Desert Safari books and stories free download online pdf in Marathi

डेझर्ट सफारी

डेझर्ट सफारी एक धम्माल अनुभव ....!!

हा अनुभव दुबई टूर मधील आहे
डेझर्ट सफारी करायचे म्हणल्यावर प्रथम नक्की काय करायचे हे समजेना .
जंगल सफारी ऐकले होते अनुभवले होते पण हा प्रकार आमच्या साठी नवीनच होता
माहिती घेतली असता समजले ..
दुबई हा पुर्ण वालुकामय प्रदेश असुन येथे दुबई शहरा बाहेर असंख्य वाळूच्या टेकड्या आहेत .
या टेकड्या मध्ये अनेक छोटी छोटी गावे वसवली आहेत जेथे फक्त आणि फक्त पर्यटकांचे मनोरंजन केले जाते
आपल्याला माहित आहे की आपण वाळूमधून साधे चालणे सुध्दा भरभर करू शकत नाही .
मग या टेकड्या मधील गावात कसे जाऊ शकणार ?असे वाटते .
मग सफारी करण्या पूर्वी याची संपूर्ण माहिती घेतली ...

डेझर्ट सफारी म्हणजे पुर्ण वालुकामय टेकड्या मधुन वेगाने केली जाणारी सैर ..

या सफारी मध्ये शक्यतो ल्यांड क्रुझर गाड्यांचा वापर केला जातो कारण या गाड्या खुप टफ असतात

या सफारी ला सुरवात करण्या पुर्वीच तुम्हाला सांगितले जाते की हा एक रोलर कोस्टर सारखा अनुभव आहे

एका वेळेस दहा पंधरा गाड्यांचा ताफा अनेक पर्यटक घेऊन या सफारी वर निघतात

एका ठिकाणी सर्व गाड्या पर्यटकांना घेवून जमा होतात

सर्व प्रथम वाळू वरून गाड्या स्लीप होवू नयेत म्हणुन त्यातील हवा कमी केली जाते

पर्यटकाना पहिली सुचना सीट बेल्ट लावुन घेण्याची असते कारण नंतरचा प्रवास अत्यंत धोक्याचा असतो
काहीही वेडे वाकडे होवू नये म्हणुन खुप दक्षता घेतली जाते आणी म्हणुन च सर्व गाड्या एका मागून एक निघतात

असंख्य वाळूच्या अती उंच सखल मार्गा वरून मग हा प्रवास चालू होतो

एका क्षणात गाडी खुप उंचावर असते तर एकां क्षणात ती खाली झेप घेते

आपल्या पुढे असलेल्या गाडीचा असा प्रवास आपण पहात असतो व पुढच्या क्षणी आपली पण तीच अवस्था होणार आहे हे समजून पोटात गोळा येत असतो पण आपल्याला ही त्याचा “दिव्याला ..” सामोरे जावे लागते

प्रत्येक गाडीतले प्रवासी जीव मुठीत घेऊन बसलेले असतात आणी मग त्या भीतीला सामोरे जाण्या साठी जोरजोरात किंचाळत रहावे लागते त्या शिवाय पर्याय नसतो ...

आम्ही तर आमच्या गाडीत शेवटी मोठमोठ्याने गाणी म्हणू लागलो पण कितीही धोकादायक असला तरी तो प्रवास नक्कीच लक्षात राहण्या सारखा असतो

संपूर्ण वालुकामय प्रदेशात जीथे रस्ते नाहीत आणी शिवाय असंख्य वाळूच्या उंच डोंगर रांगा आहेत इथला प्रवास करताना ड्रायवर लोकांच्या कौशल्याची “दाद ..द्यावी लागते काही वेळ तर वाट्ते आता गाडी अनेक पलट्या मारून उलटी होईल आणी अपघात होईल

पण असे कदापी ही घडत नाही ..

गेली कित्येक वर्षे रोज केला जाणारा हा प्रवास खुपच सुरक्षित असे जाणवले

यानंतर तेथे पोचल्या वर या संपूर्ण वालुकामय प्रदेशात दिसते की इथे एक छोटे नगर वसवले आहे आणी मग तिथे आपले स्वागत होते.
“अल्ला रख्खां .म्हणजे ससाणा पक्षी घेऊन एक मुलगा दाराशीच असतो...

तो पक्षी तेथील समाजाचे दैवत असते .

पूर्णपणे प्रशिक्षित व माणसाळलेला हा पक्षी खुप सुंदर असतो.
मालकाने सांगितले की तो आरामात आपल्या हातावर डोक्यावर आरामात बसतो. लोक पण त्याच्या बरोबर मस्त मस्त स्टायलिश फोटो काढुन घेतात आम्हाला भेटलेल्या ससाण्याचे नाव “पिंकी ” होते.
हाक मारली की मस्त मान वाकडी करून पहात असे तो सगळ्याकडे...

दाराशीच एक उंट पण बसलेला असतो ज्याला इच्छा आहे तो या उंटावरून मस्त सफर करू शकतो .. या प्रदेशात असलेल्या छोट्या टेकडीवरून आता आपण सूर्यास्ताची मजा घेवू शकतो.
टेकडीवर बसण्या साठी काही बाक पण टाकले आहेत टेकडीवरून खाली असलेल्या खोल भागात अगदी धाडसी लोक मोटर बाईक राईड पण करू शकतात.
मोटो क्रोस सारखा असणारा हा प्रकार पण खुप चित्त थरारक असतो !!!
मोटर बाईकवर असणाऱ्याला पाहणारी लोक छान बक अप देत असतात शिट्ट्या टाळ्या आरडा ओरडा यांनी सारा आसमंत दणाणून गेलेला असतो आता सूर्य खाली गेल्या वर पुन्हा त्या छोट्याशा टेकडीवरू हळू हळू उतरायचे दिव्य पार पडावे लागते ...

आता खाली उतरून मोठी कमान असणाऱ्या त्या छोट्याशा गावात आपण प्रवेश करतो आम्ही प्रवेश करीत असलेल्या गावाचे नाव स्कायल्यांड क्याम्प असे होते

या मैलोनमैल पसरलेल्या वाळूच्या प्रदेशात अशी अनेक छोटी गावे करमणुकीसाठी वसवली आहेत व रोज हजारो पर्यटक तेथे भेट देत असतात

आत प्रवेश केल्यावर एक भले मोठे स्टेज व त्याच्या चारही बाजूनी बसण्याची व्यवस्था असते.
बसण्या साठी लोड व तक्के अशी व्यवस्था असते सभोवार सगळीकडे वेगवेगळे खाद्य व पेय पदार्थांचे स्टाल असतात तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही काहीही खाऊ अथवा पिऊ शकता.
खाणे पिणे तसेच प्रसाधन गृहाची पण इथे “चकाचक” व्यवस्था असते ..!!

सभोवार फेर फटका मारत वेगवेगळे पदार्थ चाखत वेळ कसा पसार होतो समजत नाही

इथेच बायकांच्या हातावर मेंदी काढण्याचे स्टाल असतात ..

पुरुष लोकांसाठी हुक्का ..बियर याचे पण स्टाल
दुबई मध्ये वापरला जाणारा स्त्रियांचा खास पोशाख “अबाया ..” व पुरुषांचा पोशाख “कंदोरा ..” हे पण इथे एका स्टाल वर खास फोटो सेशन साठी ठेवलेले असतात ते घालून तुम्ही मस्त फोटोग्राफी करू शकता

आम्ही पण त्या ड्रेस मधील फोटो काढून घेतले ..

हो म्हणलेच आहे ना ...जैसा देश वैसा भेस फिर क्या करना ....

आता हळूहळू थंडी चढू लागते सगळीकडे वाळू त्यामुळे थंडीचा आणखीन कडाका वाटतो

सारे लोक शाली टोप्या मफलर स्वेटर यात घुसून जातात .

या सफारी पूर्वीच गरम कपडे सोबत बाळगण्याची सर्वाना सूचना दिलेली असतेच .

.तरी पण विसरला असाल तर इथे गरम कपड्यांचे पण स्टाल असतात

आता सुरु होतो इथला खास “रंगांरंग” कार्यक्रम...!

सर्व जण स्टेज च्या अवतीभवती बसतात आणी नाचाला प्रारंभ होतो

प्रथम केला जातो तो .....”तनुरा .....” डान्स ...
पुर्ण घागरा असा वाटणारा भरपूर जड असणारा आणी त्यावर बारीक बारीक इलेक्ट्रिक दिवे बसवलेला पोशाख घालून पुरुष नर्तक स्टेज वर येतो व म्युजिक सोबत हा डान्स सुरु होतो

क्षणाक्षणाला गिरक्या घेत हा डान्स सुरु असतो घागरा पुर्ण वेगाने उमलत असतो ..

संगीत पण अत्यंत वेधक व नर्तकाच्या हालचाली मनमोहक आणी अत्यंत गतीमान असतात

हा डान्स पाहताना अक्षरश डोळ्याचे पारणे फिटते ..

ती “गती” आणी ते “प्राविण्य” शेवटी शेवटी मनाला थक्क करते!!!!

शेवटी या घागर्यावरील लाईट सुंदर गतीने प्रकाशमान होतात व डान्स मध्ये आणखीन रंग भरला जातो

सतत अर्धा ते पाउण तास अती द्रुत गतीने नाचणे सोपे काम नाही शिवाय डान्स थांबला की जराही चक्कर वगैरे न येता नर्तक जिथल्या तिथे उभा असतो

याचे रहस्य विचारले असता नर्तक म्हणतो हा डान्स करताना तो मनाने परमेश्वरच्या म्हणजे त्यांच्या भाषेत “खुदा च्या जवळ पोचलेला असतो म्हणुन च हे त्याला शक्य होते

नंतर हाच डान्स करून पाहण्याची प्रेक्षकांना पण ऑफर दिली जाते

काही लोक प्रयत्न करतात पण त्या घागर्याचे वजन इतके असते की ते पेलून शिवाय डांस करणे कठीण असते दोन चार गिरक्या मारल्या की कोणालाही चक्कर येऊ लागते

यानंतर चे आकर्षण ब्याले डान्स असते हा एक प्रकारचा क्याबेरे डान्स म्हणता येईल.
अत्यंत कमनीय बांधा असलेली सुंदर युवती घट्ट आणी .पारदर्शक कपड्यात नाचत असते हा डान्स पण एक उत्कृष्ट नमुना ठरतो

प्रेक्षक ...विशेषतः पुरुष प्रेक्षक फुल एन्जोय करतात या दोन्ही डान्स चे विडियो शूटिंग ला पण पुर्ण परवानगी असते.

आता मात्र रात्र चढू लागते आणी जेवण वेळ सुरु होते ...

सुंदर पैकी बार्बेक्यू व स्वीट डिश सहीत “शाकाहारी” आणी “मासाहारी” दोन्ही प्रकारचे जेवण इथे दिले जाते

जेवण झाल्या वर मात्र सर्व गाड्या वरील ड्रायवर लोक आपल्याला बोलवायला येतात व परतीच्या प्रवासाची धांदल सुरु होते निघताना जशा होत्या तशाच आता पण सर्व गाड्या एकमेका सोबत च निघतात ..पण आता मात्र प्रवास वाळूच्या टेकड्या वरून नसतो तर जवळच असणाऱ्या हायवे वरून असतो अर्ध्या पाउण तासात आपण आपल्या हॉटेल वर सुखरूप पोचतो .. सोबत या प्रवासाच्या चित्तथरारक आणी अविस्मरणीय आठवणी घेवूनच .,..!!!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED