ब्रह्मांडापालिकडे हे प्रेम Utkarsh Duryodhan द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ब्रह्मांडापालिकडे हे प्रेम

टिप- येथील 'parallel universe' चा कन्सेप्ट हा अश्याप्रकारे सांगण्यात आलेला आहे की, आपल्या पृथ्वीसारखी पुन्हा एक अशीच पृथ्वी आपल्यापासून billion light years दूर आहे. सामान्य माणूस एवढ्या दुर आजच्या काळात तरी जाऊ शकत नाही, पण मेल्यानंतर मारणारायांची आत्मा तिथे जाऊ शकते. तिथेही आपल्यासारखेच लोक आणि सर्वच सारख असतं फक्त आपल्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. आणि आत्मा आठव्या परिमाणात प्रवेश घेते, जोपर्यंत शरीर काम करत आहे. कथा कडायला जरा कठीण आहे पण लक्ष लावून वाचा नक्की कळेल.



                        विजय मुंबईच्या एक नावाजलेल्या कंपनीत काम करत होता. प्रत्येक वेळी त्याचे प्रमोशन पक्केच असायचे. कारण तो तसाच मेहनती होता. त्या कंपनीतील प्रत्येक गोष्ट त्याच्याच हाताखाली होती. त्याच्यावर त्याच्या बॉसचाही दबदबा न्हवता. कारण कोणत्याही बॉसला एवढे मेहनती असलेले लोक आपल्या वागण्याने कंपनीला सोडून, त्याला गमाविणे कोणत्याही हलातीत मंजूर नसेलच. आणि विजयचे काम म्हणजे कमी वेळात आणि परफेक्टच असे. त्याचा ह्या शैलीमुळे बाकीचे तिथे काम करणारे, त्याच्याकडून सल्ला घेत, त्याच्यासोबत खूप आदराने आणि सन्मानाने वागत. त्याने ही इज्जत अथट परिश्रमाने, आणि खूप वर्षाच्या मेहनतीने कमावलेली होती. त्याच्याच सारखी एक मुलगी, खूप मेहनती होती. तिचे नाव नताशा. तल्लखबुद्धीची, पण तिला आपल्या कामपूरते काम आवडत असे. तिला प्रमोशन, पगारवाढ, बाजूच्यालोकांची रिस्पेक्ट याबद्दल तिला काहीही लेनदेणं  न्हवते. पण विजयला तिचा हाच स्वभाव खूप आवडत होता. तो तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्नात होता, तेही आतापासूनच नाही तर खूप आधीपासून. ह्याबद्दल तिलाही ठाऊक होते, म्हणजे तिलाही तो आवडू लागला होता, त्याचा मनमिळावू स्वभाव, लोकांना जोडण्याची कला, आणि त्याचा हसरा स्वभाव बघून तीही इंप्रेस होतीच, फक्त तिला आपल्या कामात गुंतून राहता यावे म्हणून ती त्याला इग्नोर करत होती. पण तीही आपल्यावर प्रेम करते, हे विजयला चांगलेच ठाऊक होते. फक्त तिला प्रपोस करायसाठी चांगल्या वेळेची वाट बघत होता. 
                        सर्वत्र ठीक चालू होते, एवढ्यात ऑफिस मध्ये नव्या म्यानेजरची निवळ करण्यात आली. आधीचा म्यानेजरला लकवा मारल्यामुळे त्याला लगेच इस्पितळात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरानी त्याला पर्मनंट बेडरेस्ट साठीच सल्ला दिला. म्हणून एवढ्या लवकर नव्या म्यानेजरची निवड करणे खूप कठीण काम होते कारण कंपनीचे सारे हक्क बॉस नंतर म्यानेजरची हातात असल्याने, ही पद फक्त विश्वासु माणसाकडे सोपवून देने बरे.. असे बॉसला वाटू लागले. त्याच्याकडे म्यानेजरच्या पदी निवड करायसाठी दोन ऑपशन होते, एक विजय, जो ऑफिसमधून खूप मेहनती आहे, ज्याच्यावर सर्वांचा विश्वास आहे,  आणि दुसरा म्हणजे बॉसचाच भाचा ज्याने आधीही इथे काम केलेले होते, फक्त म्यानेजराच्या पदासाठी बॉसकडे विनवणी केली, पण त्या वेळी काही कारणाने त्याला म्यानेजर बनावता आले नाही. आपल्या नात्यातलाच असल्याने त्याच्यावर बॉसने विजयपेक्षा जास्त विश्वास  ठेवला, आणि त्याला म्यानेजरच्या पदी काही प्रोसेस न कारता निवड केली. याबद्दल विजयला काहीही हरकत न्हवते, कारण त्याच्याकडे साऱ्या त्या गोष्टी होत्या जे प्रत्येक तिथल्या लोकांनी फक्त आपल्या स्वप्नातच बघितलेले असावे.
