Anti Gravitational Man - The Superhero books and stories free download online pdf in Marathi

अँटी ग्रेविटेशनल मॅन- द सुपरहिरो

नवं दाम्पत्य क्रिस आणि मारिना, जे लग्नानंतर पहिल्यांदा महाबळेश्वरला आलेत. सात दिवसाची ही ट्रिप आटोपून परत आपल्या घरी नागपूरला आलेत. त्यांच्या क्रिसच्या घराचे लोक खूप प्रेमळ आणि मनमिळावू तसेच ते दोघेही होतेच. त्यांचा प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या प्रेमविवाहला दोघांच्याही घरच्यांचे समर्थन होते. काही दिवस सुखातच गेलेत. लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच ती गरोदर राहिली. त्यांना नुकतेच कळाले की त्यांचा घरी नवा पाहूना येणार आहे. सारेच खूप आनंदात होते. एवढ्यात मारीनाची घराचे सारेच जण काळजी घेऊ लागले, खास करून तिचा पती क्रिस. तो आपल्या होणाऱ्या बाळाबद्दल खूप उत्सुक होता. तो त्याला साऱ्या सुख सुविधा पुरविण्यास तैयार होता.
त्यांच्या घराची परिस्तिथी चांगली होती, कारण क्रिस सरकारी नोकरीला होता, मरिना नामांकित दवाखान्यात नर्स होती, क्रिसचे वडील प्राध्यापक होते. तसेच त्यांचे घरही खूप आलिशान होते. सोबतच अंगणात असलेली मोठी बाग घराची आणखी शोभा वाढवत होती. क्रिस आणि मरिनाची भेट तिच्याच दवाखान्यात झाली. मरिना त्या दवाखान्यात मोठ्या पोस्ट वर होती, तिच्या हाताखाली पाच ते सहा नर्स काम करत होत्या. एकदा कार अपघातात त्याचा एका पायाच्या हाडात क्रॅक अली होती तो तिथेच भर्ती झाला, आणि तिथेच मरिनाची ओळख झाली, मग ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर तेच प्रेम लग्नात.
तिला आता तिसरा महिना लागलेला होता. आतातर क्रिस तिला एकही काम करू देत न्हवता. तिला फक्त आरामच मिळत होतं. कसेबसे आठ महिने गेलेत. मरिना टीव्ही बदलत असताना केरळच्या टोकाला समुद्रकिनारी एक निसर्गरम्य परिसर जिथे सध्याच्या महिन्यात भेट देने सर्वात उचीत मानल्या जात होते, त्याची सहल एक ट्रॅव्हल कंपनी चालवत होती. ती जाहिरात तिच्या कानावर पडली. तिने क्रिसला तिथे भेट देण्याची इच्छा दर्शवली. क्रिसने तिला ह्या अवस्थेत न जाण्याच्या सल्ला दिला. तो म्हणाला, एवढ्या दूरचा प्रवास बाळासाठी कदापि उचित नसणार, आणि तिथे बाळाला घेऊन नंतरही जाता येऊ शकते." पण ती आपल्या बोलण्यावर ठाम होती. ती तिच्याकडे जिद्द करू लागली. त्यासातठी तिला चांगलाच बहाणा मिळाला. ती म्हणाली, सफर तर विमानानेच होत आहे. त्यात कसला बाळाला त्रास, आणि बाळाची काळजी घायला पप्पा असणारच ना? (पोटाला हात लावून) होय ना बाळा?"
तिचा विरोध सर्वांनी केला पण ती क्रिस कडे खूप विनवणी कारू लागली. तिला वाटलं बाळाला जगात प्रवेश करायला पुन्हा एक महिना आहे, मग काळजी काशाची? तिच्या जिद्दीपुढे क्रिसला शरण यावच लागलं! त्याने काही अटींवर तिचे हे म्हणणे मानले. त्याच्या अटी अश्याप्रकारे होत्या, १) तिथे गेल्यानंतर कश्याचीही जिद्द कारायची नाही. २) बाळाला तिच्यामुळे कुठलीही इजा होणार नाही ह्याची काळजी घेणे. ३)बाळासोबतच स्वताचीही काळजी घेणे. ४) आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिथून जेवढ्या लवकर परत येता येईल तेवढ्या लवकर तिथून परत यायचं. तिला ह्या सर्व अटी मान्य होत्या. एकंतरीत तिला तिथे जाण्याची घाई लागली होती.
सायंकाळी क्रिस आणि त्याच्या आईवडिलानी त्यांच्या जाण्याची तैयार केली. त्यांनी दुसऱ्याच दिवशीची फ्लाईट बुक केलेली होती. मरिना जाम खुश होती. तिला फिरायचा आनंदात रात्रभर झोपही आली नाही. सकाळी उठल्यावर क्रिस मरिनाकडे येतो, आणि म्हणतो, "जाण्यास तैयार आहेस?"
मरिना," होय!"
क्रिस, "पुन्हा एकदा विचार करून घे! आपल्याला तिथे जाण योग्य असेल काय?, आपल्यासाठी, आपल्याबाळासाठी?"
मरिना, "काही होणार नाही, बाळाला यायला पुन्हा कदाचित एक महिना आहे. काळजी करू नका! बाळाची काळजी घ्यायला मी आहे ना! आणि तुम्हाच्या साऱ्या अटीही पाळण्यास तैयार आहे. मग कशाची काळजी?, साऱ्या चिंता दूर करून चला मजा करायला.

क्रिस ह्यावर काहीही बोलला नाही. फक्त त्याला मरिना आणि आपल्या बाळाची काळजी होती. अकरा वाजता प्लेन येणार होत. त्याच्या आधी त्यांना तिथे पोहोचायचं होत. ते एअरपोर्ट वर पोहोचलेत. वेळेनुसार विमानही आलेला होता. ते विमानात बसलेत, तो विमान अर्ध्या पर्यटकांने भरलेला होता. जे मालक त्या ट्रिपची जबाबदारी घेतलेला होता, तो तिथे आला. आणि त्यांचे स्वागत करू लागला. तेव्हाच तिथे एक मोठा अधिकारी आला आणि म्हणाला, "कृपया सारे लोक काही वेळासाठी बाहेर बसून वाट बघावी. कारण प्लेन मध्ये काही तांत्रिक अडचण आलेली आहे, पण चिंता करू नका आम्ही ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. अडचणीबद्दल क्षमस्व!"
त्यांचे हे बोलणे एकताच क्रिसला पुन्हा चिंता होऊ लागली. त्याला ही खतऱ्याची घंटा वाटू लागली. तिला पुन्हा म्हणाला, "मला हे काहीस वादळापूर्वीची शांतता वाटत आहे, हे कदाचित न जाण्याचे संकेत असू शकतात, म्हणून मरिना प्लिज पुन्हा विचार कर."
मरिना, "तू कुठे शुभ अशुभच्या मागे लागलास? कशाला काळजी कारतोएस? फक्त काही तांत्रिक बिघाड झाला आहे, ते त्यावर काम करत आहेत ना?, (त्याचा हात पकडून) काही होणार नाही, सार ठीक होईल. बाळाची काळजी करू नोकोस! मी स्वतःपेक्षा बाळाची जास्त काळजी घेईन.
तिकडून एक अनाऊन्समेंट झाली. सर्वांना प्लेनमध्ये आपापल्या ठिकाणी बसण्याचे आवाहन करण्यात आले. ते दोघेही आपल्या जागी जाऊन बसलेत. प्लेन चालू झाले.
त्यांचा प्लेन कोच्चीत लॅण्ड झाले. तिथून त्याच ट्रॅव्हलर कंपनीच्या जनरलिस्टने एका खाजगी हॉटेलमध्ये सर्व पर्यटकांचे रात्रीच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. व्यवस्था एकदम उत्तम होती. सर्वांना सेपरेट खोल्या देण्यात आल्या. ते रात्री झोपून सकाळी कोच्ची फिरणार होते.

रात्री चांगली झोप घेऊन, सर्व यात्रींगण सकाळी ताजेतवाने दिसत होते. ह्यात क्रिस आणि मरिना दोघेही फ्रेश दिसत होते. सर्वाना घाई सुटली होती कोच्ची फिरायची. सर्वांसाठी एक गाडी बूक करण्यात आली. जनरलिस्टने, त्यांना पूर्ण गाईड करून कोच्ची फिरविले. प्रत्येक पर्यटक स्थळे दाखविली. सर्व स्थळे फिरून झाल्यानंतर, त्यांना सांगण्यात आले की, उद्या ज्या ठिकाणची आतुरतेने वाट बघितल्या जात होते, ते स्थळ बघायला जाण्याचा सुचनेबद्दल.
हे एकूण मरिना जाम खुश झाली, कारण ती ह्याच कारणासाठी इथे आली होती. ते सारे पुन्हा काल रात्रीच्याच ठिकाणी परतले. सर्वच दुसऱ्या दिवशीची वाट बघत होते. ह्यांचातली मरिनाही खूप उत्सुक होती.

दिवस उजळायच्या आताच मारिना उठून तैयार झाली. तिने ख्रिसला वेळे आधीच उठविले. तो जर तिच्यावर चिडलाच... तिने उत्तर दिले, आपण जर लवकर करून राहिलेलं बर ना?
त्यावर क्रिस खूप बिघडला, त्याने तिच्यासोबत भांडीनच बोलू लागला होता. तिच्यावर तो कधीच एवढा चिडला न्हवता. फक्त त्याची झोप झाली न्हवती म्हणून जरा तसला वागत होता.
पण त्याचे असे बोलणे बघून मरिना रडू लागली. मग त्याला समजले की त्याने काय केले ते.. त्याने तिला जवळ घेतले, आणि तिला सॉरी म्हणू लागला, आणि तिला मनवू लागला. तिनेही ह्याचा चांगलाच प्रतिसाद दिला. तिने आपले रडणे थांबविले.
दोघेही तैयारी करून खालच्या हॉलमध्ये येऊन बसलेत. काही वेळाने एक एक लोक येऊ लागले होते. आठ वाजे पर्यंत सारे लोक जमा झालेत. एवढ्यात तो जनरलिस्ट तिथे आला आणि त्या सर्व लोकांना गाडीत बसायला सांगितले. जवळजवळ नऊ वाजता ती गाडी तिथून निघाली.
मांनासरी फिशिंग स्पॉटच्याच बाजूला एक निसर्गरम्य ठिकाण होत, जे कोच्ची पासून पश्चिमेला काही किलोमीटर अंतरावर होते. दोन तासात त्यांची बस तिथी पोहोचली.
तिथे उतरल्यानंतर त्या सर्वांनी चारही बाजूस नजर फिरविली. सर्वत्र हिरवळ आणि निसर्गरम्य वातावरण आणि बाजूलाच समुद्र, जणू ते दुसऱ्याच ग्रहावर उतरले की काय ? असे त्यांना भासू लागले. ते सर्व समुद्रकिनाऱ्यावर पाळायला लागलेत. पण मरिनाला मात्र हळू हळू जावं लागलं, पोटातल्या बाळामुळे...
ते सारे एन्जॉय करू लागले होते. मरिनाला एवढं आनंदी बघून क्रिसही खूप आनंदी होता. पण त्याला तिची तेवढीच काळजी लागली होती. काही वेळ पाण्यात खेळून सर्वांनी एका जहाजाने समुद्राची मजा तिथे जाऊनच घेण्यासाचे ठरविले. त्यातील काहीने तर कधी समुद्र बघितलेलाही न्हवता. त्यातही जहाजाने फिरणे म्हणजे समुद्राचा पूर्ण आनंद घेण्यासारखे वाटत होते.
त्यांच्यासाठी एक प्रायव्हेट जहाज बुक करण्यात आला. खास त्यांच्यासाठी. सारे लोक त्या जहाजात बसले. जहाजाचे छप्पर नसल्याने सर्वत्र नजर टाकता येत होते. त्या जहाजात फक्त एकाच अडचण होती, ती म्हणजे, तो जहाज चालवणारा जरा नवीनच होता. त्याला काही प्रमाणात जहाज चालवीत येत होते. पण पूर्ण ट्रेन न्हवत तो. पण त्यांना काही दूर जाऊन परतच यायचे होते म्हणून त्याला चालविण्यास देने काही हरकतीचे न्हवते.
जहाज चालू झाला. मरिना जरा आताच बसली. ती तीच्या बाळाची जास्त काळजी घेत होती. त्या ठिकाणाहून तिलाही चांगलेच दृश्य दिसत होते म्हणा.. जहाज काही दूर गेल्यावर सर्वत्र पाणीच दिसू लागले होते. ज्या किनाऱ्यावर ते उभे होते, ती जागा लहान लहान होत चालली होती. एक वेळ तर अशी आली की तो समुद्रकिनारा दिसेनासा झाला. आत्ता फक्त पाणीच उरले होते. सोबत दमट हवामान, शांतता, फक्त लाटांचा आवाज, खूप मनविलोभीत करणारं होत. आता जहाज चालविणारा परत जाण्याचा मार्ग घेऊ लागला, तेवढ्यात त्याला सर्व लोकांनी अडविले आणि त्याला पुन्हा दूर घेऊन जाण्याची विनवणी केली. त्या जहाज वाल्याचे म्हणणे होते की, जर परत जाण्याचा मार्ग विसरलो की गडबड होईल. पण लोकांनीही त्याला सांगितले की आम्ही तो मार्ग विसरणार नाही, आणि त्याला पुन्हा पुढे घेऊन जाण्यास सांगितले. त्याने ह्यांच्या म्हणण्यावरून पुढे जहाज पुढे नेण्यास राजी झाला.
काही दूरवर गेल्यानंतर, त्याला कळले की, पुढे मौसम खराब आहे, म्हणून तो परत जाण्याचा मार्ग पकडण्यासाठी जहाज पलटविण्याची तैयारी करू लागला. पण त्याच्या हातातली स्टेअरिंग काम करत नाही आहे असे त्याला जाणवले. तो पुन्हा प्रयत्न करू लागला त्याला पलटविण्याची पण ती स्टेअरिंग काही पालटायला तैयार न्हवती. तो जहाजच त्या वादळाच्या दिशेने जाऊ लागला होता. त्यावर तो काहीही करू शकत न्हवता. तरीही हो प्रयत्न करतच होता. सर्वांनी त्याला जहाज लवकर पलटविण्याची विनंती करू लागले, पण तो जहाज काही पलटत न्हवता, जणू तो जहाज त्याच्यकडे खिचल्या जात होता. जसजसा ती तुफानी जागा जवळ-जवळ येत होती, तसतसा जहाज आणखी वेगाने त्या तुफानाच्या दिशेने जाऊ लागला होता.
ती वादळाची जागा आता जास्त दूर न्हवती. आता सर्वाना दिसत होते की, ते काळे आणि निळे विचित्र वादळ, त्यात विजा चमकत आहेत. त्याच्या ठीक खाली पाणी गोल गोल फिरुनी आत जात आहे. हवा आणि ढगाने पुढचे चित्र दिसेनासे होत होते. आता त्यांना वाटले की आता काही कुणीही ह्या जहाजवरचे वाचणार नाहीत. तो बवनडर आपल्या पूर्ण जहाजला खेचून सर्वाना जलसमाधी देण्यात येणार आहे.
त्या जहाज चालकाने आधीच आपल्या वडिलांना फोन केलेला होता. त्याचे वडील मदतीसाठी किनारपट्टीवरून निघाले होते. पण आता त्यांच्याकडे जास्त वेळ शिल्लक न्हवताच. आता ती जागा काही मीटर अंतरावरच होती. जहाजाच्या टोकावरची लोक तिथे खेचल्या जात होती. त्यांच्यातील एकाचा हात सुटला, तो थेट त्या बावंडर मध्ये विलीन झाला, काही मिलीसेकंदाताच.. हे दृश्य बघून सर्वच खूप घाबरले. टोकावरचे एक एक लोक तिथे खेचले जात होते, आणि त्या गोल फिरणाऱ्या पाण्यात गायब होत होते. असे एक एक करून अर्ध्याहून जास्त लोक त्या तुफानी क्षेत्रात प्रवेश करत होते,आणि त्यांचा ओरडण्याचा आवाजही गायब होत होता. क्रिस ने मरिना एक हाताने घट्ट पकडलेला होता आणि दुसरा हात जहाजाच्या एका मजबूत रॉडला पकडून उभा होता. त्यांच्या पुढे फक्त काही शिल्लक लोक वाचलेले होते. जहाजही तिथे खेचले जात होते.
हळू हळू सारेच लोक तिथे खेचले गेलेत. फक्त क्रिस, मरिना आणि जहाज चालक तिथे होते. त्यांच्याकडेही काही सेकंद शिल्लक उरले होते. एवढ्यात क्रिसला एक दोर दिसला. मरिनाला जहाजाला पकडायला सांगितले, आणि स्वतः तो दोर घेऊन मरिनाच्या दोनही हाताला दोराच्या एका टोकाने घट्ट बांधले. क्रिस मरिनाला कुठल्याही परिस्थितीत तिला गमावू इच्छित न्हवता. म्हणून तो आपल्या परेने पूर्ण प्रयत्न करत होता. ती तरी तिथे ओढल्या गेली ती कुठेही पकडू शकत न्हवती, कारण तिचे दोनही हाथ बांधून होते. क्रिसचा प्रयत्न उलटा पडत होता. क्रिस ने लगेच तिला बांधलेली दोरी एक हाताने पकडली आणि दुसरा हात त्याच जहाजाच्या रॉडला घट्ट पकडला. आता तिचे प्राण क्रिसच्या हातात होते.
इकडे त्यांची मदत करायला दुसरा जहाज आणि एक नाव आलेला होता. त्या जहाजातील इंजिन आधीच्या जहाजपेक्षा खूप शक्तिशाली होते, म्ह्णून तो जहाज टिकून उभा होता. त्यात त्या जहाजचालकाचे वडील होते. तो जहाज चालक जसा आपल्या वडिलांच्या जहाजावर पोहोचला तसा क्रिस चा जहाजाचे पूर्ण नियंत्रण त्या वर्दळीच्या दिशेने जात होते. त्या जहाज वाल्यानी त्यांच्याकडची दोरी क्रिस कडे सोडली. जसे क्रिसने ती दुसरी दोरी पकडायला गेला, तसा क्रिसचा जहाज त्या वर्दळात विलीन झाला. त्या जहाजाचा एकही भाग बाहेरुन दिसत न्हवता. पण क्रिसकडे फेकलेली दोरी त्याने लगेच पकडली होती. आता क्रिसच्या एका हातात मरिनाला बांधलेली दोरी होती, तर दुसऱ्या हातात जहाजाला बांधलेली दोरी होती.
मरिना त्या गोल भावऱ्याच्या फक्त काही इंच दूर होती. त्या होल मधून खूप जास्त प्रमाणात गुरुत्वाकर्षण बळ होते. साधारण पृथ्वीच्या गुरुत्वीय बळापेक्षा कितीतरी पटीने जास्त. तो जोर मरिनाला आपल्याकडे खूप ताकतीने खेचत होता. त्यात तिला खूप जास्त त्रास होत होते. तिला असे वाटत होते जसे की तिला तिच्या बाळाला पकडून खालून कुणीतरी खूप जास्त शक्तीने खेचत आहे असे. पण ती काहीही करू शकत न्हवती. त्या गुरुत्वीय बळाचा क्रिसवरही प्रभाव पडत होता. मग विचार करण्याची गोस्ट होती की मरिनाला ह्याचा किती त्रास होत असेल?
मरिनाचे पाय पूर्णतः त्या खेचत असलेल्या होल मध्ये गेलेला होता, सोबतच बाळाचा काही भागही. तिला आता हे खेचन असहाय्य झालेलं होत. एवढया वेदना बाळांतर असलेल्या कुठल्याही स्त्रीला झाल्या नसाव्यात. ती बेशुद्ध पकडलेली होती. पण तिचे हात आताही बांधून होते.
जहाजातील लोकांनी क्रिसची दोरी खेचण्यास सुरुवात केली आणि सोबतच जहाजही त्या तुफानपासून दूर नेण्यात येत होते. काही वेळ खेचल्यासर क्रिस जहाजपर्यंत पोहोचला. त्याला लोकांनी वर घेतले. मग मरिनाला क्रिस आणि सोबतच्या लोकांनी आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. मरिना बेशुद्ध अवस्थेतच होती. तिला जहाजावर आणण्यात आले. जहाज आता आपल्या दिशेने परतु लागले.
त्या जहाजात कुठलीही मेडिकल सुविधा उपलब्ध न्हवती. आणि इकडे मरिना शुद्धीवर येत न्हवती. तिला उठविण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला पण ती काही उठू शकली नाही. म्हणूनच जहाज जास्त वेगाने चालविण्यात आले, जेणेकरून तिला पूर्ण मेडिकल सुविधा लवकरात लवकर मिळण्यात यावे म्हणून.
जहाज काही वेळातच किनाऱ्यावर आले. तिथे आधीच बोलावलेली रुग्णवाहिका उपस्थित होती. मरिना ला तिथे लगेच नेण्यात आले आणि नर्सने तिला प्राणवायूचा मास्क लावले. रुग्णवाहिका कोच्चीच्या सिटी हॉस्पिटल कडे वळली. अर्ध्या तासाच्या आत ती रुग्णवाहिका इस्पितळात दाखल झाली. तिला स्ट्रेचरवरून ऑपरेशन थेटरकडे नेण्यात आले. चार ते पाच डॉक्टर तिला आणि तिच्या बाळाला वाचविण्याच्या प्रयत्नात लागले. डॉक्टर आपल्या तर्हेने पूर्ण प्रयत्न करत होते. पण ती शुद्धीवर येण्यास तैयारच न्हवती. काही वेळात ती शुद्धीवर आली. पण तिच्या वेदना आताही तेवढ्याच तीव्र होत्या. तिला त्या वेदना खुप असहाय्य होत्या. तिने डॉक्टरला क्रिस ला बोलवायला सांगितले.क्रिस ओपेशन थिएटर मध्ये येताच डॉक्टर म्हणाले,
"बाळाची तब्येत काही प्रमाणात ठीक आहे. पण मरिनाची तब्येत काही सुधारत नाही आहे. जर आम्ही मरिनाला वाचवायचा प्रयत्न केला तर कदाचित ते बाळाला आणि मरिनालाही जीवाचा धोका आहे. जर बाळाला वाचविण्याचा प्रयत्न केले तर बाळ तर जिवंत राहील पण मरिना मात्र..., तुम्ही समजत आहे ना मला काय म्हणायचं आहे ते? "


क्रिसला काहीच कळत न्हवते काय करावे ते?, तो मरिनाकडे गेला. मरिना म्हणाली, ...

"मला माहीत आहे डॉक्टरांना काय म्हणायचे आहे ते... पण क्रिस आपल्या होणाऱ्या बाळाची खूप काळजी घे.. त्याला तुझ्याकडून आणि माझ्याकडूनही प्रेम दे..."


क्रिस म्हणाला, "नाही... मी तुला माझ्यापासून दूर होऊ देणार नाही..., आपण तिघेही एक आहोत. तिघांपैकी एकही नसला की...,, मी तो विचारच करू नाही शकत.., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मरिना... आणि मी आई-बाबांना काय सांगू?, आणि बाळाला फक्त आईच समृद्ध बनवू शकते, दुसरे कुणीही नाही."

मरिना, "
" मला माहीत आहे, तू माझ्यावर खूप प्रेम करतोस.. पण ह्या वेदना मला असहाय्य होत आहे रे!.. तू माझी चिंता करू नोकोस.. बाळातच मला शोध..., मला एक संधी मिळाली आहे आपल्या बाळासाठी काहीतरी करायची, मला थांबवू नोको..."

क्रिस,
"नाही मरिना नाही! तू प्रत्येक वेळेस मला म्हणत होती की, तू जीवनभर माझा साथ देशील, तर आता काशी काय मला वाऱ्यावर सोडून चाललीस?.. नाही मी तुला कुठे जाऊ देणार नाही.. आपण सोबत आलोय सोबतच जाउत्त..."

मरिना,
"मी माझे वचन पाळले, मी तुला माझ्या जीवनभर साथ दिलीय.. आता तू मला वचन दे की, तू माझ्या आठवणीत कधीही रडणार नाही, आणि आपल्या बाळाला तू विचार केलाय त्याहुन जास्त काळजी घे... त्याला आईची कमी भासू देऊ नको, आणि त्याला सांग की, तुझी आईही त्याच्यावर खूप प्रेम करत होती ते...(हाताला पकडून) वचन दे, आणि माझी शेवटची इच्छा पूर्ण कर, ती इच्छा म्हणजे इथून जा आणि डॉक्टरला आपले काम करू दे..."

क्रिस,
"मी तुझ्या वेदनांसाठी,आणि आपल्या बाळाच्या सुखरूपते साठी मी इथून जातो, आणि तू सांगितलेले वचनाही पाळतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव... मी फक्त तुझ्यावर प्रेम केलाय, आणि तुझ्यावरच करत राहणार..."

मरिना,
"मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुझ्यासारखा पती मिळाला, जर खरच ह्या जन्मात दुसरा जन्म होत असेल तर मी तुझीच पत्नी होण्याची इच्छा मांगेल..love you! बाय!"

क्रिस,
"loveyoutoo always..."


एवढे बोलून क्रिस पटकन ओपेशन थिएटर मधून बाहेर पडला. जर पुन्हा तिच्याकडे बघितले असते तर तो स्वतःला सावरु शकत न्हवता.बाहेरून काचेतून आत मरिनाकडे बघत काही वेळ रडू लागला,पण मध्येच त्याला आठवले की, आपण तिला वचन दिले होते की, रडणार नाही म्हणून!
डॉक्टर आत जाऊन मरिनावर शस्त्रक्रिया करू लागले. बाहेर क्रिसला मरिनासोबतचे प्रत्येक क्षण आठवू लागले. मरिना जेव्हापासून त्याच्या सोबत होती, तेव्हापासून तो तिच्याशिवाय एक दिवसासाठीही दूर झाला न्हवता, पण आता मात्र जीवनच तिच्याशिवाय काढायचं... हा विचारच त्याला सतावत होता.
दोन तास शस्त्रक्रिया करून डॉक्टर बाहेर आलेत. त्यांनी मुलगा झाल्याची खबर दिली, सोबतच मरिना ह्या जगात नाही, हेही सांगितले. त्याची आत जायची हिम्मतच म्हावती. मरिना डोळ्यापुढे असेल, पण आपल्यासोबत बोलणार नाही, ह्या विचारानेच त्याचे डोळे पुन्हा पाणावले...
पण बाळासाठी तो आत गेला. आत नर्सने बाळाला त्याच्या हातात दिले. त्याने बाळाला हातात घेताच, बाळ खूप हलके भासू लागले, जणू काही कागदाचे वजनच.. पण काही क्षणात बाळाचे वजन नॉर्मल बसू लागले.
क्रिस मारिनाकडे बघत म्हणाला, "हे बघ आपल्याला मुलगा झालाय. तुला मुलगाच हवा होता ना?, तुझी इच्छा आज पूर्ण झाली. डोळे उघळ ना! बघ ना! घराकडे जाताना सोबत पेढ्यांचा डब्बाही सोबत नेऊ म्हणजे आईबाबांचे तोंडही गोळ करता येईल."
क्रिस काही वेळासाठी विसरलाच होता की, मरिना ह्या आनंदाच्या क्षणात सहभागी नाही. जेव्हा त्याला कळले, तो मनसोक्त रडला. त्याने काहि आपले आवडते सोबतचे क्षण आठवून तिच्यापुढे मांडले. काही वेळानंतर आपल्या हृदयाला आवरून त्याने घरी जाण्याची तैयारी केली.
नर्सने बाळाला घेऊन त्याचे वजन मोजले, आधी त्याचे वजन शून्य ते दहा ग्राम दाखवू लागले. बाळाला पुन्हा उचलून ठेवले तर तेव्हा त्याचे वजन नव्वद ते शंभर च्या दरम्यान दाखवू लागले. नर्सला वाटलं की वजन काटा काम करत नसेल, म्हणून तिने दुसरा वजन काटा आणला. त्यात बाळाचे वजन नॉर्मल दिसू लागले. तिने बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला, तर तिला उचलतात येत न्हवते. बाळ खूप वजनी वाटू लागला होता. तिने पुन्हा प्रयत्न केले, तेव्हा बाळ नॉर्मल वाटले.
तो घरी जात पर्यंत त्याने बाळाला आपल्यापासून दूर केले नाही. आणि पुढे असलेल्या मरिनाकडे टक लावून बघत होता. त्याने दवाखान्यातून निघतानाच घरी फोन करून घटनेची माहिती दिली होती. घरी आल्यावरही उठलेली न दिसताच क्रिस पुन्हा रडू लागला. त्याचा वडीलाने त्याला सावरले...

..
.
..
तीन दिवसापासून त्याने जेवणाचा एकही घास खाल्ला न्हवता. फक्त पाणी पिऊन राहात होता. त्याची आई ह्याचामुळे खुप चिंतीत होती. त्याचे वडील आलेत आणि त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, बाळासाठीतरी स्वताची काळजी घे, घास भर तरी खा..
क्रिस म्हणाला, " मला माहीत आहे ती परत येणार नाही आहे, पण काय करू बाबा, तिच्याशिवाय जराही करमत नाही.. जेवणाकडे बघताच भूक कुठे जाते काही कळत नाही. "
त्याच्या वडिलांनी बाळाला घेऊन म्हणाले, "बघ बाळाकडे तो पूर्णतः तिच्यासारखाच दिसतो, त्याचे नाक त्याचे डोळे हुबेहूब तिच्यासारखेच... ह्याला बघून तरी जेवन कर."
क्रिसला मरिनाने दिलेले सर्व वचन आठवले. तो एकप्रकारे उर्जित झाला. त्याने थोडेसे जेवणही केले. आणि बाळाला खेळवायला लागला. त्याने तीन दिवसात बाळाला. जास्त घेतले न्हवते. आणि खरच ते बाळ मरिनासारखाच दिसत होता.
त्याच्यात नवीन उम्मीद जागी झाली. तो आपल्या बाळाला प्रत्येक सुख देऊ इच्छित होता. त्याचे नाव 'अभय' ठेवण्यात आले, ज्याला कशाचीही भीती नाही. त्याने आपली नोकरीही पार्ट टाइम केली होती. तो पूर्णपणे बाळाला वेळ देऊ इच्छित होता.
अभयला क्रिस पूर्ण सुख सुविधा देत होता. आणि सोबतच त्याची काळजी घ्यायला व संस्कार द्यायला त्याचे आजी आजोबा होतेच. सारेच त्याला खुप प्रेम देऊ लागले.
अभय तीन वर्षाचा झाला. पुढील काही वर्षात त्याला शिक्षण देण्याचे होते. त्याआधी क्रिस त्याला खूप माहिती देत होता. चांगल्या गोष्टी गिरवत
होता. पण एकदा त्याच्या लक्षात आले की, अभय खेळता-खेळता त्याला गाडी(खेळणीतली)हवी होती. जी त्याच्यापासून जरा दूर होती. अभयने त्या खेळणीला हात पुढे करून त्याच्याकडे बघू लागला. त्याने मान, हात आणि खेळणी सरळ रेषेत आणले, आणि पुन्हा लक्ष केंद्रित करू लागला. लगेच ती खेळणी त्याच्याकडे ओढत आली आणि अभय त्याने खेळू लागला. क्रिस हे दृश्य बाघून थक्कच झाला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED