सुंदर 'मी' होणार... Anuja Kulkarni द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुंदर 'मी' होणार...

सुंदर 'मी' होणार...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं, आपल व्यक्तिमत्व खुलत रहाव अस वाटत असत. आपल्याला सगळ्यांकडून कौतुक मिळाव अस वाटत असत. त्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करतो पण काही लोकांच्या बाबतीत उलटच होत. काही लोकांच्या सवयीच त्यांना आकर्षक होण्यापासून, लोकांमध्ये उठून दिसण्यापासून मागे खेचत असतात. आणि व्यक्तिमत्व आकर्षक होण्याऐवजी लोकांची तुमच्यावर चिडचिड होऊ शकते आणि त्यामुळे लोकं तुम्हाला टाळू शकतात. आपण कोणाला नको आहे, सगळे जण आपल्याला टाळत आहे हि एक अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. त्यासाठी काही गोष्टींचा आवर्जून विचार करा. तुम्हाला तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये पुन्हा एकदा आवडते बनायचे असेल तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा आणि आयुष्यात लोकांवर छाप पाडा-

१. तुम्ही स्वतःतच गढून गेलेले असता-

बऱ्याच वेळा तुम्हाला कळत सुद्धा नसेल कि तुम्ही फक्त स्वतःमध्ये मग्न असता. तुम्ही फक्त "मी" , "माझे" , "मला" ह्याशिवाय काही विचार करतच नसता. आजूबाजूला काय चालू आहे ह्याकडे तुमच लक्ष सुद्धा जात नसत. साहजिकच, तुम्ही समोरच्याला आनंद मिळेल अस वागत नाही. अश्या लोकांची संगत खूप कमी लोकांना हवीहवीशी वाटत असते आणि त्याचा परिणाम म्हणजे सगळे तुम्हाला टाळू शकतात. जर तुम्हाला हे नको असेल आणि मित्रांच्या गराड्यात राहायचं असेल तर "मी" मधून बाहेर पडून इतर जगाकडे पहा आणि त्याच कौतुक करा. अस केल्यानी तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींचे आवडते बनू शकाल.

२. तुम्ही फक्त बाहेरच सौंदर्य पाहता आणि आतल्या सौंदर्याबद्दल विसरून जाता-

"मी कशी दिसते" , "मी काय घालते" फक्त अश्या बाहेरच्या सौंदर्याकडे तुम्ही पाहत असता. पण तुम्हाला हे माहिती आहे का कि तुमच बाहेरच सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या आतल्या सौंदर्याकडे जास्ती लक्ष देण गरजेच आहे. जेव्हा तुम्ही आतूनही सुंदर असाल, तुमचे विचार आणि तुमच्या इछा चांगल्या असतील तेव्हा ते तुमच्या वागण्या बोलण्यातून नक्कीच समोरच्या माणसाला जाणवेल आणि तुमच्याशी बोलायला सगळेच उत्सुक असतील. तुम्ही फक्त आरश्यासमोर स्वतःला निरखून पहा म्हणजे तुमचच तुम्हाला जाणवेल कि तुमच्या आत काय दडल आहे. आणि जेव्हा का तुमच्यासमोर तुमचा खरा चेहरा येईल त्याच वेळी तुम्ही स्वतःला बदलण्यास योग्य पावलं उचलून यशस्वी व्हाल.

३. तुम्ही सतत स्पर्धा करत असता-

थोडा विचार करून बघा.. तुम्हाला सतत तुमच्या जवळच्या लोकांशी स्पर्धा करायची असते? त्यांच्या पेक्षा तुम्ही कसे वरचढ हे दाखवायचं असत? ह्याच उत्तर जर का हो आल तर हे तुमच्या मित्र मैत्रीणमध्ये तुम्ही लोकप्रिय नाही हे कारण असू शकत. प्रत्येक ठिकाणी समोरच्या माणसाला तो कसा तुमच्यापेक्षा खुजा आहे हे दाखवण्यापेक्षा जर तुम्ही त्या व्यक्तीच मनोधैर्य उंचावण्यास मदत केली तर तुम्ही त्या व्यक्तीचे "हिरो" व्हाल हे अगदी नक्की.

४. तुम्हाला तुमचे मित्र तुमचे शत्रू वाटतात-

बऱ्याच वेळा मित्रांच्या यशा मुळे तुम्हाला त्याच्या बद्दल मत्सर वाटू शकतो. मित्र आपल्या पुढे कसा गेला ह्या विचाराने तुमच्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकते. आणि साहजिकच ते तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसू शकत. हि भावना समोरच्या व्यक्तीला समजून येण्यास वेळ लागत नाही आणि असे लोक क्वचितच कोणाला आवडतात. हे टाळायच असेल तर आपल्या मित्रांच्या यशान दुःखी न होता त्याचं भरभरून कौतुक केल तर तुमच्या मित्रांना चांगल तर वाटेलाच पण त बरोबर तुमच्या मध्ये असलेल्या मैत्रीचा दुवा एकदम घट्ट झाल्याशिवाय राहणार नाही.

५. स्वतःच्या महत्व दुसऱ्याच्या विचारण-

"मला कोणी किंमत देत नाही... मी कोणाला महत्वाचा वाटत नाही" असे विचार सतत तुमच्या मनात येत असतील आणि तुम्ही हे प्रश्न तुमच्या मित्रांना विचारात असाल तर तुम्ही नक्कीच लोकप्रिय राहणार नाही आणि तुमच्या सोबत राहायला कोणालाच आवडणार नाही. कधी कधी तुमचे खास मित्र तुम्हाला न सांगता बाहेर जेवायला जातात.. अश्या वेळी तुम्हाला स्वत:बद्दल कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते.. आणि जर तुम्ही असे प्रश्न मित्रांना विचारले तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही. प्रत्येकच वैयक्तिक आयुष्य असत आणि ते प्रत्येकजण मनाप्रमाणे जगू शकत. त्यामुळे अशी परिस्थिती आली आणि जर तुम्ही अस म्हणाला, "काहीतरी महत्वाच बोलायचं असेल आणि ते मला कळू द्यायचं नसेल म्हणून मला न घेता जेवायला गेले.." तर तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या बद्दलचा आदर तसाच राहील.

६. ग्रुप मध्ये स्वतःला बॉस समजण-

काही लोकांना सतत स्वःताची टिमकी वाजवायची सवय असते. आणि ते अश्या गैरसमजुतीत राहत असतात कि ते यांच्या मित्रांमध्ये बॉस आहेत. ते जे सांगतील तेच झाल पाहिजे. पण जेव्हा काही लोक एकत्र येतात त्यावेळी सगळ्यांच्या मताला समान किंमत असते. सगळे निर्णय तुमची घेणार आणि बाकीच्यांची मत मी ऐकूनही घेणार नाही असा विचार केल्यानी तुमच्या ग्रुपमधल्या कोणालाच तुम्ही आवडणार नाही. त्यामुळे ग्रुप मध्ये असाल तेव्हा सगळ्यांच्या मताला किंमत दिली पाहिजे हे विसरू नका.

7.तुम्ही मित्रांमध्ये अप्रामाणिक राहता-

प्रत्येकालाच आपले मित्र प्रामाणिक असावे अस वाटत. मैत्रीच्या नात्यात खोटेपणाला आणि अप्रामाणिकपणाला अजिबात जागा नसते. मनात एक आणि बोलतांना दुसराच अस करायची बऱ्याच लोकांना सवय असते. अप्रामाणिक आणि खोट वागणारी लोक कोणालाच आवडत नाहीत. त्यामुळे मैत्री मध्ये लपवाछपवी किंवा खोटेपणा याला अजिबात थारा ठेऊ नका. प्रामाणिक मित्रच सगळ्यांनाच हवेहवेसे वाटत असतात. त्यामुळे खरेपणा आणि प्रामाणिकपणा कधी सोडू नका आणि समोरच्याकडून सुद्धा तेच मिळेल ह्याची खात्री ठेवा.

८. तुमच वागण बोलण उद्धट असत-

तुम्ही मित्र मैत्रिणीशी बोलतांना कस बोलता? तुमच्या बोलण्यात नम्रपणा आणि आपुलकी असते? जर अस नसेल आणि जर तुमच बोलण उद्धट असेल तर ते तुमच्या कोणत्याही मित्राला आवडणार नाही आणि तुम्हाला टाळण्याकडे लोकांचा कल राहील. कोणत्याही विषयावर चर्चा करतांना दुसऱ्यांच्या मताला सुद्धा किंमत दिली तर तुमच सुद्धा मत लोकं ऐकून घेतील आणि तुम्ही चांगले विचार करता, कोणाला दुखावत नाही म्हणून ग्रुपमध्ये प्रसिद्ध व्हाल.

९. तुम्ही अजिबात विश्वासू नसाल-

तुम्ही सारखा सारखा तुमच्या मित्रांचा विश्वास तोडत असता? जेव्हा कोणाला तुमची मदत लागते तेव्हा तुम्ही नेहमीच बिझी असता आणि कधीच कोणालाही मदत करत नाही? अस असेल तर वेळीच तुमच वागण बदला.. कारण जे दुसऱ्याला मदत करत नाहीत आणि फक्त दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करतात असे लोकं कोणालाच आवडत नाहीत. आणि अश्या लोकांना टाळलेल बर असा सगळे विचार करतात. आणि तुम्ही एकत पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ह्या विरुद्ध जर तुम्ही सगळ्यांना मदत करत असाल तर तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही नेहमीच हवेहवेसे राहाल.

१०. तुम्ही सतत नकारात्मक असता-

नकारात्मक लोकं कोणालाच आवडत नाहीत हे तुम्हाला चांगलाच माहिती असेल. सततच्या नकारात्मक राहिल्यामुळे तुमच्या बरोबर राहणाऱ्या लोकांना सुद्धा नकारात्मक वाटू शकत. आणि नकारात्मकता कोणालाच आवडत नाही. त्यामुळे नकारात्मक लोकांपासून लांब राहाण श्रेयस्कर असाच विचार नेहमी केला जातो. हे जर टाळायच असेल तर नेहमीच सकारात्मक बोलत राहा. आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही भरपूर मित्रांच्या गराड्यात आपल आयुष्य घालवू शकाल.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुजा कुलकर्णी.