Simba books and stories free download online pdf in Marathi

सिम्बा..

सिम्बा..

"आला रे आला सिम्बा आला"... रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला सिम्बा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता ही जोडी रोहित शेट्टी च्या चित्रपटात काय जादू करते हे पाहण्यासारख आहे. दोघांची जादू प्रेक्षकांना बघायची उत्सुकता आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. या चित्रपटात रणवीर एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्याची एण्ट्री, त्याचा अभिनय, संवाद जबरदस्त असल्याचं एका प्रेक्षकाने ट्विट केलं आहे. तर रोहित शेट्टीचा हा चित्रपट ‘पैसा वसूल’ असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. काहींनी हा चित्रपट ‘मेगा ब्लॉकबस्टर’ ठरेल असाही अंदाज वर्तवला आहे. पण चित्रपटात नक्की काय पाहायला मिळेल हे कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. हा सिनेमा तिकीट खिडकीवर सुपरहिट ठरणार का याबाबत उत्सुकता आहे. रणवीर सिंगचा हा सिनेमा सुपरहिट ठरावा यासाठी रोहित शेट्टींनी कोणतीही कसर सोडलेली नाही. सिंबामध्ये त्यांनी बड्या स्टार्सना घेऊन ब्लॉक बस्टरची तयारी केली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा आहे. ट्रेलर आणि यातील गाण्यांनासुद्धा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सिम्बा हा चित्रपट पुढील पाच कारणांसाठी आपण पाहू शकता..

१. रणवीर सिंग- रोहित शेट्टीची जोडी-

एकीकडे रोहित शेट्टी मसालेदार चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीचे बरेच चित्रपट गाजले. तर दुसरीकडे सतत उत्साहित असलेला रणवीर सिंग. रणवीर सिंग कमाल अभिनय करतो. रोहितचं दिग्दर्शन आणि त्या जोडीला रणवीरचं अभिनय हे समीकरण उत्तम असल्याने सिम्बा पूर्णपणे रंजक चित्रपट ठरणार ह्यात शंका नाही.

२. रणवीर सिंगच्या सिम्बामध्ये झळकणार तब्बल 11 मराठी कलाकार-

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बामध्ये रणवीर सिंग, सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. पण त्यासोबतच सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव हे अकरा मराठी कलाकारही महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. सगळेच मराठी कलाकार उत्तम अभिनय करतांना दिसतात. मराठमोळी फौज ह्या चित्रपटात आहे आणि त्यामुळे नक्कीच ह चित्रपट पाहावा.

३. सारा अली खान-

‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खानचा हा दुसरा चित्रपट. तिचा अभिनय उत्तम आहे. ‘केदारनाथ’मधील तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडलं असून सारा आणि रणवीर ही नवीन जोडी पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

४. 'सिंघम’ कनेक्शन-

अजय देवगणचा सिंघम हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता. सिम्बा मध्ये अजय देवगण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. सिम्बामध्ये रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ या सुपरहिट चित्रपटाचं कनेक्शनही पाहायला मिळणार आहे. या कनेक्शनची झलक ट्रेलरमध्येही दाखवण्यात आली होती. त्यामुळे नक्की काय पाहायला मिळणार ह्याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

५. गोलमाल चित्रपटातल्या टीमच गाण-

अजय देवगणसोबतच रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ सीरिजची गँगसुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. ‘आँख मारे’ या गाण्यात ‘गोलमाल बॉईज’ची झलक पाहायला मिळाली. ह्या टीम आणि सिम्बा चा काही संबंध आहे की गोलमालचा पुढचा चित्रपट येणार हे कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाची कथा-

ह्या चित्रपटाची कथा आहे संग्राम भालेराव उर्फ सिम्बाची (रणवीर सिंग) जो अनाथ मुलगा आहे आणि 'सिंघम' म्हणजेच बाजीराव सिंघमच्या शिवगढ गावातला आहे. त्याचे स्वप्न असते पोलिस होण्याचे ज्याला पॉवर आणि पैसा कमवायचा असतो. तो आपलं हे स्वप्न पूर्णदेखील करतो आणि बेईमानी वागणे पूर्ण इमानदारीने करतो. याचदरम्यान त्याचे पोस्टिंग गोव्यातल्या मिरामारमध्ये होते जो परिसर दुर्वा रानडे (सोनू सूद)चा असतो.


जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी सिम्बा दुर्वा रानडेशी हातमिळवणी करतो. सिम्बाला त्याच्या पोलिस ठाण्यासमोर चहाची टपरी चालवणाऱ्या शगुन (सारा अली खान)शी प्रेम होते. सिम्बा आयुष्यात सगळं स्वप्नासारखं घडत असताना अचानक एक घटना घडते ज्यामुळे त्याच्या आयुष्यात एक मोठे वादळ येते. हे वादळ त्याच आयुष्य बदलवून टाकते. ज्या दुर्वाशी त्याने पैशासाठी हितमिळवणी केली असते आता तोच त्याचा शत्रू बनतो. आणि कथानक वेगळ्याच वळणावर जात. पुढे बऱ्याच गोष्टी घडत. पण पुढे काय होते हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा लागेल.

रोहित शेट्टीला हा चित्रपट बनवण्याची कल्पना कशी सुचली ह्याची गोष्ट अशी- साऊथचा एक चित्रपट बघत असताना रोहित शेट्टीला सिम्बा बनवण्याची कल्पना सुचली. त्यावर रोहित शेट्टीने काम चालू केल आणि सिम्बा प्रेक्षकांच्या भेटीस आला सुद्धा.. आता रोहित शेट्टी बघत होता तो साऊथचा चित्रपट कुठला असेल तर ‘टेम्पर’. होय, ‘टेम्पर’ हा साऊथचा चित्रपट पाहूनचं रोहितला सिम्बा सुचला. सिम्बा हा ‘टेम्पर’चाच हिंदी रिमेक आहे. सिम्बा हा तेलुगू 'टेम्पर' सिनेमाचा ऑफिशियल रिमेक आहे, मात्र संपूर्ण सिनेमावर रोहित शेट्टीची छाप आहे. म्हणजे हा चित्रपट पाहतांना रोहित शेट्टी आठवत राहील. त्याची शैली जाणवत राहील. सिनेमाचा फर्स्ट हाफ कॉमेडीचा डोस आहे तर सेकेंड हाफ जरबदस्त अॅक्शन सीक्वेंसचा. सिनेमा रंजक बनवण्याच्या नादात रोहित शेट्टीने सिनेमाची गती मात्र फारच हळू केली आहे अस वाटून जाऊ शकत. सिनेमात सामाजिक संदेश देण्यासाठी काही 'निर्भया' हत्याकांड'सारख्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. 'सिंघमा'च्या (अजय देवगण) एंट्रीने एक नवा ट्विस्ट सिनेमात येतो. नेहमीच्या गोष्टीला रोहित शेट्टी टाईपने तडका लावण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी ही सिनेमाच्या जमेची बाजू आहे. चित्रपटातली गाणी चांगली आहेत. सिम्बा'मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे आणि ही जोडी किती हिट ठरते ते काही दिवसातच समोर येईल.

रणवीर सिंगने या सिनेमात जीव ओतून अभिनय केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणारा नाही. रणवीरचा मराठी अंदाज प्रेक्षकांचा चांगलाच भावला आहे. मात्र काही सीन्समध्ये त्याने ओव्हर अॅक्टिंग केली आहे हे अस जाणवू शकत. पण बाकी रणवीर सिंग एक उत्तम कलाकार आहे. सारा दिसते खूप सुंदर. तिच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर तिला सिनेमात करण्यासाठी फारसा काही वाव नाही आहे. मात्र तरीही तिने तिच्या वाटेला आलेली भूमिका चोख बजावली आहे. रणवीर सिंग आणि सारा ची जोडी मोठ्या पडद्यावर पाहतांना मजा येते. सोनू सूद आणि आशुतोष राणाने आपली भूमिका चांगली साकारली आहे. तर सिद्धार्थ जाधव आपल्या कॉमेडी अंदाजात रसिकांना खिळवून ठवतो. सिम्बाच्या संगीत मनाचा ठेवा घेणारे नसले तरी 'आंख मेरे', 'तेरे बिन' आणि 'आला रे आला' ही गाणी रिलीजच्या आधीपासूनच रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. जबरदस्त अॅक्टिंग, धमाल अॅक्शन आणि उत्तम अभिनय असलेला हा चित्रपट पाहून पैसा वसूल अस नक्कीच वाटेल. काही नकारात्मक प्रतिक्रिया असल्या तरी बहुतांश लोकांना हा चित्रपट आवडत आहे. त्यामुळे हा चित्रपट मनोरंजन नक्कीच करेल. चित्रपटाच्या शेवटी एक सरप्राईज पाहायला मिळेल आणि ते सरप्राईज काय ते कळण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक: रोहित शेट्टी

कलाकार: रणवीर सिंग, सारा अली खान, सोनू सूद, आशुतोष राणा , सिद्धार्थ जाधव आणि बरेच मराठी कलाकार..

निर्माता- करण जोहर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED