ना कळले कधी Season 2 - Part 27 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 27

आर्या काय आहे हे तू टिफिन नाही खाल्ला आणि मी सिद्धांत साठी ही दिला होता पण तू त्याला ही नाही दिला. तिची आई तिला बोलत होती.

'आर्या अग मी तुला काही तरी विचारतीये'.काही तरी बोल.

'आई प्लीज ह, अस मला शाळेतल्या मुलांसारखं ट्रीट नको करु ह! टिफिन का नाही खाल्ला अन ऑल! मला नव्हती भुक thats it ! आणि उगाच विषय वाढवू नको'. ती खूप rudely बोलली.

हे बघ आर्या, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते तुला नाही कळणार,आणि सिद्धांत च काय ? त्याला का नाही दिला.

विसरले मी! नाही राहील लक्ष्यात.

नक्की तू खर बोलतीये ना? मला संशय येतोय, मला खर खर सांग तुझं भांडण झाल का सिद्धांत सोबत ?आणि ही कुठली बोलण्या ची पद्धत झाली का?

आई, का माझ्या मागे लागलीये? तुला विश्वास नाही का माझ्यावर?

ज्याप्रमाणे तू उत्तर देत आहेस न त्यावरून तर अजिबात विश्वास बसत नाही आहे ठीक आहे न झालं असेल भांडण म्हणून तू डायरेक्ट इकडे निघून आली.

तुला आवडलं नाही का मी इकडे आलेलं, ठीक आहे नाही राहत मी, मला न कुणीच समजून घेत नाही सगळी कडे माझीच चुकी असते. मला वाटलं कुणाला नाही पण माझ्या आईला तरी वाटेल माझ्या बद्दल पण तू ही मलाच सल्ले दे!

आर्या आता जास्त बोलतीये हा तू! तुझ्या काळजीपोटी च बोलते मी, एकतर तू स्पष्ट बोलत नाही, विचारल तर नीट सांगत नाही मला काय कळणार? जाऊ दे तुला काय करायचं ते कर माझ्या थोड्या जास्तच अपेक्षा असतात तुझ्या कडून.

नको ठेवू ना खरच नको ठेवू इंफॅक्ट माझ्या कडून कुणीही काहीही अपेक्षा ठेवू नका. मी नाही पूर्ण करू शकत. ती चा आवाज बराच चढलेला होता.

दिदी चिल, इतकी का विनाकारण चिडतीये?

आयुष, तू तुझं काम कर मला अजिबात अक्कल शिकवू नको ह! लहान आहे लहाण्या सारखा वाग ती त्याच्यावरही चिडली.

सिद्धांत तिथे येऊन बराच वेळ झाला होता, पण बोलण्याच्या नादात कुणाचंच त्याच्या कडे लक्ष नव्हतं.त्याने सगळं बोलणं ऐकलं. आयुष च त्याच्या कडे लक्ष गेलं.

अरे जिजू तू कधी आलास? आत्ताच आला न?

नाही थोडा वेळ झाला.

तू लक्ष नको देऊ असच चालू असत आमच्या कडे तू ये ना बस.

ठीक आहे रे! आर्या, चल थोडं बाहेर जाऊन येऊ.

माझा अजिबात मूड नाही आहे आणि तू का आला इथे?

आर्या अग अस बोलतात का? तिची आई तिला म्हणाली.

तू चल आणि मी सांगतोय म्हणून चल, त्याने तिचा हात पकडला. चालायचं ? त्याने विचारल. आता नाही म्हणून काही उपयोग नाही हा असही काही ऐकणार नाही हे आर्या ला महिती होत त्यामुळे ती निमूटपणे थोड्यावेळात जाऊन येतो अस सांगून निघाली.

सिद्धांत तिला थोडस लांब एका गार्डन मध्ये घेऊन आला तिथे फार शांत, प्रसन्न वातावरण होत आणि फारशी गर्दी ही नव्हती. ते पाहून दोघांनाही थोडं बर वाटल.

का घेऊन आला इथे? आणि मुळात तू आलसच का? ठरलं होतं न नाही बोलायच ! मग, विसरलास इतक्यात?

नाही अजिबात नाही, अश्या गोष्टी विसरत नाही मी. आणि मी आलोय का तर ते ही तू स्वःता ला च विचार. काय चाललंय का तुझं हा?

अरे तू कालच म्हणाला ना मला काही घेणं देणं नाही मग माझं काहिही चालू दे तुला काय करायचं!

हे बघ आर्या जे झालंय ना ते आपल्यात झालं आणि तू त्याचा राग इतरांवर काढतीये. कळतंय का तुला? मला ते नाही आवडल ! तुला माझा किती रागराग करायचा तो कर, माझ्याशी किती भांडायच तर भांड पण असा इतरांवर का राग काढतीये? आणि मला माहिती आहे हा तुझा स्वभाव नाही. मी काधीही तुला माझ्या शिवाय इतर कुणाशीही भांडताना नाही पाहिलं कारण मुळात तू तशी नाहीच आहे मग का आर्या का वागतीये अशी? तुला जसा त्रास होतो तसा मलाही होतो म्हणून मी काही सगळ्यांवर राग काढतो का? नाही न.

"सिध्दांत", चुकलं माझं.तीच्या डोळ्यात पाणी होत.

तो तिला जवळ घेत म्हणाला आर्या, आपल्यामुळे आपल्या च जवळचे माणस दुखावल्या जातात न, आणि हे बघ शेवटी त्रास तुला च होतो मग अस का वागायचं?आणि साहजिक आहे तुला कुणीही हे विचारणारच. आणि अश्या वागण्यामुळे आपलीच माणस दुरावतात अग, त्यांना तुझ्या बद्दल काहीतरी वाटत म्हणूनच विचारतात न. त्याच्या मागेही काळजी प्रेम असत, ते बघायचं.

हो पण मला नाही करता येत सिच्युएशन हँडल काय करू मी? मी खूप डिस्टर्ब झाले होते.मला वाटलं संपल सगळं मी उगाचच घर सोडून आले, तू नाही येणार परत ! माझ्याच वागण्याची चीड येत होती मला. पुन्हा तिचं insecurity! मला भीती वाटते पुन्हा ऐकट पडण्याची.

सिद्धांत च्या लक्षात आलं की आर्या ला त्या दिवशी त्याने प्रॉमिस केल होत पण ती तेव्हा शुद्धीत नव्हती त्यामुळे तिला ते काहीही आठवत नव्हतं. आर्या, पण मी तुला प्रॉमिस केलेलं तू विसरलीस ?कदाचित तुला आठवत नसेल म्ह्णून पुन्हा एकदा सांगतो. "नाही सोडणार मी तुला एकटीला कुठल्याही परिस्थितीत!' आणि मनातून ती भीती आधी काढून टाक, तू एकटी नाही आहेस काहीही झालं तरीही मी तुला एकटीला नाही सोडणार.

"सिद्धांत"खरच हे तू बोलतोय! आणि मग जर तुला कधीच नाही आठवलं तर!

मी म्हणालो ना कधीही नाही मग आठवण्याचा आणि न आठवण्याचा प्रश्न च नाही उरला.

thank you सिध्दांत तुला कदाचित कल्पनाही नसेल की तुझ्या ह्या बोलण्याने माझं किती मोठ टेन्शन गेलं. ती पुन्हा त्याला मिठी मारून रडायलाच लागली.

आता काय झालं रडायला? आता तरी आनंदी हो!

आनंदाश्रू आहेत रे हे! ती हसून म्हणाली.

ओके, म्हणजे तुझ्या कडे सगळ्या types च्या अश्रूंचा स्टॉक असतो का? तो मिश्कील पणे म्हणाला.

चूप रे, अस काही नाही.

चल मग आधी रेवा ला सॉरी चा मेसेज कर विनाकारणच बोलली ना तिला? आणि घरी जाऊन काकूंना आणि आयुष ला पण सॉरी म्हणायच आहे चल. तो तिला म्हणाला.

नाही ह मी आईला म्हणेल सॉरी पण आयुष ला नाही तो उगाचच चढल्या सारखा करेल सॉरी म्हंटल तर आर्या म्हणाली.

सिद्धांत ला तिच्या बोलण्यावर हसायलाच आलं, अग आर्या अस अस काय करतीये, तू त्याच्या वर पण विनाकारणच चिडली होती ना, आणि लहान असला म्हणून काय झालं तो तुला चांगलच सांगायचा प्रयत्न करत होता. तू नाही ऐकलं.

हो ते सगळं खरं आहे पण..........जाऊदे बोलते एकदाच सॉरी!

hmm गुड!!!! चल आता.
ते दोघही घरी आले, आर्या घरी आल्यावर खूप खुश होती तिने तिच्या आईला ही सॉरी म्हंटल.

'काय रे सिद्धांत काय जादू केली आर्या वर एकदम कळी खुलली तिची'!

काही नाही ग आई! तुझं आपलं काहीतरीच.आर्या म्हणाली.

ती आयुष कडे गेली तो तिच्यावर रागवलेलाल च होता.

आयु सॉरी ना! पुन्हा नाही ओरडनार !

मला नकोय तुझं सॉरी,आधी अपमान करायचा मग सॉरी म्हणायच ह्याला काही अर्थ आहे का? मी लहान आहे म्हणून मला काहिही बोलायच! तो म्हणाला.

हो बरोबर आहे तुझं आयुष तू लहान असला म्हणून काय झालं तुलाही मान आहे न! सिद्धांत मुद्दामून आर्याला चिडवण्यासाठी त्याला बोलला.

exactly!!! मलाही हेच म्हणायच आहे.आयुष म्हणाला.

सिद्धांत तू का आगीत तेल ओतायच काम करतोय! let me handle, आर्या त्याला थोडं रागानेच म्हणाली.

ok पण मला फक्त इतकच म्हणायच होत की तू त्याला लहान समजू नको बस!

बर नाही समजत ठीक आहे, आयुष मी शेवटच सॉरी म्हणतेय हा ! बघ हा इतका भाव खाऊ नको!

बर बाई केलं माफ बस. तू भी क्या याद रखेगी.

"चल नौटंकी कुठला "

त्या दोघांनी ही सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, जेवण केलं आणि सिद्धांत आर्या ला घेऊन निघाला.

क्रमशः
©Neha R Dhole