Hrudyat something something books and stories free download online pdf in Marathi

हृदयात समथिंग समथिंग....

हृदयात समथिंग समथिंग....

'हृदयात समथिंग समथिंग..' चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असणार हे कळतच पण ह्या चित्रपटातल्या कलाकारांना पाहून हा चित्रपट धमाल विनोदी असणार हे जाणवत. त्यात ह्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात नक्की काय असेल आणि ते कश्या पद्धतीनी सादर केल आहे हे पहायची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना असेल. प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला इम्प्रेस करताना प्रेमवीरांची कधी-कधी त्रेधातिरपिट उडते. ह्या त्रेधातिरपिटीमधल्याच गंमतीजंमती हृदयात समथिंग समथिंग ह्या सिनेमात तुम्हांला पाहायला मिळतील. आजकाल विनोदी सिनेमा म्हटला की, कमरेखालचे विनोद जास्त असतात. त्यामुळे संपूर्ण कुटूंबाला एकत्र येऊन असे सिनेमे पाहता येत नाहीत. संपूर्ण कुटुंबाला घेऊन विनोदी चित्रपट पाहता येत नाहीत पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कोणते विनोद रुचणार नाही ह्याचा विचार करून 'हृदयात समथिंग समथिंग' ह्या चित्रपटात कौटुंबिक मनोरंजनावर भर दिला आहे. त्यामुळे सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांना ह्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकालाच काही ना काही टेन्शन्स असतात. म्हणूनच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्याच्या उद्देश्याने हा सिनेमा बनवला गेला आहे अस निर्मात्यांच म्हणण आहे. आणि विनोदी सिनेमा म्हटला की, कॉमेडीचे बादशाह अशोक सराफ तर हवेतच. अशोक सराफ यांच्या खास विनोदी शैलीतला हा सिनेमा आहे. आणि अशोक सराफ हे त्यांच्या विद्नोडी भूमेकेसाठी प्रसिद्ध आहेतच त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला हा आवडेल अस वाटून जातंय.. .

* हा चित्रपट का बघावा-

१. प्रवीण राजा कारळे ह्याचं उत्तम दिग्दर्शन-

दिग्दर्शन उत्तम असेल तर साहजिकच चित्रपट सुद्धा चांगला बनतो. प्रवीण राजा कारळे ह्याचं उत्तम दिग्दर्शन ही 'हृदयात समथिंग समथिंग’ ह्या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

२. चित्रपटाचे नाव-

'हृदयात समथिंग समथिंग’ हे नाव पाहताक्षणी ह्या चित्रपटाविषयी विचार करायला लावत. आणि चित्रपटामध्ये काय पाहायला मिळेल अंदाज त्याच्या नावावरून येतो. 'हृदयात समथिंग समथिंग’ ही एक प्रेम कथा आहे ज्यात कसे ट्विस्ट आणि टर्नस पाहायला मिळतात आणि ते पाहण मजेशीर ठरेल.

३, अशोक सराफ यांची वेगळी भूमिका-

अशोक सराफ ह्यांनी वेगवेगळ्या भूमिका उत्तमरीत्या साकारल्या आहेत. 'हृदयात समथिंग समथिंग’ ह्या चित्रपटात अशोक सराफ 'लव गुरू' म्हणून प्र्क्षांसमोर येतात. त्यांना पाहण नेहमीच आनंददायी असतं आणि त्यांना पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा.

४. फ्रेश चेहरे-

लव गुरु अशोक सराफ ह्यांच्याबरोबर अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियांका यादव असे फ्रेश चेहरे ह्या चित्रपटात पाहायला मिळतात. आणि अश्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहण पैसा वसूल करणार असेल.

५. उत्तम गाणी-

कोणत्याही चित्रपटात गाणी महत्वाची भूमिका बजावतात. ह्या चित्रपटातली गाणी हृदयस्पर्शी आहेत आणि कानाला मंत्रमुग्ध करणारी आहेत. ह्या चित्रपटातली गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे विनोदी सिनेमातलं हे एकुलतं एक रोमँटिक गाणं आहे. सागर खेडेकर ह्यांचे गीत, अनिरूध्द काळे ह्यांचे संगीत असलेले ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गायले आहे. सिनेमात स्नेहा चव्हाण ही प्रिया ह्या एका खट्याळ मुलीच्या भूमिकेत आहे. अशा खट्याळ मुलीचा रोमँस कसा असेल, हे त्या गाण्यातून प्रतीत होणं गरजेचं होतं. तो भाव आनंदीच खूप छान व्यक्त करू शकते, असा मला विश्वास होता. आणि आनंदीच्या आवाजाला जसराजचा आवाज कॉम्पिलमेन्ट करतो. त्याचबरोबर ह्या चित्रपटात असलेल्या कलाकारांचा 'चंद्रमुखी' ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव ह्या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता ह्यांनी संगीतबध्द केलेले 'चंद्रमुखी' हे गाणे गायले आहे. त्यामुळे कलाकारांनी गायलेलं गाणं ऐकण काही विशेषच ठरेल.

* चित्रपटाची कथा-

आयुष्यात कधीही प्रेमात न पडलेला माणूसच सापडणार नाही. त्यामूळे प्रत्येकाला प्रेमात पडल्यानंतर ह्या सिनेमात होणा-या गंमती-जंमती कधीतरी आपल्याही बाबतीत घडल्यात असे वाटेल. ही तुमच्या-आमच्या सर्वांच्या ‘हृदया’जवळची कथा आहे. प्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ आहेत, ती व्यक्ति फक्त आपलीच व्हावी, यासाठी नानाविध गोष्टी प्रेमवीर करत असतात आणि त्या प्रेमातल्या ‘केमिकल लोच्या’मुळे मग ब-याच गंमतीजमतीही आयुष्यात घडतात. ह्यावरच ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट आधारित आहे. अशोक सराफ ह्यांनी ह्या चित्रपटात लव गुरुची भूमिका साकारली आहे आणि ते अनिकेत विश्वासराव ला मदत करतांना दिसतात.


प्रेमात आणि युद्धात सगळे काही माफ असते असे म्हटले जाते. एखादी मुलगी आवडल्यानंतर तिला पटवण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या मुलाची कथा 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटात पाहायला मिळते. गोलमाल या जुन्या चित्रपटातील जुळ्या भावाचा फॉर्म्युला देखील या चित्रपटात वापरला आहे. पण त्यात एक वेगळाच ट्विस्ट प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळतो. समीर (अनिकेत विश्वासराव) प्रिया (स्नेहा चव्हाण) ला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. पण तिच्या समोर आपले प्रेम कसे व्यक्त करायचे हे त्याला कळत नसते. यात त्याला त्याचा बॉस (अशोक सराफ) मदत करतो. बॉस त्याला अनेक आयडिया देतो. त्यामुळे प्रिया देखील समीरच्या प्रेमात पडते. पण या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाल्यावर समीरला कळते की प्रिया त्याच्या बॉसचीच मुलगी आहे. हे कळल्यावर प्रिया आणि समीर दोघांना पण आश्चर्याचा धक्का बसतो. वडिलांशी ते दोघे खोटे बोलायचे ठरवतात आणि त्यांना लग्नासाठी तयार करण्यासाठी एक बेत आखतात. प्रियाचे वडील लग्नासाठी तयार होतात का, या सगळ्यात काय धमाल मस्ती होते हे प्रेक्षकांना हृदयात समथिंग समथिंग हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

या चित्रपटाच्या कथेत काहीही नावीन्य नसल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो. चित्रपटात पुढे काय होणार याची आधीच कल्पना येत असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागत नाही. चित्रपटातील काही दृश्य चांगली जमून आली आहेत. आपली आजी वारली आहे ही थाप समीर त्याच्या बॉसला मारतो, त्यावेळेचे दृश्य नक्कीच खळखळून हसवते. अशोक सराफ यांनी नेहमी प्रमाणेच या चित्रपटात देखील अफलातून काम केले आहे. अनिकेत विश्वासरावने चांगले काम केले असले तरी काही दृश्यात तो अभिनय ओढून ताणून करत असल्याचे जाणवते. भूषण कडू, स्नेहा चव्हाण, प्रियांका जाधव यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात अनेक गाणी असली तरी एकही गाणे ओठावर रुळत नाही. तसेच चित्रपटाची लांबी जास्त असल्याचे जाणवते. मध्यंतरानंतर चित्रपट उगाचच ताणला आहे. चित्रपटाचा शेवट तर ओढूनताणून करण्यात आला आहे. शेवटी हास्य निर्मिती करण्यासाठी अनेक पात्रांना एकत्र आणत चांगलाच गोंधळ घालण्यात आला आहे. पण या गोंधळामुळे देखील विनोद निर्मिती होत नाही अस वाटू शकत.

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांनी निर्मिती केली आहे. तर सचिन नथुराम संत ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे ह्यांनी केले आहे. मुखेड तालुक्यातील उजाड माळरान डोंगराच्या दऱ्या खोरीत नापिकी दुष्काळी पाणी टंचाईच्या परिस्थितीने हैराण झालेल्या तालुक्याचा भूमिपुत्र स्वप्नील चव्हाण आता चित्रपट क्षेत्रात पर्दापण करत असून, त्यांच्या निर्मितीतून ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट साकारला आहे. नऊ वर्षांच्या मुलांपासून ते अगदी नव्वदीच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांना पाहता येईल, असा हा कौटुंबिक सिनेमा आहे. अशोक सराफ ह्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात गेली कित्येक वर्ष राज्य केले आहे. आणि आता ह्या मॅड-कॉमेडी सिनेमातून पून्हा एकदा त्यांचं धमाल कॉमिक टाइमिंग आपल्याला अनुभवता येईल. हा कौटूंबिक मनोरंजक सिनेमा तुम्हांला पोटभर हसवेल की नाही हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल आणि तुम्हीच ते चित्रपट पाहून ठरवा.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED