लाईफझोन ( भाग - 12) Komal Mankar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लाईफझोन ( भाग - 12)



      संध्याकाळच्या त्या कातरवेळी मी बालकनीत उभी होते . दूरवरून डॅन मला येताना 

दिसला . मी काही क्षणांसाठी स्तब्धच झाले . हा अचानक इकडे माझ्याकडे कसा ? 

सर्वकाही ठीक असेल ना ह्यांच्यात ?? असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करून गेले .

डॅन समोर आला तो आपला निरागस चेहरा घेऊनच .

' काय रे काय झालं , असा चेहरा का पडलेला दिसतो ? '

तो माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन एकदम ओक्साबोक्शी रडायलाच लागला .  त्याला अस 

पहिल्यादाच मी रडतांना बघत होते . 

' डॅन काय झालं ? सांगशील का ? असा रडू नको अरे .... '

 ' जिनी सोडून गेली मला ...... घटस्फोट घ्यायचं ठरवलं तिने .... '

' काय अचानक झालं काय तिला ?? तुझं तर तिच्यावर जीवापाड प्रेम होतं ना डॅन मग हे ... . '

खरंतर प्रद्युमनही आमच्यापासून खूप दूर राहतं होता तो सतत आपल्या कामात गुंतला असायचा ... 

 डॅनला मन मोकळं करायला कोणीच सोबत नव्हतं . म्हणून तो माझ्याकडे निघून आला 

पण नेमकं काय झालं असावं ?? मला काही कळेना .... तो सांगता झाला .

' रेवा अगं .... जिनी माझ्या मैत्रीवरही मनात संदेह निर्माण करू लागली , जेव्हा 

आम्ही कॉलेज मध्ये होतो तेव्हापासूनच मी तिला तुम्हा सर्वांबद्दल सांगितलेलं . सँडी एकटी असते तिची काळजी वाटते म्हणून मी तिला कॉल करत असतो . पण जिनी सारखा माझ्यावर पहारा ठेवत असते . 

मी प्रद्युमनला जरी कॉल केला आणि सँडीचा विषय काढला की ती लगेच माझ्याकडे डोळे 

वटारून बघते .. आणि लग्न झालं म्हणून का मी तुमच्यासोबत बोलणंच बंद करायचा . 

हा कुठला मानवी स्वभाव आहे ग आपल्यात असं कधीच चालायचं नाही . 

पण आपली मैत्री किती स्वच्छदी आहे ह्याच जाहिरकरून जरी तिला सांगितलं तरी तिचा तो स्वभाव जायचा नाही .. तुझ्यासोबतही फोनवर बोलतं असताना ती आपण काय बोलतं आहोत हे ऐकायला किचनमधून स्वयंपाक करताना यायची ... '

डॅन आणि जिनी मध्ये होणारे वाद हे सहाजिकच होते ... पण एवढा संदेह काहीच 

नसतांना ... असा का स्वभाव असावा मानवाचा ?? आपल्या व्यक्तीवर जराही विश्वास 

नसणारा ...

' डॅन , तू काळजी करू नको जिनी नाही घेणार घटस्फोट तुझ्याकडून . मला पत्ता दे तिचा 

मी तिला जाऊन भेटते .  '


डॅनने मला तिच्या घरचा पत्ता दिला . पण एवढ्यात माझं तिच्याकडे जायचं काहींना काही कारणाने टळत गेलं  .

डॅन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला पाहुणे बघायला आले . माझ्या होकाराची जास्त काही अपेक्षा न करता लग्न काढण्यात आलं .

कारण अनुराग तेव्हा युरोपला प्राध्यापक म्हणून कार्यरत होता आणि तो नुकत्याच दोन महिन्यांच्या सुट्टीवर इंडिया मध्ये आला होता . त्यांच्या घरच्यांची खूप इच्छा होती 

की ह्या एक महिन्यातच लग्न व्हावं . दहा दिवस असेच निघून गेले . डॅनला मी सांगितलंही 

माझं लग्न जुळलं . 

  तो स्वतः एकदिवस मला घ्यायला घरी आला तिच्याघरी त्यांनी सोडून दिलं आणि बाहेर पडला ... तिनेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही ...

   आत गेल्यावर तू  इथे का आली ? हा तिचा उद्धट प्रश्न . जिनी मला वाटलं लग्नाआधी 

डॅनची चॉईस आहे म्हणजे स्वभावाला नम्र आणि निगर्वी असणार . ही बाहेरच्यांनाच रिस्पेक्ट नाही देत म्हटल्यावर डॅन सोबत कशी वागत असावी ह्याचा अंदाज आला . 

मी नम्रपणे तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला . जिनीही माझ्याबाजूला बसली . 

आणि तिने जो प्रश्न उपस्थित केला तो कपाळावर आठ्या आणाराच . 

' किती वर्षे झाले ग रेवा .... डॅन आणि सँडीच्या अफेरला ?? '

' जिनी काय बोलते आहे तू हे ?? आम्ही फक्त मित्र आहोत तेही शालेय जीवणापासूनची आमची मैत्री आहे . तू असा संदेह का निर्माण करून घेते ?? '

माझ्या ह्या बोलण्यावर ती खवळलीच , ' मैत्रीण मैत्रीण ..... मैत्रीण एवढीच काळजी वाटतं होते आपल्या जिवलग मैत्रिणीची तर लग्न करून घ्यायचं होतं ना तिच्यासोबत ... मला प्रेम जाळ्यात अडकवून ह्याने माझ्यासोबत का लग्न केलं ?? '

जिनी किती तापटपणे वागत होती . 

' अगं , तू समजतेस असं काही नाही आहे आमच्यात . पण प्लिज तू डॅनला घटस्फोट देण्याचा निर्णय मागे घे ! '

जिनी तयार झाली पण एका अटीवर ... 

' ठीक आहे , मी नाही घेणार घटस्फोट पण एका अटीवर . तू सँडी आणि प्रद्युमन तुमच्या 

तिघांपैकी कुणाचाही कॉल डॅनला आलेला मी खुपवून घेणार नाही . '

' जिनी हे काय बोलते आहे तू .... ' 

ठीक आहे म्हणत मी तिथून बाहेर पडली .... डॅनला कॉल न करता एकटीच निघून गेली तिथून घरी . 

सँडीला कॉल करून मी सांगितलं की ह्या नंतर डॅनला तू कॉल करू नको तुला कसली 

मदत लागली तर मला आणि प्रद्युमनला मदत माग . 


       माझ्या लग्नाची तारीख जवळ आली होती प्रद्युमनला मी कॉल केला तो काहीच 

रिस्पॉन्स नव्हता देत . डॅनला तर इच्छा असूनही मी बोलवू शकत नव्हती कारण जिनीला 

दिलेला शब्द मला मोडायचा नव्हता . मी सँडीला खूप कॉल करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन ऑफ येत होता . 

 माझ्या लग्नाच्यावेळी सँडी मला सोबत हवी होती . 

असं का घडत आहे मला कळत नव्हतं प्रद्युमन सुद्धा ??? तो ही माझ्यावर असा विश्वास न ठेवता .......


     लग्न होऊन आम्ही युरोपला निघून गेलो  . खूप सतावत राहिले मनाला छळणारे प्रश्न 

पण त्या प्रश्नाचा कधी पाठ पुरावा करताच नाही आला . 

             
       प्रद्युमनचा नंबर डिलीट केला मी फोन मधून . कारण जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रीतला 

गाभाराच आता नष्ट झाला होता .... 

 अभय निघून जातांना मला सांगून गेला होता की तुम्ही सर्व अखेरचा श्वास असेपर्यंत 

आपलीही मैत्री टिकवून ठेवा पण नाही टिकवता आली मला .. माझा दोष होता का ?? 

हो .... मी च कुठेतरी चुकले म्हणून माझ्या सोबत अबोला धरलाय प्रद्युमन आणि सँडीनेही सोबत ... 

 ह्या अशाच खुळचट भावनांच घर करून मी जगू लागले त्यांना विसरून आपल्या 
संसारात ... पण कुठेतरी त्या सर्वांची आठवण दाटत होती हृदयात ... 


    दोन वर्षां नंतर आम्ही इंडिया मध्ये परत आलो ... अनुरागणे ठरवलं आता इथेच सेटलं व्हायचं ... त्याच्या ह्या निर्णयाला मी पण विरोध दर्शवू शकत नव्हते . 


     आईकडे तिला भेटायला गेल्यानंतर ती म्हणाली , 

' अगं रेवा , तुझं लग्न झाल्यानंतर एकमहिन्याने तुझा तो मित्र प्रद्युमन घरी येऊन गेला . 

काहीतरी बोलयच आहे म्हणाला होता तो ... तू आल्यावर पाठवशील घरी बस्स एवढं बोलून निघून गेला .... '


मी कितीदा येऊन गेले लग्न झाल्यावर आईने हे मला तेव्हाच का नाही सांगितले म्हणून मी ही जरा आईवर नाराज झाले पण ती म्हणाली मी तुला सांगायचं विसरली .... 


आता प्रद्युमन राहतो तिथेच असेल का ? की ते घर सोडून दुसरीकडे गेला असेल .... 


तरी एकदा जाऊन बघावं म्हणून मी त्याला भेटायला गेले .


 अगदी तसाच होता तो परिसर बहारदार कुणालाही आकर्षित करून घेणारी फुलांची 

बाग काय ती प्रद्युमनने तयार केली होती .... 


 पण प्रद्युमन कुठे बाहेर माझ्या नजरेस पडत नव्हता . आत शिरले डोकावून बघू लागले 

प्रद्युमन .... प्रद्युमन अश्या हाका मारतच प्रद्युमन माझ्या समोर उभा राहिला आणि मी 

शहारलेच ... का ??? भीती वाटली होती त्याची ?? का वाटावी ??  मित्र असूनही ?? 

हो त्याला बघून थोडी घाबरलीच मी मला तो माझा मित्र कोणी प्रद्युमन न वाटता आज एक 

वेगळाच प्रद्युमन वाटतं होता .. त्याच्या डोळ्यांकडे बघितलं असता माझ्या मनातली ती भीती दूर झाली .... 

कारण त्याच्या त्या तरल नजरेतुन मला प्रद्युमन दिसत होता ... पण , त्याचा तो दाडी वाढलेला चेहरा मला काय तो भीतीदायक वाटला ....

' रेवा तू अशी अचानक ?? ये ये .... बस्स ना ! '

असं म्हणत त्याने मला बसण्यास विनंती केली ... इतक्या दिवसांनी प्रद्युमन समोर आज मी बसलेले होते काय बोलावं सुचतं नव्हतं .

' कशी आहेस रेवा ?? ' त्याचा प्रश्न .....

' हं ह् ...... ठीक ....ठीक आहे मी . तू कसा आहेस ? '

' मी कसा असणार .... बघते आहे तू मला तुझ्यासमोरच आहे मी . '

' ही दाडी वैगरे कधी पासून वाढवायला लागला तू ?? ' 

' मग ..... काय झालं ?? नको वाढवू का ?? '  त्याने उपस्थित केलेला प्रश्न मन म्हणतं होतच कशाला हा उगाच असा दाडी वैगरे वाढवतो ... पूर्ण बदलूनच गेला . 

' अगं रेवा .... काय विचारतो आहे मी ? नको वाढवू का दाडी ?? '

' नको प्रद्युमन ....... '

माझ्या नकोवर तो जरा दचकतच बोलला ... ' का ग आज पहिल्यादा मला ह्या 

अवतारात बघून घाबरली .. '

  तो बोलला खरचं पण त्याला वाईट वाटणार म्हणून ओठावर आलेलं शब्द गिळून घेत 

मी म्हणाली , 

' नाही रे ..... '

' काय नाही रे .... अगं तुझ्या डोळ्यात दिसलं मला तू मला बघून घाबरलेली .. पण भिऊ नको ये मला तुझा मित्रच आहे मी प्रद्युमन ... तोच . '

त्याला विचारावं वाटलं मला , तू लग्नाला का नव्हता आला म्हणून आणि न रहाता मी त्याला विचारले ......

' प्रद्युमन ....... '

' अ ........ काय ?? ' 

' तू लग्नाला का नव्हता आला माझ्या ? आणि फोन पण रिसिव्ह नव्हता करतं ... '

माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रद्युमनने सरळ प्रश्नच बदलवला ....

' तू कॉफी घेणार ?? जस्ट वेट ...... ' म्हणत तो कॉफी आणायला निघून गेला . 

आता ठरवलं मी ह्या विषयावर ह्याच्या सोबत काहीच बोलायचं नाही पण , माझं मन खूप 

अस्वस्थ झालं होतं चेहऱ्यावर माझ्या ती नाराजी दिसतं होती ..... 

' रेवा , अगं तू खुश आहे आता . डॅन खुश आहे . सँडी पण खुश आहे लग्न केलं तिनेही.... डॅनने तुला त्याचा संसार वाचवायला पाठवलं होतं की तोडायला ग , तू अशी करूच कशी शकते ? ' 


    मला काही कळतं नव्हतं ..... 


' प्रद्युमन अरे तू हे काय बोलतो आहे मी जिनीला  सांगितलं , आम्ही फक्त मित्र आहोत तू डॅनवर खोटा संदेह नको घेऊ . पण ती ऐकायलाच तयार नव्हती .... ' 


   प्रद्युमन प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे बघत म्हणाला ,

' हे काय बोलते आहे तू रेवा ..... अगं , डॅनने आम्हाला कॉल करून सांगितलं की रेवाला 

मी माझा संसार वाचवायला तिच्याकडे पाठवलं आणि तिनेच माझा संसार मोडायचा कट रचला होता . '

मला गरगरायला झालं डोकं खूप जड वाटायला लागलं ... 


जिनी ..... जिनी तिला हे सर्व करून काय मिळालं  ?? 


अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले .... मी तिथून उठले आणि पळत सुटले ...

प्रद्युमनने मला थांबवण्याचा प्रयत्न केला ... पण मला आता नव्हते थांबायचे . 


मी घरी आले ... खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं .... काय करावं सुचतं नव्हतं मी 

मैत्रीचा घात केल्याचा खोटा आरोप घेऊन नव्हते जगू शकत . 

त्या रात्री माझ्या समोर माझी मुलगी , अनुराग कुणाचाच चेहरा आठवला नाही .

त्या रात्री झोपेत मला सारखा माझ्यावर विश्वास न ठेवणारा माझा जिवलग मित्र डॅन , स्वतः पेक्षा अधिक जीव ओतून माझ्यावर प्रेम करणारी मैत्रीण सँडी ..... ठीक आहे म्हणून जिनीचा  शब्द पाळण्याच धाडस करून जगत असलेली मी आज त्या मैत्रीच्या 
रिंगणात .... वेडावून गेली होती ... 
 मला अभय आणि केतकी जवळ निघून जायचं होतं म्हणून मी झोपेच्या  गोळ्या खाल्या ......
                पण मला त्यांच्या जवळ  नाही जाता आलं ...... 
अनुराग .... अनुराग , छकुली .... त्यांनाही मी तेव्हा आठवलं नव्हतं गं . 


******


    दिवस उजाडला होता ... सूर्यप्रकाश खिकडकीतून आत शिरत होता ... काल रात्री

 हॉस्पिटलमध्ये रेवा जवळ आपण

 नसताना सँडी किंवा प्रद्युमन डॅन ह्यांच्यातील कोणी एक असायला हवं होतं हे क्षणभर

 मला वाटलं .... तिने हा सर्व भूतकाळ माझ्यासमोर उलगडायला संपूर्ण रात्र घालवली .

 पण तिच्या त्या जिवलग मित्रांच्या यादीत मी कुठेच नव्हती . तरी देखील 


तिचा तो भूतकाळ मनाला चटका लावून गेला .... 


' रेवा मी निघते आहे ..... ' 

' अगं रामू .... आताच एवढ्या सकाळी उठून कुठे जाते आहे ?? ' 

....... तिच्या ह्या प्रश्नाने मी जरा निरुत्तर झाले ... पण लगेच म्हणाले ,

' डॅन , सँडी  आणि ...... आणि प्रद्युमनला इथे घेऊन यायला ....' 


####### समाप्त #########