हळदीच दुध- उत्तम आरोग्याचा एक पर्याय. Anuja Kulkarni द्वारा आरोग्य मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हळदीच दुध- उत्तम आरोग्याचा एक पर्याय.

हळदीच दुध- उत्तम आरोग्याचा एक पर्याय.

घसा धरला, आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर वेगळी औषध घेण्याआधी हळदीच दुध पिल जात. त्याचबरोबर वरचेवर सर्दी होण्याच्या समस्येवर काही वेगळ्या उपयानाधी हळदीचे दूध हा एक रामबाण उपाय आहे. हळदीच्या दुधाचे बरेच उपयोग आहेत ज्यातले बरेच उपयोग तुम्हाला माहिती नसतील. दूध आणि हळदीमध्ये औषधी गुण असल्याने ते शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. ह्ळदीतील जंतूनाशक गुणधर्मामुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. फक्त घाश्यासाठी नाही तर हळद पूर्ण शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. रात्री झोपायच्या आधी जर हळदीच दुध पिण्याची सवय ठेवली तर त्याचे भरपूर फायदे पूर्ण शरीरावर झालेले दिसून येतील. हळद आणि दुध एकत्र सेवन केल्यास शरीराला याचा दुप्पट फायदा होतो. आयुर्वेदानुसार थंडीमध्ये हळद आणि दुधाचे एकत्रित सेवन केल्यास विशेष लाभ होतो

* हळदीच दुध पिल्यानी होणारे फायदे-

१. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी-

हवा बदल किंवा अॅलर्जी मुळे बऱ्याच वेळा सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. अश्यावेळी स्वयपाकघरात असलेली हळद घालून दुध पिल तर त्याचा फायदा सर्दी खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी होतो. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी हळदीचे दूध हा बहूगुणी घरगुती उपाय आहे. हळदीमध्ये जंतूनाशक गुणधर्म असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असल्याने घश्यातील खवखव कमी होण्यास मदत तर होतेच पण हळद दुधात घालून घेतल्यामुळे श्वसनमार्गातील अडथळे दूर होण्यास देखील मदत होते.

२. गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी-

वाढत्या वयात असलेली एक समस्या म्हणजे गुढघेदुखी. बरेच लोकं गुढघेदुखीमुळे त्रस्त असलेले दिसतात. अश्यावेळी हळदीच दुध पिल्याने आराम मिळू शकतो कारण हळदीच्या दुधात दाहशामक गुणधर्म असतात. हळदीचे दूध प्यायल्याने शरीरातील सांधे बळकट होतात. त्याचबरोबर, सांध्यातली वेदना कमी होण्यास मदत होते. आणि वेदना कमी झाल्याने सांधेदुखीच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढण्यास मदत होते.

३. रक्ताचे शुद्धीकरण होण्यासाठी-

हळद दुधामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रक्त शुद्ध होण्यासतर मदत होतेच आणि त्याचबरोबर,शरीरातील रक्तभिसरणाची प्रक्रिया सुधारण्यास देखील मदत होते. हळद अ‍ॅन्टीऑक्सिडंट मध्ये संपन्न असते. अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्याची प्रक्रिया सुधारते. अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचेच नुकसान होण्यापासून सुद्धा बचाव होतो. पोटाशी संबंधित आजारांमध्ये हळदीच्या दुशाचे सेवन लाभकारक आहे.

४. डोकेदुखीचा आणि अंगदुखीचा त्रास कमी करण्यासाठी-

ददीर्घकालीन चालणारी डोकेदुखी किंवा अंगदुखी ह्यावर हळदीचे दुध अत्यंत प्रभावी असते. हळदीच्या दुध हे ‘अ‍ॅन्टीऑक्सिडंट’ मध्ये संपन्न असल्याने डोकेदुखी व अंगदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते. सर्दी-खोकल्यामुळे नाक चोंदणे ही समस्या बर्‍याच जणांना सतावते. मग त्यापासून आराम मिळवण्यासाठी ग्लासभर हळदीचे दूध पिण्याची सवय ठेवली तर त्याचा बराच फायदा झालेला दिसून येईल.

५. सुडौल बांध्यासाठी-

हल्ली सुडौल बंध सगळ्यांनाच हवा असो. त्यासाठी व्यायाम हा गरजेचा आहेच पण त्याचबरोबर, हिवाळ्यात दररोज एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून पिल्यास शरीर सुडौल बनते. हळदीच्या दुधामध्ये कॅल्शिअम आणि इतर तत्व वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. कोमट दुधामध्ये हळद घालून ते पिल्यानी शरीरात जमा झालेले फॅट्स कमी होण्यास मदत होते आणि साहजिकच बंध सुडौल होण्यास सुद्धा मदत होते.

६. हाडं ठिसूळ झाली असतील तर-

वय वाढत तस हाडं ठिसूळ होऊ शकतात. हा त्रास स्त्रिया आणि पुरुष दोघांना उद्भवू शकतो. हाडं ठिसूळ झाली कि साहजिकच हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता बळावते. हे टाळायच असेल तर ह्यावर उपाय म्हणजे हळदीच दूधाच सेवन! हळदीच दुध नियमित पिल्यामुळे कॅल्शियम मिळण्यास मदत होईल आणि हाडं भक्कम होण्यास तर मदत होईलच पण त्याचबरोबर इतर हाडाच्या आजारापासून सुटका होण्यास मदत होईल.

७. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी-

शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर आहे. लिव्हर शरीरातली घाण बाहेर टाकण्यास मदत करते. हळदीच्या दुधाच्या सेवनामुळे लिव्हर मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर, लिव्हरशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दुध हा एक उत्तम उपाय समजला जातो.

८. कर्करोगापासून बचावासाठी-

सध्या कर्करोग होण्याच प्रमाण वाढलेल दिसून येत. घरात कोणाला कर्करोग झाला असेल,खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा धुम्रपान, मद्यपान अश्या वाईट सवयी असण ह्यामुळे कर्करोग व्हायची शक्यता वाढू शकते. निरोगी जीवनशैली, चांगल्या सवयी वजनावर नियंत्रण इत्यादी ठेवलं तर कर्करोग होण्यापासून बचाव होऊ शकतो. त्याचबरोबर जर नियमित हळदीच दुध पिण्याची सवय लाऊन घेतली तर कर्करोगावर आळा बसण्यास मदत होऊ शकते. हळदी मध्ये अॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातल्या पेशी मध्ये बदल होण्यापासून बचाव करण्यास मदत होते आणि कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.