Sima books and stories free download online pdf in Marathi

सीमा (कथा )

कथा - सीमा

----------------------------------

अनिता आफिस जाण्याच्या तयारीतच होती ,आणि मोबाईल-रिंग वाजली , इतक्या घाईच्या वेळी तिला बोलणे जमणारे नव्हते ,केवळ नाईलाज म्हणून तिने .उत्तर दिले.. हाय सीमा - बोल ..!

पलीकडून सीमा म्हणाली .. लंच टाईम मध्ये वेळ काढून बोलावेस अनिता ..तुझे मत आणि सल्ला हवा आहे मला .मी कॉल करेन तुला बाय.

सीमाने घाईच्या वेळी कॉल करून ..अनिताच्या डोक्यात विचारांचा भुंगा सोडून दिला होता , आफिस्ला जाईपर्यंत आता एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता ..सीमाचे ठरलेले लग्न ..? त्याबाबत तर नाही ना काही ? देवा ..असे काहीच नसू दे..

अनिता मनोमन प्रार्थना करीत होती..सीमा तिची बेस्ट फ्रेंड ..अगदी धाकट्या बहिणी सारखी , एकमेकींना शेअर केल्याशिवाय राहवत नसे , त्यातून हा तर लग्नाचा विषय...! सगळ्या गोष्टी सुरळीत पार पाडाव्यात रे बाबा .

सीमा एक नामवंत कॉर्पोरेट संस्थेत नोकरीला होती..स्मार्ट व्यक्तिमत्वाची ..हुशार आणि कुशल कर्मचारी असा ठसा सीमाने आपल्या कार्याशैलीने उमटवला होता .आपले कामच आपल्याला मोठे करीत असते ", हे तिचे ब्रीदवाक्य ती सर्वांना मोठ्या आत्म-विस्वासाने ऐकवीत असे.."त्यामुळे "मला पहा नि फुले वाहा ",अशा दिखावा स्टाईल ने मिरवणाऱ्या समवयस्क सहकारी सीमा पासून दूर दूर रहात असत. करिअरचाच विचार करणारी , इतर गोष्टीपासून स्वतःला लांब ठेवणे पसंद असणारी सीमा .तिच्याशी फारशी ओळख नसणार्यांना "सीमा म्हणजे " रुक्ष - शिष्ट , ,काम एके -काम ", इतर कशाची आवड नसणारी अशी स्व-केंद्रित व्यक्ती वाटत असायची.

जे दिसते ते वरवर पाहून मत बनवणारी माणसं आपलेच असे मत आजुबाजू पसरवित असतात ,सहाजिकच एक जनरल इमेज तयार होऊन जाते .असेच काहीसे सीमाच्या बाबतीत नक्कीच घडलंय "असे अनिताला वाटायचे ,अनेकदा या बद्दल तिचे सीमाशी बोलणे सुद्धाव्हायचे ..अनिताचे ऐकून घेत सीमा म्हणे- अनिता- लोकांच्या अशा कमेंट्स ला किती किंमत द्याची ,किती महत्व द्याचे हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे असते . लोकांचे काय ..मनमोकळेपणाने वागले "लगेच त्याचा सोयीस्कर अर्थ काढून वागतात ,रिझर्व्ह राहिले - ..वागले तर त्याचा त्रास वेगळाच. म्हणून मी मला जे योग्य वाटते तसेच रहाते आणि वागते..मग यामुळे नुकसान होईल ..फायदा होईल " याचा विचार करीत नाही ..आणि अशा बिनकामी गोष्टींचा विचार करण्यात टाईम-वेस्ट " करणे तर मुळीच आवडत नाही..मी ही अशी आहे..अशीच रहाणार .

सीमाच्या या स्वभावाची अनिताला थोडी भीती वाटत असे.माणूसघाणा स्वभाव "वाटावा अशी सीमा ,तिच्यापासून सारे असेच दूर दूर रहाणे बरे नाही.. यापुढे तरी सीमाने -समोरची व्यक्ती पाहून, माणूस पाहून सहजपणाने वागावे " तेच अधिक बरे होईल .सीमा म्हण्यची नेहमी- अनिता - माणसांच्या या समुहात वावरून मला खूप चांगली नसली तरी

माणसाची पारख करणे नक्कीच जमते ..म्हणून ..मी अशी झाली आहे. तरी पण तू नको काळजी करत जाऊ बाई.

अनिताला गेल्या वर्षभरातील प्रसंग आणि घटना आठवल्या .. अभिजितचे स्थळ सीमाला सांगून आले ", या स्थळाला नकार द्यावा असे काही कारण नव्हते ..तरीपण दोघांच्या नुसत्या भेटी-गाठी .आणि जुजबी गप्पा च्या पुढे गाडी सरकत नव्हती. एकमेकांना जाणून घेणे -समजून घेणे ..या प्रायोगिक फेऱ्या किती दिवस ? असाच प्रश्न सर्वांना पडू लागला होता. अभिजीतला सीमा आवडली होती . अभिजित आवडला आहे" हे सीमा सांगत नव्हती ..आणि त्याच्या घरी जाऊन -घरातले वातावरण आणि त्याची माणसं याबद्दल जाणून घेण्य साठीच्या तिच्या चकरा चालूच होत्या ..त्याचे प्रमाण कमी झाले नव्हते ..याच एका कारणामुळे ..अभिजीतचे स्थळ

अजून तरी "पसंद आहे" या श्रेणीत होते.

अनिताने एकदा विचारलेच.. सीमा - काय ही तुझी पद्धत ? धड होकार नाही आणि नकार पण देत नाहीस ..असे किती दिवस ताटकळत ठेवणार आहेस ..दोन्ही घरच्या माणसांना ? तुझी नापासंदी असेल तर सांगून टाक.तो अभिजित दुसरे स्थळ शोधील . त्याचा का अंत पहातेस एव्हढा ? तुला हे स्थळ नको असेल तर तसे सांगावे तर लागेल ना .

तिच्या बोलण्यावर सीमा म्हणाली - अनिता - अभिजित सारखे स्थळ तुम्हा सर्वांना आवडावे असेच आहे , मला ही ते नापसंद आहे असे कुठे म्हटलंय ? पण, मी अजून ही समाधानी नाहीये , माझ्या शंका दूर होतील तेव्न्हाच माझा निर्णय देईन..तो पर्यंत ..वाट पहाणे.

काय बोलावे सीमा तुला - काही जागाच ठेवली नाहीस तू आमच्या बोलण्याला ..तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बाई..घे तुला हवा तेव्हढा वेळ .आमच्या बोलण्याकडे नको देऊस लक्ष .अनिताने विषय तिथेच थांबवला .

गेल्या अनेक दिवसात सीमाशी बोलणे झाले नव्हते ..तसे ही पाहिले तर अनिता सुद्धा तिच्या व्यापातून वेळ काढू शकली नव्हती. त्यामुळे आज आलेल्या फोनने सीमा दुपारी काय सांगणार आहे या बद्दलची उत्सुकता वाढली होती ..आणि काळजी पण वाटत होती या सीमाचे काही सांगता येत नाही.तिच्या मनाला जे पटेल तोच आणि तसाच निर्णय ती घेणार हे अनिताला माहिती होते. आफिसात रोजचेच काम सुरु झाले , हातांना सवय होती ते गुंतले रोजच्या कामात ..पण अनिताचे मन काही कामात लागत नव्हते ..तिच्या मनात सीमाचेच विचार चालू होते.तिच्या कडून काही ऐकल्याशिवाय बरे वाटणार नव्हते हेच खरे .

लंच टाईम झाला तसे अनिता लंच -रूम मध्ये जाऊन बसली ..एका सुरक्षित कोपर्यातली खुर्ची पाहून ती वात पाहू लागली ..रिंग वाजली ..स्क्रीनवर सीमाचा नंबर दिसला ..नाव दिसले .. अनिताने हाय केले ..बोल ग सीमा ..

काय सांगणार आहेस तू ?

अनिता -किती हायपर होऊन बोलतेस ..मला तुझ्या मनातली धडधड इकडे ऐकू येते आहे. शांत हो अगोदर .मग बोलूया आपण.

सीमा -असे काही नाही ..तू सांग..अनिताने उत्तर देत म्हटले.

ऐक अनिता - सीमा सांगू लागली ..

एक स्थळ म्हणून ..कागदोपत्री ..अभिजीतचे स्थळ लाखात एक आहे , त्याला नकार देणाऱ्या मुलीला वेडे ठरवले जाऊ शकते ..तुला खरे वाटणार नाही अनिता ..आता पर्यंत अशा एकोणपन्नास वेड्या मुली झाल्यात ..आणि आता मी पन्नासाव्वी वेडी मुलगी ठरणार आहे ".

का ग सीमा काय झाले एव्हढे ?--अनिताने न रहावून मध्येच विचारले ..

सीमा सांगू लागली.. आजच्या आधुनिक जगात माणसे परस्परांना इतकी दुरावली आहेत की .. कुणाला कुणा बद्दल बद्दलच काही माहिती नाही ,पाहतोय ते खरे मानायचे ? की --जे अनुभवले त्याला खरे मानायचे ?गोंधळून जायला होतंय. खोटेपणाने वागून.. गोड आणि फसव्या मायाव्वी वागण्याने आपल्या जाळ्यात फसवणे ..हा एक खेळ आणि उद्योग झालाय काही माणसांचा . या अशा उलट्या काळजाच्या माणसांच्या तावडीत माणसे कशी काय सापडतात ? समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे ही . बनवेगिरीची कुशलता म्हणावी लागेल...बघ ना अनिता.. मला सुद्धा झटका आणि फटका बसलाच ना ..अभिजीतच्या हुशारीचा

तुला आज सांगते अनिता - आम्ही दुसर्यांदा भेटलो त्याचवेळी मला अभिजीतच्या हेतू बद्दल शंका आली होती ..आणि मी तेंव्हाच ठरवले ..इसको तो झटका देना पडेगा ..मी अधिक सावध झाले .कारण अभिजित पक्का बनेल -बेरकी आणि ठग इसम होता . लग्नाळू -मुलींना स्वतःहून मागणी घालणे , त्यांच्याशी परिचय आणि जवळीक वाढवणे , आणि गोडी गोडीत पैस्याची मागणी करून लुटायचे ..हे करीत असतांना .काही अधीर मुली ..त्याला हवं ते सारं देऊन मोकळं व्हायच्या ...पुढे साखरपुडा झाला की लग्न मोड , लग्नाची तारीख तोंडावर आली की लग्न मोड , ऐन लग्नाच्या दिवशी ..कार्यालयाच्या दारातून वरात माघारी नेणे ..असे अनेक प्रकार या महाशयांनी केलेत.

वाईट एकाच गोष्टीचे वाटते की..ज्या मुली अभिजीतची शिकार झाल्यात ..त्यापैकी कुणीही पुढे येऊन हे कारनामे उघडकीस आणले नाही ..कारण "आपलीच बदनामी होईल" ही त्यांची भीती एका दृष्टीने खरीच होती ..नेमक्या याच मानसिकतेचा फायदा हा भामटा घेत असे.

अभिजीतचे ते घर , त्यातली त्याची माणसे ..सगळी खोटी आणि पैसे देऊन उभी केलेली ..किती भयानक आहे ना हे.

त्याचे खरे आई-वडील ..दूरच्या खेडेगावात मोल-मजुरी करून जगणारे गरीब माणसं आहेत. आपल्या मुलाचे प्रताप ऐकूनच बिचारे अर्धमेले झालेत. मी सांगितले अभिजीतच्या आई-वडिलांना ..त्यांच्या गावी जाऊन

बाप रे सीमा - काय काय केलेस तू हे ! आम्ही तर कल्पना केली नव्हती असे काही असू शकेल ?

त्या अभिजीतचे काय होणार ?- तुझा बदला घेईल ना ग तो ..काही सांगता येत नाही ग सीमा अशा माणसांचे

अनिता - बिलकुल घाबरू नकोस , अभिजित असे काही करू शकत नाही.यापुढे तो असे काही करणार नाही ,त्याच्या विरुध्द केस केलीय मी ..पोलिसी खाक्या अनुभवला की होईल सुतासारख सरळ.

अनिता - हे जग आता इतके मोठ्ठे झालाय ना ..की आपल्या या छोट्या दुनियेत होणारे भूकंप या नव्या जगाला कधी जाणवत सुद्धा नाही. एका अभिजीतला मी उघडा पाडला ..त्याचे खरे रूप लोकांसमोर आणले ..पण,इथेच संपत नाही ही लढाई ..असे अनेक अभिजित आजुबाजू सुखाने आपापले धंदे करीत रहाणार ..आणि साधी-सरळ भोळी माणसं ,

अधीर मन -अधीर नजर "असणारी माणसं गोत्यात येणार ,हे थांबावे .

सीमा - मानलं ग बाई तुला .डेअरिंग केलस फार मोठं . तुला माणसांची "पारख "आहे हे तुझे वाक्य तू सर्वार्थाने खरे करून दाखवलेस . सलाम दोस्त.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED