खर्चाचे नियोजन..
बऱ्याच वेळा आनंद आणि पैसे हे बरोबर चालतात अश्या वातावरणात मध्ये आपण राहत असतो. बऱ्याच प्रमाणात ते बरोबर सुद्धा आहे. तुम्हाला कोणती चांगली गोष्ट घ्यायची असेल तर साहजिकच तुमच्याकडे ती वस्तू घ्यायला पैसे तर हवेतच. पैसे ही प्रत्येकाच्याच आयुष्यामधली महत्वाची गोष्ट आहे. पण पैसे असले तरी आपण कुठे खर्च करतो ते महत्वाच असत. खर्चाचे नियोजन ही एक महत्वाची बाब असते. अर्थात, कोणत्या गोष्टीवर आपण किती पैसे खर्च करतो ते सर्वस्वी आपल्या हातात असत. पण तो निर्णय नेहमी बरोबरच असतो अश्यातला भाग नसतो. म्हणजे काही वेळा कोणीतरी घेतली आणि तुम्हाला त्या गोष्टीची गरज नसेल तरी सुद्धा आपण ती गोष्ट घेता ज्याचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही. कधीकधी जाहिरांतीच्या मोहात अडकून आपण काही वस्तू घेतो आणि नंतर त्याकडे पहातही नाही. मग पैसे फुकट वाया जातात. आणि कधीकधी भरमसाठ पैसे घालवून पण जास्ती काळ समाधान मिळत नाही. पण योग्य विचार करून केलेला खर्च जास्ती काळासाठी आनंद देत राहतो. त्यामुळे आपण काय खरेदी करायला प्राधान्य देतो हे पाहणे महत्वाचे असते. आणि जे आपल्याच हातात असत. हे आपणच ठरवलं पाहिजे की आपल्याला खरच गरज आहे का आणि मग त्या गोष्टी वर पैसे खर्च केले तर ते वाया जात नाही. तुम्ही काय खरेदी केल पाहिजे आणि कश्यावर जास्ती खर्च नाही केला पाहिजे हा निर्णय स्वतःवर ठेवणे गरजेचे असते. अर्थात, ह्याबद्दल प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. आपल्या आवडीप्रमाणे पैसे खर्च केले तर नंतर पश्याताप होत नाही. आपली आवड आणि ज्यात आनंद मिळतो अश्या गोष्टींवर जास्ती पैसे खर्च केले तर त्या गोष्टीच दुःख नक्की होणार नाही. आणि पैसे वाचवून त्या पैश्याचा योग्य वापर केला तर आनंद द्विगुणीत होतील हे अगदी नक्की. त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते..
* कोणत्या वस्तूंवर खर्च कमी करता येऊ शकतो-
१. इलेक्ट्रॉनिक्स-
आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंशिवाय आपण आपल आयुष्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. बऱ्याच वेळा अस होत,तुम्ही एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून बराच खर्च करून ती वस्तू घ्याल पण काही काळातच ती वस्तू जुनी होणार हे लक्षात ठेवा. काहीवेळा महागड्या वस्तूंची गरज नसते पण आपण ती घेतो आणि नंतर मात्र त्या गोष्टीच दुःख होत राहत. मोबाईलच उदाहरण ह्यावेळी घेता येईल. रोज वेगवेगळ्या ब्रान्ड चे नाव नवीन सुविधा असलेले स्मार्ट फोन बाजारात येत असतात. त्यातल्या सुविधा आपण किती वापरतो हे पाहून योग्य निवड गरजेची ठरते. आपली गरज ओळखून खर्च केला तर चांगली वस्तू तर मिळतेच पण त्याबरोबर समाधान सुद्धा मिलेते. त्यामुळे अश्या वस्तूंवर किती खर्च करायचा ते प्रत्येकानी ठरवण गरजेच असत.
२. घर सजवायच आवड-
काही जणांना आपल घर सजवायची आवड असते. साहजिकच आहे.. आपल घर प्रत्येकालाच सुंदर हव असत. पण त्यासाठी जास्ती खर्च करायची गरज नसते. भरमसाठ महाग वस्तूंनी घर सजवलं तर सुंदर दिसेल हा एक गैरसमज असतो. कधी स्वतः केलेली पेंटिंग, कधी फोटो घराची शोभा वाढवतात. घराविशायीची आपुलकी सुद्धा अश्याने वाढण्यास मदत होते. घरातल्या लोकांच्या आवडी निवडी बघून सगळ्यांच्या संगन्मतानी घर सजवलं तर ते नक्कीच सुंदर होईल. आणि घर सजवताना घरातल्या प्रत्येकाचीच मत लक्षात घेतली तर घरातली लोकं सुद्धा अधिकाधिक जवळ येण्यास मदत होईल. आणि पैश्यांची बचत होईल हे वेगळंच...
३. भारी गाड्या-
हल्ली चारचाकी गाड्या घेण हे फार अवघड राहिलेलं नाही. चार चाकी गाडी घेण सगळ्यांच्याच आवाक्यात आल आहे. पण जर तुमची ऐपत नसतांना तुम्ही खूप महागडी गाडी घ्यायचा हट्ट केलात तर तुम्ही विनाकारण कर्जबाजारी होणार हे अगदी नक्की. कर्ज मिळणे सोप्पे असते पण ते कर्ज फेडणे कधी अवघड होऊ शकते. बऱ्याच वेळा लोकांना दाखवण्यासाठी महागड्या गाड्या घेतल्या जातात. आणि विनाकारण तुमच्या वरच ओझ वाढू शकत. दुसऱ्यांना दाखवण्यापेक्षा स्वत:च्या आनंदासाठी गाडी घेतली तर त्यामुळे गाडीचा योग्य वापर तर होईलच आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आणि नवीन गाडीचा मनमुराद आनंद लुटता येईल.
४. नवीन फॅशन-
बाजारात नुसती चक्कर टाकली कि वेगवेगळ्या पर्स, गळ्यातली, कानातली इत्यादी हमखास बघायला मिळत. ते विकत घ्यायचा मोह सुद्धा होण साहजिक आहे. कधीतरी अश्या वस्तूंची खरेदी केली तर चांगलच आहे पण प्रत्येकवेळी नवीन वस्तू पहिली कि ती घेत राहिलात तर जेव्हा खरच एखाद्या वस्तूची तुम्हाला नितांत गरज असेल त्यावेळी तुम्हाला ती वस्तू घेता येणार नाही. त्यामुळे विनाकारण खरेदी कारण टाळलेल कधीही चांगल. त्यामुळे पैश्याची बचत तर होतेच पण त्या पैश्यांचा योग्य ठिकाणी उपयोग पण करता येतो.
५. दागिने-
सोन्याचे दागिने सगळ्याचं घालायला आवडतात. आणि ती खरेदी म्हणजे एक प्रकारची गुंतवणूकच असते. पण सोन्याचे दागिने रोज घालता येत नाहीत म्हणून हल्ली फॅन्सी दागिने घालायची क्रेझ सगळ्या वयोगटातल्या स्त्रियांमध्ये दिसून येते. त्यात सुद्धा वेगवेगळ्या किमतीचे दागिने असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हवे तितके घालून हव्या त्या प्रकारचे दागिने घेऊ शकता पण जर असे दागिने घेऊन तुमचे खर्च विनाकारण वाढत असतील तर फॅन्सी दागिने न घेतलेले चांगले. त्यापेक्षा सोन्यात किंवा खड्यांमध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयोगी पडू शकते.
* ५ गोष्टी ज्यावर तुम्ही जास्ती खर्च करणे फायद्याचे ठरू शकते-
१. शिक्षण-
"जन्मभर शिकत राहायचं असत.." अस म्हणल जात ते काही चुकीच नाही. तुमच्या शिक्षणावर तुम्ही कितीही खर्च केलेत तरी ते पैसे वाया जात नाहीत. शिक्षणामुळे तुमचे विचारांच्या कक्षा रुंदावतात. तुम्हाला तुमची ओळख मिळते. आणि तुम्ही कोणत्याही वयात शिक्षण घेतल तरी ते तुमच्यासाठी फायद्याचच असत. त्यामुळे बाकी कुठे खर्च केले नाहीत तरी काही फरक पडणार नाही पण जर तुम्ही तुमच्या शिक्षणावर जास्ती खर्च केलात तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्याचबरोबर तुम्ही राहत असलेल्या समाजाला सुद्धा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
२. प्रवास-
प्रवास करायला सगळ्यांनाच आवडतो. वेगळ्या ठिकाणी हिंडून नव नवीन अनुभव मिळतात आणि विचारांच्या कक्षा रुंदावतात. प्रवास केल्यामुळे तुम्हाला बरेच फायदे होतात. प्रवास केल्यामुळे तुमचा मूड बदलण्यास मदत होते. प्रवासामुळे नवीन उत्साह येतो. त्यामुळे थोडे पैसे खर्च झाले तरी आवर्जून प्रवास हा कराच आणि भरपूर आठवणी गोळा करा. प्रवास केल्यामुळे इतर खर्च कमी करावे लागू शकतात पण प्रवासातल्या मजा अनुभवल्यावर जास्ती खर्च झाल्याचं दुःख नक्की होणार नाही.
३. हॉबी-
आयुष्यात कोणत्याही वयात संगीत शिकता येत. संगीत म्हणा किवा एखाद वाद्य वाजवायला शिका. त्यानी आयुष्य आनंदी आणि उत्साही होण्यात मदत होईल. संगीत शिकल्यामुळे पूर्ण परिवार एकत्र येण्यास सुद्धा मदत होईल. नवीन वाद्य आणण्यासाठी तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागतील पण तो खर्च वाया जाणार नाही ह्याची खात्री ठेवा. संगीतामुळे तुमच आयुष्य आनंदानी फुलून जाण्यात तर मदत होईलच पण त्याचबरोबर तुम्हाल नवीन आठवणी तयार करता येतील. अश्या बऱ्याच हॉबी आपल्याला जोपासता येतात ज्याने आयुष्य समाधानी होण्यास मदत होते. कधी आपल्याला फोटो काढायची आवड असेल तर त्यावेळी कॅमेरा घेतांना पैसे वाचवायची गरज नसते. कारण एकदा केलेली गुंतवणूक आयुष्यभराचा आनंद सोबत घेऊन येते हे विसरता येणार नाही.
४. पुस्तक-
"पुस्तक हा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र आहे.." हे म्हणल जात ते काही चुकीच नाही. पुस्तक कोणत्याही परिस्थितीत आपल्या बरोबर असतात. आणि त्याची आपल्याला मदतच होते. त्यामुळे पुस्तक घेतांना अजिबात कंजूसपणा करू नका. पुस्तक वाचल्यामुळे तुमचा मूड बदलण्यास मदत होते आणि सतत नवनवीन शिकायला सुद्धा मदतच होते. हल्ली नवीन ट्रेंड आलाय तो ईबुक्स वाचायचा. त्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मोबाईल मध्ये प्सुतक वाचायचा कंटाळा येत असेल तर "किंडल ईरीडर" हा ही एक उत्तम पर्याय आहे. त्यात तुम्ही तुम्हाला हवी तितकी पुस्तक विकत घेऊन किंवा फ्री बुक्स वाचू शकाल. त्यासाठी थोडे पैसे खर्च होतील पण ते पैसे वाया जाणार नाही हे अगदी निश्चित!!!
५. फूड-
अन्न हे शरीरासाठी आवश्यक असत. पण फक्त पोटासाठी नाही तर चवीसाठी वेगवेगळ्या प्रदेशातले वेगवेगळे पदार्थ चाखायची मजा काही औरच असते. पैसे कमावतो ते पोट भरण्यासाठीच त्यामुळे पोट भर आणि मन तृप्त होणार अन्न खाल्लं कि समाधान मिळतच! प्रत्येक ठिकाणचे पदार्थ वेगळे असतात. आणि त्याची मजा घेण ह्यासारख सुख नसत. हे थोड खर्चिक होऊ शकत पण त्यातूनही एक वेगळच समाधान मिळत. त्यामुळे खाण्यासाठी पैसे खर्च झाले तर त्याच अजिबात वाईट घेऊ नका. वेगवेगळे पदार्थ चाखले कि ते तुम्ही घरी सुद्धा करून त्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. आणि भरपूर आठवणी बनवू शकता.
खर्च फक्त वस्तू घेण्यासाठी न करता अश्या गोष्टी घेण्यासाठी करणे फायद्याचे असते ज्यामुळे आपल्याकडे भरपूर आठवणी तयार होतील. आणि ज्यामुळे आपले आयुष्य आनंदानी भरून जाईल. जर फक्त निरुपयोगी वस्तूंवर खर्च केला तर कालांतराने त्याचा त्रास होणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे खर्च कुठे करायचा ते ठरवा आणि पैसे योग्य पद्धतीनी खर्च करा. कधी गरज पडली तर घरच्यांचे सल्ले घेणे सुद्धा फायद्याचे ठरते. अस केल्यानी नाती सुधृद राहण्यास देखील मदत होते. पैश्याच नियोजन ही एक अत्यंत मात्वाची गोष्ट समजली जाते. आणि ते उत्तमरीत्या करणे हे आपल्याच हातात असते. शेवटी निर्णय आपलाच असतो तो योग्य पद्धतीने घेणे हे गरजेचे असते. त्यामुळे आपले आयुष्य छान होईलच पण याचबरोबर, आपल्या बरोबरची लोके सुद्धा आनंदी होतील. फक्त वस्तू म्हणून नाही तर त्याचा उपयोग बऱ्याच काळासाठी होईल अश्या ठिकाणी पैसे खर्च केल्याने मन प्रसन्न राहण्यासही मदत होईल. आणि नंतर त्या गोष्टीने त्रास सुद्धा होणार नाही.