ना कळले कधी Season 2 - Part 26 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 26

आर्या कुठे निघाली आहेस तू....?

थोड्यावेळापूर्वी कुणी तरी म्हणत होत मी नाही अडवणार an all आता काय झाल मग?

ऐ मी अडवलं नाही तुला फक्त कुठे चाललीये हे विचारल. सांगायचं तर सांग नाही तर मला काही फरक नाही पडत.

मी चालली माझ्या घरी तुला असही माझ्या शी बोलायचच नाही आहे ना रहा मग एकटा!बाय आणि ती निघालीही.

जा आणि अजिबात वापस नको येवू मला गरज पण नाही. सिद्धांत तिला म्हणाला.

काय ग, आर्या आज इकडे कशी? आणि एकटीच.तिच्या आई ने तिला विचारल.

काय ग आई हे माझं घर नाही का? मला वाटलं तेव्हा नाही येवू शकत का मी.

तस नाही ग तू काही बोलली नाही काही फोन नाही अचानक आली म्हणून विचारल.

आठवण आली तुझी, करमत नव्हतं मला तिकडे म्हणून आली.

मग सिद्धांत कुठे आहे तो का नाही आला?

आई मला करमत नव्हतं मला तुझी आठवण येत होती त्याचा काय संबंध! आणि माझ्यासाठी काहीतरी खायला बनव मस्त भूक लागलीये मला.

बर बर थांब!

संपले बाबा आईचे प्रश्न, किती प्रश्न पडतात हिला. आणि मी आले बस झालं ना त्या च्या बद्दल कशाला विचारायचं. ती अजूनही रागात च होती.

बर झालं आर्या गेली आता निदान काही दिवस माझ्या डोक्याला शांतता तरी राहील. आता मी मस्त आराम करणार आहे असेही काल रात्री माझा थोडाही आराम झाला नाही.आणि ह्या वेळेस तर मी अजिबात आर्याला कॉल ल ही नाही करणार आणि भेटणार ही नाही.

किती मस्त वाटत ना आपल्या घरी कुणी बोलणार नाही, आपण काहीही करू शकतो, मुळात सिद्धांत चा धाक नाही. नाहीतर सतत डोक्यात असत सिद्धांत काही बोलेल का? चिडेल का? आता मात्र काही टेन्शन नाही. त्याला शांतता पाहिजे होती न घे म्हणावं आता.

काय दिदी मग काय भांडून आली का?आयुष च्या प्रश्नाने ती विचारातून बाहेर आली.

ह्याला कस कळलं? तिचा मनातच विचार चालू होता. छे!!! , भांडून कशाला ? मला आठवण येऊ शकत नाही का तुमची. आणि तू अस का विचारतोय.

काही नाही ग एकंदरीत तुझा स्वभाव आणि इतिहासाला स्मरून मला वाटलं जशी माझ्या सोबत भांडतेस तशी त्याच्या सोबत भांडली की काय? म्हणून बाकी काही नाही.

तुझ्या सोबत भांडण्याची मला हौस अजिबात नाही तूच उकरून काढतो कळलं का!आर्या म्हणाली.

बर बर आता पुन्हा चालू नको होऊ, लगेच निघणार आहेस का? की आहे थोड्यावेळ? त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला.

अरे मी तर चांगला राहायचा प्लॅन करून आले आणि हा तर आजच घालवायला निघाला मला. पण त्याचंही बरोबर आहे आयुष तर जास्त दिवस थांबले तर शंभर प्रश्न विचारेन मला. ती मनातच विचार करत होती.

ऐ बहिरी झाली का?

ऐ नीट बोल ह , आणि मी राहणार आहे 2-3 दिवस कळलं आता पुढचे काही दिवस एकही प्रश्न विचारायचे नाही कळलं! आर्या ने त्याला बजावलं.

तुझं न नक्की काहीतरी झालंय, तू सांगू नको पण मी शोधेल च बघ आयुष तिला म्हणाला.

शोध जा बघू तुला काही सापडत का?

सिद्धांत नेहप्रमाणे सकाळी उठला आणि आणि त्याने आर्याला आवाज दिला, पण एकदम तिची रिकामी जागा पाहून त्याला लक्षात आले की ती इथे नाही आहे. किती सवय झाली आहे न आर्याची! नसली तरीही वाटतय आजूबाजूलाच आहे. तो मनातच बोलला आणि ऑफिस रेडी होऊ लागला.

इकडे आर्याला ला ही जागा आली पण तीने अजूनही डोळे उघडले नाही. आज सिद्धांत ने उठवलं कस नाही starnge ती, तिने डोळे उघडून पाहिलं, अरे मी विसरलेच मी सिद्धांत कडे नाही माझ्या घरी आहे. रोज सिद्धांत च्या आवाजाची इतकी सवय झाली आहे न! आज त्याची एकटा ऑफिस ला निघून जाण्याची धमकी नाही ऐकली तर काही तरी चुकल्या सारख वाटत. पण त्याला काय त्याच तो तर एव्हाना रेडी ही झाला असेल. चला मला ही जावं लागेल नाहीतर गेल्यावर परत टोमणा मारेल मला की आज मी नव्हतो ना उठवायला मग उशीर होणारच! नकोच त्याला बोलायला कशाला चान्स द्यायचा. ती ही उठून आवरायला लागली.
दिघेही ऑफिस पार्किंग मधेच भेटले. त्यांनी एकमेकांना पाहिलं आणि ओळखही दिली नाही.लिफ्ट मध्येही दोघेच होते पण ते एकमेकांकडे पहायलाही तयार नव्हते. किती attitude आहे ह्याचा मध्ये हसला तर काय होत पण नाही हा हसणारही नाही, जस काही हसला तर जेल मध्ये टाकणार आहे ह्याला. एकदाही विचारत नाही आहे कशी आहेस? घरी चल म्हणणं तर लांबच राहील. मी चुकी केली का इकडे येऊन! म्हणजे हा जर असाच वागत राहिला तर मला कधीच चल म्हणणार नाही.त्याला तर काय सवय आहे एकट राहण्याची. बापरे! आता. तिला विचार करून च भीती वाटायला लागली.

काय गेलं असत साधं गुड मॉर्निंग विष केलं असत तर, अरे नवरा म्हणून नाही पण बॉस ला तर करावं, इतकं साधं समजू नये आर्याला! इथे मी एकटा राहतोय पण तिला काय त्याच साधी चौकशी पण नाही केली माझी. इतका कुठला आला राग. आता ह्या वेळेस तर मी स्वतःहुन बोलणारच नाही, ना कॉल ना भेटणार . मलाही बघायचच आहे आर्या काय करते.माझी काहीच चुकी नव्हती.हा फक्त थोडा रिऍक्ट झालो, पण ठीक आहे ना, ती तर ओव्हर रिऍक्ट झाली. इतकं सोपं वाटत न सोडून जाण आता बस म्हणा.

त्यांची रेग्युलर मॉर्निंग मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर आर्या थांबली.सिद्धांत ला वाटल आर्या कालचच काही तरी बोलायला थांबली असेल.

हा आर्या बोल काय म्हणते?

actually सिद्धांत,मला एक डाउट होता.

हे ऐकून सिद्धांत चा मूड ऑफ झाला.

त्याने तिचं ऐकून घेतलं आणि तिचा डाउट solve केला.

थँक्स सिद्धांत म्हणून ती निघाली, इतक्यात तो म्हणाला थांब.

आता आर्या ला वाटलं की हा कालच सगळं विसरून जा म्हणेल. आणि ती थांबली.

आर्या, एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या बॉस ला अस नावाने निदान समोर तरी नाही बोलू इथिक्स असतात काही, हा जर तुझा आणि त्याचा काही संबंध असला तर त्या सिच्युएशन मध्ये ठीक आहे, पण if i am not wrong तर सध्या तर आपला काहीच नाही. so, keep this things in mind.

आर्याला सिद्धांत च्या असल्या बोलण्याचा खूप राग आला. तिला तर काय करू आणि काय नाही असं झालं. पण ऑफिस होत आणि ह्या वेळी तो बॉस होता त्या मुळे ती काहीही नाही बोलली.

sorry, सिद्धांत सर! आणि ती निघाली.

काय गरज होती आठवण करून देण्याची की आपला काही संबंध नाही. मुद्दामून केलं हे सगळं त्याने, ती मनातून ह्या वेळेस खूप दुखावली गेली होती.

लंच ला ती सगळ्यांसोबत जेवायला बसली रोज ती आणि सिद्धांत सोबत बसायचे पण आज ती त्याच्या सोबत बसली नव्हती. तो तिच्या बाजूच्याच टेबल वर होता.
'काय आर्या आज आमच्या सोबत कसकाय'? आशिष ने विचारल.
'का ग सरांसोबत काही भांडण झाल का?' रेवा चा प्रश्न.

ती चा आधीच मूड खराब होता, त्यात सगळे जणांचे प्रश्न ऐकून तीच डोकं आणखीच खराब झालं.

तुमचा प्रॉब्लेम काय आहे? कशाला दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची? मी विचारते का कधी काही तुम्हाला नाही न! मग माझ्या आयुष्यात इतका इंटरेस्ट नका दाखवू. काल सोबत जेवलो तरी प्रॉब्लेम, काय तर जेवू का घातलं? आज तुमच्या सोबत बसावं वाटलं तर पुन्हा तेच ! का मी नेहमी त्याच्याच सोबत राहायला हवं का? ती चिडून बोलली. मला न आता एक क्षणही इथे थांबायची ईच्छा नाही आहे ती टिफिन बंद करून निघाली.तिचे सगळे फ्रेंड्स एकदम शॉक झाले अस का रिऍक्ट केलं आर्याने. 'इतकं काहीच झालं नव्हतं, आणि नेहमी तर ती हे सगळं स्पोर्टिंगली घेते'. रेवा म्हणाली.

बाजूला च बसलेल्या सिद्धांत ने हे सगळं बघितलं, आर्या ला काय झालं अचानक अशी का रिऍक्ट झाली. तिला हे सगळे नेहमीच चिडवतात. नक्कीच काही तरी झालं,तो ही उठला. आणि तिच्या मागेच गेला.

आर्या काय झालं ? अशी उठून का आलीस? are you ok?

please leave me alone ! ती फक्त इतकच म्हणाली.

पण काय झालं?

आता नाही म्हंटल ना मी! प्लीज.

ok take your time, काही लागलं तर सांग. अस म्हणून तो खरा गेला तर तिथून पण त्याच्या डोक्यात विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. का वागली असेल आर्या अशी? एरवी कधीच वागत नाही. मुळात तिला रागच येत नाही हा फक्त माझा येत असेल ती गोष्ट वेगळी. पण आता पर्यंत बाहेर अस कुणाशी चिडून बोलताना आज पहिल्यांदाच पाहिलं मी तिला. काय झालं असेल नेमकं? ती बोलायला ही तयार नाही. पण बोलावं तर लागेलच त्या शिवाय कस कळणार? पण ती इथे काहीही बोलणार नाही. काय करु?? hmm ऑफिस सुटल्यावर तिच्या घरीच जातो surprise म्हणून तिथे ती मला नाही टाळू शकत.हे च योग्य आहे.

क्रमशः
© Neha R Dhole.