झोंबी - एक वर्चस्व Utkarsh Duryodhan द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झोंबी - एक वर्चस्व

जुलै, 2009,

                  अमोल- सॉफ्टवेर इंजिनियर, दिवाळीच्या सुट्या मिळाल्यामूळे आपल्या घरी परत यायचा विचार करू लागला होता, कारण एक वर्ष लोटला होता घराचं तोंड पाहिलं न्हवत. घर ऑफिसपासून दोनशे किलोमीटरवर, नेहमी बसने प्रवास करणारा पण आता नवी कार घेतल्याने त्यानेच जायची इच्छा दर्शवली, त्याच्या आईने त्याला बसनेच यायचा सल्ला दिला, पण हा आपल्या मतावर ठाम होता. त्याचा घरी फक्त तो आणि त्याची आईच राहायची, त्याचे वडील लहानपणीच वारले होते, त्याचा मोठा भाऊ, जवळच असलेल्या गावात पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होता. ते गाव रस्त्यातच असल्याने त्याला भेटूनच जावं असं त्याला वाटलं, याच इराद्याने आपले ऑफिसचे सारे काम आटोपून आपल्या घराकडे निघाला. त्या गावाच्या चारही बाजूला भले मोठे जंगल. रात्रीच्या वेळेस लोक तिथून प्रवास करायचे टाळत होते. पण अमोलने विचार केला, आपल्याकडे कार असल्याने सध्यातरी काही भीती नाही. 
                  रात्रीचे नऊ वाजले होते, अमोल एकटाच प्रवासाचा आनंद  घेत निघाला होता, आई त्याला वारंवार फोन करत होती, तो आईला 'काळजी करू नकोस' असेच उत्तर देऊ लागला. गाडी जरा वेगातच होती. पुढे रस्त्यावर  त्याला काहीतरी चमकल्यासारखे भासले, पुढे काहीविचार करायच्या आत गाडी त्या बारीक चमकणाऱ्या वास्तूवरून गेली. पुढे जाऊन कारचे चारही टायर पंचर झालेत. गाडी बंद करून तो मागे वळून बघितला तर तेथे काचेचे तुकडे पडलेले दिसलेत. अश्या परिस्थितीत काय करावे काही कळत न्हवते. पूर्ण रस्ता सुन्न होता, एकही गाडी दिसत न्हवती. पुढे बघितले असता, एक म्हातारी बाई बसून काहीतरी खात असल्यासारखे दिसू लागले, अमोल पुढे जाऊन बघता, त्या म्हातारीने हालचाल बंद केलेत. अमोल त्या म्हातारीला म्हणाला, "कोण आपण, काय करता आहात एवढ्या रात्री इथे?'" मध्येच त्याला, मागून कारकडे विचीत्र आवाज येत असल्यासारखे भासले, मागे वळून बघता, काही विचित्र दिसणारे लोक त्याच्या कारला ठोकपिठ करत दिसले, ते पूर्णपणे रक्ताने भरलेले होते, अमोलने पुन्हा त्या म्हातारीकडे बघायचा प्रयत्न करताच ती म्हातारी असल्याच अवस्थेत त्याचा एकदम पुढे येऊन हल्ला करायच्या आत अमोल बाजूला सरकला, त्यानं पुन्हा विचारले, "कोण आहात तुम्ही? आणि हे रक्त कसलं? तुम्ही माझ्यावर का हल्ला करताय?" हे वाक्य पूर्ण करताच त्याने जिथे ती म्हातारी बसलेली होती तेथे त्याचे लक्ष गेले, तिथे एक माणसाची खोपडी विद्रुप रुपात दिसली, त्याला हे काही बरं नाही वाटलं, त्याने पुन्हा तिच्याकडे बघायच्या आत तिने पुन्हा हमला केला, या वेळी त्याच्या गालावर नखाने खरचटले, तो काहीही विचार न करता तिथून पळ काढला. तो पळत सुटला त्याला काही सुचत न्हवते, पूर्ण जंगलभर तसलेच लोक दिसत होते, सारे त्याच्यावर हमला करायच्या तयारीत होत. कुणी धावत त्याच्यावर तुटून पडत होते, तर काही जागेवरच थांबून आपण त्यांच्याकडे यायची वाट बघत होते. काहींचे हात तुटलेले, काहींचे पाय, काहींचेतर डोळेही फुटलेले होते, तसल्याच रक्तबंबाळ अवस्थेत शिकारीची वाट बघत होते. तो जंगल सोडून पुन्हा त्या रस्त्याने धावू लागला. पुढे जाऊन त्याला एक गाव दिसले, रात्रीच्या अंधारात त्याच्या भावाचे गाव हेच का, काही कळत न्हवते, पण त्याच्या माहितीनुसार त्या रस्त्यात एकच गाव पडत होते. तेच गाव असावे ह्या आशेने तो त्याच मार्गाने पळत सुटला. 
                  गावात प्रवेश करताच त्याला ते गावातले लोकही तसेच दिसू लागलेत. तो कसलाही विचार न करता पोलिस स्टेशन गाठले. तिथले लोक अर्धवट पण जिवंत, आणि तसेच हल्लेखोर. अमोल आपल्या भावाला शोधू लागला. त्याला भीती होती की तोही असल्याच लोकांसारखं तर नाही झाला असेल ना? खूप शोधाशोध करूनही भावाचा काही ठाव ठिकाण लागला नाही. सध्या याला आपल्या जीवाची काळजी वाटू लागली. तो तेथील काही पिस्तूल, गन, रायफल, बुलेट्स आणि काही बॉम्ब घेतला आणि गाव सोडून जंगलात शिरला. जसजशे रस्त्याला तसले लोक यायचे अमोल त्यांना टार्गेट करायचा. जास्त प्रमाणात दिसले की एक बॉम्ब सोडायचा आणि आपला रस्ता मोकळा करायचा आणि पुढे धावायचा. पुढे गेल्यानंतर एका मोकळ्या जागेत पिस्तुल चालल्याचा आवाज आला, पुढे गेल्यानंतर बघतो तर काय?, एक आपल्यासारखीच नॉर्मल मुलगी पिस्तुल घेऊन उभी होती. तिच्या पिस्तूलातून आताही धूर येत होता. तिच्या निशाणावर एक तसलाच शैतान ढेर झालेला. त्याने पुढे येऊन बंदुकला लोड करून तिच्या दिशेने आला आणि म्हणाला, "कोण आहात तुम्ही?, तुम्ही मला समजू शकता का?" ती उत्तरली,"हो मी नॉर्मलच आहे, तुम्ही माझ्यावरून बंदूक हटवा मी झोंबी नाही!" 
अमोल, "तुम्ही ह्याच गावाचे काय?'
ती, "नाही हो मी दुसऱ्या जिल्ह्याची, इथे आमची ट्रिप आली होती, आम्ही दहाजनी होतो, मला सोडून सारेच झोंबी बनलेत, मला ही पिस्तूल मिळाल्याने आपले प्राण वाचवत इथपर्यंत आले.. तुम्ही पण ट्रवलर आहात काय?."
अमोल, "नाही हो!, मी माझ्या गावाकडे जात असताना, मध्येच माझी गाडी पंचर झाली. आपले प्राण वाचवत कसेतरी इथपर्यंत आलो."
ती, "चला तर मग, सोबतच आपला मार्ग मोकडा करूयात."
अमोल, "धन्यवाद आपल्या सोबतीबद्दल कारण मला हे एकटं एवढ्या लोकांना मारत जिवंत परत जाईल ह्याची काही गॅरंटी वाटत न्हवती पण आता असं वाटत आपण दोघे मिळून टीम बनून, जिवंत वाचून आपल्या मुक्कामापर्यंत जाऊ शकतो."

            दोघेही पळत निघालेत, पुढे जसजसे झोम्बी यायचे तसतसे त्यांना ठार मारत पुढे जायचे. पुढे चालून अमोलला चार झोंबीनी घेरले, त्याचा चावा घ्यायच्या आत तिने आपल्या पिस्तूलाने धाड धाड गोड्या चालविल्या आणि अमोलने प्राण वाचवले.
 अमोल (पळतच), "धन्यवाद! (धाड) तसे आपले नाव काय."(धाड)
 ती, "प्रिया! (धाड)"
 अमोल, "कुठे राहता तुम्ही?"(धाड)...
 प्रिया, "आता (धाड) या विषयाबद्दल बोलायची वेळ नाही आहे.(धाड) जेव्हा आपण सुखरूप पोहचू (धाड) तेव्हा मनसोक्त बोलूयात...'( धाड)
 गोड्या धाड धाड चालतच होत्या, अमोलला आता प्रियबद्दल प्रेम वाढत होतं, त्याला ती खूप आवडली होती. तीच बोलणं त्याला भुरड घालत होती. त्याने विचार केला, सुरक्षित घरी पोहोचल्यावर तिला प्रपोस करूयात. 
 पुढे त्यांना खुले मैदान दिसू लागले. तिथे पोहोचल्यावर त्यांना पुढे एक पोलीस थकलेल्या अवस्थेत दिसला जवळ गेल्यावर तो अमोलचा भाऊच निघाला. 
 अमोलचा भाऊ पण असाच वाचत-वाचत आला होता. तो जरा थकल्यामुळे, विश्रांतीसाठी थांबला होता. अमोलने त्याला मिठी मारली. तसे ह्या दोघांचे पटत न्हवते पण भावांचा जीव, काहीही असले तरी एकाच पोटातले. आता तिघेही एक टीम बनून त्या झोंबीना मारत मारत पुढे जाऊ लागलेत. 
                  पुढे एक मोठी भिंत दिसू लागली. त्याचा दरवाजाही पुढेच होता. त्या बॉर्डरच्या पुढेच एक गाव लागत होते, तेच अमोलला गाव होता. पण त्या भिंतीचा पलीकडे खूप जास्त प्रमाणात झोंबी आहेत असे भासले. अमोलचा भाऊ तो दार खोलायला गेला, अमोलने त्याला थांबविले आणि म्हणाला, "थांब दादा, जर दरवाजा खोलशील तर सारे झोंबी एकावेळेस आपल्यावर झडप घेतील, सर्वांना आपण सांभाळू नाही शकणार."
 पण त्याचा भाऊ त्याचे काहीही न एकता दार उघडले. आणि अमोलच्या म्हणण्यासारखेच झाले. सारे झोंबी एकत्र येऊन त्यांच्यावर हमला करू लागलेत अमोल आणि प्रिया दोघेही त्यांच्यावर गोळ्या झाळत होते पण अमोलच्या भावाला त्यांनी घेरलं, त्याला झोंबी मारू लागलेत, स्वताला वाचविण्याच्या नादात त्याच्या भावाच्या पिस्टलातून एक गोळी सुटली, ती थेट प्रियाच्या पोटात जाऊन घुसली. तो तर वाचला नाही, झोंबी त्याला खायच्या नादात होती. याचाच फायदा घेत अमोल आणि प्रिया त्या गेट द्वारे पळाले. प्रियाच्या पोटातून खूप जास्त रक्त निघत होतं. तरीही ती आपली पीडा दूर ठेऊन पळत होती. तिच्या हिम्मतीला बघून तोही हैराण झाला. त्यालाही आपल्या पत्नीच्या रुपात अशीच बेधडक मुलगी हवी होती. तो तिला सावरत तिला पकडून जाऊ लागला, आणि म्हणाला, "मला तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे, पण आपण सुखरूप घरी पोचल्यावर सांगेल, जस्ट को-ऑपरेट मी...".
                    तिला आता खूप त्रास होऊ लागला होता ती आता पुढे धावूही शकत न्हवती. ती म्हणाली, "मी आता पुढे नाही जाऊ शकत, खूप दुखत आहे, प्लीज मला इथेच सोड आणि तू आपले प्राण वाचवं"
  अमोलला पुढे एक कार दिसत होती, "पुढे एक कार आहे तू इथेच थांब मी कार घेऊन येतो."
  प्रिया, "तू काहीतरी तुझ्या मनातलं सांगणार होतास ना?, सांग ना? काय गोष्ट आहे"
  अमोल, "ते नंतर सांगतो, दोन मिनिटं थांब मी जाऊन आधी कार आणतो.'
  अमोल धावत जाऊन कारच्या आत शिरला. तिथे चावी लावूनच होती. त्याने गाडी चालू केली आणि यु टर्न मारली प्रियाकडे...

तिला बघते तर काय,, तीही झोंबी बनलेली होती, तिच्या आजू बाजूला तीन चार झोंबी होते, कदाचित त्यातीलल एकाने तिचा चावा घेऊन तिला आपल्यासारख बनवलं होत.
अमोलला काही क्षणासाठी विश्वासच झाला नाही. आपला इथपर्यंत साथ देऊन आता शेवटच्या क्षणी आपल्याला सोडून जाईल असे त्याला जराही वाटले न्हवते. तो तिला गाडीमधूनच प्रिया,- प्रिया मला सोडून जाऊ नोकोस असा म्हणू लागला, पण ती आणि तिच्या बाजूचे सारी झोंबी त्याच्या कारवर हमला करू लागले. अमोलने त्यांच्यावरून गाडी घालून पुढे गेला. स्वत:जवळचे बॉम्ब त्या जंगलात फेकत घराकडे गेला. त्या बॉम्ब मुळं साऱ्या जंगलाला आग लागली. सार जंगलच आगेत भस्म झालं. 
सकाळचे चार वाजली होते. अमोल घरी येऊन झालेली सारी बाब आईला सांगीतली आणि आईचा कुशीत जाऊन खूप रडला. त्याचीही आई आपल्या एका मुलाच्या जाण्याने खूप रडली. रडतच दोघेही झोपी गेलेत. 
सकाळची नऊ वाजलीत. दोघेही उठलेत दोघांनाही हे सार स्वप्नासारखच वाटलं. पण सारी घटना खरी होती. 

आठ दिवसानंतर पेपरमध्ये छापल्या गेलं, की त्याच्या सोबतची ती मुलगी प्रिया एक आमदारांची मुलगी होती. म्हणूनच हे केस उलगडीस आले होते. त्या गावतील एका वैज्ञानिकाने काही रासायनांना मिळून एक फॉर्म्युला बनविला, जाणे माणूस अमर होतो. त्याने आधी एक उंदरावर एक्सपरिमेन्ट केले, त्यावर तो सफल झाला, आपणही हे सोल्युशन घेऊन अमर होऊ शकतो असे त्याला वाटू लागले. त्याने कशाचाही विचार न करता, पूर्ण सोल्युशन आपल्या शरीरात टाकल. ह्याचा उलट परिणाम झाला. तो पहिला झोंबी बनला. बाहेर निघून साऱ्या गावाला झोंबी बनविला. पण अमोलच्या पूर्ण जंगलाला आग लावल्याने सारे झोंबी तिथेच मरण पावले, म्हणून त्या रोगाचं या पुढे प्रसार झाला नाही. ह्याची दाखल घेत सरकारतर्फे अमोलला गौरविण्यात आले. त्याला रोख रकम दिली. 
पण प्रियाला अमोलच्या मनातल काही कळलं नाही...




उत्कर्ष दुर्योधन लिखीत...