पूर्वनिर्धारीत Utkarsh Duryodhan द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पूर्वनिर्धारीत

रॉकी कार ने जरा वेगानेच चालला आहे, बाहेर पाऊसही पडत आहे.
जानवी त्याची होणारी बायको त्याला काहीतरी सांगत होती, तिला मध्येच थांबवून...
रॉकी, "हॅलो जानवी, तू आज पार्टीमध्ये खूप खास दिसत होतीस."
त्याची होणारी बायको, "माझ्या बोलण्याकडे का लक्ष देतो आहेस, पुढे बघून गाडी चालीव, आदळशील कुणाला..."

फोन स्पीकर वर होता...

रॉकीचा मित्र प्रणित, "ओहो! होणारी बायको आतापासूनच काळजी घ्यायला लागली वाटतं..."
जानवी, "मग काळजी तर असणारच, होणारी बायको आहे त्याची.."


रॉकीचे लक्ष जरासे भरकटले, आणि त्याची कार एका दरीत जाऊन आदळली.....

रॉकी खूप दूरवर जाऊन पडला, त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो बेहोष झाला. पण पाऊस पडत असल्याने पावसाचे थेंब त्याच्यावर पडू लागले होते, आणि तो काही क्षणातच शुद्धीवर आला. पण त्याला कळले की, तो काही क्षणात नाही तर खूप दिवसानंतर शुद्धीवर आला आहे. त्याने आपल्या मोबाईलवर तारीख बघितली होती. त्याने दरीच्या खाली बघितले, तर त्याला त्याची कार जळलेल्या अवस्थेत दिसली. त्याला वाटलं की आपल्यासोबत असलेले तिन्ही मित्र इथेच ठार झाले असावे. तो तिथून स्वत:ला सावरत पहाडावर चढू लागला, कारण वरच मेन रोड होता, आणि तिथूनच कोणती तरी गाडी मिळणार होती, आणि त्याला आपल्या घरी जायला मदत होणार होती.
रॉकी वर आला त्याला एक गाडी दिसली, त्याने त्या गाडीवाल्याला लिफ्ट मागितली. त्याच्या गाडीमध्ये कुणीही न्हवते, फक्त चालवणारा ड्रायवर होता, आणि आता रॉकीही त्याच्या मागच्या सीट वर बसला. ड्रायवरने विचारले कुठे जायचे आहे, तर तो म्हणाला, "पोलीस स्टेशन!" तो गाडी चालवू लागला. मागे बसलेला रॉकी काहीतरी बडबडत होता. त्याला वाटत होते की हे सर्व त्याच्यामुळेच झाले आहे. त्याला वाटत होते की, त्यानेच आपल्या मित्रांना मारलं. त्या ड्रायवरने बडबडत असलेल्या रॉकीचा तोंडून हेच ऐकले की, ह्या माणसाने कुणाचा तरी खून केलाय, आणि तो रॉकीला खुनी समजू लागला. त्या ड्रायव्हरला वाटू लागले की, ह्याला आपल्यासोबत घेऊन जाणे बरोबर नाही, म्हणून त्याने आपली गाडी बाजूला थांबविली आणि रॉकीला म्हणाला, "तुम्ही दुसरी गाडी शोधा साहेब, ही गाडी नाही जाणार पुढे."
रॉकी, "प्लिज मला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवून द्या, मी तुमच्या पाया पडतो."
लाल बुंद झालेले रॉकीचे डोळे, आणि शर्टवर रक्ताचे शिंतोडे बघून तो ड्रायव्हर घाबरला, आणि तो म्हणाला, तुम्ही उतरून जा, मी तुम्हाला नाही नेऊ शकत." पण तरीही रॉकी त्याचे ऐकायला तैयार न्हवता. म्हणून त्या ड्रायव्हरने आपल्याकडे असलेला चाकू काढला, आणि त्याला बाहेर जायला सांगितले. चाकू बघून रॉकी घाबरून गेला, आणि त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागला, जेणेकरून चाकू पासून स्वतःचा बचाव करू शकेल. पण त्या ड्रायव्हरने रॉकीच्या हातावर वार केला. हे बघून रॉकीला भीती वाटली, आणि त्याचा हात आपल्या दोनही हाताने वाकवून चाकू खाली पडण्याचा प्रयत्न करू लागला, पण चुकून, तो चाकू ड्रायव्हरच्या गळ्याच्या दिशेने वळले, आणि त्याचा गळा चिरला गेला, आणि जागेवरच त्या ड्रायव्हरचे प्राण गेले. आधीच घाबरून असलेला रॉकी, पुन्हा मोठ्या धक्क्यात गेला, आता त्याला समजत न्हवते की काय करावं, म्हणून त्याने त्या ड्रायव्हरला त्याच्याच गाडीतून बाहेर ढकलले. पण योगायोगाने मागून पोलीस येत होती, आणि त्यांनी रॉकीला असे करताना बघितले, आणि त्याच्या दिशेने पोलीस आपली गाडी वेगाने आणू लागले. रॉकीला ही कळले की, मागे पोलीस आहेत म्हणून त्याने कशाचाही विचार न करता, त्या ड्रायव्हरची गाडी घेऊन पळू लागला.
तो पोलिसांना चकवा देऊन एका रेस्टॉरंटजवळ पोहोचला, तिथे जरासा आराम केला. आपला मोबाईल बघितले असता, त्याला मोबाईल बंद पडलेला दिसला. त्याला चालू करून जानवीला फोन लावला. तिला फोन वर घडलेला पूर्ण प्रकार सांगू लागला. पण त्याच्याच मागे असलेला एक इसम त्याचे संभाषण ऐकतच होता, आणि त्याला समजले की, त्याने चार लोकांचा खून केलाय. त्या इसमने पुढचे काहीही न ऐकता, सरळ पोलिसांना फोन लावला आणि त्या रेस्टॉरंट मध्ये असलेल्या सर्वाना सूचित करू लागला. तिथे असलेल्या सर्वाना कळले की, रॉकीने चार लोकांचा मर्डर केला, म्हणून सर्वच त्याच्यावर नजर ठेऊन होते, जेणेकरून तो कुठे पळून जात कामा नये. रॉकीलाही जरासा संशय आला की, सर्वाना आपल्याबद्दल कळले आहे, आणि मध्येच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज येऊ लागला. रॉकीने तो आवाज एकताच एकच पळ काढला, आणि ती गाडी स्टार्ट करून तिथून पळून सुटला. ही गोष्टही त्याने फोनवर जानवीला सांगितली. तिने त्याला एका इस्पितळात भेटायला सांगितले. रॉकी त्याच दिशेने जाऊ लागला.
जानवीने रॉकीला सर्वात आधी दवाखान्यात भरती केले. त्याला सलाईन लावल्यानंतर तो बेहोशीच्या अवस्थेत गेला. काही वेळानंतर तो शुद्धीवर आला. त्याची मलमपट्टी केल्यानंतर त्याला विचारले की काय झाले होते त्याच्यासोबत. रॉकीने तिला पूर्ण घटनाक्रम सांगितले की, त्याचा गाडीवरचा तोल सुटला आणि, तो तर बाजूला पडला म्हणून वाचला, पण त्याच्यासोबत असलेले त्याचे तिन्ही मित्र मात्र वाचू शकले नाहीत. एवढ्यात रॉकीची रिपोर्ट आली की, ऍक्सेडेंट मुळे त्याच्या डोक्यावर जबर मार बसला आहे, त्यामुळे त्याची काहीशी मेमरी मिटली आहे.
जानवी म्हणाली, "काय?, तू त्या तीन लोकांसोबत जात होतास?, पण तुझे तर त्यांच्यासोबत पटत नाही ना?, ते तिघेही तर तुझे दुश्मन आहेत?, मग तू त्यांना मित्र कसा म्हणतो आहेस? हे बघ तुझी तब्येत ठीक नाही आहे सध्या. तू जरा आराम कर. इथे रिपोर्ट आली आहे की, तुझ्या डोक्याला जरासा मार लागल्याने तुझी मेमोरी लॉस झाली आहे, म्हणूनच कदाचित तू असा बोलतो आहेस.
पण रॉकीला चांगलेच ठाऊक होते की, ते तिघेही त्याचे मित्रच आहेत, आणि ते त्याच्याच कार मध्ये होते. एवढ्यात त्याला आठविले की, जानवीने त्याला फोन केला होता, आणि म्हणूनच तो अपघात झाला. पण जानवी म्हणाली, की तिने त्याला दोन दिवसापासून फोन केले नाही, कारण दोघांत दोन दिवसाआधी भांडण झाले होते. रॉकीने फोन हिस्टरी चेक केले तर खरच जानवीचे दोन दिवसापासून फोन आलेला नव्हता.
रॉकीला वाटू लागले की, कदाचित खरच आपली मेमोरी लॉस झाली असावी. पण त्याला एवढे ठाऊक होते की, त्याने येता येता एकाचा खून चुकून केला होता. तोच आपला गुन्हा कबुल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेला. पोलिसांना पूर्ण हकीकत सांगितली, त्या पोलिसांनी पूर्ण चौकशी केली, त्याचे नाव विचारले, तर त्याने सांगितले रॉकी सिरसाट. पोलीस इन्वेस्टिगेशन केली. पण रस्त्यात असे काहीही घडले न्हवते, रस्त्यात कुठेही मर्डर झालेला न्हवता. पोलिसांनी त्याला विचारले की, "असे तू का म्हणत आहेस" तर एवढ्यात आठवले की, त्याची मेमोरी लॉस झाल्याची रिपोर्ट त्याच्याकडे आहे. त्याने ती रिपोर्ट पोलिसांना दाखविली. पोलिसांनी त्याला घरी आराम करण्याचा सल्ला दिला.
रॉकी ही खबर सांगायला जानवीला फोन लावला. जानवीला पूर्ण घटनाक्रम सांगू लागला. पण जानवीने त्याला मध्येच थांबवून म्हटले, "हॅलो, कोण बोलत आहे, आपले नाव काय आहे?, तुम्हाला कोण हवंय?" त्याने सांगितले की तो रॉकी बोलत आहे, तर जानवी म्हणाली, "कोण रॉकी?, तुझा आवाज तर ऋषिकेश सारखा वाटतो आहे.. अरे हो, तू तर ऋषिकेश आहेस ना?, आता दोन वर्षानंतर माझी आठवण आली काय माझी?"
रॉकी, "काय?, कोण ऋषिकेश, आणि एक मिनिट, आपण काही तासापूर्वी भेटलो होतो ना?"
जानवी, "काय?, मी तुला भेटणार, मुळीच होऊ शकत नाही, दोन वर्षांपूर्वी आपले ब्रेकअप झाले होते, तेही तुझ्यामुळेच, मी कशाला तुला भेटायला येणार..."
रॉकीने फोन ठेवला. त्याला समजत न्हवते की, त्याच्यासोबत काय होत आहे?, तो त्याच इस्पितळात गेला, आणि तिथल्या नर्स ला विचारणा केली की, त्याच्यासोबत एक मुलगी होती ना, पण त्या नर्सने त्याला सांगितले की, तो रॉकी एकटाच आला होता काही तासांपूर्वी.
त्याला आता काहीही कळत न्हवते. त्याला तर संशय येऊ लागला होता की, काही वेळेआधी पोलीस स्टेशन मध्ये होता, तेही खोट तर नाही, हे बघायला परत पोलीस स्टेशन मध्ये विचारायला गेला. त्याने ह्यावेळी आपले नाव ऋषिकेश सांगितले, आणि कार अपघातबद्दलही सांगितले. पोलीस म्हणाले, "अरे तू तर जिवंत आहेस, काही दिवसाआधी तीन मुलं आली होती, की ते रस्त्याने जात असताना कार अपघात झाला, आणि ऋषिकेश म्हणजे तुझा मृत्यू झाला, असे त्यांनी आम्हाला सुचविले, आम्ही तुला शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण तू तर जिवंतच आहेस" ह्यावेळी त्याला आणखीन धक्का बसला, त्याने पुन्हा हेच विचारले की काय म्हणालात?, आणि ते पुन्हा सांगू लागले, आणि ह्यावेळी तो आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करू लागला, जेणेकरून हेही पुढे जाऊन खोटं होता कामा नये, आणि आपल्याकडे पुरावा असावा की, आपण खरच पोलिसांना भेटलो होतो.
आता त्याला हे माहीत करायचे होते की, ते तिघे ह्याचे मित्र होते की शत्रू?, म्हणून त्याने पुन्हा जानवीला फोन लावला. त्याने, फोन लागताच रेकॉर्ड करणे सुरू केले, त्याने तिला सांगितले की, "मी ऋषिकेश बोलत आहे, आणि ते तिघे जण माझे मित्र आहे की शत्रू हे सांग. जानवी म्हणाली, "कोण ऋषीकेश?, आणि तुम्हाला माझे नाव कसे माहीत?, मी तुम्हाला ओळखते काय?"
रॉकीने फोन ठेवला आणि आपल्या घरी आला. त्याने चेक केले की, खरच त्याचेच घरं आहे की नाही. त्याला कळलं की, हे त्याचेच घर आहे. जरा रिफ्रेश झाल्यानंतर, त्याने विचार केला की, हे आपल्यासोबत काय घडत आहे?, जानवी तर आता आपल्याला ओळखायलाही तैयार नाही. पण त्याला आठवले की, त्याने जानवीचे कॉल रेकॉर्ड केले होते, त्याने रेकॉर्ड लिस्ट बघितली असता, त्याला समजले की, ते रेकॉर्ड झालेच न्हवते. पण पोलिसांचे संभाषण त्याच्याकडे रेकॉर्ड होते. आता त्याला समजत न्हवते की, ते तिघे मित्र त्यावेळी कार मध्ये होते की, नाही?, आणि ते खरंच आपले मित्र आहेत की आपले शत्रू?, जर शत्रू असते तर त्यांनी माझ्या मरण्याची बातमी पोलिसांना सांगितलीच नसती, मग खोटं कोण बोलत आहे?, ते पोलीस, की, ती हॉस्पिटल मधली नर्स आणि डॉक्टर की जानवी?, की हे सर्वच आपला भास आहे?, त्याला काही समजत न्हवते. पण त्याला एक चाहूल लागली की त्याच्या घरी कुणीतरी आहे, त्याला असे माहीत होताच, त्याला मागून एकाने मारले, रॉकी सावरायच्या आतच पुढूनही दुसर्याने मारले, एवढ्यात तिसराही आला, रॉकीला मारायला, तिघांनी त्याला आपल्या घेर्यात आणले आणि लाथ बुक्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. मारताना ते तिघे म्हणाले, "अबे, तू वाचलाच कसा, तू तर आमच्यापुढेच मेला होतास ना?, काही हरकत नाही, आता नक्कीच मरणार..." रॉकीला समजले की, हे तिघेही आपल्यासोबत कार मध्ये असणारेच होय... त्यांच्या लाथ बुक्या त्याला पडतच होत्या, पण रॉकीचा आठवले की त्याच्या खिश्यात लहान चाकू आहे, त्याने आपल्या संरक्षणसाठी ठेवलेले होते. त्याने तो चाकू काढला, तसाच त्याच्या पायावर सपासप वार केले, ते तिघेही खाली बसले, आणि तरीही ते रॉकीच्या हातून चाकू घेण्याच्या शर्यतीत लागले, पण रॉकीने कशाचाही विचार केला नाही, आणि तिघांपैकी दोघाला त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांना तिथेच संपविले, तिसर्याने हे बघताच रॉकीचा डोक्यावर मारले, पण रॉकी बेहोष होण्याआधीच त्याच्याही गळ्याला चिरले आणि रॉकी बेहोशीत गेला.
काही वेळात तो शुद्धीवर आला. पण त्याच्या बाजूला त्या तिघांपैकी कुणाचेही शव दिसले नाहीत. शव तर काय?, आजूबाजूला त्यांच्या संबंधित काही पुरावेही दिसत न्हवते. पण रॉकीला चांगलाच मार लागला होता, तो इस्पितळात आपल्या उपचारासाठी गेला. पण तिथे गेल्यानंतर त्याला कळले की, पूर्ण जगभरात एक वेगळीच महामारी पसरली आहे. एका देशात नुक्लिअर प्लांट मधून रेडिएशन एमिट झाले, आणि लोकांत त्या रेडिएशनचा असर असा होत होता की, ते सर्व लोक राक्षसी वृत्तीचे बनत चालले होते. चांगल्या माणसांचा चावा घेऊन त्यांनाही आपल्यासारखे बनवू लागले होते. इस्पितळात सर्वत्र तसेच माणसं, हे बघताच रॉकीने तिथून पळ काढला. पण बाहेर गेल्यानंतर त्याला कळले की, त्याच्या मागे पोलीस लागले आहे. पोलीस त्याचा पाठलाग करत आहेत. त्या पोलिसांनी, लाऊडस्पीकर लावून त्याला स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा सल्ला देऊ लागले होते. सोबतच भारतात ही महामारी सर्वात आधी रॉकी कडूनच आली आहे, असे त्यांचे मत होते, आणि सद्यस्थितीत रॉकीही ह्या रोगाने इंफेक्ट आहे, असे ते सांगू लागले. सोबतच त्याच्या मुळेच सर्वात आधी, त्या रेस्टॉरंट मध्ये हा रोग पसरला, जिथे त्याने जेवण केले होते, आणि तिथून पळाला होता, त्यानंतर इस्पितळात त्याने रोग पसरविला, आणि नंतर पोलीस स्टेशन मध्ये येऊन सर्वांना इंफेक्ट केले. पुन्हा रोग पसरू नये म्हणून त्याला पोलिसांच्या स्वाधीन व्हायला सांगू लागले.
रॉकी तिथून पळाला. तो सरळ जंगलात शिरला, तिथून एका पहाडावर जाऊन गुहेमध्ये लपून बसला. तीन ते चार तास तिथेच राहून, पुन्हा तो जंगलाकडे परतू लागला. त्याला वाटले की, हेही मेमोरी लॉस मुळेच असे भासत असावे, पण त्याला बाहेर आल्यानंतर कळले की, आतापर्यंत जवळपास सर्वच जण म्युटंट बनले आहेत, त्याची नजर जिथे जात होती, तिथपर्यंत तसलेच राक्षसी माणसे दिसू लागली. तो पुन्हा पळत पहाडाजवळ आला. तिथे त्याला जानवी दिसली. जानवी त्याला म्हणाली, "इथून पळून जा ऋषिकेश, मलाही एका राक्षणसे चावा घेतलाय, मीही त्यांच्यातली बनू लागली आहे, मी म्युटंट बनायच्या आत इथून पळून जा."
पण एवढ्यात जानवीही म्युटंट बनली, आणि त्याच्यावर हल्ला चढविला. ती त्याला चावा घेण्याच्या आतच धरती हलू लागली. काही क्षणातच भूकंपाचे झटके येऊ लागले होते. ह्यांचाच फायदा घेत जानवीला पहाडाखाली ढकलून दिले. तिचा तिथेच मृत्यू झाला. पण भूकंपाचे झटके अजूनही चालू होते आणि वाढतही होते. त्याला काहीही समजत न्हवते की, काय करावे?, त्याला वाटलं, इथेच आपला अंत आहे. एवढ्यात त्याची आई दिसली, ती त्याला आपल्याजवळ बोलवू लागली.
पण त्याची आई तर तो लहान असतानाच मरण पावली होती, तो तिच्याजवळ गेला नाही, त्यानंतर त्याचे मामा, आजी, आजोबा, चुलत बहीणही दिसू लागली, हे सर्वच खूप आधी मरण पावले होते. ते सर्वच त्याला बोलवू लागले. भूकंपाचे तीव्र झटके चालूच होते. मागे बघितले असता, सर्वच म्युटंट लोक त्याच्या मागे येऊ लागले होते. तो तिथेच हरला होता. त्याच्याजवळ कुठलाही मार्ग आता शिल्लक राहिला न्हवता.
पण एवढ्यात त्याला जानवीची एक गोष्ट आठवली, जेव्हा रॉकीने तिला प्रोपोज केले होते, तेव्हा तिने विचारले होते की, "तुला माझ्यावर किती विश्वास आहे.." ह्यावर त्याने तिला म्हटले होते की, "स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे..." पण प्रतिउत्तरात ती म्हणाली की, "काहीही झाले तरी स्वतःवरचा विश्वास संपू द्यायचा नाही, कुण्या दुसऱ्यासाठी स्वतःचा विश्वास कधीच कमी करायचा नाही... सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिक म्हणजे पूर्ण दुनिया जिकशील."
त्याने आपले डोळे मिटले आणि आपल्या आत झाकून बघू लागला. तो काही क्षणातच बेहोष झाला, आणि काही मिनिटांत तो उठला, तेव्हा तो आपल्याच घरी होता, आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्या तीनही मित्रांचे शव होते, जे त्यानेच मारले होते. त्याला वाटले की, हे त्याचे अस्तित्व नाही, म्हणून तो पुन्हा डोळे बंद करून स्वत:ला शांत केले, पुन्हा तो बेहोष झाला. काही वेळेनंतर पुन्हा तो शुद्धीवर आला. त्यावेळी तो इस्पितळात होता, त्याच्या बाजूला जानवी होती, त्याला हेही काही पटले नाही, आणि त्याने पुन्हा डोळे लावले, स्वत:ला मेडिटेशनच्या अवस्थेत नेले, आणि काही वेळात पुन्हा तो बेहोष झाला. काही वेळात त्याला होश आले. त्याने इकडे तिकडे बघितले असता, त्याच्या आजूबाजुला जंगल होते, खाली कार जळलेल्या अवस्थेत होती, त्याचा तुकताच अपघात झाला होता. त्याने पुन्हा आपले डोळे लावले, तो पुन्हा बेहोशीच्या अवस्थेत गेला. काही वेळातच त्याला होश आले. त्याने आपले डोळे खोलले, त्याला समजले की आपण एका मशीन मध्ये कैद आहोत.
एवढ्यात जानवीचा बारीक आवाज त्याला येऊ लागला, "डॉक्टर, रॉकी शुद्धीवर आलाय..." रॉकीला वाटले हेही आपले खरे अस्तित्व नसावे, म्हणून त्याने पुन्हा आपले डोळे बंद केले. पण एवढ्यात डॉक्टर आले होते, त्यांनी त्याला एक इंजेक्शन दिले. आणि तो बेशुद्ध झाला.
त्याला काही वेळेनंतर शुद्धी आली. त्याच्या उजव्या बाजूला जानवी होती, डाव्या बाजूला त्याचे तीनही मित्र होते. त्याने जानवीला पहिलाच प्रश्न विचारला की, "हे तिघे माझे मित्र आहेत की शत्रू?"
जानवी म्हणाली, "अरे हे तुझे मित्रच आहेत, आणि तू असे का विचारात आहेस?"

रॉकी, "आणखी एक सांग, मी इथे कसा आलो?, मला काय झाले?,"

जानवी, "अरे काही नाही, जरासा अपघात झाला, आता सर्व ठीक आहे..."

रॉकी(त्या तिन्ही मित्रांकडे बघून), "तुम्हाला कुठंलीच इजा झाली नाही काय अपघातात?"

जानवी, "अरे हे तिघे न्हवते कार मध्ये, आपण दोघेच होतो. "

रॉकी, "काय?, मग मला असे का वाटत आहे की, हे तिघे माझ्यासोबत होते, आणि तू फोनवर माझ्यासोबत बोलत होतीस?"

जानवी, "अरे नाही, तुला गैरसमज झालाय, मी तुझ्या बाजूला होते, आणि हे तिघे आपल्यासोबत फोनवर बोलत होते, कॉन्फरन्स वर,.. तुझा फोन स्पीकर वर होता, तू मला म्हणाला होतास, की मी पार्टीमध्ये खूप चांगली दिसत होती, आणि हा प्रणित म्हणाला, आतापासूनच बायकोची काळजी, .. सोड ते आता आराम कर, बाकी सर्व ठीक होईल.. आणि आता माझी काळजी करायला लागू नकोस, मला कुठेही मार लागला नाहीये, फक्त आपली कार झाडावर आदडली होती, आणि तुझे डोके स्टेअरिंग वर आदळले होते. आणि तू म्हणूनच कोमात गेला होतास..."

रॉकी, "मी किती दिवसापासून कोमामध्ये आहे?"

जानवी, "बरोबर एकवीस दिवस"




(पूर्ण कथा काल्पनिक)


उत्कर्ष दुर्योधन लिखित...