Bhavishy aani bhootkalacha inkreshan books and stories free download online pdf in Marathi

भविष्य आणि भूतकाळाचा इक्वेशन

According to Einstein’s theory of special relativity, when you travel at speeds approaching the speed of light, time slows down for you relative to the outside world, and then you will be in future...

दिनांक 11 ऑक्टोबर 2015,
प्रोफेसर कबीर वैद्य, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास मध्ये जे लोक कुणाचे ऐकत न्हवते, ते आता फक्त प्रोफेसर कबीरचेच ऐकायचे, आणि ऐकू का नये, त्यांनी आपली डॉक्टरेट डिग्री आपल्या वयाच्या तेवीसव्या वर्षीच पूर्ण केलेली होती. जशी आपली डिग्री पूर्ण झाली, तसा युनिव्हर्सिटी ऑफ मद्रासचा चांगला प्याकेज त्यांच्या पुढे आला. ते तिथे खूप लवकर जॉईन झाले. एवढेच काय? त्यांच्या वयाचे लोक आत्ताही तिथेच आहे, पण विद्यार्थी म्हणून... कॉलेजचा प्रत्येक माणूस त्यांना आदर द्यायचा, मग तो कुणीही असो, कुठल्याही क्षेत्रातला असो, व कुठल्याही वयाचा असो, पण सर्वजण त्यांच्यासोबत आदरानेच वागायचे. त्यांनी ती उपलब्धी प्राप्त केलेली होती. त्यांचा विज्ञानावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी एवढ्या कमी वयात काही थेरीही मांडलेल्या होत्या. त्यांचा सत्कार दुसऱ्या देशाचे मोठमोठे वैद्यणीक करत होते. ही बाब पूर्ण युनिव्हर्सिटीसाठी तसेच देशासाठी खूप कौतुकास्पद गोष्ट होती. त्यांनी जेव्हापासून युनिव्हर्सिटीत शिकवायला सुरुवात केली, तेव्हापासूनच सर्व विद्यानर्थ्यांचे कल विज्ञानाकडे वाढलेले दिसून येत होते. त्यांची शिकवण्याची पद्धताच वेगळी, सर्वांहून. एक वेळ सांगितलेली माहिती, विद्यार्थ्यांच्या एवढ्या लक्ष्यात राहत होती की, ते पूर्ण आपल्या जीवनभर विसरू शकणार नाही. अश्या प्रकारे ते एक्सप्लेन करत होते, तेही पूर्ण प्रॅक्टिकल करून. ते एकप्रकारे वैद्यणीकच बनले होते.
ते जरा उशिराच जॉईन झाले होते. म्हणजे आता दोन महिन्याच्या सुट्ट्या लागणार होत्या, सर्व कॉलेजला. ते ह्या दोन महिन्याच्या कालावधीत एक इक्वेशनच्या मागे लागले होते. ते रोज फक्त तीन ते चार तास झोप घेऊन पूर्ण वेळ आपल्या कामात व्यस्त होऊन जात होते. त्याच्या मागे आपली तब्येतही बिघळलेली होती. तरीही ते आपल्या गोळ्या सुरू ठेऊन, ते इक्वेशन सोडवत बसले. पूर्ण दोन महिन्याचा कालावधी संपला, पण तो इक्वेशन काही पूर्ण झाला नाही. ते त्याच्या शेवटच्या टप्यात होते, पण त्यांना शेवट मिळत न्हवता. त्यांनी दुसऱ्या वैज्ञानिकाशी संपर्क साधून ह्याला सॉल्व्ह करू बघितले, पण त्यांना तर एवढी प्रोसेस ह्यांनी केलीच कशी हेच समजले नाही. म्हणजे एकटा फक्त प्रोफेसर कबीरलाच पूर्ण सोल्युशन सोडवायच होत. पण आता कॉलेजची लागलं होत, म्हणजे आता त्याला वेळ देणं कमी करावं लागणार, हे त्यांना चांगलाच ठाऊक होत. ते आपला काही वेळच आपल्या इक्वेशनला देऊ लागले होते.
कॉलेज नव्याने सुरू झालं. प्रोफेसर कबिरला नवीन ब्याच मिळाली. तिथले सर्व विद्यार्थी नवीनच असल्याने, सर्वाना जरा नर्व्हस होत होत. पण जसा प्रोफेसर कबीर ह्यांचा क्लास आला, आणि काही वेळातच त्यांनी सर्व मुलांची मने जिंकली. सर्व मुलांची भीती दूर केली. एवढेच काय क्लास सुटल्यानंतर त्यांना पुन्हा शिकवण्याही विनवणी करू लागले, सर्व विद्यार्थी.पण नियमानुसार त्यांना जावंच लागलं.
