Jaaniv books and stories free download online pdf in Marathi

जाणीव - (कथा)

कथा - जाणीव

----------------------

अनिरुद्धाचे आणि नीलिमाचे पैश्यावरून सुरु झालेले वाद आणि त्यावरची चर्चा ,त्याचे आई -बाबा दोघेही शांतपणे पहात होते , या दोघांच्या वादात या वेळी तरी आपण बोलणे बरे नाही म्हणून गेल्या पिढीतले हे पती-पत्नी - नव्या पिढीतल्या कपल्स -च्या डिस्कशन मध्ये इंटरफेअर करीत नव्हते , गेल्या महिन्यापासून पैश्याचा विषय आणि त्यावर वाद सुरु होता ..अनिरुद्धची मनीमेनेजमेंट अजिबात बरोबर नसते .त्यामुळे इमर्जन्सी च्या वेळी हात पसरण्याची वेळ आली तर ते किती लाजिरवाणे असेल "..!त्यापेक्षाही वेळेवर आपण उपयोगाचे नाही" याचे मला जास्त वाईट वाटते आहे .

,गरज पडेल त्यावेळी रोख रक्कम असलीच पाहिजे , ती नसेल तर किती अवघड परिस्थिती होईल ?

हे अनिरुद्धला कसे कळत नाहीये "?,या विचाराने नीलिमा जास्त संतापलेली होती.

एक दृष्टीने निलीमाचा हा संताप अनिरुद्धच्या आई-बाबांना योग्य आहे असेच वाटत होते .कारण ..ठरवलेल्या गोष्टीवर फक्त भरभरून बोलायचे ..पण, प्रत्याक्ष्य कृती काहीच करायची नाही , सगळ्या गोष्टी पुढे ढकलत .दुसर्या विषयाकडे लक्ष वळवायचे " असे करणे हा अनिरुद्धचा स्वभाव होता .आणि सुरुवातीला असलेली त्याची ही सवय .आता त्याच्या स्वभावात मुरलेली होती..अशावेळी जर आपण आपल्या मुलाची बाजू घेत ..वाद थांबवण्याचा प्रयत्न करू लागलो तर ..सुनबाई - नीलिमा ..अधिकच रागावून बोलणार .

त्यापेक्षा .. तिच्या शांत होण्याची वाट पाहणे उत्तम ठरेल. यावर आई-बाबांचे एकमत झाले ..इतक्या वर्षाच्या अनुभवातून ..गोष्टी न ताणता ..त्यातून सुटका करून घेणे "यातच भले असते " हे सूत्र त्यांच्या मनात ठसले होते.नाही म्हटले तरी..वाढत्या वयाने .. माणसांना जाणीव होते .,कुठे आणि केव्न्हा व कसे थांबायचे असते ? हे त्यामुळेच कळते आपोआप.

.आजकाल आजारपण आणि त्यावरचे उपचार करण्याची वेळ आली की ..त्यासाठी होणारा संभाव्य खर्च ..किती ? कल्पनेने डोळे पांढरे होण्याची वेळ येते ..असे महागडे आजारपण न येवो" अशीच मनोमन प्रार्थना करावी लागते .आरोग्य -विमा योजना ..वगेरे असतात , पण स्वतःसाठी आणि परिवारासाठी ,त्याशिवाय कुणा आपल्या माणसाला मदत करण्याची वेळ आली तर .आपण मदत करायला नको का ?

नेमकी ही परिस्थिती उद्भवली होती .. -निलिमाच्या मोठ्या बहिणीच्या मिस्टरांना -अचानक हार्ट -प्रोब्लेम सुरु झाला .

डॉक्टर सूचनेप्रमाणे ..बायपास करणे आवश्यक आहे " हे ऐकून ..पुढील तयारी करणे आवश्यक होते ,महिनाभरात हे ऑपरेशन होणार हेते ..निलिमाच्या बहिणीकडे आजकालच्या नवीन बदलत्या सुविधा बद्दल माहिती नव्हती ..त्यामुळे ऑपरेशन साठी येणाऱ्या खर्चासाठी पैसे उभारणे आवश्यक होते . त्यांना आपणच आर्थिक मदत करणे आवश्यक होते आणि निलीमाची ताई आणि भावजी .दोघे ही पैश्यांच्या व्यवहारात अतिशय काटेकोर , नाते आणि आर्थिक व्यवहार दोन्हीत गल्लत करीत नसत . त्यामुळे काम झाल्या नंतर ते पैसे परत करणार यात शंकाच नव्हती.. तूर्तास त्यांच्यासाठी सर्वांनी मिळून हा प्रसंग निभावून नेणे महत्वाचे होते.

नीलिमाने अनिरुद्ध आणि त्याच्या आई-बाबांना याबद्दल कल्पना दिली ., तिचे ऐकून घेत आई-बाबां नीलिमाला धीर देत म्हणाले ..काही काळजी करू नका म्हणवे तुझ्या ताई आणि भावजींना .सगळं काही ठीक होईल आणि आपण आहोतच ना सारेजण त्यांच्या पाठीशी .

नीलिमाला हे ऐकून खूप बरं वाटलं .

नीलिमाने अनिरुद्धला ताई-भावोजी कडील परस्थिती सांगितली .

किती पैसे हवेत ? अनिरुद्धाने विचारल्यावर .

ती म्हणाली - कुणा एकट्यावर बोजा नको म्हणून- आपण सर्वांनी मिळून आर्थिक हातभार उचलायचा आहे..

माझा दादा जसे सांगेल तसे करू या ..

ओके डन. ,तू मला २-४ दिवस अगोदर कल्पना दे ..म्हणजे मी आणून देईन तुझ्याजवळ पैसे.अनिरुद्धने प्रोमीस केले.

ताई-भावोजींना हॉस्पिटलमध्ये पैसे भरण्यासाठी पैसे द्यावे लागणार ..दादाचा निरोप तिने अनिरुद्धला सांगितला

नीलिमाचे ऐकून तो म्हणाला

..या आठवड्यात जमणार नाहीये , १५ दिवसांनी जमेल , मी माझ्या एका जवळच्या मित्राला दिले आहेत ..अनिरुद्ध ने हे सांगताच ..नीलिमाला संताप आवरला नाही ..तिच्या रागाचे आणखी एक कारण होते ..अनिरुद्ध आणि त्याच्या मित्रांना शेअर -मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची आवड होती ..या उद्योगात त्यांना फायदा कधी कधी .आणि .नुकसानी नेहमी .असा मामला ,

" नेमक्या अशा "बिनकामाच्या कामासाठी अनिरुद्धाने काही न सांगता मित्राला रोख पैसे देऊन टाकणे ..तिला अजिबात आवडले नव्हते ..म्हणून .ती अधिकच संतापली होती ..

स्वभाव चांगला असणे वेगळे ,आणि सारासार विचार आणि गांभीर्याने विचार न करणे ..हा स्वभावातील दोष असतो . अनिरुद्धच्या या स्वभाव -दोषामुळे आजची परिस्थिती आली आहे ..अनिरुद्धला कधी जाणीव येणार या गोष्टींची ?

त्याच्या बाबांनी ..शेवटी दोघांच्या वादात हस्तक्षेप केला ..व नीलिमाला म्हटले ..हे बघ ..तुझे आजचे बोलणे अगदी रास्त आणि योग्य आहे..फक्त आजच्या आज यावर काही उपाय आहे का ? , तर .नाही ..म्हणून तू अगोदर शांत हो.

नीलिमा - हे बघ ..तू तुझ्या दादाला कबूल केले आहेस ना ..मदत करू म्हणून ...

तुझा शब्द वाया जाणार नाही..हा माझ्या बँकेतील चेक ..उद्या तुझ्या दादांना दे..त्यांचे काम होईल ..तुझाही शब्द राखला जाईल

आणि अनिरुद्ध .तुझ्या मित्राने पैसे दिले की.तू ते माझ्या खात्यात जमा करशील ..नीलिमाला सांगून करशील हे.

हे सगळं घडल्यावर अनिरुद्ध नीलिमाला म्हणाला ..सॉरी..नीलिमा .मी सिरीयसली विचार न करता वागतो ..याचा सर्वांना त्रास होतो ..याची जाणीव खरेच आजच्या प्रोब्लेमने मला झाली आहे.आणि हो..

बाबा ..तुमच्यामुळे आज निलिमाच्या शब्दाची किमंत राखली गेली ..खूप छान वाटले .आणि खरे सांगतो , विस्वास ठेवा आज मला माझाच राग सुद्धा आला.

यापुढे तुमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही .

लेकाच्या पाठीवर हात ठेवीत ..निलीमाकडे पहात बाबा म्हणाले ..नीलिमा ..विश्वास ठेव तुझ्या नवऱ्यावर.तुझा रांग, संताप योग्य आहे ,पण अनिरुद्धला पश्चताप झालाय ना , आता तू शांत हो प्लीज .

यस नीलिमा - यापुढे तुझा रांग अनावर होईल - असे मी काही करणार नाही.तुझ्यामुळे परिवार "काय असतो याची जाणीव झाली .

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - जाणीव

अरुण वि.देशपांडे -पुणे.

9850177342

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED