Robot 2.0.. books and stories free download online pdf in Marathi

2.0

2.0

रजनीकांतचा 2.0 प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाने सगळेच विक्रम मोडून काढले. भारतातील सर्वांत महागडा चित्रपट 2.0 आहे. अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा मच अवेटेड चित्रपट 2.0 चित्रपटगृहात आला. पहिल्या शोपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचली. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर नवे विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे यात काही शंका नाही आणि त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे. ‘बुक माय शो’वर या चित्रपटाचे दहा लाखांहून अधिक तिकिट बुक झाल्याची माहिती समोर येत आहे. आता रजनीकांतची जादू बॉक्स ऑफिस वर काय कमल करते हे पाहण औत्स्युकाच ठरणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सुद्धा धमाल उडवून दिली होती. ट्रेलर रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी त्याला २ कोटी ५० लाख व्ह्यूज मिळाले होते. या चित्रपटातील व्हीएफएक्सवर तब्बल ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन हे ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. एस. शंकर दिग्दर्शित ‘ 2.0′ मध्ये तंत्रज्ञान आणि कथा यांचा उत्तम मेळ मध्ये घालण्यात आला असून चित्रपटाचं कथानक रोबोट चिट्टीच्या भोवती फिरताना दिसून येतं. यात रोबोट चिट्टीची भूमिका रजनीकांत यांनी वठविली आहे. रजनीकांत कायमच त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. तर अक्षयकुमारही त्याच्या साहसदृश्यांसाठी लोकप्रिय आहे. या दोघांच्याही या वैशिष्ट्यांचा या चित्रपटात समावेश करण्यात आला असून त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकांना न्याय दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच त्यांना जोड मिळाली आहे ती त्यांच्या रंगभूषेची आणि संवादकौशल्यांची. या चित्रपटात उत्तम संवादशैलीचा वापर करण्यात आला असून रंगभूषेवरही तेवढाच जोर देण्यात आला आहे. खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय तब्बल ४ तास मेकअप करण्यासाठी देत होता. म्हणजेच ही मेहनत चित्रपटात नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि ते पाहतांना मजा येणार आहे हे नक्की. पडद्यावर दिसणारी दृश्यं आणि त्यात वापरलेलं तंत्रज्ञान यांचे कौतुक वाटेल. डोळे दिपवून टाकणारं काही तरी सादर करण्यासाठी त्याची कायमच धडपड प्रत्येक दृश्यात जाणवते आणि त्याच कौतुक वाटल्याखेरीज राहणार नाही. शंकरचे भव्य सेट्स, प्रोस्थेटिक मेकअप आणि गेल्या काही वर्षांपासून व्हिज्युअल इफेक्टसचा अतिवापर याच्या आधारे आपला सिनेमा कसा ‘नेत्रसुखद’ होईल यासाठी तो अगदी पुरेपूर प्रयत्न करतो हे सुद्धा जाणवू शकत. पण तरीही ते पाहण्यात मजा येते.

चित्रपटाची कथा-

एक वृद्ध व्यक्ती मोबाइल टॉवरवर गळफास घेऊन आत्महत्या करते, या दृश्यानं ‘2.0’ची सुरुवात होते. नंतर लगेचच संपूर्ण शहरातील स्मार्टफोन यूझरकडून आकाशाच्या दिशेने खेचले जातात. एकाच वेळी संपूर्ण शहरातील स्मार्टफोन गायब झालेले पाहून सरकारी यंत्रणा चक्रावून जाते. नंतर याच स्मार्टफोनपासून बनलेला एक भव्य आक्राळविक्राळ पक्षी शहरावर हल्ला करतो. या वेगळ्या संकटाचा सामना करण्यासाठी लष्करही निष्प्रभ ठरल्यामुळे डॉ. वशीकरण (रजनीकांत) आणि त्याची पर्सनल सेक्रेटरी रोबो नीला (अॅमी जॅक्सन) यांना बोलावले जाते. विघातक कार्यामुळे कुप्रसिद्ध ठरलेल्या आणि सध्या संग्रहालयातच ठेवलेला चिट्टी (रजनीकांत) या शक्तिशाली पक्षाविरोधात लढू शकतो, असे वशीकरण यांचे मत आहे. मात्र, पहिल्या रोबोतील डॉ. बोहरा यांचा मुलगा (सुधांशू पांडे) त्याला विरोध करतो. हा विरोध डावलून वशीकरण चिट्टीला ‘अॅक्टिव्ह’ करतात. टेलिकॉम कंपन्यांच्या रेडिएशनमुळे होणाऱ्या पक्षांच्या मृत्यूमुळे अस्वस्थ असलेला पक्षीराजन (अक्षयकुमार) हे या कथानकातील एक महत्त्वाचे पात्र. पक्षी वाचावेत म्हणून धडपडणारी ही व्यक्ती मोबाइल रेडिएशनच्या विरोधात आहे. पक्ष्यांना वाचवण्यासाठी मोबाइल वापरू नये, असे पक्षीराजनचे म्हणणे आहे. सरकारदरबारी भांडूनही टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क वाढत गेल्यामुळे एकूणच स्मार्टफोन वापरणाऱ्यांना त्याचा विरोध आहे. निराशेतून स्वत:चे जीवन संपवणाऱ्या पक्षीराजन यांनी मृत्यूनंतर ‘निगेटिव्ह वेव्हज्’च्या आधारे संपूर्ण मानवजातीवरच सूड उगवण्याचे ठरवले आहे. पक्षीराजन विरुद्ध चिट्टी असा हा संघर्ष ‘2.0’ मध्ये उभा राहतो. त्या संघर्षातील टप्पे कोणते, त्यात काय होतं, हे पाहण्यासाठी ‘2.0’ पाहायला हवा.

चित्रपटामध्ये अक्षयची भूमिका दामदार असून रजनीकांत यांची भूमिकाही त्याला तोडीस तोड देणारी आहे. प्रेम कथा सोडून बाकी काही पाहायचं असेल तर 2.0 मनोरंजन नक्कीच करतो. रजनीकांतची एण्ट्री झाल्यानंतर काही काळातच रोबोट चिट्टी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि बघता बघता त्याच्यासारखेच ५०० आणखी रोबोट तयार होतात. त्यामुळे या चित्रपटामध्ये क्लॅमॅक्सचा पुरेपूर वापर केला असून तो कोठेही कंटाळवाणा होणार नाही याकडे लक्ष देण्यात आलं आहे. या कारणास्तव चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता हळूहळू वाढवत जातो. व्हिज्युअल इफेक्टसचा वारेमाप वापर हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. हे इफेक्टस प्रेक्षकांच्या आणखी अंगावर येण्यासाठी वापरलेले ‘थ्रीडी’ तंत्रज्ञान यामुळे सिनेमा सुरेख वाटतो. प्रत्येक इफेक्ट पाहतांना प्रेक्षक हा तंत्रखेळ पाहून अक्षरश: थक्क होतो. प्रेक्षकांच्या तोडून "वॉव.." नक्कीच बाहेर पडेल. अर्थात दिग्दर्शकालाही हेच अभिप्रेत असेल ह्यात काही शंका नाही. पण कथा म्हणावी तितकी खास नाही. पहिल्या रोबोट मध्ये जे पाहिलं तसच काही पाहायला मिळेल अश्या आशेनी चित्रपटगृहात गेलात तर तुमची निराशा नक्की होऊ शकते. पुढे काय होणार, या उत्सुकतेपेक्षा पुढच्या दृश्यात आणखी काय ‘भारी’ दाखवणार, याची आपण वाट पाहत बसतो. कथा हे मूळ राहातच नाही. फक्त आपली दृष्टी राहते ती इफेक्ट्स वर.. तंत्रज्ञानाची वाजू दिग्राशाकाने उत्तम रित्या मांडलेली आहे त्यामुळे चित्रपट पाहतांना कंटाळा येत नाही. तंत्रज्ञानासाठी सिनेमाला अगदी पैकीच्या पैकी मार्क द्यायलाच हवेत. जर कथा चांगली असती तर चित्रपट अजूनच उत्तम बनला असता अस वाटून जाऊ शकत. पण डोक्याला फार ताण न देता फक्त मनोरंजन हव असेल तर हा चित्रपट निराश करत नाही. चित्रपटा बद्दल फार विचार केला नाही आणि फक्त मनोरंजन म्हणून हा चित्रपट बघायला उत्तम आहे अस म्हणता येईल. रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्यातील जुगलबंदी मात्र मस्त रंगते. रोबोच्या वेशातही रजनीकांत ‘स्टाइलबाजी’ करून जातो. अक्षयकुमारचा परफॉमर्न्सही जोरदार. ए. आर. रहमानच्या संगीताविषयी काही बोलण्यासारखं नाही. यात केवळ दोन गाण्यांचा समावेश करण्यात आला असून त्यांना ए.आर.रेहमानचं संगीत लाभलं आहे. तसा चित्रपटात संगीताला, गाण्यांना फार वावही नाही. त्यात चिट्टी आणि अॅमी या दोन रोबोंची प्रेमकथा रंगवण्याचा मोह आवरल्यामुळं काहीसा दिलासा मिळतो आणि चित्रपट भरकटत नाही..

दिग्दर्शक एस. शंकर यांनी चित्रपटातील प्रत्येक गोष्टीतील बारकावे उत्तमरित्या उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चित्रपटातील पाच सीनपैकी चार सीन हे व्हीएफएक्सने परिपूर्ण आहेत. मनोरंजन एवढाच या चित्रपटाचा उद्देश नसून यात सामाजिक संदेशही दडला आहे. पण यात भावनिक दृश्यांना फारस प्राधान्य न दिल्याचंही दिसून येतं. थोडक्यात काय तर ‘2.0’ हा सारा तंत्रज्ञानाचा खेळ आहे. चित्रपटगृहाबाहेर पडल्यावर काहीतरी भव्य पाहिल्याची जाणीव होते. सायन्स फिक्शनची आवड असलेल्यांना आवडेल असा 2.0 आहे. आणि अर्थात, रजनीकांतचे फॅन असाल तर हा चित्रपट चुकवू नये असाच आहे.

निर्माते : ए. सुबस्करन, राजू महालिंगम
कथा, पटकथा, संवाद : एस. शंकर आणि बी. जेयमोहन
दिग्दर्शक : एस. शंकर
संगीत : ए. आर. रहमान
कलाकार : रजनीकांत, अक्षयकुमार, अॅमी जॅक्सन, आदिल हुसेन, अनंत महादेवन

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED