Tadjod books and stories free download online pdf in Marathi

तडजोड - (कथा )

कथा - तडजोड

-----------------------------------------

भारती आणि विकास यांच्यातील संबंध अलीकडच्या काही दिवसांपासून ताणलेले आहेत " ही गोष्ट जाणवणारी असली तरी , त्या दोघांच्या वागण्या-बोलण्यातून "आमच्यात सगळं सुरळीत आहे ", असेच दिसत असे. विकास तसा माझा जुना आणि सहवासातील मित्र असल्यामुळे त्याच्याबद्दल माझे अंदाज काल्पनिक असणार नाही " एव्हढी खात्री तर आमच्या मित्राना आणि परिवारातील सर्वांनाच होती..

" चेहरे आणि मुखवटे " याचे नाते तसे दोन मित्रांचे असते "असे मला नेहमीच वाटत आलेले आहे ,रोजचे जगणे असो वा आयुष्य -प्रवास असो " चेहेर्यावर मुखवटे चढवूनच माणूस वावरत असतो, वागत असतो". असे करणे म्हणजे मोठ्ठा गुन्हा आहे" असेही मुळीच नाही . जगण्याच्या घनघोर लढाईत "मुखवटे " सुद्धा प्रभावी अस्त्र " असते हे मान्य करतांना दुमत होणार नाही.- विकास आणि भारती , गेले काही दिवस याच "अस्त्राचा " वापर करून आयुष्य एकेक दिवसांनी मागे ढकलू पहात होते . स्त्री-पुरुष असो वा दोन व्यक्ती मधील संबंध असोत, त्यांच्यात इगो-लढाई "असतेच असते " , अशा अहं-च्या टक्कर मध्ये महत्वाचे कारण काहीही असू शकते , अगदी एखादे कारण इतरांच्या दृष्टीने हास्यास्पद असते आणि नेमके हेच कारण " इगो -लढाईतील व्यक्तींसाठी अतिशय महत्वाचे असते अगदी "मेरी जिंदगी का सवाल है ..! असे म्हणण्या इतके महत्वाचे .

भारती -सर्वार्थाने घरात रमणारी मुलगी ..लग्नानंतर ती सुगरण -सुगृहिणी होणार 'हा आमचा अंदाज तिने मुळीच चुकवला नाही .मनापासून विकासचा संसार फुलवणारी भारती ,एक व्यक्ती म्हणून सर्वांच्या आदरास पात्र झाली होती , एका विवाहित स्त्रीला ज्या ज्या म्हणून नाते-भूमिका सादर कराव्या लागत असतात .त्या त्या प्रय्तेक भूमिकेत भारतीने सह्ज्तेचे रंग भरले होते विकासचा परिवार असो वा तिचे माहेर असो. भारतीने "समतोलपणा उत्तम साधला आहे " हे कुणीही मान्य केले असते . तसेच झालेले होते ,आणि इथेच सगळा "घोळ " झाला होता .

"मुझे गिनो " अशी आग्रही भूमिका असलेल्या विकासचा, भारतीच्या वागण्यामुळे तसा "भाव "कमी झाला होता . हर एक ठिकाणी "भाव खाणाऱ्या विकासला " आता फारसा भाव न देता , भारतीच्या मदतीने कार्यभाग साधता येतो " हे पाहून ,विकासला बाजूला सारून भारतीला पुढे करणे अधिक सोयीचे आहे" हे सर्वांना जास्त उपयुक्त वाटू लागले . या प्रकाराने विकास अस्वथ झाला ,"

"स्वतहाचे अवमूल्यन होणे" अशा स्वभावाच्या व्यक्तींना सहन होणारी गोष्ट नसते , आणि गम्मत अशी की " भारतीमुळे असे झाले " असे म्हणून दाखवणे चुकीचे ठरवले गेले असते" हे कळण्या इतका विकास चतुर नक्कीच होता .मग त्याच्या वागण्यातला -बोलण्यातला चीड -चीडपणा " हळूहळू वाढू लागला ,

"नवरा हा बायकोचा सहकारी असतो" असे किती म्हटले तरी एका सुविचारा इतकेच त्याला महत्व आहे" " हे कसे नाकारणार ?, शीत-युद्धातले डावपेच लढवणे जास्त सोपे आहे ",असे विकासने ठरवले असावे म्हणून " विनाकारण विरोध "हे सूत्र त्याने अवलंबिले , सहाजिकच -भारतीला याचा त्रास होऊ लागला , व्यक्तीमधला संवाद " विसंवादी सुरातला असला की त्याचे कटू प्रतिध्वनी सर्वांनाच एकू येत असतात , ते तसे आमच्याही कानावर येतच असत .

ताणलेले वातावरण सैलसर होण्यास " भारती आणि विकास हेच खरे एकमेकांना मदत करू शकणारे , पण, घडले ते वेगळेच , विकासच्या वागण्याने दुखावलेली भारती .आता तिची अपेक्षा अशी होती की - " विकासने विचित्र वागणे सुरु केले आहे", त्यानेच आपणहून हा प्रकार थांबवावा , मी तर काहीच चुकलेले नाही , मग, मीच का पुढाकार घ्यावा ? असे म्हणू लागली ,

तिची अशी ताठर भूमिका अनपेक्षित होती ती आमच्यापेक्षा विकाससाठी . "स्वतहाच्या मनाप्रमाणे बायकोला वागवू शकतो " अशा विचाराच्या नवर्यांचा , विकास म्हणजे एक उत्तम नमुना होता , आणि या वेळी मात्र भारतीने "मी पण काही कमी नाही ", याची चांगलीच झलक दाखवून दिली होती

विकास आणि भारती नवरा -बायको असण्या बरोबरच त्यांच्या मुलांसाठी "आई-बाबा " होते , मुलांना जाणवत होते .आपल्या आई-बाबांच्या वागण्यातील फरक , बोलण्यातील सूर आणि त्यातील शब्द ." याचे कारण त्यांना या वयात उमजणे तसे सोपे नव्हते ,या प्रकारामुळे घरातील वातावरण आता निर्मळ आणि मोकळे राहिलेले नाही " या समस्येने गंभीर रूप धारण केलेले आहे" ,आम्ही सारे मित्र एकमेकाशी हे बोलून दाखवत होतो

.हे सगळे थांबले पाहिजे , पण कसे ?. आम्ही विकासला समजवून सांगितले, तसे भारतीला बोलून पाहिले , पण का कुणास ठाऊक ,या वळणावर समंजस भारतीला काय झाले होते ? हे कळेना , हा बदल अचानक नक्कीच झाला नव्हता , मग इतक्या दिवसाचा मनोभंग "त्याचे दुक्ख उफाळून आले असेल का ?

म्हणून भारती देखील "मुझे गिनो " असे विकासला ठणकावून बोलून दाखवते आहे . कधी कधी मनाला पण संधी मिळाली तर "आसुरी आनंद आणि समाधान मिळवावेसे वाटत असते ", भारतीच्या मनाला नेमके आताच असे वाटत असेल का ? या दोघांचा ताठरपणा नको त्या वेळी ,नको इतक्या वेळ " राहिला तर यात घराचे घरपण राहील काय ? मी माझा प्रश्न दोघांना विचारून पाहिला , त्यांनी उत्तर तर दिलेच नाही .वर मलाच प्रश्न केला ..तूच सांग .-कुणी आधी वाकले पाहिजे ?

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - तडजोड

-अरुण वि.देशपांडे -पुणे.

9850177342

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED