Aaghat books and stories free download online pdf in Marathi

आघात

आघात्त

प्राची घरी आली तेव्हा आठ वाजून गेले होते
निमिष नुकताच ऑफिस मधुन आला होता आणि कपडे बदलत होता .
आज त्यालाही नेहेमीपेक्षा उशीरच झाला होता .
आल्या आल्याच तो प्राचीची चौकशी करणार हे नीलिमाला माहित होते
त्याला काय उत्तर द्यायचे असा विचार करणाऱ्या नीलिमाला प्राचीला पहाताच अगदी “हायसे” झाले .
काय हा उशीर प्राची ,जा चटकन हात पाय धुवून घे ,कधीपासून वाट पाहतेय मी .
सहाला येणारी तु किती हा उशीर आज ?
नशीब माझ तुझ्या पप्पाला पण यायला आज उशीर झालाय
जा आता तुच सांग तुझी कारणे त्याला .”
नीलिमा आत जाऊन टेबल वर जेवणाची तयारी करू लागली .
थोड्याच वेळात बाप आणि लेक फ्रेश होऊन जेवायला आले .
मग गप्पा मारत हसत खेळत जेवणे सुरु झाली .
निलीमाही थोडे वाढून त्यांच्या सोबत जेवायला आली .
प्राचीने नुकतीच नववीची परीक्षा दिली होती .
खुप चांगले मार्क्स मिळायची अपेक्षा होती तिला .
आता दहावी साठी प्रायव्हेट क्लास लावावे लागणार होते
मग पुन्हा अभ्यास सुरु होणार मग कुठे मजा करायला मिळणार
म्हणून रोज सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन कुठे कुठे भेटत होत्या .
आज पण त्या सर्वजणी सकाळी जुही कडे जेवायला गेल्या होत्या .
काय पिल्लू आज काय काय धमाल केली ?
निमिष पिल्लूच म्हणे तिला लाडाने ..
अरे पप्पा आज जुहीच्या घरी गेलो होतो आम्ही सगळ्याजणी
तिच्या मम ने मस्त मेजवानीचा बेत केला होता
आमचे आवडते पंजाबी फूड आणि नंतर कॉकटेल आईस्क्रीम ..”
प्राची म्हणाली ..
“अग सकाळी दहाला बाहेर पडलेली तु आता घरी येते आहेस
इतका वेळ करीत काय होता तुम्ही ?
नीलिमा थोडी त्राग्याने बोलली
“जाऊ दे ग निमा मुलीच आहेत त्या करीत असतील गप्पा टप्पा “
पप्पाने ग्रीन सिग्नल दिला म्हणल्यावर प्राची एकदम निर्धास्त हसली .
“मम्मा अग तिकडून मग आम्ही सौम्या च्या घरी गेलो
तिने खुप मस्त फिल्म ची सीडी लावली मग तिथे थांबलो .
तिच्या आईने पण मग भेल चाट असा घरगुती बेत आखला होता .
ते झाल्यावर घरी आले यात घड्याळाकडे लक्षच नाही राहिले ग “
हे ऐकल्यावर ठीक आहे असे म्हणुन नीलिमाने विषय आटोपता घेतला .
रात्री झोपताना मात्र निमिष ला तिने थोडे दटावलं..
“सारखी सारखी बाजु नको घेत जाऊ रे तिची .
तुला माहित ना दिवस कसे आहेत ..आजकाल ते
.मुली इतका उशीर घराबाहेर राहिल्या की जीव धास्तावतो रे ..
त्यात मी एकटीच घरात ..नाही नाही ते मनात विचार येतात “
निमिष म्हणाला ,” हो ग समजते मला ते .
पण नको सारखी काळजी करीत जाऊ .आपले लक्ष असते व्यवस्थित तिच्याकडे “
यांनतर एक आठवड्यात प्राचीचा निकाल लागला .
शाळेत दुसर्या नंबरने पास झाली प्राची ..
मग काय सगळा आनंदी आनंद ,गिफ्ट पार्ट्या एन्जोय असे करण्यात एक आठवडा कसा उडून गेला समजलेच नाही कुणाला .
पुढच्या आठवड्यात मात्र दहावी साठी लावायच्या क्लासेसची चौकशी सुरु झाली
निमिष पुर्ण पुढाकार घेऊन हे सारे पाहत होता
आपल्या लाडक्या हुशार लेकीला चांगले क्लास लावायचे होते त्याला
गणित इंग्रजी आणि सायन्स साठी काही खास मेहेनत घ्यावी लागणार होती .
शिवाय सकाळी पण दोन तास शाळा हुशार मुलींसाठी वर्ग घेणार होती .
त्यात ही प्राचीचे नाव होतेच .
“निमिष तिच्या या तिन्ही विषयांचे क्लास आपण एका ठिकाणीच लावू रे
आणि जवळ असु दे ,उगाच पोरीला धाव धाव नको रे करायला लावायला “
नीलिमा म्हणाली ..आणि निमिष ने पण त्याला दुजोरा दिला .
दोन तीन दिवसात सर्व माहिती मिळाली .
हे सगळे क्लास एकाच ठिकाणी असणार होते संध्याकाळी .
प्राचीच्या दोन खास मैत्रिणी पण सोबत असणार होत्या .
फक्त प्रोब्लेम इतकाच होता की क्लास घरापासुन थोडे दूर होते .
पण बस सेवा चांगली होती ,मुली जाऊ शकत होत्या
शिवाय शाळा सुरु झाल्यावर क्लास शाळेपासून जवळच होते .
दूर अंतरामुळे नीलिमाला थोडे धाकधूक वाटत होते .
पण प्रत्येक गोष्टीची अती काळजी करणे पण ठीक नव्हते .
आणि मैत्रिणी सोबत असणार होत्या शिवाय त्यांच्या जवळ मोबाईल होतेच .
असे रुटीन सुरु झाले .सकाळचे शाळेचे वर्ग शिवाय संध्याकाळी क्लास
त्यामुळे रुटीनला थोडा स्पीड आला होता .
पण मुली ते एन्जोय करीत होत्या .
एकंदर सारे काही मस्त होते .
प्राचीला घरी येईपर्यंत सात वाजत असत .
आले की बाईसाहेबाना त्यांच्या आवडीचे खाणे तयार लागत असे .
आजही क्लासला जाताना “पावभाजी” ची फर्माईश झाली होती .
सहा वाजायला आले तशी नीलिमा पावभाजीच्या तयारीला लागली .
सोबत आंबा आईस्क्रीम कालच करून ठेवले होते .
निमिष आज थोडा उशिरा येणार होता ,त्याच्याकडे परदेशी पाहुणे ऑफिसला येणार होते .
माझी वाट पाहू नका असे सांगुन गेला होता तो .
सात वाजले नीलिमा आवरून फ्रेश होऊन बसली .
खाऊन झाले की मायलेकी बाजारात जाणार होत्या किरकोळ खरेदी साठी .
नीलिमा सोफ्यावर टीवी पहात प्राचीची वाट पाहू लागली
साडेसात झाले तरी पत्ता नव्हता प्राचीचा
काहीतरी जास्त पोर्शन घेत असतील म्हणुन उशीर झाला असेल असे वाटले नीलिमाला
पण आठ वाजुन गेले तरी प्राची आली नाही म्हणल्यावर नीलिमाने तिला फोन लावला .
बेडरूम मधुन रिंग वाजल्याचा आवाज येत होता .
अरे देवा ..ही पोरगी फोन घरीच विसरली वाटते .
मग मात्र थोड्या काळजीने तिने प्राचीच्या मैत्रीणीना फोन लावला .
एक जण आज क्लासला गेलीच नव्हती आणि दुसरी क्लास संपला तेव्हा प्राची सोबत होती
पण नंतर मात्र तिचा मामा तिला घ्यायला आला होता .
त्यामुळे प्राची एकटीच बसने गेली असे ती म्हणाली .
आता मात्र काय करावे नीलिमाला समजेना .
तशात निमिषचा फोन पण मिटिंग चालु असल्याने लागत नव्हता .
त्याला मेसेज मात्र टाकून ठेवला तिने
शेवटी साडे आठला तिने स्कूटर काढली आणि थोड्या काळजीने ती क्लासच्या रस्त्याला लागली .
आता खुप उशीर झाल्याने रस्त्यात तुरळक रहदारी होती .
नीलिमा थोडी स्पीड मध्येच होती ..
आणि पर्समधला मोबाईल वाजु लागला ,नक्की प्राचीचा असणार फोन
असा विचार करून तिने स्कूटर साईडला घेतली आणि पर्समधला मोबाईल काढला .
तोच मागुन भरधाव येणाऱ्या कारने तिच्या सकट तिच्या स्कूटर ला धडक मारली
आणि तिचा मोबाईल दूर फेकला गेला .
नीलिमा घरी पोचली तेव्हा नऊ वाजुन गेले होते .
बेल वाजवताच निमिषने दार उघडले आणि चटकन आतुन प्राची येऊन तिला चिकटली .
“अग काय हा उशिर ...कुठे गेली होतीस इतका वेळ .
आणि फोन का उचलत नव्हतीस किती वेळ ?
निमिषने एका मागुन एक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली .
“ मम्मा सॉरी ग आज फोन न्यायला विसरले,परत घरी आले असते तर उशीर झाला
असता म्हणुन तशीच गेले ग ..
नेहेमीच्या बसला बसले होते पण रस्त्यात ती पंक्चर झाली .
त्या रस्त्यावर दुसरी काहीच सोय नसल्याने पुढची बस येईपर्यंत वाट पहावी लागली
आणि तुला काहीच कळवता आले नाही .”प्राची रडत म्हणाली
तिने तिच्या मिठीत असलेल्या प्राचीच्या केसातुन हात्त फिरवला
आणि हलकेच तिला थोपटायला सुरवात केली .
“ मला तुझा मेसेज मिळताच मी तडक घरी आलो बघ ..
येऊन बघतो तो काय प्राची तर घरी आली होती .
त्या टीवी वर सारख्या बलात्काराच्या घटना पाहुन तुझ्या डोक्यात नाही नाही ते विचार येत असतात .
पिल्लू सुरक्षित आहे आपले ..!!!
इतके बोलत असतानाच अचानक निमिषचे लक्ष नीलिमा कडे गेले
तिचा उतरलेला चेहेरा अस्ताव्यस्त कपडे पाहून तो म्हणाला ..
“ए तुला काय झाले ?कुठे पडलीस की काय ?
नीलिमा केविलवाणे हसुन म्हणाली ..काही खास गंभीर नाही रे ..
त्या रस्त्यावर निलिमाच्या स्कूटरला कारची धडक बसल्यावर नीलिमा पडली
उठून बसणार एवढ्यात कार मधुन चार पुरुष बाहेर पडले आणि तिला बाजूला ओढून
नेऊन आळीपाळीने त्यांनी तिच्यावर अत्याचार केले होते ..
तोंड दाबून धरल्याने आरडाओरडा करता आला नाही तिला
तशात तो रस्ता अगदीच निर्जन आणि अंधारा होता
ते कोण आहेत हे पहायची पण तिला शुध्द राहिली नव्हती ..
कशी बशी स्कूटर घेऊन ती घरी आली होती ..
“काय झाल बोल न मम्मा काय विचारतो आहे बाबा ...?
प्राची आणि निमिष तिच्याकडे पाहत होते ती काय सांगणार ते ..
पण ती कशी सांगणार होती की “बलात्कार “तर तिच्यावर झाला होता हे ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED