Paishyach Niyojan books and stories free download online pdf in Marathi

पैश्याच नियोजन..

पैश्याच नियोजन..

यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाच काय आहे? पाहिलं उत्तर साहजिकच "पैसा" हेच येईल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी पैसा हा लागतोच आणि त्याही पेक्षा जास्ती महत्वाच असत ते त्या पैश्याच नियोजन कस केल जात. जे पैसे आपल्याकडे येतात ते पैसे व्यवस्थित संभाळण. प्रत्येक यशस्वी व्यक्ती हेच करतांना दिसून येईल. यशस्वी लोकांकडे बराच पैसा असतो. पण तो पैसे त्यांनी कसा साठवून त्याच नियोजन केल हे बघण गरजेच असत. आणि अस नेहमी म्हणल जातच, आयुष्य नेहमीच समान नसत. त्यात चढ उतार हे असतातच. त्यामुळे पैश्याच योग्य नियोजन करण्याची अत्यंत गरज असते. पण कधी कधी पैसे सांभाळतांना आपल्या हातून काही चुका होऊ शकतात. पैश्याच नियोजन करतांना काय टाळल पाहिजे आणि काय केल पाहिजे हे बघणे अत्यंत महत्वाच आहे -

१. जास्ती खर्च करण टाळा-

बऱ्याच वेळा अस होत की हातात पैसे खेळायला लागले की ते उडवण्याकडे कल असतो. गरजा उगाचच वाढवल्या जातात. आणि एकदा का गरजा वाढल्या की त्या कमी कारण अवघड होऊन बसत! त्यामुळे गरज नसतांना जास्ती खर्च केला जातो आणि ती गोष्ट टाळता सुद्धा येत नाही. त्यापेक्षा वायफळ खर्च करण्यापेक्षा जर ठरवून ते पैसे साठवले किंवा गुंतवले तर पैसे तर वाढतील आणि त्याचबरोबर गरज पडल्यावर कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही. आणि तुमच्या पैश्याच योग्य नियोजन करता येईल. म्हणजेच काय, जी लोकं यशस्वी आहेत ते आपले खर्च नेहमी आटोक्यात ठेवतात.

२. दर्जेदार वस्तू वापरा-

चांगल्या दर्जाच्या वस्तू घेतल्या की साहजिकच त्या वस्तू महाग असतात पण त्या जास्ती काळासाठी वापरता येतात. यशस्वी लोकं चांगल्या वस्तूंसाठी किती पैसे मोजावे लागतील ह्याचा विचार करण्यापेक्षा ती वस्तू किती चांगली आहे आणि किती काळ वापरता येईल हे पाहतात. त्यामुळे साहजिकच दर्जेदार वस्तू जास्ती काळासाठी वापरता येतात.

३. बँकिंगचे खर्च सांभाळा-

बँक मध्ये खात उघडल की त्याचे थोडे फार खर्च आलेच. बँक फी किंवा इतर चार्जेस येतातच. त्यात क्रेडीट कार्ड चा वापर सर्रास होतांना दिसतो. काही वेळा त्या खर्चांकडे दुर्लक्ष होऊ शकत. पण यशस्वी लोकं तो खर्च व्यवस्थित सांभाळतात. दर महिन्याला येणार बंकेच स्टेटमेंट न चुकता पहा आणि त्याचा आढावा घेऊन हे खर्च आटोक्यात ठेवा.

४. आयुष्यातल्या महत्वाच्या घटनेनंतर आर्थिक बदल करा-

आयुष्यातले मोठे बदल म्हणजेच, लग्न इत्यादी. अश्यावेळी आर्थिक बदल करण अत्यंत गरजेच असत. काही खर्च कमी करून काही वाढवावे लागतात. यशस्वी लोकं हे अत्यंत प्रभावशाली करतात. ज्यामुळे खर्च आटोक्यात राहतात. असे थोडे बदल केल्यानी तुमच आयुष्य सुखकर तर होईलच पण त्याचबरोबर तुमच्या परिवारासाठी सुद्धा सुखकर होईल. जास्ती करून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याकडे लक्ष द्या ज्यामुळे तुमचा परिवार दीर्घ काळा साठी सुरक्षित राहील.

५. उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष ठेवा-

काही लोकं थोड्या उत्पन्न वाढीनी म्हणजे १-३ % वाढीन आनंदी असतात. पण हल्लीच्या दिवसात इतकी ग्रोथ म्हणजे काहीच नसते. महागाई दिवसेंदिवस वाढतच असते. आणि उत्पन्न महागाईच्या बरोबर वाढत नसत. अश्या वेळी यशस्वी लोकं अजून वेगवेगळे पर्याय शोधतात ज्यामुळे उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढल की साहजिकच तुम्हाला जास्ती खर्च करता येतो आणि पैश्याची सुरक्षितता वाढते. म्हणजे एक गोष्ट नक्की,आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सतत शिकून स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन पर्याय शोधले पाहिजेत.

६. जमाखर्चाचा हिशोब ठेवा-

आपल्यापैकी किती जण बँक स्टेटमेंट पाहतात? हि सवय नसेल तर हि सवय अंगवळणी पडून घ्या! हि एक अत्यंत चांगली सवय आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बँक स्टेटमेंट तपासण हि अत्यंत गरजेच असत. त्यामुळे आपण काय खर्च केले किंवा किती पैसे मिळाले ह्याचा आढावा घेण अत्यंत महत्वपूर्ण असत. चुकून काही गोंधळ झाला असेल तर तो वेळीच तपासण गरजेच असत. त्यामुळे बंकेच स्टेटमेंट आल की ते न पाहता बाजूला ठेऊ नका आणि आपल्या जमाखर्चाचा नीट आढावा घ्या.

७. पैश्याच्या बाबतीत नको ते धोके पत्करू नका-

आयुष्यात पुढे जाण्यासाठी थोडे धोके हे पत्कारावेच लागतात. पण जास्ती आत्माविश्वास ठेऊन अती धोके पत्करू नका. अस केल्यानी तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते गमावून बसू शकता. हे टाळण्यासाठी थोडी काळजी घेण गरजेच असत. यशस्वी लोकं धोके पत्करतात तेव्हा नुकसान टाळण्यासाठी २ गोष्टी आवर्जून करतात. पहिली म्हणजे धोका कमी करण्यासाठी इन्शुरन्स काढून ठेवतात आणि दुसरी म्हणजे आपली संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. अस केल्यामुळे साहजिकच लॉस व्हायचं प्रमाण कमी होत आणि पैसे सुरक्षित राहतात.

८. आपल्याला सगळ कळतंय हे वाटून घेण टाळा-

प्रत्येकजण प्रत्येक गोष्टी मध्ये पारंगत असतोच अस नाही. त्यामुळे 'मला सगळ कळतंय मला कोणाची काय गरज' हा विचार करण टाळा. अस केल्यानी तुम्ही स्वतःच नुकसान करून घ्याल. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तज्ञ व्यक्तीकडून समजून घेण अत्यंत गरजेच आहे. म्हणजे त्याचा तुम्हाला फायदाच होईल. त्याचबरोबर,थोड्या थोड्या अंतरानी तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या आणि गरज पडल्यास त्यात थोडे बदल सुद्धा करा.

९. तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका-

तज्ञ व्यक्तीचा सल्ला हा अत्यंत महत्वाचा असतोच पण जबाबदारी हि त्या व्यक्तीची नसते हि गोष्ट अजिबात विसरू नका. तज्ञ व्यक्ती फक्त सल्ला देतात पण त्याप्रमाणे वागण आपल्याच हातात असत. उदाहरणार्थ, तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करायचा सल्ला हवा असेल तर तो तुम्हाला तज्ञ व्यक्तीकडून घ्यावा लागेल. पण जेव्हा तुम्ही त्यात लक्ष घालून त्याबद्दल शंका विचाराल किंवा चर्चा कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच जास्ती फायदा मिळेल. त्याचबरोबर, आपण कोणाचा सल्ला ऐकतो आहोत हे सुद्धा पडताळून पहा. म्हणजे तुम्हाला सल्ला देणारी व्यक्ती योग्य आहे ना हे तपासून घ्या.

शेवटच पण अत्यंत महत्वाच-

१०. फक्त पैश्यासाठी जगू नका-

काही लोकं फक्त पैश्याच्या मागे धावतात. त्यावेळी तब्येतीवर त्याचा काय परिणाम होतो आहे ह्या कडे सुद्धा ते लक्ष देत नाहीत. पण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त पैसे हे महत्वाचे नसतात हि गोष्ट नेहमी लक्षात ठेवण गरजेच असत. तब्येत बिघडवून खूप पैसे मिळाले तर त्याचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे आपली स्वप्न, परिवार, इत्यादी मध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्याचा समतोल राखण हा यशस्वी होण्याचा कानमंत्र आहे.

अनुजा कुलकर्णी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED