ठग्स ऑफ हिंदोस्तान..
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची भूमिका असेलला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहेत. या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट अशी चर्चा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची आहे. आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे. त्यामुळे ठग्स ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’चं देसी व्हर्जन आहे की काय अशा चर्चा रंगत आहे. पण, हा चित्रपट फिलिप टेलरच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग्स’ या कांदबरीवर आधारलेला आहे. व्यापाराचं निमित्त करून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू या देशाला गुलाम बनवलं. इंग्रजांच्या ताकदीपुढे सगळ्यांनीच माना टाकल्या मात्र काहींना ही गुलामगीरी मान्य नव्हती. गुलामगीरीची ही बंधनं उखाडून फेकण्याच्या या युद्धाची झलक ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. एका बाजूनं इंग्रजाविरुद्ध लढणारा ‘आजाद’ म्हणजेच अमिताभ बच्चन आणि दुसरीकडे फितुर ‘फिरंगी’ म्हणजेच आमिर या दोघांची जुगलबंदी ‘ठग्स’मधून पाहायला मिळणार आहे. आमिर, अमिताभ यांच्यासोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केलं आहे.
हा चित्रपट बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटाची कथा वेगळी आहे. त्यातून दिवाळीच्या सुट्टीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचे ३ रेकॉर्ड मोडू शकतो अशी आशा आहे.
१. पहिल्यादिवशीची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट-
दिवाळीच्या सुट्टीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या सुट्टीत प्रदर्शित होणारे चित्रपट चांगले चालतात आणि ह्या चित्रपटाला तगडे स्टारकास्ट लाभले आहे. त्यामुळे ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपट यंदाचा Biggest opener Movie ठरू शकतो. ५ हजार स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे पहिल्यादिवशी ठग्स ४० ते ४५ कोटींची कमाई करेल असं म्हटलं जात आहे. आता खरच हा चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करतो हे पाहण्यासारख असेल.
२. विकेंडला सर्वाधिक कमाई करणार चित्रपट-
दिवाळी सुट्टी आणि त्यातून विकेंड असल्यानं पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठग्स ऑफ हिंदोस्तान ठरू शकतो. पहिल्या चार दिवसात हा चित्रपट १५० कोटींची कमाई करेल असं भाकित अनेक चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवलं आहे. पण खर तस होईल का ह्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
३. बॉलिवूडमधला सर्वाधिक कमाई करणार चित्रपट-
अमीर खान प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येतो आणि आमिरच्या यापूर्वीच्या सर्व चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. त्यामुळे ठग्स ऑफ हिंदोस्तानदेखील सर्वाधिक कमाई करेल असं भाकीत वर्तवल जात आहे.
दिवाळीच्या नंतरच्या सुट्टीच्या काळात बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा परिणाम होणे अपेक्षित आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या रिलीजआधी एक आठवडा कुठलाही चित्रपट रिलीज होणारा नाही. रिलीजनंतरच्या तीन आठवडेही कुठलाही मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होत नसल्याने बॉक्स ऑफिसवर आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ला मोठा फायदा होणे निश्चित मानले जात आहे.
आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बहुचर्चित ठरत असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये रोज चर्चा रंगल्याचं पाहायला मिळते. यातच आता भर पडली आहे ती अमिताभ बच्चन यांनी गायलेल्या अंगाईची. ह्या अंगाईच लेखन अमिताभ भट्टाचार्य यांनी केलेलं आहे. हो, या चित्रपटामधील एका सीनसाठी बिग बींनी स्वत: एक अंगाई गीत गायल्याचं समोर आलं आहे.
मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आपल्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखला जातो. या सिनेमात आमिर खानने फिरंगी मल्ला हे पात्र साकारले आहे. सिनेमाचा ट्रेलर, पोस्टर आणि गाणी लोकांच्या मनात सिनेमाबाबतचं आकर्षण निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. असे असले तरीही या सिनेमाची तुलना पायरेट्स ऑफ कॅरेबियन या सिनेमाशी होते आहे. आमिर खानचा फिरंगी मल्ला आणि जॉनी डेप जॅक स्पॅरो यांचे लुकही मिळतेजुळते असल्याचं बोललं जातं आहे. पहिल्यांदाच बॉलिवूडचा महानायक आणि मिस्टर परफेक्शनिस्टची जुगलबंदी ‘वाश्मल्ले’ या गाण्याच्या निमित्तानं पाहायला मिळाली. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध गायक- संगीतकार अजय- अतुलनं ‘वाश्मल्ले’ गाण्याला संगीत दिलं आहे. ‘वाश्मल्ले’ म्हणजे मनसोक्त नाचणं, आनंद व्यक्त करणं होय. या गाण्यातही अमिताभ आणि आमिर मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. प्रभू देवानं या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषेतही हे गाणं प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे गाणं अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत २७ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून युट्युबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये हा व्हिडिओ चौथ्या क्रमांकावर आहे. ह्या चित्रपटच खास वैशिष्ट म्हणजे २ खऱ्या बोटी माल्टा मध्ये बनवण्यात आल्या आहेत. ज्या वापरता येऊ शकतात. हा प्रयोग नवा आहे आणि मोठ्या पडद्यावर पाहण्याची मजा काही वेगळीच असेल. या चित्रपटाचे चित्रीकरण एका घनदाट जंगलात करण्यात आलेले आहे. या जंगलात चित्रीकरण करणे हे चित्रपटाच्या टीमसाठी खूपच कठीण होते. त्यांना चित्रीकरण करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे थायलंडमधील माल्टा या परिसरात झालेले आहे. माल्टा हे अतिशय घनदाट जंगल असून या जंगलात अनेक विषारी साप आहेत.
चित्रपटाची कथा-
आमिर व अमिताभ या जोडीच्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात पाय पसरवू पाहणाऱ्या कालखंडावर आधारित आहे. ईस्ट इंडिया कंपनीने येथील अनेक राज्ये बळकावली होती. पण रौनकपूर एक असे राज्य होते, जे अद्यापही इंग्रजांना हुलकावणी देत होते.
सेनापती खुदाबख्श आझाद (अमिताभ बच्चन) या राज्याचा सेनापती असतो. रौनकपूरचा ‘मिर्जा साहब’ (रोनित रॉय) याच्यासकट संपूर्ण राज्याच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते.अचानक ईस्ट इंडिया कंपनीचा जनरल जॉन क्लाईव्ह या राज्यावर धोक्याने कब्जा मिळवतो आणि ‘मिर्जा साहब’ला मारतो. खुदाबख्श ‘मिर्जा साहब’ची मुलगी जफीरा (फातिमा सना शेख) हिला इंग्रजांच्या तावडीतून कसेबसे वाचवतो आणि ११ वर्षे लपूनछपून आपल्या लोकांना गोळा करून इंग्रजांविरोधात गनिमी युद्ध छेडतो. या युद्धात जफीरा ही सुद्धा आपल्या इंग्रजांचा सूड उगवण्यासाठी मैदानात उतरते. खुदाबख्शला मात देण्यासाठी इंग्रजांना एका धूर्त व्यक्तिचा शोध असतो. त्यांचा हा शोध फिरंगी मल्लाह (आमिर खान) याच्यापाशी येऊन संपतो. आपल्या आजीची शपथ घेणारा आणि धादांत खोटे बोलणाऱ्या फिरंगी मल्लाहचे केवळ एकच ध्येय असते ते म्हणजे, पैसा. याच पैशांसाठी तो ठगांना पकडून देण्याचे इंग्रजांचे काम स्वीकारतो आणि इंग्रजांच्या गुप्त योजनेनुसार, मल्लाह ठगांच्या सैन्यात शिरतो. पुढे एकापाठोपाठ एक अशी अनेक वळणे घेत, चित्रपट पुढे सरकतो. अर्थात अनेक वळणांची ही कथा कुठल्या मुक्कामाला पोहोचते? इंग्रजांची योजना फत्ते होते की, खुदाबख्श जिंकतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल.
तस म्हणल तर, ह्या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत अस वाटू शकत. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी याच्या व्हिएफएक्स इफेक्टसची जोरदार चर्चा होती. पण प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर यादृष्टीने चित्रपटात काहीही दम नसल्याचे दिसते. चित्रपटाची सगळ्यांत मोठी उणीव आहे, ती म्हणजे याची लांबी. चित्रपट उगाचच वाढवला आहे अस वाटू शकत. कदाचित लांबी कमी झाली असती तर चित्रपट आणखी प्रभावी बनू शकला असता. क्लायमॅक्सही आणखी रोमांचक करता आला असता. सिनेमेटोग्राफी, जहाजांवरील लढाईचे सीन्स, भव्य सेट, असे सगळे असले तरीही चित्रपटाची कमकुवत कथा, सुमार दिग्दर्शन तुम्हाला निराश करते. शेवटी काय तर, आमिर व अमिताभ यांचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्कीच पाहू शकता. दोन्ही कलाकारांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव नक्कीच विशेष असेल.