टवटवीत नाती - निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!!!
कोणतीही नाती नेहमीच टवटवीत राहावी अस आपल्या सगळ्यांनाच वाटत असत. पण कधी कधी कोणतेतरी दुसरेच ताण किंवा मनात असलेला राग आपल्या जवळच्या लोकांवर काढला जातो. आणि टीका केली जाते. त्याचा सरळ परिणाम तुमच्या जवळच्या लोकांवर दिसून येऊ शकतो. विनाकारण गैरसमज होऊन नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते. तुम्ही काही गोष्टी बदलल्या तर नात्यांमध्ये गैरसमज न होता नाती फुलत राहतील ..
१. काहीही बोलतांना विचार करून मगच बोला-
बऱ्याच वेळा काहीही विचार न करता कोणाच्या दिसण्यावरून,वागण्यावरून किंवा वागण्यावरून प्रतिक्रिया दिली जाते. हि प्रतिकिया बऱ्याच वेळा टीकेच्या स्वरूपातली असू शकते. प्रतिक्रिया देण्याआधी काही विचार सुद्धा केला जात नाही. अगदी, आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला काय वाटेल ह्या गोष्टीचा विचार सुद्धा केला जात नाही. कधी कधी अश्या प्रतिक्रियांमुळे समोरची व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे साहजिकच नात्यात दुरावा सुद्धा येऊ शकतो. हे टाळायच असेल तर काही सोप्प्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवण गरजेच बनत-
- दुसऱ्याच्या स्वभावातले काही गुण बदलायचे असतील तर त्यासाठी टिकेचा वापर करण्यापेक्षा ती गोष्ट खेलीमेलीमध्ये समोरच्यापर्यंत पोचवली तर समोरचा व्यक्ती सुद्धा नक्की स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करेल.
- दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतः मध्ये बदल घडवून आणा. आपल्या जवळचे कोणत्याही पद्धतीनी दुखावले जाणार नाहीत याची काळजी आपणच घेण गरजेच असत.
२. सत्यात राहा-
तुम्हाला अनुभव असेल कि समोरच्या व्यक्तीकडून जेव्हा तुम्ही खूप जास्ती अपेक्षा ठेवता आणि जर काही कारणांनी त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर तुमचा राग टीकेच्या स्वरूपातून बाहेर पडू शकतो. आणि टीका आली कि समोरची व्यक्ती दुखावली जाणार याचाही तुम्हाला विसर पडत असेल. पण हे टाळण अत्यंत गरजेच आहे. जेव्हा तुम्हाला नाती खेलीमेलीची राहावी अस वाटत असेट तेव्हा उगाच भरमसाठ अपेक्षा करण्यात काही अर्थ नसतो. सत्य परिस्थितीचा स्वीकार करूनच अपेक्षा ठेवल्या तर त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर नक्की होणार नाही.
- दुसऱ्याकडून अपेक्षापूर्ती न झाल्याने तुम्ही दुःखी होऊ शकता किंवा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येऊ शकतो. पण कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवतांना ती अपेक्षा पूर्ण होण्यासारखी आहे का ह्या गोष्टीचा विचार कारण अत्यंत गरजेच असत. अशक्यप्राय अपेक्षा ठेवल्यानी तुमचा तर हिरमोड होईलच आणि तुमचा हिरमोड झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्या टीकेला सामोर जाव लागेल आणि ती ब्याक्ती सुद्धा दुखवी जाईल. एकूणच काय, तुम्ही केलेल्या टीकेमुळे तुमच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता वाढीस लागू शकते. हे टाळायच असेल तर नात्यात अवास्तव अपेक्षांना नाही म्हणायाला शिकून नात फुलात ठेवायला मदत करा.
- आपण काय अपेक्षा ठेवतो आहे त्याचा आढावा घ्या. स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेऊन बघा आणि आपण अपेक्षा पूर्ण करू शकतो का याचा विचार करून बघा. जर तुम्हाला सुद्धा ती अपेक्षा पूर्ण कारण शक्य नसेल तर समोरच्याकडून अपेक्षा ठेवायचा तुम्हाला अधिकार सुद्धा राहणार नाही. प्रत्येकालाच स्वतःच अस अस्तित्व असत. त्यामुळे नात्यात थोडी स्पेस महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नात्यांमध्ये कटुता येऊन द्यायची नसेल तर समोरच्या व्यक्तीची स्पेस जपा.
३. समोरच्या व्यक्तीची कृती वैयक्तिकपणे घेऊ नका-
आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घटत असतात. त्या प्रत्येक घटनेवर टीका करायची बऱ्याच लोकांना सवय असते. तुमचा काही संबंध नसतांना एखाद्या गोष्टीवर टीका करायची काहीही गरज नसते. पण काही व्यक्तींना न राहवून प्रत्येक गोष्टीवर टीका केल्याशिवाय बर वाटत नाही. हा स्वभाव वेळीच बदलान गरजेच असत. प्रत्येकाला आपल आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार हा आहेच. जर तुम्हाला काही अपय झाला नसेल तर तुम्हाला सुद्धा त्या व्याक्क्तीवर टीका करण्याचा काही अधिकार राहत नाही.
- कधी कधी तुमच्या काही योजना ठरल्या असतील पण काही कारणांनी तुमच्या मित्राला त्या प्लॅन मध्ये सामील होता येणार नसेल तर ती गोष्ट तो मुद्दाम तुम्हाला दुखवायला करतोय असा समज करून जर तुम्ही त्याच्यावर टीका करत बसतात तर नक्कीच तुमच्या नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. समोरच्या व्यक्तीला सुद्धा काही अडचणी येऊ शकतात हि गोष्ट लक्षात ठेवली तर तुमच्या मनात शंका येणार नाही आणि तुमच नात सुद्धा हेल्दी राहण्यास मदत होईल.
- समोरच्या व्यक्तीला काहीतरी दुसर काम आल असेल किंवा काही कारणांनी यायला जमणार नी हि गोष्ट लक्षात ठेवण गरजेच असते. अश्यावेळी संशय न घेता "ठीके, पुढच्यावेळी भेटू.." अस म्हणालात तर नात्यात ताण अजिबात येणार नाहीत. आणि तुमच्यासाठी समोरच्याचा आदर वाढेल हेही अगदी नक्की.
४. व्यक्ती आणि त्या व्यक्तीच वागण एकत्र करू नका-
कधी कधी एखादी व्यक्ती चांगली आहे हे तुम्हाला माहिती असत पण तिच वागण न आवडल्यामुळे टिकास्त्र चालवायला तुम्ही मागे पुढे पाहत नसाल. अस करत असाल तर थांबा.. २ मिनिट विचार करा आणि मगच काही बोला. समोरच्या व्यक्तीमध्ये सकारात्मक गुण न पाहता तुमच लक्ष नकारात्मक गुणांकडे वाटल कि तुम्हाला संताप येणार हे अगदी नक्की असत. माणसाच वागण सतत बदलत असत. त्यामुळे व्यक्ती आणि त्या व्यक्तीच वागण एकत्र करू नका.
- एखाद्या वेळी कोणी तुमच बोलण मधेच थांबवून तिथून निघून गेला असेल तर साहजिकच तुमच्या मनात त्या व्यक्ती बद्दल नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते. आणि तुमच्या कडून टीका होण्याची सुद्धा शक्यता असते. पण अश्या वेळी हा विचार करून बघ, "खरच काही काम आठवल असेल" किंवा घाई असेल त्यामुळे तो थाबला नसेल. असा विचार केल्यानी तुमच्या मनात शंका येणार नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीला दुखावणार सुद्धा नाही.
- व्यक्तीचा मूळ स्वभाव आणि तिच वागण वेगळ असू शकत. कधी कोणते ताण किंवा अजून काही गोष्टीमुळे वागण्यात बदल होऊ शकतो. पण अश्यावेळी टीका न करता ता व्यक्तीला समजावून घेण अत्यंत गरजेच असत. शेवटी आपल्या जवळच्या लोकांची काळजी आपणच घेतली पाहिजे हि गोष्ट विसरू नका.
५. सकारात्मक गुणांकडे पहा-
कोणीच सर्वगुण संपन्न नसत. त्यामुळे प्रत्येकात काहीतरी कमी हि असतेच. हि गोष्ट नेहमी लक्षात ठेवून फक्त सकारात्मक गुणांकडे लक्ष दिल्यानी नात्यात कधीच दुरावा येणार नाही याची खात्री तुम्ही ठेऊ शकता. शेवटी आपली नाती आपणच जपायची असतात. आपल्या जवळच्या लोकांना आपणच बांधून ठेवायचं असत. आणि एकमेकांमधला ताण कमी कसा होईल ह्याकडे लक्ष देण गरजेच असत.
- ज्या गोष्टीनी नात्यात ताण निर्माण होतो अश्या गोष्टी आवर्जून टाळल्या तर नात्यात दुरावा येणार नाही. कधी कधी तुम्हाला आलेल्या ताणामुळे तुमच्याकडून समोरच्या व्यक्तीला दुखावलं जाऊ शकत. हे टाळण्यासाठी ताण कमी करण्याचे उपाय शोधून त्याची अंमलबजावणी कारण गरजेच असत.
- तुम्ही अनुभवलं असेल, तुम्ही कोणावर टीका केला कि समोरचा सुद्धा तुम्हाला दुखवायला काहीतरी शोधत राहील. त्यामुळे साहजिकच नात्यामधला ताण वाढून नाती दुषित होऊ शकतात. पण टीकेपेक्षा कौतुक केल तर त्यामुळे समोरचा माणूस सुद्धा सुखावतो आणि वातावरण हेल्दी राहण्यास मदत होईल.
कोणाच्या शारीरक व्यंगावरून, स्वभावावरून किंवा वागण्यावरून टीका करण अत्यंत वाईट असत. समोरचा माणूस खूप दुखावलं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नाती तर दुषित होतीलच पण एकमेकांबद्दलचा आदर सुद्धा कमी होऊन त्याच रुपांतर रागामध्ये होऊ शकत. एखादी गोष्ट सागायची असेल तर टी च्नागल्या शब्दात, समोरचा माणूस दुखावला जाणार नाही अश्या पद्धतीनी सांगितली तर तो माणूस सुद्धा आनंदानी बदल करायला तयार होईल तेही नात्यांमध्ये दुरावा न आणता. त्यामुळे टीकेला नाही म्हणा आणि आयुष्य आनंदी बनवण्यासाठी एक पाऊल उचला.
- अनुजा कुलकर्णी.