                       नाव- अर्णव, उच्चशिक्षित, तल्लखबुद्धीचा, स्वाभिमानी, पण पैश्यांचा घमंड. त्याला जीही गोष्ट आवडायची तो ती गोष्ट घेतल्याशिवाय सोडत न्हवता, त्यासाठी त्याला पैसे द्यावे लागले तरी चालेल, रक्त बाहवं लागलं तरी चालेल, पण ती वस्तू दुसऱ्याच्या हातात जाऊ द्यायची नाही, बस्स! त्याची एन्ट्री ऑफिस मध्ये झाली. त्याचा रुबाब बघून सारेच थक्क. काळ कोट, त्यावर काळा चष्मा, कानात ब्लुटूथ धाडदधिप्पाड शरीर, सारच आकर्षित होत. तो आपल्या केबिन मध्ये बसला. त्याचे केबिन पूर्णतः काचेचे, जेणेकरून म्यानेजर चे सारे लक्ष सर्वांकडे असावे म्हणून! तो कोणासोबतही न बोलता, आपल्या कामी लागला. काम करता-करता त्याचे लक्ष नताशा कडे गेले. ती चष्मावर खूप सुंदर दिसत होती. तिचे कामावरचे लक्ष बघून तो तिच्याकडे आकर्षित झाला. तो तिच्याकडे बघू लागला. त्याला बघायचे न्हवते पण तो पुन्हा पुन्हा तिच्याकडे आकर्षित होत होता. पण तिचे ह्यांच्याकडे काही लक्ष न्हवते. ती आपल्या कामात व्यस्त होती. तो तिला पुन्हा पुन्हा बघत होता. त्याला ती आवडली होती. त्याने तिला आपल्या केबिन मध्ये बोलविले. त्याने तिला विचारले की, इथे केव्हापासून काम करत आहेस?, त्यावर ती उत्तरली, मी पाच वर्षांपासून इथेच आहे. का काय झालं?
 त्यावर अर्णव म्हणाला, काही नाही, तू एवढी मन लावून काम करत होतीस ना, माझे तुझ्यावर लक्ष होते, पण तुला आपले काम प्रिय वाटते का?, म्हणजे तुला नाही वाटत की, कधीतरी आपण ह्यापुढेही जायला हवे, स्वतः म्यानेजर बनून काम सांभाळावे, अस कधीं नाही वाटलं काय तुला?
 त्यावर ती म्हणाली, नाही! मला जे काम आवडते, ते मी करतेच त्यात कुठलाही उच्च नीच बघात नाही. आणि माझे काम कुणालातरी करावेच लागेल ना!
तो म्हणाला, वा!! तुझ्यासारखेच जिद्दी, मेहनती आणि आपुलकीच्या लोकांची ह्या कंपनीत गरज आहे. प्राउड ऑफ यु! जा कर आपली कामे, आणि हो मला तुझी फाईल  बघायला खूप आवडेल, दाखवशील काय?
 त्यावर ती म्हणाली, हो सर का नाही, आत्ताच आणते मी.
                             ती फाईल घेऊन आली. त्याने फाईलवरून तिचे नाव जाणून घेतले. सोबतच तिचा पत्ता आणि तिचा फोन नंबर. त्याने तिच्या घराच्या समोरच नवीन फ्लॅट घेतला लगेच. आणि एक माणसाला सामान शिफ्ट करायला सांगितले. तो पूर्ण चान्स मारत होता तिच्यावर. पण त्याला हे माहीत न्हवते की, विजय आणि नताशाचे प्रेम वाढत होते, आणि त्याची एन्ट्री उशिरा झालेली होती. तो धरूनही तिच्या घराकडेच लक्ष ठेवत होता. त्याने आपली कार आपल्या जुन्या घरीच ठेवली, आणि ऑफिस साठी तिच्या कारने लिफ्ट मागून येत होता. तिथेही तो तिला फ्लर्ट करत होता. तो जोक मारण्यात खूप माहीर होता. आणि नातशाला जोक ऐकण्यात! दोघांची जुगलबंदी जमत होती. 
                             एकदा असेच बोलता बोलता, तिच्या तोंडून विजेची गोष्ट निघाली. तिने त्याच्याबद्दल आणि त्याच्याबद्दलचा तिच्या भावना सांगितल्या. पण त्याला काहीही फरक पडला नाही. कारण तो तिला खूप पसंत करू लागला होता. त्याला कुठल्याही किमतीत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे होते. त्यासाठी तो कुठल्याही हद्द पार करायला तैयार होता. आणि विजय ने अजून तिला प्रपोज केला नाही म्हणजे आपला चान्स लागणे काही मोठी गोष्ट वाटत न्हवती. तो ऑफिस मध्ये तिलाच कामावर बोलावत होता, कुठलेही काम असो तिलाच बोलवू लागला होता. बोलविल्यानंतर आपल्या मनोरंजक वाणीने तिला अडकवून ठेवत होता.तिलाही ह्याचा स्वभाव आवडू लागला होता. 
                              ही गोष्ट विजयच्या कानावर पडली. त्याला ह्याचा डाव समजू लागला होता. पण तो काहीही करू शकता न्हवता, कारण आता तो त्याचा बॉस होता. एकदा त्याने ह्याबद्दल विचारले की नेहमी तिलाच का बोलावत, ह्या ऑफिस मध्ये दुसरेही लोक आहेत, त्यांना का नाही? 
                              त्यावर अर्णव म्हणाला, तुला काय प्रॉब्लेम आहे, मी कुणालाही बोलावू, बॉस मी आहो. आपले काम कर, नाहीतर नोकरीतून काढून टाकीन.
                              त्याची ही धमकी ऐकून तो पुन्हा त्याच्याकडे गेला नाही, करण त्याला आपल्या नोकरीपेक्षा नातशाची जास्त काळजी वाटू लागली, कारण जर नोकरीतून काढले तर हा बॉस तर बिनधास्त होऊन तिच्यावर नजर टाकून राहील, ती हातातून जाऊ नये म्हणून त्याने बॉससोबत बोलणे टाळले. विजयने तिला प्रपोज करायचे ठरवले. तो रिस्क घेऊ इच्छित न्हवता, म्हणजे जर आता प्रपोज केले नाही तर, त्याने माझ्याआधी तीला प्रपोज केले तर माझी एवढ्या दिवसाची मेहनत वाया जाईल. म्ह्णून त्याने दुसऱ्या दिवशी तिला प्रपोज करायचे ठरवले.  तो पूर्ण तैयारीत होता. तो आधीच ऑफिस मध्ये जाऊन तैयार! रोजाच्या टाइमावर ते दोघेही आलेत. त्याने अर्णवच्याच देखता, तिला प्रपोज केला. तिला ह्या सरप्राईज बद्दल काहीही माहीत न्हवते. तिला खूप आनंद झाला, कारण ती त्याच्यावरही प्रेम करत होती. तिने त्याला लगेच होकार दिला. विजयला वाटले, आता बस्स झाले. आता तो बॉस काही आपल्या बंधनात येणार नाही. ते दोघेही हा खास दिवस सेलिब्रेट कारू लागले. 
                              पण इकडे अर्णवचा राग आस्मानापर्यंत. तो इकडे काही वेगळीच डाळ शिजवू लागला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांच्या पगाराची तारीख होती. त्याचे सारे म्यानेजमेंट अर्णवच्या हातात होते. त्याने सर्वांचे पगार बरोबर दिलेत, फक्त विजयच्या पगराचा फक्त अर्धा हिस्साच दिला. विजयला हे कळल्यावर त्याने ह्याचा जाब अर्णवकडे मागितला. त्यावर तो म्हणाला, ह्या महिन्यात तुझे काम काही बरोबर दिसले नाही. आणि ऑफिस मध्ये दुसऱ्याला डिस्ट्रुब करून काय साबीत करून दाखवायचं होतं तुला? हे गार्डन नाही आहे, ऑफिस आहे. 
                              विजय ह्यावर काहिही बोलला नाही. पण त्याला पूर्ण पगार पाहिजे होते. त्याने उलट ह्या महिन्यात जादा काम केलेले होते. त्याने ही बाब मोठ्या बॉसला सांगितली. मोठ्या बॉसने ह्याची पहाणीशी केली असता, विजयने असे काम केलेले होते की, त्याचे प्रमोशन व्हावे. पण उलट त्याचा अर्धा पगार कापणे ही बाब दुर्दैवी होती. मोठ्या बॉसने दुसऱ्या दिवशी मिटिंग बोलावली ऑफिसमध्ये. अर्णव घरी येऊन नताशासाठी खास तैयारी करून ठेवलेला होता. त्याचा इरादा नातशाला प्रपोज करायचा होता. त्याने तिला घरी बोलाविले. आणि म्हणाला, हे बघ मला तू खुप आवडली आहेस. मला वाटते मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. प्लीज त्याला सोडून माझ्याकडे ये. नाही, मी काही स्वार्थी नाही. पण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, आणि हो मी ह्या कंपनीचा मालक आहे त्याच्यापेक्षा जास्त सुखी ठेऊ शकतो तुला. जरा माझ्या बोलण्यावर विचार कर आणि माझ्यावर विश्वास ठेव, तुला खूप सुखी ठेवील, एखाद्या परीप्रमाणे. 
                              त्यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. त्याला म्हणाली, मला जरा विचार करायला वेळ हवी. असे म्हणून ती घरी आली. ती दोनही बाजूने फसली होती. कारण तिला अर्णवही आवडू लागला होता. एकीकडे लॉंग रिलेशनशिप आणि दुसरीकडे शॉर्ट बट स्वीट रिलेशनशिप! आणि दोघांनाही होकार देणें शक्य न्हवते. ती रात्रभर हाच विचार करू लागली की कुणाला होकार देऊ आणि कुणाला रिजेक्त करू?
                              दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मिटिंग होती. सारे लोक जमा झालेले... त्यात नताशा अजूनही विचारात बुडालेली. तिला कोणावरही अन्याय होऊ द्यायचा न्हवता. कारण दोघेही आपल्याच ऑफिसातले. जर त्यांच्यातील एकावर मी अन्याय केला तर तो मला जीवनभर माफ करेल काय? हाच विचार करत होती. तेवढ्यात मोठा बॉस आला. त्याने विजयचे कारनामे सांगितले. त्याच्या मेहनती, जिद्दी, आणि चिकाटीवरून त्याने त्या कंपनीचे नाव उच्चाकवर नेलेले होते. त्यासाठी त्याला आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रमोशन देण्यात आले तेही अर्णवच्या हातातून. अर्णव रागाने लालबुंद झालेला होता. तेवढ्यात विजय आपले दोन शब्द मांडायला आला. त्याने म्हटले की, तुम्हाला खाली खेचायला खूप लोक येतील पण आपण त्यांच्याच खांद्यावर पाय ठेऊन यशाची पायरी उभी करू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो. त्याच्या ह्या व्यक्तव्यवर सार्यांनी टाळ्या वाजविला. पण सार्यांना समजले विजयला कुणाला टार्गेट करायचे ते! पण त्याच्या ह्या बोलण्याने अर्णव पुन्हा खूप रागावला. त्याने मनात एकच विचार केला, साम, नाम, दंड, भेद!
                              सारे लोक कामाला लागले. अर्णवही आपल्या केबिनमध्ये गेला. त्याने रागातच विजयला आपल्या केबिन मध्ये बोलावले. त्याला म्हणाला, नताशाला विसरून जा! ह्यातच तुझी आणि तिची भलाई आहे. ती तुझ्यावर खोटं प्रेम करते. पण माझा पैसा बघून आता ती माझ्यावर जास्त प्रेम करू लागली आहे. 
                              ह्यावर विजय म्हणाला, होका? खरच? तिला बोलावू काय? तिलाच विचारून घेऊ की ती कोणावर प्रेम करते ते! आणि हो आता तुमच्या पगारात आणि माझ्या पगारात जास्त फरक राहिलेला नाही, म्हणून पैश्यांचा रुबाब माझ्यापुढे दाखवू नाका! आणि नताशा फक्त माझी आहे,  तिला माझ्यापासून कुणीही दूर करू शकत नाही. 
                              अर्णव, तुझा अंतकाळ जवळ आला आहे. एवढे बोलून त्याच्या जवळच असलेल्या एक लोखंडी वस्तूने त्याच्या डोक्यावर जोरदार हल्ला चढविला. त्याचा मारा एवढ्या जोरात होता की, तो जागेवरच बेशुद्ध पडला. एका कर्मचाऱ्याच त्यावर लक्ष जाते, आणि विजयला इस्पितळात नेल्या जाते. तो वार एवढ्या जोरात होता की डोक्याचा मोठा भाग ड्यामेज होतो, आणि तो कोमात जातो. एवढ्यात त्याची आत्मा त्याच्या शरीराच्या बाहेर येते.
                              
                               त्याला वाटते की मेल्यानंतर आत्मा बाहेर आलेली आहे. पण तो म्हणत असतो, मला जगायचे आहे. ICU च्या बाहेर सारे लोक त्याला दिसत होते. भीतीपालिकडेही. सार स्वप्नासारखं होतं, सुंदर. फक्त काही त्याला सेन्स न्हवत, स्पर्षं नव्हत, होता तो फक्त सुंदर अनुभव आणि पुढे होता स्वतःचाच शरीर बेजाण पडलेलं. तेवढ्यात त्याचे लक्ष एक माणसाकडे जाते. तोही त्यांच्यासारखाच डोळे मिटलेला, तपस्या करत असलेला. तो त्याच्या जवळ जातो, त्याला जाणवते की, त्याला आता चालायची गरज नाही.तो उडतही जाऊ शकतो. विजयची आत्मा त्याच्या जवळ येताच, तो म्हणतो. तुला तिथे जायची किल्ली हवी? ह्यावर विजय म्हणतो, काय म्हणत आहे तुम्ही महाशय?, आणि तुम्हीही मेलेले आहेत काय माझ्याप्रमाणे? 
                               ह्यावर तो म्हणतो, तू कुठे मेला आहेस? ते सार सोड, आणि माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐक! तू तिसऱ्या परिमाणातुन आठव्या परिमाणात आला आहेस (from third dimention to eight dimention). मी एक साधू आहे. मी माझ्या शरीरापासून मुक्त होण्यासाठी तपस्या करत आहे. मला तुझी जाण आहे. तू विजय, तुला अर्णवने काही तासापूर्वी मारले. तू ती बाहेर असलेली नातशावर प्रेम करतोस. फक्त तूच नाही तर अर्णवही तिच्यावर प्रेम करतो. म्हणून त्याने तुला मारले आहे. आता तुला पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करायची इच्छा बाळगत आहेस. पण हे एवढं सोपं नाही.
                               विजय म्हणाला, तुम्हाला एवढं सगळं माझ्याबद्दल कास काय माहीत?
                               तो साधू म्हणाला, फक्त मलाच नाही माहीत, तुलाही माझ्याबद्दल माझ्याएव्हढेच माहीत आहे. फक्त माझ्यावर ज्ञान केंद्रित कर! लक्ष लाव माझ्यावर!
                               विजयने तसेच केले आणि म्हणाला, तुम्हीं महावरतो साधू आहेत. आपण तपस्वी आहेत. तुम्ही एका पाहाडावरून खाली पडले, आणि कोमात गेले. आपण दोघेही आठव्या परिमाणात आहोत. आपल्याकडे फक्त काही वेळ शिल्लक आहे पुन्हा तिसऱ्या आयमात प्रवेश करायला. जर ह्या वेळात काही केले नाही तर आपण दहाव्या परिमाणात प्रवेश करू, जे मृत्यनंतर जातात. आपण नंतर कधीही तिसऱ्या परिमाणात जाऊ शकणार नाही. आपण पूर्ण भुतकाळ बघू शकतो,  जाणू शकतो, पण भविष्याची कल्पनाही करू शकत नाही. नवव्या आयाम भविष्यात घेऊन जातं, पण आपलं सारं अस्तित्व मिटवून देत. आत्ताच आणि आधींचाही. (बाहेर उभी असलेली नताशाला बघून) ती माझ्यावर आणि अर्णववर सारखच प्रेम करते. पण आता तिला फक्त माझी काळजी लागलेली आहे. तिला कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही आहे. मी इथल्या कुठल्याही वास्तूला हात लावू शकत नाही, मग मी पुन्हा आपल्या शरीरात कसे प्रवेश करणार? एवढे सांगा साधू...
                               साधू, मी घोर तपस्या करुन हे जाणले की, आपण पुन्हा शरीरात प्रवेश कसे करू शकतो?..  तर मला कळले की, ह्याचा फक्त एकाच मार्ग आहे. तुला समांतर ब्रह्मांडात(parallel universe) मध्ये जावं लागेल. तिथे तुझ्या समांतर प्रतिमेला आपल्या पृथ्वीवर आणून त्याला अर्णवला मारण्यास प्रेवृत्त करावं लागेल. मृत्यूच्या बदल्यात पुनर्जीवित! 
                               मी तुझ्यासाठी तिथे जाण्याचा मार्ग तैयार करू शकतो. साधूने वर बघत दोनही हाताने वर्तुळाकार एक मार्ग बनविला, जो वॉर्महोलच्या द्वारे शॉर्टकट दोन ब्रह्मांडाला जोडण्याचे काम करते. विजय त्या मार्गाने गेला. काही क्षणातच तो समांतर ब्रह्मांडाच्या पृथ्वीवर आला. तो त्याच दवाखान्यात आला. पण तिथे त्याचा समांतर प्रतिमा न्हवती. पण तिथे सारं आपल्यासारखाच होतं, सार आपल्याच पृथ्वीसारख भासत होत. तो तिथे जणू जीवंत होता, कारण सारे त्याला भासु शकत होते. तो सरळ ऑफिसकडे रवाना झाला, जिथे त्याचे काम होऊ शकेल. ऑफिसमध्ये गेल्यानंतर कळले की, तिथल्या त्याच्या प्रतिमेने नताशाला प्रपोज केलेलं होतं. तिने होकार दिलेलं होतं, काही दिवसांत लग्नही करणार होते. तिथला अर्णव खूप लाजाळू, साधा, सरळ आणि प्रेमळ होता. त्या ऑफिसातले सारे लोक त्याला देवमाणूस मानत होते. विजय आपल्या प्रतिमेपुढे आला. तो एक नंबरचा आळशी, कामचोर, आयत्या होता. विजयने आपली कहाणी मांडली. पण त्याची प्रतिमा त्याची मदत करायला मुळीच तैयार न्हवता. कारण तो स्वार्थी होता, त्याला ह्याचा मोबदला हवा होता. पण विजयकडे खूप कमी वेळ उरलेला होता, त्यात त्याला आपल्या प्रतिमेला आपल्या पृथ्वीवर आणून अर्णवचा खून करवायचे होते. म्हणून त्याने एक शक्कल लढवली, तो म्हणाला, जर तू माझी मदत केली नाहीस तर मी जेव्हा मरेल त्याच वेळी तुझाही मृत्यू होईल.
                               विजयाचे हे बोलणे ऐकून, त्याला भीती वाटली. तो लगेच विजयसोबत जायला तैयार झाला. विजय त्याला घेऊन इस्पितळात गेला जिथून तो आला होता. तिथे वर्महोलचे द्वार होते. तिथून ते परत पृथ्वीवर आलेत. इथे आल्यावर साधू म्हणाला, लवकर जाऊन अर्णवला मार, तुला ठाऊक आहे अर्णव कुठे आहे ते!
                               विजय त्याला घेऊन सरळ पोलीस कस्टडीत घेऊन गेला. तिथे अर्णव खाली एकटाच बसलेला होता. तो विजयला बघू शकत न्हवता पण दुसऱ्या पृथ्वीच्या विजयला नक्कीच बघू शकत होता. अर्णवने त्याची माफी मागितली. पण त्याने सोबत आणलेल्या रोडने जोरदार वार केले. त्यात तो बेशुद्ध झाला. ते इस्पितळात परतले. त्याच्या प्रतिमेला पुन्हा आपल्या ग्रहावर जाण्याचा मार्ग दाखविला. पण एवढा वेळ होऊनही विजयला आपल्या शरीरात प्रवेश घेता येत न्हवते. त्यांना कळलं की अर्णवही त्याच इस्पितळात भर्ती झाला होता आणि तोही कोमात आहे. एवढ्यात त्याची आत्माही, आठव्या आयामात प्रवेश घेते. दोघेही एकमेकांच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही, पण आत्माला मात्र करू शकतात. विजय घाईघाईने अर्णव मेलय की नाही ह्याची पुष्टी करायला विसरला. आता पुन्हा परत त्याच्या प्रतिमेला आणता येणार नाही. कारण एक जीव तिथून फक्त एकदा प्रवेश करून परत जाऊ शकतो, पण पुन्हा नाही. आता फक्त लढाई करूनच आपल्या शरीरात प्रवेश करू शकणार होते. दोन आत्माची लढाई, (survival for existance). त्यांच्यातील फक्त एकच जगू शकत होता कारण जसे वाघाच्या आणि हरीणाच्या लढाईत फक्त एकच जिंकू शकतो आणि दोन वाघांच्या लढाईत एका वाघिणीसाठी फक्त एकाच पात्र ठरू शकतो. ही लढाई होती निसर्गाची, त्यागाची, प्रेमाची... दोघेही लढू लागले. एकमेकांना मारू लागले. तिसऱ्या परिमाणात ह्याचा काहीही असर होत न्हवता. पण आठव्या आयामात एक हडपंप आलेलं होत. 
                               तपस्वीला हे मुळीच मान्य न्हवतं. तो नताशाकडे गेला. तो सहाव्या परिमाणात येऊन सारा घडलेला प्रकार सांगितला. त्याने ह्या सर्वांची जबाबदार तिला मानलं आणि ह्यापुढचा निर्णय घ्यायला तिलाच सांगितलं. ती काही वेळ विचार करत राहिली. अचानक तिने रडतच इस्पितळात असलेल्या चाकूने आपला डावा हात कापला. काही वेळातच ती बेशुध्द पडली. तिलाही तिथेच एडमीट करण्यात आले. तिच्या आत्मानेही आठव्या परिमाणात प्रवेश घेतला. तिने विजयचा मेंदू वाचला. तिथे तिला जाणवले की, parallel युनिव्हर्स मधला विजय आळशी, कामचोर, आणि अमेहनती आहे, जे ह्या नियमात होते. अर्णव साधा-भोळा, मेहनती आणि अस्वार्थी आहे, हेही नियमानुसार होते. दोनही युनिव्हर्स मध्ये वेगळं, पण तिने तिथल्या नताशाचा अभ्यास केला. तिला जाणवले की आपल्यात आणि तिथल्या नताशात कुठलाही फरक जाणवला नाही. हे नियमबाह्य होत. ती पुन्हा विचार करू लागली की असे कसे शक्य आहे? दोनही ब्रह्मांडातील एकच लोक एकाच विचाराचे कसे काय राहू शकते? 
                               नताशाला आपल्या प्रतिमेच्या भविष्यात जायचे होते, तिचे भविष्य बघायचे होते. तिने साधूला असे होऊ शकते काय विचारले. साधूने असे शक्य आहे हे सांगितले आणि तिच्यासाठी तिथल्या भविष्याचा द्वार खोलून दिला. ती तिथे गेली. ती तिथल्या नताशाकडे गेली. तेव्हा तिचे लग्न विजयसोबत झालेले होते. पण तिथे विजय पुन्हा बिघळलेला होता. तो दारुडा झाला होता. त्यांना मुलंही झाले न्हवते. तो तिला मारत होता, तिचे छळ करत होता. विजयची नोकरीही गेली होती. त्याने जुगारात नातशाला लावले होते, आपल्या स्वार्थासाठी आणि तो तिला हरलेला होता. तो तिला त्यांच्या हातात लावण्याच्या तैयारीत होता. तिथल्या नताशाला पश्चात्ताप झाला होता की, तिने अर्णवला होकार का नाही दिला. तर आज ती आनंदी राहिली असती. 
                               Milkyway ब्रह्मांडातली नताशा parallel ब्रह्मांडातल्या नताशाची समज काढू लागली. नताशाने तिला सांगितले की, तिनेही हातावर घाव करून घे.  तिथे तिला मरू दिले, आणि तिच्या आत्माला तीने तिला आपल्या पृथ्वीवर आणले. इथे आल्यावर तिला नवीन शरीर प्राप्त झाले. आणि इथे नातशाचे आपले मिशन पूर्ण केले आणि आपल्या शरीरात प्रवेश घेतला. इथे विजय आणि अर्णव आताही लढत होते. साधूने त्यांना थांबविले. आणि आपल्या शरीरात प्रवेश घेणास सांगितले. त्यांना कळलं की नताशाने समांतर ब्रह्मांडातून दुसऱ्या नातशाला आणले. कारण आम्ही दोघेही जीवन जगावं म्हणून. नताशा तिच्या प्रतिमेला म्हणाली, तुझ्यासाठी नवीन जीवन अर्णव सोबत.

Women are very powerful...


(कथा ही काल्पनिक आहे. )



उत्कर्ष दुर्योधन लिखीत...