Apharan aani khun ! books and stories free download online pdf in Marathi

अपहरण आणि खून !

मिडल क्लास फैमिली बद्दल काय सांगायचं? आपल्यासारख्याच मिडल क्लास मधला एक मुलगा हर्षल, ज्याची नुकतीच बारावी झाली. एका नावाजलेल्या B.Sc कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. हर्षल तास बेधडक, हुशार, पण जर लाजाळू होता. कोणासोबत झालेला अन्याय त्याला सहन होत नसे. कोणावर दुरव्यवहार होत असेल तर तो खूप आक्रमक व्हायचा. पण पालकांचा प्रेमामुळे आजपर्यंत त्याने कुठलेही वाईट निर्णय घेतलेला न्हवता.
                   सोबतच्या काही मित्रांचा कट-ऑफ मुळे नंबर लागू शकला नाही, पण त्याचा खास दोस्त अमनला मात्र त्याच कॉलेज मध्ये हर्षलच्याच ब्रँचमध्ये ऍडमिशन मिळालं. दोघेही लहानपणीचे मित्र. हर्षलसारखाच अमनही हुशार, संस्कारी, प्रेमळ मुलगा, फक्त मनाने नाजूक. तो लहान-सहान गोष्टीलाही घाबरत असे. हर्षल सोबत असल्याने काही प्रमाणात तरी त्याची भीती कमी झालेली होती.
                   कॉलेजचा एक महिना जरा कठीणच गेला. नवीन शिक्षक, नवीन मुले, वेगळं वातावरण यांना समजायला जरा वेळच लागला. पण आनंदाची बाब म्हणजे, पाच ते सहा मुलं-मुली ह्यांचे मित्र झाले, याचे कारण ह्या दोघांचा प्रेमळ स्वभाव. ह्यांनी आपला एक वेगळाच ग्रुप तयार केला. ज्यात प्रत्त्येक समस्यांचे निवारण एकमेकांच्या सहवासात करत. त्यामुळे अभ्यासाची काही चिंताच न्हवती. रोज चालू अभ्यासक्रम समजून आणि एकमेकांना समजावून, करून घेत असत. ज्यामुळे ह्यांना वेगळी शिकवणी लावाची गरजच नाही पडली. अभ्यासाव्यतिरिक्त बाकीचा वेळ मौजमजेत घालवायचे.
                   असेच हसत खेळत दिवस जात होते. पहिला सेमिस्टर सर्वांचा क्लिअर झालेला होता आणि अख्या वर्गातून पहिल्या दहा विद्यार्थ्यांतुन ह्याचाच नंबर होता, म्हणून हे सर्वच आनंदी होते. ह्यांच्या सोबत ह्या सर्वांचे पालकही अभ्यासाच्या बाबतीत भयमुक्त झालेले होते. आता मौजमजेचा वेळही वाढलेला होता. प्रत्येक रविवारी कुठणकुठं फिरणं व्हायचंच. सर्वांच्या पालकांना आपल्या पाल्यावर पूर्णपणे विश्वास होता की, हे कुठल्याही वाईट मार्गाला लागणार नाही. कारण ते सर्व मुलं तसेच प्रामाणीकही होते. त्यांना बऱ्या-वाईट गोष्टींची समझ आलेली होती.
                   ख्रिसमस मजेत गेलेला होता. आता नव्या वर्षाची प्लॅनिंग करू लागले होते. नवीन वर्षाची पार्टी त्यांच्याच ग्रुप मधल्या अंजली नावाच्या मुलीच्या घरी अरेंज करायची ठरलं. दोन सदस्यांनी आपल्या घरचे होम-थिएटर आणले आणि एकमेकांना कनेक्ट केलेत, जेणेकरून आवाज जास्त येईल आणि पार्टीही चांगल्या प्रकारे एंजॉय करता येईल. अंजलीच्या आईने सर्वांसाठी खाण्या-पिण्याचा बंदोबस्त केला. रात्री अकरा वाजता सर्व एकत्र जेवण करून गच्चीवर गेलेत . सर्वांकडून पैसे गोळा करून अमनने फटाक्यांचा बंदोबस्त केला होता. फटाके फुटायला तयारच होते, फक्त बारा वाजयची आतुरतेने वाट बघू लागलेत. जसे बारा वाजलेत, सर्वात आधी ह्यांचा फटका फुटला, आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटू लागलीत. चारही दिशेने लोकांचे "HAPPY NEW YEAR" चा आवाज कानावर पडू लागला. इकडे हर्षलने होम थिएटरवर आपल्या मोबाईलचे संगीत लावलेत. झगमगणाऱ्या दिव्यांचा प्रकाशात सारेच गाण्याच्या तालावर नाचू लागले. एनर्जीसाठी बाजूलाच ज्यूसची व्यवस्था केलेली होती. सारेच घामाने बिथरलेले, पायाचे दुखणे चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागले पण कोणीही थांबायचा तयारीत न्हवता. सारेच एकमेकांना जणू उर्जाच देत होते.  रात्रीची दिड वाजलीत. आता कुणातही पुन्हा नाचण्याची ऊर्जा उरलेली न्हवती. म्हणूनच गाणी बंद करण्यात आली. सारे खाली बसून एकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देऊ लागलेत. ओरडुन-ओरडुन जवळपास सर्वांचाच गळा बसलेला. पण पुढे काय ह्याची सर्वांना चिंता वाटू लागली, कारण मजा करण्याच्या धुंदीत झोपण्याचा काहीही प्लॅन झालेला न्हवता. फक्त मुलींच पक्क ठरलं की रात्र अंजलीच्याच घरी काढायची. प्रश्न होता तो मुलांचा. अंजलीच्या घरी एवढ्या मुलांची सोय होईल इतकी पुरेशी जागा न्हवती. आणि मुलींच्या घरी झोपणं, मुलांनाही योग्य वाटत न्हवतं.  आणि सर्व मुलांचं घर एकाच रोडला, म्हणून सोबत सोबत एकत्र जायचा निर्णय घेतला. तशी अंजलीची आई झोपायला जागा करू लागली होती पण मुलांनी त्यांना सुरक्षित घरी जाईल असे आश्वासन दिलं.
                   सारी मुलं एकत्र निघाले. सुनसान रस्ता, एवढ्या रात्री वाहनांची शंकाच नाही. काही प्रमाणात भीती होती पण बोलत-बोलत ही भीतीही नाहीशी होत होती. आता सर्वांची घरे येऊ लागलीत. एक-एक मुलगा आपापल्या घरी जाऊ लागला. शेवटी फक्त अमन आणि हर्षलच उरले होते. त्या दोघांचं घर लागूनच, म्हणजे शेवटपर्यंत साथ मिळणार म्हटल्यावर भीती न्हवती. बोलता-बोलता त्यांना काही लोकांचा आवाज येऊ लागला. दोघेही विचार करू लागले, एवढ्या रात्री लोक? तरी ते न डगमगता पुढे चालू लागले, तसतसा आवाज आणखी येऊ लागला. आता ते लोक दिसू लागले होते. ते तिघे होते आणि त्यांच्याकडे एक कार होती. काही वेळातच त्यांनी अमन-हर्षलला बघितलं. ते एक दुसऱ्याला कसलीतरी इशारे करू लागले. ह्या दोघांनी त्यांच्याकडे जराही बघीतलं नाही. ह्यांना काही कडायच्या आत तिघांनी अमन आणि हर्षलला घेरलं. एकाने आपला चाकू काढला आणि एकाने आपली गावठी पिस्तूल. त्यांच्याकडच्या हत्यारांना बघून दोघेही घाबरून गेलेत. अमनने तर आरडाओरडा करायला सुरुवात केली. पण त्या गुंडांनी त्यांना बेदम मारलं. त्यांच्याकडच्या वस्तू घेतल्या आणि आपल्या कार मध्ये टाकून त्यांना खूप दूर निर्जन स्थळी डोळ्यावर पट्टी आणि हाताला दोरी बांधून एका काळ्याकुट्ट खोलीत कोडलं. त्यांच्याकडे असलेले बाराशे-तेराशे रुपये घेतले आणि ते खोलीला ताला मारून चालले गेले.
                   घरी अमन आणि हर्षलचे आई वडील फोन लावून लावून परेशान! शोधाशोध करूनही पत्ता न लागल्याने दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी लगेच श्वान पथकासाहित शोधमोहिम सुरू केली.  पोलिसांना वाटू लागलं होत की हे एक अपहरणाची केस आहे. पण ह्या दोघांच्या आईंचा मात्र रडून-रडून बेहाल.
                   दुसऱ्या दिवशी ते गुंड परत आलीत. त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढून त्यांच्या गालावर एक-एक बजावली. अमनचा तर भीतीने तोंडातून एक शब्दही येत न्हवता. मात्र हर्षलने हिम्मत करून त्यांना काय हवंय विचारलं. अमनची भीती बघून त्याला पुन्हा घाबरवत होते. त्यातील एकाने बाहेरचा इशारा केला, सारे बाहेर गेलेत. इशारा करणारा व्यक्ती दोघांना म्हणाला, "ह्यांच्याकडून पैसे कसे काढायचे?"
दुसरा म्हणाला, "ह्यांच्या बापाला फोन करून वीस हजार मागून घेऊत! वीस हजारासाठी कोणताच बाप नाही म्हणणार नाही."
पहिला, "नको आज-कालची पोलीस फोन ट्रॅक करून पत्ता काढतात म्हणे!, माझ्याकडे एक दुसरा प्लॅन आहे, चला आत."
                    आत येऊन त्याने आपली बंदूक काढली आणि पहिली गोळी हवेत उडविली. अमनचा भीतीने पाय थरथरू लागला. आता त्याने बंदूक अमनच्या डोक्यावर लावली, आणि अमनला म्हणाला, "चालवू का?"
अमनचा तर भीतीने अंगावर शहारे आलेत. तो रडतच, "नाही!" म्हणाला. नंतर त्याने हर्षलच्या डोक्यावर बंदूक लावली आणि अमनला पुन्हा विचारला,  " याला मारू काय?   "   
अमन रडत-रडत म्हणाला, "प्लीज सोडा ना, आम्हाला"
गुंड, "ठीक आहे, तुम्हाला एकाच शर्तीवर सोडतो, (अमनकडे बघत) तु इथून निघायचं कुठूनही वीस हजार जमवायचे (अमनला एक चिट्टी देत) पैसे घेऊन कालच्या जागी येऊन मला ह्या नंबरवर मिस कॉल द्यायचा, पण... कुणालाही कळता काम नये. तुझ्यावर माझी माणस त्या ठिकाणी लक्ष ठेऊन असतील जर तुझ्यासोबत दुसरा कुणीही दुसला तर तुझ्या यारची खैर नाही."       
                       अमनची दोर काढण्यात आली. डोळ्यावर पट्टी बांधून गाडीनेच त्या मागच्या रात्रीच्या जागी त्याला सोडून दिलं आणि ते निघून गेलेत. अमनने डोळ्यावरची पट्टी काढत विचार करू लागला की पैसे कसे जमवायचे. लंगडतच घराकडे आला घराकडे खूप गर्दी होती. तो कुणाची मदतही घेऊ शकत न्हवता. पण अमनच्या घराचा मागचा दार त्याच्या खोलीतून जातो म्हणून तो मागून कुणालाही भनक न लागू देता आपल्या खोलीत आला. आपल्याकडले पैसे जमा करू लागला. कसेबसे त्याला तीन हजार मिळालेत पण बाकीचे काय? रूमचा मेन दरवाजा हळूच खोलला, तर हॉल मध्ये खूप नातेवाईक जमली होती. तो भीतीपोटी दरवाजा बंद करून पुन्हा पैसे शोधू लागला, पण त्याच्या हाती काही लागत न्हवते. त्याचापुढे फक्त हर्षलचाच चेहरा येत होता तोही डोक्यावर बंदूक ठेवलेला. "बाहेर गेले तर पैसे मिळतील पण हर्षलचे प्राण जातील तेही माझ्यामुळे!" अमनच्या मनात खूप विचार येऊ लागलेत. आधीच तो नाजूक मनाचा, गुंडांनी ह्याच नाजूकतेचा फायदा घेत आपली चाल चालली, पण अमनला ओळखता आली नाही. आता तर अमनला गोळी चालण्याचा आवाज येऊ लागला. त्याला हर्षलची प्रेत चारही बाजूने दिसू लागले. तो जोर-जोराने श्वास घेऊ लागला. त्याला रडन राहवलं नाही तो मनात रडू लागला पण बाहेर आवाज जात होता. हॉलमधल्या लोकांनी प्रकार बघायसाठी दरवाजा उघडला. त्यांना अमन बेहाल अवस्थेत दिसला. अमनला कळालं "हे सारे आलेत आता हर्षलची खैर नाही, आपल्यामुळे आपल्या मित्रचा बाळी गेला, आपण खुनी!" असले विचार त्याच्या मनाला लागले, त्याच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. तो हा धक्का सहन करू शकला नाही. तो मनोरुग्ण झाला. पोलीस घरी आलीत, त्याची तपासणी केली, त्याच्या खिश्यात एक चिठ्ठी मिळाली, ज्यात मोबाईल नंबर होता. नंबरच्या माध्यमातून सिम कार्डचा पत्ता लावला. GPS ट्रॅक करून सध्याची त्या नंबरची लोकेशन मिळविली. त्या लोकेशनवर जाऊन त्या तिघांना अटक करून हर्षलची सुटका केली.
                       ह्या गोष्टीला दोन महिने झालेत. पण अमन काही त्या धक्क्यातून सावरू शकला नाही. अमन ऍडमिट असल्याने हर्षल एकटा पडला. अमन पुन्हा आपल्यात यावं अशी रोज प्रार्थना करत होता. रोज अमनला भेटायला हॉस्पिटलमध्ये जात होता.
                       हर्षल एकदा अमनला भेटून परत आल्यावर आपला अभ्यास पूर्ण करून चाय प्यायला जवळच एका दुकानात गेला. दुकानाच्या आत सिगारेटचा धुवा असल्याने बाहेरच दुकानदाराला चाय मागू लागला. तो चायकडे बघू लागला. मागून पुन्हा काही लोक आले आणि चाय मागितली. हर्षलने मागे काही बघितले नाही, पण ते कसल्यातरी विषयावर बोलत होते. हर्षलला आवाज जर ओळखीचा वाटू लागला. चाय बनविणाऱ्या भैयाच्या चष्म्यातून त्याला तीच माणसं दिसली ज्यांनी ह्या दोघांच अपहरण केलं. हर्षलचे पाय कापू लागले. चाय पीत विचार केला की, "ह्यांची सुटका काशी झाली?" त्यांचा कसल्यातरी गोष्टीवर चर्चा चालू होती, जे हर्षलच्या कानावर पडत होती. एक म्हणाला की, "आज जरा मोठा हात मारुया! म्हणजे पैसेही आणि जराशी मस्तीही, एक तिर से दो निशाण!"
दुसरा म्हणाला, "हो यार आपण चोरी केली, पण मनाची शांती आजपर्यंत आजमावली नाहीना."
तिसरा म्हणाला, "चला तर मग, आपल्या मागच्या गल्लीत खूप मुली जातात, तिथेच हात साफ करूत."         
                          ते तिघे निघू लागले. हर्षलला ह्यांची चाल कळाली, आणि शैतांनी वृत्तीही. त्याने लगेच पोलिसांना फोन लावले. पोलिसांकडून काही प्रतिसादात मिळाला नाही, ते खूप विचारपूस करत होते. त्याने फोन कट केला आणि एक जनरल स्टोर मध्ये जाऊन धारदार चाकुची मागणी केली. दुकानदाराकडे फळ कापायचे पण मजबूत चाकू त्याला दिलं. तो चाकू घेऊन हळूहळू त्याचा मागे-मागे जाऊ लागला. त्या वेळेस रात्रीचे साडे नऊ वाजले होते. तो विचार करू लागला, ज्यांनी माझ्या मित्राला मनोरुग्ण करून सोडले, आता दुसऱ्या शिकरवर निघाले आता ह्यांची काही खैर नाही असे म्हणत, रागा-रागात कसलाही पुढचा विचार न करता, बदल्याची, आणि सबक शिखवण्याची भावना ठेवत त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. त्यांनी एक मुलीला अडविले. आजूबाजूला कुणीही न्हवते. तिची ब्याग घेतली. कदाचित ती कामावरून आली असावी. ती मुलगी प्रतिउत्तर द्यायचा खूप प्रयत्न केला, पण ह्या गुंडांच्या मनातील जनावरापुढे ती खूप दुर्बळ पडत होती. हर्षलला आधीच खूप राग येत होता, आणि हे दृश्य बघून तो कशाचीही पर्वा न करता त्यांच्यावर चाकूने हल्ला चढविला. हर्षलला त्यांना ठारच मारायच होतं. जर इथून ते वाचले तर पुन्हा जेलातून सुटून असलेच धंदे करतील म्हणून हर्षल सपासप वार करत होता. ते तिघे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले. त्या तिघांचा खून हर्षलच्या हातून झाला.
                          हर्षलने केलं ते चांगलं केलं? कायदा हातात घेऊन दुसऱ्याची इज्जत, प्राण वाचवून तो स्वतः गुन्हेगार ठरला? आपल्या मित्राला न्याय देण्यास समर्थ ठरला? हर्षलला असे करायला हवं होत? असे खूप प्रश्न आपल्या मनात येतात.
                          हर्षलच्या केलेल्या फोन वरून पोलीस त्या जागेवर येऊ लागली. त्यांना सायरनचा आवाज येऊ लागला. त्या मुलीने पटकन हर्षलच्या हातात असलेला चाकू घेत त्याला म्हणाली, "तुझे एवढे मोठे उपकार हा गुन्हा आपल्या नावी करूनही फेळू शकणार नाही. मीच ह्यांचा खून केला, आपल्या बचावासाठी आणि आपल्या भावाच्या रक्षणासाठी मीच जबाबदार आहे. मला जास्त मोठा कारावास भोगावा लागणार नाही. पण तू माझा लहान भाऊ म्हणून मला कधीतरी भेटायला येशील ना? मला दोन बहिणी आहेत, पण मला आज एक लहान भाऊ मिळाला. फक्त ही गोष्ट आपल्या दोघात राहू दे, आणि वचन दे ह्यापुढे कुणाचाही खून करणार नाही, कायदा हातात घेणार नाही.
                          हर्षल, "वचन दिलं ताई!!"
                                  
हर्षलने न्याय केलं की खून?

उत्कर्ष दुर्योधन लिखीत...


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED