवा शॅम्पू च्या बाटल्या सॉक्स मध्ये घालून रोल करून तुमच्या शूज मध्ये घालून बॅगे मध्ये कमी जागेत माववू शकता.
अजून तुमच्या गरजेप्रमाणे स्वतःच्या काही युक्त्या तुम्ही वापरू शकता. अस केल्यानी कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सामान तुम्ही माववू शकता. तुमच्या बॅगेतला इंच आणि इंच वापरला जाईल
३. वॉल प्लग-
तुम्ही मोबाईल किंवा टॅब्लेट चा वॉल प्लग सामानात घ्यायला विसरला तर अजिबात पॅनिक होऊ नका! हॉटेल मधल्या टी.व्ही. च्या मागे यु.एस.बी पोर्ट असतो तो तुमच्या मोबाईल आणि टॅब्लेट ला चार्ज करू शकेल.
४. क्लेव्हर बॉक्स तुमच्या कानातल्या आणि गळ्यातल्यांसाठी-
ट्रीप ला जातांना टेन्शनच असत. कानातल आणि गळ्यातल नीट राहील का? त्यासाठी एक अतिशय सोप्पा आणि सुलभ मार्ग आहे. प्लॅस्टिक चा पिल बॉक्स कुठल्याही केमिस्टकडे सहजपणे मिळू शकतो. तो प्रवासात तुमच्यासाठी क्लेव्हर बॉक्स च काम नक्कीच करेल. त्यात तुम्ही तुमच्या रिंग्स आणि कानातले एका बटन च्या भिकात अडकवून ठेऊ शकता. त्यामुळे तुमची कानातली आणि तुमच्या रिंग्स सेफ राहू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तुमची गालातली एका स्ट्रॉ मध्ये बांधून ठेऊ शकता ज्यामुळे तुमच्या गळ्यातल्याचा गुंता होणार नाही आणि ते तुटण्याची शक्यता राहणार नाही.
५. व्हॅकयूम बॅग-
तुम्हाला चिंता वाटत असेल कि बॅग मध्ये भरलेले कपडे चुरगाळू शकतात आणि सुरुकुतलेले कपडे घालण तुम्हाला आवडत नसणार. त्यासाठी एक सोप्पा उपाय आहे. तो म्हणजे तुम्ही तुमचे कपडे व्हॅकयूम बॅग मध्ये ठेऊ शकता. त्यामुळे तुमची जागा तर वाचेलच पण कपडे पण व्यवस्थित राहतील. आणि कपडे चुरगाळणार नाहीत.
६. शर्ट च्या कॉलर साठी बेल्ट चा वापर-
जर तुम्ही प्रवासात शर्ट नेणार असाल तुम्हाला चिंता असेल कि कॉलर चा शेप बदलला तर आयत्यावेळी काय करायचं? प्रवासात सुद्धा तुम्हाल तुमच्या शर्ट चा शेप जाऊन द्यायचा नसेल तर एक सोपी युक्ती आहे. तुम्ही तुच्या शर्ट ची घडी करून तो शर्ट रोल करून त्याच्या कॉलर मध्ये बेल्ट गोल करून घालून ठेऊ शकता. त्यामुळे जागा तर वाचेलच पण त्याचबरोबर कॉलर चा शेप सुद्धा जाणार नाही.
७. बॅग आणि सामानाचा फोटो-
प्रवासात तुमची बॅग चुकून हरवू शकते. त्यावेळी काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. तुम्हाला एक करता येईल. तुमच्या प्रवासातल्या बॅग चा फोटो आणि त्याच्या आतल्या सामानाचा फोटो तुम्ही काढून ठेऊ शकाल. त्यामुळे जर चुकून तुमची बॅग हरवली तर तुम्ही योग्य व्यक्तीला बॅग चा आणि आतल्या सामानाचा फोटो दाखवता येईल. म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा बॅग शोधन सोप्पा जाऊ शकत.
८. बॅग मधल्या सामानाला वास न येऊ देण्यासाठी-
तुमचा अनुभव असू शकतो कि तुम्ही तुमची बॅग उघडली कि त्यातल्या कपड्यांना वास येऊ शकतो. हे तुम्हाला टाळायच आहे? तर हे सहज शक्य आहे. तुम्ही तुमच्या बॅग मधल्या सामाना मध्ये परफ्युम कार्ड्स प्रत्येक कपड्यांच्या लेयर मध्ये ठेऊ शकता. त्यामुळे तुमचे कपडे एकदम फ्रेश राहीतील आणि तुम्ही सुद्धा दुर्गंधा पासून वाचू शकता.
९. मल्टीटास्क-
प्रवासात तुम्हाला प्रसाधन लागत असतीलच. पण तुम्ही तुमच सगळ सामान तर घेऊ शकणार नाही. जर थोडीशी आयडिया केली तर आहे एका वस्तूचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनी करू शकता. म्हणजेच उदाहरणार्थ, तुम्ही शाम्पू घेतला तर त्याचा उपयोग तुम्हाला तुच्या कपडे धावायला सुद्धा करू शकता. त्याचबरोबर, तुम्ही फक्त अलो व्हेरा जेल अर्थात कोरफडीच जेल घेतलात तर ते उत्तम मोईश्चरायझर म्हणून वापरू शकाल आणि त्याचा उपयोग सन बर्न, किडे चावले किंवा त्वचेच्या रॅश साठी सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही कमी सामानात प्रवास करू शकाल आणि तुम्हाला इतर कोणत्या वस्तूची आठवण सुद्धा येणार नाही. अश्या पद्धतीनी तुम्ही तुमच्या प्रसाधांनाच मल्टी टास्किंग करू शकाल.
ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही तुमच्या बरोबर झिप लॉक ची पिशवी ठेऊ शकता. त्यात अजून काही महत्वाच सामान असेल तर ते ठेऊ शकता. अश्या पद्धतीनी तुम्ही तुमची ट्रीप एकदम स्मार्ट करून त्या ट्रीप चा मनमुराद आनंद घेऊ शकता.
Happy Journey..
अनुजा कुलकर्णी.