एका आठवड्यात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्रा विषयीची भीती पुर्णतः दूर केली. आता सर्वांचा आवडता विषय भौतिकशास्त्रच बनला. ब्याचचे सर्व विद्यार्थी एकप्रकारे प्रोफेसरचे मित्रच बनून गेले. सर्वांकडून मिळणारे प्रेम बघून प्रोफेसर खूप खुश होते. पण ते महिन्यातून दोन ते तीन दिवस त्या आपल्या इक्वेशनला देत होते.
एकदा प्रोफेसरने आपला पिरेड संपवून आपल्या ऑफिसकडे जाऊ लागले होते. त्यांच्या मागून त्याच ब्याच मधली एक मुलगी धावत त्यांच्याकडे आली. तिचे नाव मोनिका होते. तिचे ऍडमिशन जरा उशिरा झाले होते. तिला आधीच काही माहीत नसल्याने आजचं शिकवलेलं काही कळलं नाही, ती प्रोफेसरकडे विनवणी करू लागली की, त्यांनी मला शिकवावं. प्रोफेसर तिला आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेलेत. तिला पूर्ण समजावलं, ती मुळातच खूप हुशार होती, म्हणून तिला जराही हिंट मिळाली की ती लवकरच क्याच करून घेत असे. तिची जाणून घेण्याची शैली बघून प्रोफेसरने तिला ह्याच्या पुढचंही शिकवून टाकलं. ती खूप इंटेलिजंट विद्यार्थिनी होती. बघितले तर अख्या ब्याच मधून ती सर्वात हुशार विद्यार्थिनी होती.
क्लास मध्ये प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ती सर्वात आधी द्यायही. प्रेफेसर कबीरला ती मुलगी खूप आवडली होती. प्रोफेसरच्या मदतीने तिने पहिल्या सत्रात फिजक्स विषयात युनिव्हर्सिटी टॉप मारले. तिचे भरभरून कौतुक करण्यात आले. तिने ह्याचे पूर्ण श्रेय प्रोफेसर कबीरला दिले. ह्या गोष्टीचा प्रोफेसर कबीरवर खूप मोठा परिणाम झाला. त्यांना मोनिका खूप जास्त आवडली होती. प्रोफेसर आणि मोनिका आपला खूप वेळ एकत्रच घालवत होते. दोघांच्या आवडीनिवडी जुळू लागल्या होत्या. दोघांची मने जुळली होती. प्रोफेसरने आपल्या इक्वेशन बद्दल तिला सांगितलं. तिनेही ह्यात सर्वात जास्त मदत केली होती. पण तरीही तो इक्वेशन पूर्ण झालं न्हवत. पण ह्यांच्या प्रेमाचं इक्वेशन जुळलं होतं.
प्रोफेसर आणि मोनिका कॉलेजमध्ये लपून-छपून भेटू लागले होते. जर कुणाला दिसले तर त्यांना कॉलेज डिस्कस करत आहोत असे सांगायचे. आणि प्रोफेसर कबीरची छबी एवढी मोठी होती की, त्यांना पुढे कुणी विचारतही न्हवते. मोनिका रात्री आपल्या हॉस्टेलवरून जसा वेळ मिळायचा ती लपून तिथून निघून कबिरसोबत चेन्नई फिरायला जायची. तिच्या घरचे मुंबईला राहत असल्याने त्यांना ह्याबद्दल काहीही माहीत न्हवते. म्हणून ते दोघेही चिंता मुक्त होते. रात्रभर फिरून, एखादी मुव्ही बघून सकाळी सर्व उठायच्या आत, तिला प्रोफेसर होस्टेलवर सोडून देत होते. आणि सकाळी दोघेही कॉलेजमध्ये हजर राहायचे. पण ह्याची भनक कुणालाही लागली नाही. नाही कॉलेज मध्ये, नाही हॉस्टेल मध्ये. प्रोफेसरने तिला प्रपोज करायचे ठरवले. कॉलेज सुटल्यानंतर तिला आपल्या कार मध्ये बसवून समुद्रापाशी घेऊन गेलेत. तिला पूर्ण तिथला नजारा दाखवला. त्या वेळेस ती खुप आनंदी दिसत होती. प्रोफेसरला हाच चांगला चान्स वाटला, प्रपोज करण्याचा. त्यांनी तिला कसे बसे प्रपोज करूनच टाकले. तिच्यासाठी हा एक सरप्राईजच होता. ती आनंदाने उड्या मारायला लागली, आणि होकार देत, प्रोफेसरच्या गळ्यात पडली. त्यांच्या सात महिन्याच्या रिलेशनशिपला आता एक नवी दिशा मिळाली. दोघेही खूप आनंदाने आपले रिलेशन पुढे चालवत होते.
पण काही दिवसांनी त्यांना वाटलं की, आता ते एकमेकांशिवाय राहू शकणार नाही. त्यांना हे असलं लपून भेटणंही जरा विचित्रच वाटू लागलं. काही झालं तरी कुणाची ना कुणाची नजर पडतच होती, कुठ न कुठं त्यांच्या चर्चा सुरूच होत्या. त्यांना आपल्या मानासारखं जगता येत न्हवत. मग त्यांनी निर्णय घेतला की आता एकत्र येण्याचा. लग्न करण्याचा. प्रोफेसर कबीर मोनिकाच्या घरी गेलेत, आपल्या आईवडिलांसोबत. त्यांच्या आईवडिलांना मोनिका आधीच पसंद पडली होती. ती कुठल्याही बाबतीत कमी न्हवती. एवढी सुंदर सुशील मुलगी मिळणे खूप कठीण होते, पण मोनिकाची गोष्टच वेगळी होती. मोनिकाच्या घरच्यांनाही प्रोफेसर कबीर खूप पसंत पडले. सोबतच त्यांना चांगल्या पदावर एक नोकरीही असल्याने, आणि कमी वयात ज्याप्रमाणे त्यांनी जी बुलंदी प्राप्त केली होती, ती काही लहान-सहान गोष्ट न्हवतीच. सर्वांच्या आशीर्वादाने ते दोघ लग्नाच्या बेळीत अडकले.
लग्नानंतर दोघेही चेन्नईलाच प्रोफेसरच्या नव्या घरी राहू लागले होते. त्यांची इच्छा सर्व परिवार म्हणजे प्रोफेसरचे आईवडीलांसोबत राहण्याची होती, पण प्रोफेसरच्या वडिलांची सर्व्हिस आसाम ला होती. आणि त्यांच्या सेवानिवृत्तीला पुन्हा खूप दिवस उरले होते. म्हणून नाईलाजाने दोघांनाही चेन्नईलाच राहावे लागले. पण ह्याचा एक फायदा होता की मोनिका आपले पुढचे शिक्षण घेऊ शकत होती, त्याच युनिव्हर्सिटीत राहून.
एकत्र ते खूप सुखी होते. त्यांचा राजा-राणीचा संसार थाटला होता. लग्नानंतर दोन वर्ष कशी पुढे सरकली काही कळले नाही. पण त्यांना ह्या कालावधीत एक गोड मुलगा झाला. सोबतच ती दुसऱ्या पाहुण्याच्या आगमनाची वाट बघत होती, म्हणजेच ती दुसऱ्यांदा गर्भवती होती. सर्वत्र आनंदी वातावरण होते. पण प्रोफेसर कबीरला मात्र त्या इक्वेशनची आत्ता खूप चिंता वाढली होती. करण तो इक्वेशन जवळजवळ पूर्ण झालाच होता, पण शेवटची व्हॅल्यू जुळत न्हवती.
आपले दुःख आपल्या पत्नीपुढे म्हणजेच मोनिका पुढे मांडले. तिने त्यांना "ह्याबद्दल काळजी करू नका, आणि अश्या अवेळी तो इक्वेशन आठवेल आणि पूर्ण होईल की तुम्हालाही ह्याची भनक लागणार नाही." असे ती म्हणाली.
प्रोफेसर आपल्या पहिल्या मुलासोबत खेळत होते. ते खेळत असताना, प्रोफेसरचे लक्ष, काहीतरी वरून काढत असलेल्या मोनिकाकडे जाते. तिच्या शरीराचा आकार "€" अश्या प्रकारे भासला. त्यांना आठवले की, ह्यापुढे त्या इक्वेशनमध्ये काय टाकायचे आहे. ते लगेच आपल्या खोलीत गेलेत, आणि आपल्या कामाला लागलेत. काही वेळातच त्यांनी तो इक्वेशन पूर्ण केला. जसा त्यांनी इक्वेशन पूर्ण केले, तसा त्यांनी मोनिकाला जोरजोरात, आवाज देऊ लागले. तिने गडबडीत आपले पूर्ण काम सोडून त्यांच्याकडे आली. प्रोफेसरने तिला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत न्हवता. पण तिने त्यांना शांत केले, आणि काय झाले हे विचारले. त्यांनी तिला पूर्ण एक्सप्लेन करून सांगितले. त्यांचा इक्वेशन पूर्ण झाला होता. एवढ्या दिवसाची मेहनत कामी आली होती. आता ते जगविख्यात शास्त्रज्ञ बनतील, अशी पूर्ण ग्वाही होती.
त्यांनी अर्जंट मिटिंग बोलाविली, आपल्याच कॉलेजमध्ये. भारतातील सर्व शास्त्रज्ञ आलेत. सोबतच दुसऱ्या देशाचे शास्त्रज्ञ ही व्हिडिओच्या स्वरूपात जुळले होते. प्रोफेसर कबिरने त्यांच्यापुढे आपला इक्वेशन मांडला. सर्वांनी तो मान्यही केला, सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला, ह्या इक्वेशनमुळे. तो इक्वेशन होता, tube bullet fire speed(TBFS) म्हणजे ह्या इक्वेशन द्वारे, एका ट्यूबमध्ये स्पेशल शिपला, म्हणजेच यानला ठेऊन तिला बंदुकीच्या गोळीपेक्षा वेगाने सोडता येते. ह्याने होणार असे की, ह्याचा फायदा ट्रेनला, आणि रॉकेटला होणार, म्हणजेच ट्रेनचा वेग वाढवून सर्व लोकांसाठी त्याला सोईस्कर असा प्रोजेक्ट्स, ज्याचा वेग पाच हजार किलोमीटर प्रति सेकंदपर्यंत नेऊ शकत होतो. आणि रॉकेटला कमीतकमी दहा हजार किलोमिटर प्रतिसेकंदच्या वेगाने आणि तेवढ्याच फ्युएलच्या मदतीने अंतराळात पाठवू शकत होतो. ह्याने अंतराळात शोधमोहीम आणि जमिनीवर लोकांची दगदग कमी करता येत होते.
सर्व वैज्ञानिकांनी ह्याची अंमलबजावणी करण्यास सुरू केली. आणि प्रत्येक देशात अश्या रेलगाड्यांची निर्मिती सुरू झाली. काही दिवसातच TBFS च्या रेलगाड्या सुरू झाल्यात. सोबतच इस्रो आणि नासाने TBFS च्या रॉकेटही लॉन्च केलेत. ह्याचा मानवश्रुष्टीला खूप मोठा फायदा झाला. सर्व लोकांचे आयुष्य सुखकर झालेत. सोबतच दुरवरची नवी नवी माहितीही मिळू लागली होती.
प्रोफेसर कबीरला ह्या शोधासाठी गौरविण्यात आले, मोठमोठे अवॉर्ड देण्यात आलेत. आता त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर, एक वैज्ञानिक म्हणून कोरण्यात आले होते.
आता त्यांच्याकडे कशाचीही कमी न्हवती. त्यांना दुसराही मुलगाच झाला होता. आता ते शांत जीवन जगण्याचा विचार करू लागले होते.
एकदा ते आईन्स्टाईनचे पुस्तक वाचन असताना, त्यांना दिसले की, आईन्स्टाईनच्या मते जर आपण प्रकाशाच्या वेगा एवढा वेग प्राप्त केले तर कदाचित आपण भविष्यात पोहोचू शकतो. (theory of special relativity) त्यांनी हा रूल आपल्या इक्वेशनमध्ये अप्लाय करायचे ठरवले. त्यांनी सर्व अभ्यास करून रात्रभरात एक नवीनच इक्वेशन तैयार केले होते. "theory for travelling future" तोही त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना सांगितला. आणि त्यांच्या इक्वेशनच्या चाचणीसाठी पृथ्वीच्या मधोमध अक्षवृत्तावरून एक ट्यूब बांधण्यात आली. ती पृथ्वीची गिरकी घेऊन गोलाकार एकाच जागेवर भेटत होती. त्याला प्रत्यक्ष बनवायला एक महिना लागला. त्यांनी त्यात बुलेट भरले, म्हणजेच त्यात एक स्पेशल शिप भरण्यात आली. त्याचे वजन जेवढे कमी करता येईल तेवढे कमी करण्यात आले. म्हणजे पुन्हा जास्त त्याची गती वाढवता येईल. फक्त एकदा त्याची चाचणी करण्यात आली. तर पहिल्याच प्रयत्नात ती सफल ठरली. नंतर त्यात स्वतः प्रोफेसर कबीर बसलेत. आणि मशीन चालू करण्यात आली. जशी मशीन चालू झाली, तसा वेग घेणं सुरू झालं, काही सेकंदातच त्याचा वेग लाईटच्या वेगपर्यंत पोहोचले. ते यान पृथ्वीच्या एवढ्या गिरक्या घेत होते की, एका सेकंदात सात ते आठ वेळा, प्रोफेसरचे यान पुथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा घालत होते. काही वेळातच ते यान गायब झाले. फक्त आता तो रूटच उरला होता. सर्वाना वाटलं की प्रोफेसर भविष्यात पोहोचले असतील.
प्रोफेसरच्या यान मध्ये त्यांचा नॉर्मल वेळ भासत होता, पण बाहेर असणाऱ्या लोकांसाठी वेळ खूप हळू झाला होता. प्रोफेसर यान मध्ये आपले पाणी उचलून पिलेत म्हणजे बाहेर, एक दिवस होऊन जायचा. प्रोफेसरच्या प्रत्येक हालचालीवर बाहेर एक-एक दिवस संपत होते. यान मध्ये काही मिनिटे झालीत, म्हणजे बाहेर एक वर्षच झाले होते. यानमध्ये घालवलेला एक तास म्हणजे पृथ्वीवरचे ६५ वर्ष होऊन जात होते. दीड तासानंतर त्या यानची शक्ती हळूहळू संपून एका क्षणाला तो पूर्णता थांबून गेला. प्रोफेसर बाहेर येण्यासाठी दरवाजा खोलला. बाहेर पूर्ण रेडीएशन होते. त्यांनी दरवाजा बंद करून आपला स्पेशल सूट लावला. आणि पुन्हा दरवाजा खोलून बाहेर पडले. बाहेर येताच त्यांच्या पुढे एक असा विश्व पुढे होता, जो बघून कुणालाही विश्वास बसणार नाही. एवढा भयावह दृष्य ज्याची कल्पना कुणीही करू इच्छिणार नाही. पूर्ण जागा ओसाड, बेजाण, नापीक अशी होती. सर्वत्र धुळीचे वातावरण, जमिनीवर कुठलेही वनस्पती उरले नसल्याने, गवताच्या संपलेल्या अस्तित्वाने जमिनीवरची माती पूर्णतः उडत होती. त्याला धरून ठेवणारी वनस्पती नसल्याने ती सैरभैर उडत होती. आत्तापर्यंत युद्धामध्ये तीन ते चार अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. ह्याने झाले असे की, सर्वत्र रेडिएशन पसरलेलं होतं, ह्यामुळे खूप लोक मृत्युमुखी पडले होते. पूर्ण जगाची लोकसंख्या मृत्यूशी झुंज देत होती.
प्रोफेसर तिथल्या स्थायी लोकांची विचारणा केली, त्यांना सांगितले की आपण भूतकाळातून आलोय. त्यांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितले की, पृथ्वीवर फक्त गरीब लोकांचंच वास्तव्य आहे. श्रीमंत लोक जवळच एका मानवनिर्मित उपग्रहावर राहतात. तिथली परिस्थिती त्यांना तर माहीतच नाही, पण पृथ्वीवर फक्त माणसाचंच वास्तव्य आहे. माणसाव्यतिरिक्त कुठलेही जीव जंतू, प्राणी मात्रा इथे राहत नाही. एका संशोधननुसार आजपासून काही वर्षातच पृथ्वी नष्ट होणार आहे. म्हणूनच पृथ्वीवरच्या लोकांनी पुढची पिढी जन्मू नये म्हणून प्रजनन क्रिया पूर्णता बंद करण्यात आली होती.
पृथ्वीवर आता काही उरलं न्हवतं, तिथे राहण्यासारखं. माणूस प्रजातीने पूर्ण पृथ्वीला विनाशाच्या खाईत नेलं होत. प्रोफेसर हे एकूण थक्कच झाले. त्यांनी विचार केला, इथून पुन्हा आपल्या काळात जाण्याचा. तिथे जाऊन पुथ्वीला विनाशपासून वाचवण्याची तैयारी करायचा. पण त्यांना माहीत नाही की, पुन्हा परत कसे जाता येईल, भूतकाळात? माहिती देणाऱ्या सहकार्याला मदत मागितली. त्यांनी तिथे एक खोली बघितली, आपले रिसर्च करण्यासाठी. तिथे जाऊन विचार सुरू केला. आपले नवीन इक्वेशन बनवू लागले. त्या सहकार्याने त्यांना लागत असलेल्या सर्व वस्तू पुरवू लागले. त्यांनी आत्तापर्यंत जेवढा अभ्यास केला, तो पूर्ण आठवून तिथून काय घेऊन इक्वेशन मध्ये उपयोग करता येईल त्याचा विचार करू लागले. त्या दिवशी पूर्ण विचार करून, त्याची संभावना बघून, त्याचे नुकसान बघून पूर्ण काम करू लागले. त्यांनी टाइम ट्रॅव्हलच्या भविष्यात जाण्याच्या इक्वेशनलाच काही प्रमाणात बदलून एका इक्वेशनची निर्मिती केली. पण त्यानुसार चौथ्या प्रमाणावर (forth dimention= time) परिणाम पडणार होता. पण इथे राहण्यापेक्षा निसर्गाचे काही नियम मोडीत काढून आपल्या काळात जाणे केव्हाही बरे. आणि तिथे गेल्यानंतर ही परिस्थिती त्यांच्यापुढे मांडली, आणि त्यांना ह्यापरिस्थितीबद्दल जागरूकता दिली तर कदाचित आपण हे भविष्य बद्दलवू शकतो, आणि पृथ्वीला वाचवू शकतो. त्यांच्या थेरीनुसार, आपल्या इक्वेशनच्या शेवटच्या टप्प्याला आपल्या हातावर लिहून घ्यायचे होते. ह्यामागे एक कारण होते. त्यांना आपल्या मेंदूला हेप्लॉटिझम करायचे होते आणि आत्तापर्यंतच्या केलेल्या क्रिया उलट्या दिशेने चालवायचे होते. त्यांनी त्या सहकार्याच्या मदतीने एक डिव्हाईस बनवले, त्याला आपल्या डोक्यावर लावले. म्हणजे मेंदू ज्याप्रमाणे मागे जाईल, त्या डिव्हाईसच्या मदतीने त्यांचे शरीरही तेच काम करेल.
प्रोफेसरने स्वतःला हेप्लॉटिझम केले, आणि त्यांच्या सहकार्याने ते डिव्हाईस सुरू केला. डिव्हाईसने क्याच केले, की प्रोफेसर आत्ता काय विचार करत आहेत. ते आतापर्यंत केलेल्या कामाला उलट्या दिशेने करू लागले. झालेले काम तसेच होते, पण प्रोफेसर असे वागत होते की, ते उलट चाललेत. त्या डिव्हाईसच्या मदतीने उलट क्रिया करण्याची प्रक्रिया एकदम चांगल्या प्रकारे पार पाळत होता. ते पोहोचले, जिथे त्यांनी इक्वेशनचा विचार करणार होते. पण ह्यावेळी पूर्ण दृश्य असे झाले होते की, त्यांनी काही इक्वेशन बनवलेच नाही. त्यांच्या मनातही आणि बाहेरच्या अस्सल दुनियेतही. प्रोफेसर शुद्धीवर येऊ लागलेत. त्यांनी लगेच आपल्या हातावर बघितले, तिथे एक इक्वेशन दिसले. बाहेरची पूर्ण दुनिया बदलत होती, पण त्यांच्या शरीराचा कुठलाही भाग जराही बदलत न्हवता. म्हणूनच त्यांना इक्वेशन दिसत होते. इक्वेशन दिसताच पुन्हा ते हेप्लॉटिझमच्या बेळ्यात गेले. . .
भूतकाळात मात्र सारे लोक प्रोफेसर कबीरच्या येण्याची वाट बघू लागले होते. तिथे जरा वेगळ्याच घटना घडत होत्या. जसा भविष्यात ते उलट चालले होते, त्याचप्रमाणे भूतकाळत हळू-हळू त्यांचे अस्तित्वही उलट्या दिशेने जात होते. तिथे त्यांची एक छबी बनत होती, त्यांची प्रतिमा बनत होती. त्यांनी तिथे भविष्यात जाण्याची मशीन बनवलीच न्हवती. जसे भविष्यात प्रोफेसरने हातावरचे इक्वेशन बघितले, इकडे मोनिकाचा दुसरा मुलगा तिच्या पोटात होता. हा सर्व प्रकार फक्त प्रोफेसर सोबत जुडलेल्या लोकांसोबतच घडत होता. ज्यावेळी प्रोफेसर उलट्या दिशेने आपल्या भविष्याच्या यान कडे येऊ लागलेत. भूतकाळात ते इक्वेशन बनवू लागले होते, भविष्यात जाण्याचा. (ह्या सर्व घटनांत वेळ मात्र पुढे जात होता. मोनिकाचे वय वाढत होते, पण प्रोफेसरचे अस्तित्त्व हळूहळू मागे सरकत होते)
जसे ते भविष्यकाळात उलट यान मध्ये बसले. भूतकाळात मोनिका पहिल्या बाळाची गर्भवती होती. त्यांचा सफर भविष्यकाळात सुरू झाला होता, यानमध्ये, उलट दिशेने. भूतकाळात, वेगाने उलट क्रिया घडत होती. तिथे त्यांचे लग्न नुकतेच जुडले होते. त्यांची क्रिया उलट दिशेने घडत होती पण कुणालाही ह्याची भनक लागत न्हवती. यानला उलट दिशेने चालू होऊन एक तास झालेत. भूतकाळात प्रोफेसर आणि मोनिकाची फक्त भेट झाली होती. भविष्यकाळातुन जसा त्यांनी भूतकाळात प्रवेश केला, तेव्हा प्रोफेसरचे शिक्षण नुकतेच संपले होते. त्यांच्या एन्ट्रीमुळे त्यांची प्रतिमा नष्ट झाली. त्यांनी भूतकाळात म्हणजेच वर्तमानकाळात पाय ठेवला, मागे बघताच तो यानही गायब झाला. त्यांनी तिथे असलेल्या एकाला आजची तारीख विचारली. त्यांनी सांगितले की, आजची तारीख, रविवार १५ जुलै २०१९ सांगितले.
प्रोफेसरने मोनिकबद्दल माहिती काढली. ती त्यांच्याच वया एव्हढी झाली होती. तिचे त्याच युनिव्हर्सिटीतुन डिग्री झालेली होती. ती आता एका नावाजलेल्या बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे. तिला प्रोफेसर कबीरबद्दल काहीही माहीत नाही, कारण त्यांची भेट काघीही झाली नाही. प्रोफेसर मोनिकावर आजही खूप प्रेम करतात, पण आता तिला काहीही सांगू शकत नाही, कारण काय सांगता येईल?, तिला सांगितल्यानंतर पुढे निसर्ग काय नियम खेळेल? म्हणून तिला विसरून नव्याने जीवन जगणे केव्हाही चांगले असे वाटू लागले.
त्यांच्याकडे आता नोकरीही नाही. ते पुन्हा मद्रास युनिव्हर्सिटीत नोकरीसाठी जाऊ इच्छित न्हवते. कारण हे सर्व पुन्हा घडू शकते. म्हणून ते दुसररिकडे नोकरी शोधण्यासाठी गेलेत. ह्यावेळी त्यांच्याकडे भविष्यात जाण्याचा आणि भूतकाळात जाण्याचे दोनही इक्वेशन होते, पण त्यांनी त्याला मनातच ठेवले. त्यांना ह्या पूर्ण सफरमध्ये कळलं की, भविष्यात ह्याच इक्वेशनमुळे असा परिणाम होईल, की त्याला पुन्हा सुधारणे खूप मुश्किल होऊन जाईल.
(त्यांच्या मते, त्याच इक्वेशनमुळे भविष्यात अशी परिस्थिती उद्धभवली. जर वेळेसोबत खेळले तर वेळ आपल्यासोबत खेळणार. ह्यानंतर प्रोफेसर कबीरने एका सामान्य कॉलेजमध्ये नोकरी केली. पण अजून त्यांनी लग्न केले नाही.)


आवडल्यास रेटिंग नक्की द्या...
(पूर्ण कथा काल्पनिक आहे)




उत्कर्ष दुर्योधन लिखीत...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED