Hasat raha... books and stories free download online pdf in Marathi

हसत रहा..

हसत रहा..

नेहमीच हसत राहील की त्याचे खूप सकारात्मक परिणाम जीवनावर दिसून येतात. हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं कोणत्या न कोणत्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेलेली दिसतात. सतत कोणता तरी ताण असतोच. आणि हा ताण कळत न कळत मनःशांती आणि शारीरिक तब्येतीवर सुद्धा परिणाम करतात. आपल हास्य हरवत चाललं आहे ही गोष्ट खूप वेळा लक्षात सुद्धा येत नाही. ताणतणाव आणि दगदग त्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे. या साऱ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावरही होतो. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे चक्र चालूच राहत. पण त्यातही आपण जर हसत राहिलो तर समस्या काहीशा हलक्या होतात. याचबरोबर, आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या प्रेशरमुळे लोक हसणेच विसरल्याचे दिसते. आयुष्यात चढ-उतार येतच राहतात. सुख-दुःख तर आयुष्याचा भागच असतो. हे सारं टाळायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणं. असे म्हणतात की, 'लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन'. आणि हे खरंच आहे की, हसणे हा अनेक रोगांवरील रामबाण उपाय मानला जातो. फक्त लाफ्टर डे ला नाही तर रोज नियमत हसत राहणे निरोगी आयुष्यासाठी महत्वाचे असते. हास्य फक्त तुमच्या व्यक्तिमत्वाला खुलवत नाही तर प्रेरणा आणि सामर्थ्य देते. चेहऱ्यावर सकारात्मकतेच तेज आणत. हास्य ही मानवाला लाभलेली अप्रतिम देणगी आहे. ज्याला मनमोकळे, खळखळून हसता येते तो माणूस नेहमीच सुदैवी मानला जातो... त्यामुळे नेहमीच हसत राहा कोणाला दाखवायला नाही तर स्वतःला छान वाटावं म्हणून नेहमीच हसत राहा.. कोणाला दुखवायला कुत्सित हसू नाही तर अगदी मोकळेपणाने हसत राहा आणि इतरांना सुद्धा आनंद वाटा आणि त्यांना हसवत राहा...

* हसण्याचे फायदे-

१. सकारात्मकता मिळते-

हसण्यामुळे शरीराला एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळत राहते. त्यामुळे आयुष्य वाढते. ब्लेड प्रेशर कमी होऊन, दु:ख दूर करण्याचे कामही या हसण्यामुळे होते. शरीरासोबत मेंदूचाही व्यायाम होतो. त्याचबरोबर चेहऱ्याला सुद्धा व्यायाम मिळतो. चेहऱ्यावरवरील स्नायू सक्षम ठेवण्यासाठी आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तुमच्या हसण्यामुळे चेहऱ्यावरील टवटवीतपणा कायम राहतो आणि चेहरा नेहमीच फ्रेश राहतो.

२. ताण-तणाव दूर ठेवता येतात-

ताण आला की गोळ्या खा अशी आजची स्थिती आहे पण ताण कमी करायचा सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे मनसोक्त हसणे. ताण-तणाव, चिंता, काळजी दूर करण्याची शक्ती हास्यात आहे. आपल्या मेंदूवर, शरीरावर पडणारा तणाव दूर करण्यासाठी हास्य अतिशय फायदेशीर असत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त हसणारी व्यक्ती कमी हसणाऱ्या व्यक्तीच्यी तुलनेत आयुष्य अधिक उत्तमरित्या जगत असते.

३. रोग प्रतिकारक शक्ती वाढते-

हसत राहिल्याचा महत्वाचा फायदा म्हणजे, हसण्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. त्यामुळे संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून संरक्षण होते. त्याचबरोबर, आजारही दूर ठेवता येतात. ज्या लोकांना ह्दयांचा आजार आहे, अशांसाठी तर हसणे हे अतिशय उपयुक्त आहे. १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी ह्दयगती तीव्र होते त्यापेक्षा जास्त खळखळून हसण्यामुळे होते. आणि १० मिनिटे व्यायामेतकी हृदय गती साठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.

४. नकारत्मक विचार बाजूला राहतात-

मनात नकारात्मक विचारांची गर्दी झाली असेल तर अश्या वेळी फक्त मनमोकळेपणाने हसून बघा... हसल्यामुळे तो काळ स्तब्तेत जातो आणि मनातले नकारात्मक विचार कमी होतात. नेहमी हसणाऱ्या व्यक्तिच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतात. जवळचे संबंध निर्माण होण्यासाठी हसणे हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी हसतमुख आणि उत्साही असणाऱ्या व्यक्तिकडे लोक आकर्षिंत होत असतात. कारण सकारात्मकता मॅग्नेट च काम करतांना दिसते.

५. वजनावर नियंत्रण राहते-

वाढते ताण आणि वाढते वजन ह्या आज कालच्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत. हसत राहिल्याने चटपटीत किंवा स्पायसी खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे साहजिकच वाढणाऱ्या वजनावरही नियंत्रण ठेवता येते. जास्त ताण मग जास्त खाणे हे दुष्टचक्रच आहे. खाणे व तणाव या गोष्टी वजन वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. पण भरपूर हसण्यामुळे तणाव आणि अतिरिक्त खाणे कमी करतात आणि त्याचा परिणाम वजनावरही दिसून येतो.

६. झोप चांगली लागते-

आज काळ झोपेच्या समस्या वाढल्या आहेत. झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेण्याकडे कल वाढतांना दिसतो आहे. पण छान हसण्यामुळे कदाचित तुम्हाला गोळी ची गरज लागणारही नाही. मनापासून हसल्यामुळे गोळी न घेता उत्तम झोप लागू शकेल. रात्री झोपण्याआधी मनमोकळेपणाने हसावे, विनोद करावे. यामुळे तणाव कमी होतोच. शिवाय दिवसभराचा थकवा नाहीसा होऊन शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते ते ही कोणत्याही गोळ्यांशिवाय..

७. मन आणि शरीर तरुण ठेवण्यास मदत होते-

हल्ली प्रत्येकालाच तरुण राहायचं असत. एक गुड न्यूज आहे की हसल्यामुळे अकाली वृध्दत्व येत नाही. हसताना चेहऱ्यावरील १५ स्नायू एकत्र येतात. आणि हसल्यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढते. शरीरात रक्ताभिरण वाढते. ज्यामुळे शरीराला ऑक्सीजन मिळतो. जो हृदयासाठी आणि पूर्ण शरीरासाठी महत्वाचा असतो. हसण्यामुळे मन तर टवटवीत होतेच पण त्याचबरोबर शरीर सुद्धा सुधृद राहण्यास मदत होते.

असे मनमोकळे हास्य नेहमीच शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक असते. त्यामळे फक्त एकाच दिवशी नाही तर अगदी रोज, कधी ठरवून कधी अगदी सहज, कधी स्वतःवर पण हसण विसरू नका. आणि मनाबरोबर शरीर उत्तम ठेवा. त्याचबरोबर आपल्याबरोबर इतरांना सुद्धा हसण्यात सामील करून घ्या.

हसत रहा, आंनदी रहा.. अगदी नेहमीच...:-)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED