आयुष्यावर नियंत्रण ठेवायचं आहे..हे ट्राय करा!! Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आयुष्यावर नियंत्रण ठेवायचं आहे..हे ट्राय करा!!

आयुष्यावर नियंत्रण ठेवायचं आहे..हे ट्राय करा!!

आयुष्यात काय होणार हे माहित असत तर साहजिकच त्याची मजा राहणार नाही. अनपेक्षित सुखाचा अनुभव येण आनंददायी असत. अस म्हणल जात, आपल्याकडे जे जे येत ते डोळे उघड ठेऊन पाहिलं आणि त्याचा योग्य वापर करून घेतला तर आयुष्य अजूनच मस्त होईल. पण अर्थात काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी सोडव लागतच ! सगळ नशिबावर सोडून चालत नाही. आयुष्यात जे हवाय ते मिळवायचं असेल तर त्यासाठी कष्ट हे केले पाहिजेत. स्वतःच्या तत्वांना धरून योग्य मार्ग अवलंबला कि समाधान नक्कीच मिळत. सगळ्या बाजूंनी यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही काय मार्ग अवलंबता, तुमची तत्व काय आहेत ह्याचा विचार अत्यंत महत्वाचा असतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या टिप्स-

१. पूर्ण न होणाऱ्या अपेक्षा ठेऊ नका-

तुम्ही सतत कामात बिझी असता? आणि आयुष्याकडून भरपूर अपेक्षा ठेवून असता? कधी कधी तुमच्या अपेक्षा इतक्या वाढतात कि त्या पूर्ण होण्यासारख्या सुद्धा नसतात. कधी कधी तर तुम्ही काम सोडून नुसती दिवा स्वप्न बघण्यात गुंग होऊन जाता. पण एक लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडून कष्ट होण गरजेच आहे. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसतात. त्यासाठी नवीन नवीन आव्हान घेण सुद्धा गरजेच आहे नाहीतर तुम्ही आहे तिथेच राहाल.. आव्हानांचा सामना करतांना तुम्हाला आयुष्यात उत्साह मिळेल आणि आंनद मिळेल. त्यासाठी लवचिकता ठेवण्याची गरज असते. आणि बराच वेळा आव्हान खडतर असेल तर तुम्ही स्वतःला सांगता,"मी ह्या गोष्टीत उत्तम नाहीये त्यामुळे मला अमुक गोष्ट जमणारच नाही!" तेव्हा तुम्ही नवीन काही करायचा प्रयत्न सुद्धा करायचं टाळत असता. अर्थात नवीन काही करतांना त्यात तुम्ही यशस्वी व्हालच अशी खात्री नसते. पण प्रयत्न कारण तुमच्या हातात असत. त्यामुळे प्रयत्न करत राहा पण पूर्ण होणार नाहीत अश्या अपेक्षा अजिबात ठेऊ नका.

२. चूक झाली तरी स्वतः ला दोष देऊ नका-

कधी कधी आयुष्यात चुका होतात. पण बऱ्याच वेळा त्या चुका अनवधानानी होत असतात. त्यामुळे प्रत्येक चुकीला स्वतःला दोष देण बंद करा. माणूस म्हणल कि चुका तर होणारच त्यामुळे चुका होणारच! आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी थोडी रिस्क घेण गरजेच असत. रिस्क घेतली तरी त्यावेळी खात्री नसते कि तुम्हाला हव ते साध्य होईलच..थोडी रिस्क घेतली आणि त्याचा अंदाज चुकायची शक्यता असते. अश्यावेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा त्या चुका सुधारून परत कामाला लागण गरेजच असत. चुकांमधून बराच काही शिकता येत. त्यामुळे चुका झाल्या तर स्वताला दोष देत राहत बसण्यापेक्षा त्या चुका परतकश्या होणार नाहीत ह्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुमच आयुष्य सुंदर वळण घेत मार्गी लागेल.

३. सतत दुसऱ्याशी बरोबरी करण टाळा-

पुढे जायचं असेल तर दुसऱ्याशी स्पर्धा आलीच असा चुकीचा समाज घेऊन आपण वावरत असतो. कोणापेक्षा पुढे जाण्यापेक्षा स्वतः च्या आनंदासाठी, समाधानासाठी यशस्वी होण हे अधिक चांगल असत. दुसऱ्याशी स्पर्धा करून समाधान मिळत नाही. ते मिळत ते स्वतःच्या यशामुळे. त्यामुळे सतत दुसर्याकडे पाहण्यापेक्षा स्वतःचा उत्कर्ष कसा होईल ह्याकडे जास्ती लक्ष द्या.

४. स्वतःची मूल्य कधीच विसरू नका-

खूप काहीतरी मिळवायच्या इच्छेनी कधी कधी चुकीचा मार्ग अवलंबला जातो. आणि त्यामुळे तुमची सगळी मूल्य बाजूला पडतात. सरळ मार्गांनी यश मिळत नाही असा काहींचा समाज असतो जो एक अत्यंत चुकीचा समाज आहे. उलट सरळ मार्गांनी यश मिळवल तर त्याच समाधान नक्की जन्मभर टिकून राहण्यास मदत होते. त्याविरुद्ध मूल्य न जोपासता गैर मार्गांचा अवलंब केला तर साहजिकच त्याची टोचणी जन्मभर मनाला लागून राहू शकते. आणि मिळालेल्या यशाचा आनंद फार काळ टिकून ठेवता येणार नाही. स्वत:ची जी मूल्य आहेत त्यांना धक्का लागून न देता आयुष्यात पुढे गेलात तर तुमच आयुष्य सुरळीत चालू राहील आणि तुम्ही आनंदी राहाल.

५. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवायला विसरू नका-

आनंद मिळण्यासाठी खूप काहीतरी मोठ मिळण्याची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा आनंद मिळवता येतो. मोठ्या सुखाच्या प्रतीक्षा करण्यापेक्षा प्रत्येक क्षणी मिळणाऱ्या सुखाचा विसर पडून देऊ नका. त्यामुळे तुम्ही उगीचच तुमच आयुष्य दुःखी करत असता. आयुष्य आनंदी सुखी करायचं असेल तर त्यासाठी डोळे उघडे ठेऊन जगण्याची गरज असते आणि आयुष्यात येणारा छोटा किंवा मोठा आनंद सहज स्वीकारला पाहिजे.

६. दुसऱ्याच्या मतावर अवलंबून राहू नका-

तुम्हाला गरज नसतांना सुद्धा १०० लोकांकडून सल्ले मिळत असतील. त्या सगळ्या लोकांचे सल्ले ऐकत राहिलात तर तुमच आयुष्य विनाकारण गुंतागुंतीच होऊ शकत. नेहमी लक्षात ठेवा, शेवटचा निर्णय हा तुमचा असतो त्यामुळे कधीही दुसऱ्याच्या मतांवर अवलंबून राहू नका. प्रत्येकच आयुष्य, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाची मत सुद्धा वेगळीच असणार. तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल, तुम्हाला पटेल असे निर्णय घ्या. उगाच कोणाच्या तरी दबावाखाली येऊन किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन तुमची मत वारंवार बदलू नका. त्यामुळे नुकसान होईल ते तुमचाच. कारण नुसते सल्ले देण अत्यंत सोप्पा असते पण त्याचे परिणामाला स्वतःच स्वतःला सामोर जाव लागत. त्यामुळे कितीही लोकांचे सल्ले ऐकले तरी निर्णय मात्र तुम्हीच घ्यायला विसरू नका.

- अनुजा कुलकर्णी.