Aapalyala abhiman vatale ashi ro chi 9 ghoshit operation books and stories free download online pdf in Marathi

आपल्याला अभिमान वाटेल अशी रॉ ची ९ घोषित ऑपरेशन्स...

आपल्याला अभिमान वाटेल अशी रॉ ची ९ घोषित ऑपरेशन्स...

आपल्याला त्यांच्याविषयी जास्ती माहिती कळत नाही किंवा ऐकायला देखील मिळत नाही. त्यांच काम कोणाला कळत नाही, ते बाहेर पण येत नाही आणि त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित राहू शकतो. रॉ म्हणजे रिसर्च एंड एनालिसिस विंग अर्थात अनुसंधान और विश्लेषण विंग! धर्मो रक्षति रक्षित: म्हणजेच जे धर्माच पालन करतील ते नेहमीच सुरक्षित राहतील- हे रॉ च ब्रीद वाक्य!! इंदिरा गांधी ह्यांच्या तत्कालीन सरकारने २१ सप्टेंबर १९६८ साली रॉ ची स्थापना केली. रॉ म्हणजे देशासाठी काम करणारी संस्था, प्रसंगी जीवावर उदार होऊन देशाच्या सुरक्षेची काळजी घेणारी एक गुप्तहेर संघटना इतकेच आपल्याला माहित असतं. ते तेवढच माहित असणं आपल्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी योग्य असतं. कारण कुठल्याही मिशनवर काम करताना प्रचंड गुप्तता पाळणे हे रॉ च्या लोकांसाठी अत्यावश्यक असते. नव्हे, त्यांना तशा सूचनाच असतात. रॉ एजंट त्यांचा जीव धोक्यात घालून मिशन पूर्ण करत असतात. भूतकाळात रॉ कडून खूप मिशन्स झाली त्यातली काहीच घोषित आहेत आणि ज्याचा आपल्याला अभिमान वाटल्यावाचून राहणार नाही. रॉ कडून झालेली काही मिशन्स जी असाधारण होती त्यातली काही निवडक-

१. ऑपरेशन स्माईलिंग बुद्धा-

स्माईलिंग बुद्धा भारताच पाहिलं परमाणु ऑपरेशन होत. हे काम रॉ कडे दिल गेल होत. आणि संपूर्ण गुप्तता पाळण्याची जबाबदारी रॉ कडे होती. स्माईलिंग बुद्धा हे पाहिलं ऑपरेशन होत ज्यात भारतात होणाऱ्या ऑपरेशन मध्ये सामील करून घेतलं होत. १८ मे १९७४ रोजी भारताने पहिली अणुबॉंब चाचणी केली. साहजिकच या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि काही मोजक्याच लोकांना याची माहिती होती. राजस्थानातल्या पोखरण इथं ही चाचणी घेण्यात आली. तिचं सांकेतिक नांव होतं-स्मायलिंग बुद्धा.. म्हणजेच, बुद्ध हसला. भारत-पाकिस्तानच्या १९७१युद्धापर्यंत आण्विक शस्त्र कार्यक्रमास भारतानं तितकं महत्व दिलं नव्हतं. पण ह्या चाचणी नंतर भारत अणुबॉम्ब असलेल्या देशात समाविष्ट झाला. ह्या चाचणी नंतर अमेरिका, चीन आणि पाकिस्तानला आश्यर्य वाटल्याशिवाय राहीलं नाही. ह्या अणु चाचणीनंतर भारत अण्वस्त्रसज्ज झाला.

२. खलिस्तान मुव्हमेंट-

८० चे दशक हा भारतासाठी खराब कालावधी होता. आयएसआय च्या पाठींब्यामुळे खलिस्तानच्या दहशदवादाने उच्चांक गाठला होता. हा काळ अत्यंत कठीण असा काळ होता. पंजाब मधल्या आतंकवाद्यांविरुद्ध रॉ कडून २ गुप्त गटांची म्हणजेच स्थापना झाली. Counter Intelligence Team - X or CIT-X, and Counter Intelligence Team - J or CIT-J. CIT-X चा मुख्य उद्देश पाकिस्तानला लक्ष करायचं आणि CIT-J कडे खलिस्तानी ग्रुप्स ना लक्ष करायचं असा होता. रॉ कडून ह्यावेळी सुद्धा उत्तम कामगिरी झाली. त्यांनी फक्त खलिस्तानी दहशतवाद्यांना बाहेर काढाल पण त्याच बरोबर पाकिस्तान मधल्या बऱ्याच ठिकाणी अशांतता आणली आणि त्यामुळे आयएसआय ला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या हलाचीन पूर्ण पणे बंद केल्या.

३. ऑपरेशन कहुता-

कहुता हे पाकिस्तानातल्या रावळपिंडीजवळचं गांव. तिथं पाकिस्ताननं प्रोजेक्ट ७०६ या नावाखाली आपला खान रिसर्च लॅबोरेटरीज (KRL) हा ऍटॉमिक बॉंब बनवण्याचा प्रोजेक्ट चालू केला. तिथं ते लांब पल्ल्याची मिसाईल्सपण बनवणार होते. पाकिस्तानकडे आण्विक शस्त्रं असणंही भारतासाठी धोक्याचं होतं. रॉ कामाला लागली. नक्की कुठं हा प्रकल्प चालू आहे ही माहिती त्यांना मिळत नव्हती. म्हणून त्यांनी जिथं पाकिस्तानी शास्त्रज्ञ आपले केस कापायला येतात,त्या सलूनमधून चक्क त्या शास्त्रज्ञांचे कापलेले केसच चोरले. मग आपल्या BARC मध्ये या केसांचं परिक्षण केलं, आणि त्या केसांवर ऍटॉमिक किरणं पडली आहेत हे सिद्ध झालं. अशा तर्‍हेनं कहुतामधल्या अणूभट्टीचा शोध तर लागला आणि पाकिस्ताननं युरेनिअममध्ये शस्त्रं बनवण्याचा दर्जा आणण्याइतपत काम केलंय हे ही लक्षात आलं. पण त्याच वेळी मोरारजींनी मुहम्मद झिया-उल-हक, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ह्यांना माझा पाकिस्तानातल्या हेरांनी तुमच्या कहुतामध्ये काय चाललंय हे सगळं कळल आहे अशा अर्थाचं वाक्य सांगितलं. आणि हे समजल्यावर पाकिस्तानच्या जनरलनं सूत्रं हलवली. त्यानं रॉचे सगळे हेर शोधून शोधून मारले.. आणि पाकिस्तान त्यांच्या अणूशस्त्रांच्या कार्यक्रमात कुठंवर पुढे गेलाय हे आपल्याला आजतागायत कळलं नाहीय.

४. ऑपरेशन मेघदूत-

डोळे आणि काम उघडे ठेवले की हजारो आयुष्य वाचू शकतात त्याच उत्तम उदाहरण म्हणजे ऑपरेशन मेघदूत. काश्मीर परिसरातल सियाचीन ची ग्लेशियर आपल्या कब्ज्यात घेण्यासाठीच्या ह्या ऑपरेशच कोड-नेम ऑपरेशन मेघदूत होत. सियाचीनमध्ये भारतीय सीमेच्या एकीकडे चीन आहे तर दुसरीकडे पाकिस्तान. १९८४ मध्ये सियाचीन ताब्यात घेण्यासाठी भारतीय जवानांना कित्येक संकटांचा सामना करावा लागला होता. रॉ कडून पाकिस्तान सियाचीन ची ग्लेशियर कब्जा करण्याच्या तयारीत आहेत ही माहिती मिळाली. आणि ही माहिती अत्यंत महत्वपूर्ण होती. पाकिस्‍तानने एप्रिल १९८४ मध्ये सियाचिनचा ताबा घेण्याचे ठरवले होते. पण याची कुणकुण भारतीय अधिकाऱ्यांना लागली. त्यानंतर भारताने पाकिस्तानला बुचकळ्यात टाकत सियाचीन काबीज करण्याची योजना आखली आणि जन्म झाला ‘ऑपरेशन मेघदूत’ चा! रॉ च्या ह्या माहितीमुळे सियाचीन मध्ये भारताचा तिरंगा फडकवला गेला.

५. ऑपरेशन चाणक्य-

काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि काश्मीर वेगळ करण्यासाठी आयएसआयचा पाठींबा मिळालेल्या लोकांचा शिरकाव होऊ नये यासाठी रॉ ला सांगण्यात आल होत. रॉ च हे मिशन 'फुट पाडा आणि विजय मिळवा' ह्या चाणक्याच्या नीतीचा उपयोग केला होता. म्हणूनच ह्या ऑपरेशनचे नाव ऑपरेशन चाणक्य ठेवल होत. ह्या ऑपरेशनच्या मदतीने काश्मीर घाटीत आतंकवादी कारवाया बंद करण्यात यश मिळाल होत. ह्या ऑपरेशन मध्ये रॉ ने आपल्या एका एजंटला पुरावे गोळा करण्यासाठी आयएसआय मध्ये पाठवलं होत. आणि त्याची मदत घेऊन आयएसआय मध्ये फुट पाडण्यात आली. ह्याचा परिणाम असा झाला की आयएसआयचे काही एजंट भारताबरोबर आले.

६. ऑपरेशन कॅकट्स-

ऑपरेशन कॅक्टस किंवा ऑपरेशन संध्या ही सैनिकी मोहीम म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (अर्थात प्लॉटे) या संघटनेने मालदीवचे शासन उलथून टाकण्यासाठी घडवून आणलेला कट होता. प्लॉटेच्या अब्दुल्ला लुतुफी याने स्वतःच्या ८० बंदुकधाऱ्यांबरोबर मिळून हा कट केला होता. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपामुळे हा कट निष्फळ ठरला. रॉ कडून भारतीय सेनेला सगळी गुप्त माहिती कळली त्यानंतर सेनेचे १६०० सैनिक हवाई मार्गे मालदीव मध्ये पाठवण्यात आले आणि मालदीव मध्ये शांती प्रस्थापित झाली.

७. ऑपरेशन लीच-

म्यानमारचा प्रदेश नेहमीच भारतीय इंटेलिजेंस साठी फसवा प्रदेश आहे. त्यात मुख्य कारण म्हणजे तिथे असलेली घनदाट जंगलं. आणि त्यात घनदाट जंगलात राहत असलेले लोक. भारताला तिथे लोकशाही ला प्रोत्साहन द्यायचे होते आणि तिथे अनुकूल वातावरण होण्यासाठी मदत करायची होती. ह्यासाठी रॉ ने बर्माच्या विद्रोही लोकांसाठी विरोधी ग्रुप आणि लोकशाहीचे समर्थन करणारी पार्टी- काचीन इंडिपेन्डन्स आर्मी (KIA) ची स्थापना केली. हे रॉ च्या सर्वोत्तम कामगिरींपैकी एक मानले जाते. १९९८ ला ६ विद्रोही नेत्यांची हत्या करण्यात आली आणि 34 अराकानी गुरिल्लोंना कैदेत घेतलं.

८. Anti-Apartheid movement- रंगभेद विरोधी आंदोलन-
ह्या बाबतीत फार माहिती उपलब्ध नाही की रॉ दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया मधल्या रंगभेद विरोधी आंदोलनात सहभागी होती. रॉ ने आफ्रिकेच्या स्वातंत्र देशातल्या इंटेलिजेंस ऑफिसर्सन प्रशिक्षण दिल होत. बऱ्याच रिटायर झालेल्या ऑफिसरनी इंटेलिजेंस एजेंसीच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये काम केल होत.

९. स्नॅच ऑपरेशन-

काही काळापासून रॉ स्नॅच ऑपरेशन मध्ये सुद्धा सामील आहे. ह्यात रॉ ऑफिसर्स बाहेरच्या देशातल्या संशयीताला पकडतात आणि आपल्या देशात आणून अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांची कसून चौकशी केली जाते. हे प्रत्यावार्तानाच्या मोठ्या प्रक्रियेतून वाचण्यासाठी केले जाते. स्नॅच ऑपरेशन समजण्याकरता अक्षय कुमारचा बेबी हा चित्रपट हे उत्तम उदाहरण आहे. मागील काही वर्षात नेपाल, बांगलादेश आणि अजून काही देशात मिळून ४०० यशस्वी स्नॅच ऑपरेशन करण्यात आली आहेत.

ही रॉ ची फक्त काही उदाहरण आहेत जी घोषित करण्यात आहेत. अजून असंख्य उदाहरण आहेत ज्या बद्दल आपल्याला काही समजत नाही आणि भविष्यकाळात सुद्धा काही कळणार नाही. आपल्या नकळत खूप सारे लोकं देशाच्या सुरक्षेसाठी लढत असतात. आपल्याला त्याची जाणीवही नसते पण आपल्याला फक्त हे माहिती असत की आपण सुरक्षित हातात आहोत आणि रात्रीची निवांत झोप घेऊ शकतो.

Source website- https://www.indiatimes.com/culture/who-we-are/9-declassified-raw-operations-that-will-fill-you-with-pride-250002.html

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED