ना कळले कधी Season 2 - Part 20 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 20

अरे कुठे गेला हा असा न सांगता! डोक्यात राग घालून गेलाय, कुठे गेला असेल? कॉल करू का? हा पण कसा माझा फोन फोडला ना त्याने . बिचारा माझा फोन, आताच तर घेतला होता . तिने एकवार आपल्या फुटलेल्या फोन कडे पाहिलं तो आजूनही त्याच जागेवर पडून होता. 'मी नाही उचलणार काहीही झाल तरी त्यालाच उचलू दे', कळेल तरी निदान आपण रागात किती नुकसान केलय! 'सिद्धांत ला ना चिडचिड करण्या शिवाय दुसरं काही जमत च नाही!' घरीच येणार होते ना मी दुसरा काही ऑपशन आहे का माझ्या कडे? पण नाही सांगितलं का नाही म्हणून भांडला. बर text पण करून ठेवला होता पण त्याने त्याच समाधान झाल च नाही. पण सिद्धांत असाच आहे त्याला अजूनही काळजी वाटते माझी जर त्याला काहीच वाटत नसते तर त्याला काहीही फरक नसता पडला मी न आल्याचा. त्याला कधीच एक्सप्रेस होता येत नाही. त्याला स्वतःलाच त्याच्या फिलिंग्स समजत नाही, त्यामुळे तो असा रिऍक्ट करतो. मीच समजून घ्यायला हवं होतं उगाचच वाद वाढवला. पण त्याला हे कधी कळणार? की तोही नाही राहू शकत माझ्या शिवाय, मी ना खरच आई कडे च जायला हवं होतं म्हणजे बघू तरी तो काय करतो ! पण तिथेही नाही जाऊ शकत. पण हा आता असा का गेला, आता चोर आला तर? तिने खिडकीतुन बाहेर पाहिलं बराच अंधार होता.

ती सगळे दार, खिडक्या लावून हॉल मधेच सिध्दांत ची वाट पाहत बसली. तिचा जीव अगदी रडकुंडीला आला होता.

नेहमीचच झालय आता हे आर्या च वागणं! तिला कस कळत नाही की आपली कुणीतरी काळजी करणार आहे, आपली पण कुणी वाट बघत असेल. पण नाहीच हिला मुळात काही जबाबदरी नावाची गोष्टच नाही. अस राहून कस चालेल आणि हो मी चिडतो पण त्यामागचं कारण कधीच दिसत नाही फक्त मी रागावलेलो दिसतो, काय झालं असत आल्या आल्या सांगितलं असत कुठे गेली पण ती ही काही कमी नाही. वरून मलाच बोलते मेसेज केला होता म्हणे. पण मीही थोडं ओव्हर रिऍक्ट च केल येणारच होती ना घरी? पण आर्या थोड्या वेळही आजूबाजूला नसली तरीही अस बेचैन का होत?किती ठरवतो मी की नाही चिडायच तिच्यावर पण प्रत्येक वेळेस कंट्रोल राहतच नाही. का होत अस? आज तर रागात तिचा फोन पण फुटला माझ्या कडून. काय करत असणार आर्या आता . त्याने घड्याळाकडे पाहिलं बापरे बराच उशीर झालाय. आर्या एकटीच आहे तिच्या कडे फोन पण नाही. आधीच भित्री आहे ती. मला जायला हवं काहीही झालं तरी तिला अस एकटीला सोडायला नको होतं. काय झालं असेल बिचारीच? नाही ती बिचारी नाही आहे. पण मी नको जायला तिलाही कळू दे कस वाटत कुणी सोबत नसलं की. पण ही रात्रीची वेळ आहे नको मी जातोच.

तो घरी पोहचला. आर्या झोपली की काय? सगळे दार खिडक्या बंद आहेत. त्याने बेल वाजवली पण कुणीही दार उघडलं नाही. शेवटी त्याच्या जवळच्याच key ने दार उघडले.

'आर्या','अग जागीच आहेस न ? म दार का नाही उघडलं'.

'मला ऐकूच नाही आलं!'(आता ह्याला काय सांगू मला भीती वाटत होती.)

'काय ऐकू नाही आल अग इथेच आहेस न तू अस कस ऐकू नाही आलं'.घाबरली होतीस का तू?

छे!!!! मी का घाबरणार. आणि कुणाला घाबरणार.

हो का! 'आर्या हे बघ खोट बोलता येत नाही ना तर प्रयत्न करू नये, एकदा चेहरा बघ तुझा स्पष्ट भीती दिसतीये'. तो हसून म्हणाला.

(ह्याच काय जात हसायला इथे भीतीने जीव जाण्याची वेळ आली होती माझी.)

त्याच त्या खाली पडलेल्या फोन वर लक्ष गेलं. त्याला वाईट वाटलं. त्याने उचलला, सॉरी आर्या , मी थोडं ओव्हर रिऍक्ट च केल.

आता काय सॉरी म्हणून फायदा माझा फोन तर गेला ना? येणार आहे का सॉरी ने परत. तिचा मनातच विचार चालू होता.

आर्या, मला माहिती आहे मी सॉरी म्हणून तुझा फोन परत येणार नाही आहे. पण मी intentionally नाही केलं अग !

तु कधीच intentionally काही करत नाही सिध्दांत.आणि प्लीज आता ह्यावर discussion नको, मला झोप येत आहे good night. आणि ती तिथून निघाली.

आर्या......,त्याने आवाज दिला पण ती तिथे थांबलीच नाही. आर्या खरच खूप hurt झालेली दिसते. होईल नॉर्मल, वेळ द्यावा लागेल.

आज आर्या ला थोडी लवकरच जाग आली. सिद्धांत अजूनही झोपेतच होता. किती शांत झोप लागलीये सिध्दांत ला. झोपेतच शांत असतो हा फक्त उठलाकी परत काहीतरी कारण काढून चिडेल माझ्यावर. काल सॉरी म्हणाला म्हणा, त्याचा रागही जास्त वेळ टिकत नाही.

थोड्या वेळाने सिद्धांत खाली आला, काय आर्या आज लवकर कायकाय उठली तू? बर वाटतय ना तुला?

अशी काही प्रथा आहे का? की रोज तुच लवकर उठल पाहिजे. त्याच्या प्रश्नातील खोचकपणा ओळखुन त्याला उत्तर दिले.

नाही, तो निमूटपणे म्हणाला. ऐआर्या आणि तू किचन मध्ये काय करतीये? बाहेर ये!

ती पटकन बाहेर आली का काय झालं काही आहे का तिकडे?

तू होतीस ना एवढी मोठी !

तुला काय म्हणायचं आहे नेमकं तिने थोडस रागानेच विचारल.

हे बघ आर्या आज काही experimental नको म्हणून बोलावलं. मी तुला म्हणालो ना मी शिकवतो मग का करतीये? हे बघ आणि आता सकाळी सकाळी मला वाद नको आहे.

बर !बर ! मलाही वाद नकोच आहे सांग काय करू खर तर तिला आता त्याच्या बोलण्याचा राग येत होता पण तिने त्याच ऐकण्याचं ठरवलं.

आर्या, तू ना vegetables cut करायला घे!

काय असली चिल्लर काम मी करू ?

हे बघ काम अस चिल्लर, वगैरे काही नसत काम काम असत आणि आपल्याला बेसिक पासून शिकायचं आहे ना मग घे कट करायला.

काय कटकट आहे ह्याची!
इतक्यात बेल वाजली आर्या निघणारच होती बघायला पण सिद्धांत गेला लगेच

वेलकम आयुष , आज सकाळी सकाळी च आमची आठवण आली.

अरे आज सकाळच्या क्लास ऑफ होता मग इकडे आलोच होत तर म्हंटल तुम्हाला भेटावं.

तू इथे काय करतोय सकाळी सकाळी ? नक्की बंक मारून आला ना? आर्या त्याला पाहून म्हणाली.

काय ग, अतिथी देवो भव! वगैरे काही असत तुला माहिती नाही का? आणि मी काही सांगितलं तरीही तुझा विश्वास नाही बसणार, जाऊ दे मुळात मी तुला भेटायलच नाही आलोय मी सिद्धांत जिजू ला भेटायला आलो, बर पाणी आण मला,आयुष म्हणाला.

आर्या अग पाणी दे ना तो मागतोय, सिद्धांत तिला म्हणाला.
'तुझ्या कडे आलाय ना तो मग दे तू! ती म्हणाली. 'इथे एक कमी होत मला त्रास द्यायला त्यात हा भरीत भर '! तिने त्यांच्या दोघांकडे ही दुर्लक्ष केलं आणि तिने आपल्या कामावर परत concentrate केल.

दिदी, हे घे मी तुझ्या साठी काय आणलय मी!

काय बघू ? ती पटकन त्याच्या जवळ गेली.

हे घे strepsils !

तिने घेतली त्याच्या हातातून काय आर्या तुला strepsils आवडतात? सिद्धांत ने आश्चर्याने विचारल.

नाही रे!

मग का घेतलं?

त्याने दिल म्हणून,हा पण आयुष तू का दिल मला ती म्हणाली.

अग हे बघ सिम्पल आहे, तू आता मी आहे तोपर्यंत मला ओरडत राहणार मग तुझा घसा दुखेल that's it!

सिद्धांत ला त्याच लॉजिक ऐकून आणि आर्याचा चेहरा पाहून हसूच कंट्रोल झालेच नाही.

तू काय हसतोय ! काही जोक चाललाय का इथे? आर्या सिद्धांत ला म्हणाली. आणि आयुष नि तर आज ठरवलंच वाटतय की माझी वाटच लावायची.सिद्धांत समोर कशाला बोलतोय हा! त्याला तर मजाच येत असेल. तिने त्याला strepsils फेकून मारले. तूच खा आणि मी न आता बोलणार च नाही तुझ्याशी.

क्रमशः
©Neha R Dhole