ना कळले कधी Season 2 - Part 30 Neha Dhole द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ना कळले कधी Season 2 - Part 30

सुरवात तर अगदी सिद्धांतरुपी राक्षस, Devil अशीच होती तिथपासून प्रवास वाचण्यात त्याला जी मजा वाटत होती, आणि पुढे काय लिहिलं असेल या बद्दल अजूनच उत्सुकता वाढत होती. आणि विशेष म्हणजे आर्यने त्याचा राक्षस असा उल्लेख केलेला वाचूनही त्याला राग नव्हता आला उलट हासायलायच येत होतं.
'बिचारीला तेव्हा मला तोंडावत म्हणावं वाटलं असेल पण तेव्हा मी ठरलो तिचा बॉस काय बोलणार म्हणून तिने लिहिलं असेल'.त्याच्या बद्दल च्या निगेटीव्ह कंमेंट्स वाचून त्याला असच वाटलं.चला एकंदर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आमची. किती भाग्य म्हणावं की दुर्दैव की आमची स्टोरी मला आठवत नाही म्हणून मला वाचावी लागतीये.पण काहीही म्हणा आर्याने लिहिलं मात्र एकदम भारी. ऑफिस मध्ये पहिल्यांदाच त्याने तिला रागावल आणि त्यानंतर तिला किती वाईट वाटलं हे वाचूनच त्याला दुःख झालं. पुढे तिची तब्येत ठीक नसताना घेतलेली काळजी, ट्रिप मधले त्यांनी सोबत घालवलेले क्षण, त्याने आर्या साठी बांवलेल जेवण, सगळे प्रसंग तो वाचत होता आणि वाचताना त्याला अस पुन्हा जगत असल्यासारखं वाटत होतं. खरच लग्नाआधी ही आम्ही मनाने इतके जवळ होतो. ते वाचताना त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं पुन्हा त्याने वाचायला सुरुवात केली. डान्स करताना जवळ आलेला सिद्धांत, ज्याने क्षणात स्वःता ला तिच्या पासून दूर केले, त्या एका प्रसंगावर तर तिने लिहिलं होतं सिद्धांत अस वागून आणखीनच जवळ आला. accident नंतर त्याने घेतलेली काळजी हे सगळच वाचून त्याला विश्वास च बसत नव्हता की असही आमच्या आयुष्यात घडल होत? पण तारीख वारासाहित लिहिलेल्या डायरीकडे पाहून त्याला खात्री होती की हे सगळं खरं आहे. पण आपल्याला ह्यातलं काहीही आठवत नाही म्हणून त्याला अजुनही वाईट वाटत होतं. सिद्धांत तिला बोलत नसताना तिची होणारी घुसमट, तिने प्रपोज साठी पाहिलेली वाट सगळं अगदी त्याच्या मनाला स्पर्शून जात होतं.
'इतकं वाटत होतं तर मग बोलायच ना स्वःत च का वाट पाहिली सांगायचं मला तू आवडतोस म्हणून' पण नाही तिला माझ्याच तोंडून वदवून घ्यायचं असेल! तो प्रसंग वाचताना सहजच त्याच्या तोंडातून निघून गेल.
पुढे त्यांच्या लग्नाची तयारी त्यात आर्याची उडणारी धांदल तिला आलेलं टेन्शन त्यात सिद्धांत चा मिळणारा आधार सगळच खूप छान शब्दात मांडल होत. लग्नानंतर चे दिवस त्याबद्दल आर्या ने लिहिलं होतं,' की मी खूप लकी आहे मला सिद्धांत सारखा पार्टनर मिळाला. तो खर तर फणस आहे म्हणजे वरून तो कितीही rude वाटत असला तरीही आतून मात्र अगदी गोड. तो असा समजणे शक्यच नाही'. त्याला हे वाचून हसायला आलं. बापरे आर्या किती चांगलं ओळखलं मला. आर्याने पुढे लिहिलं होतं माझ्या टेन्शन च कारण आणि उपाय एकच आहे तो म्हणजे "सिद्धांत". काय!!! हे काय लिहिलं हिने म्हणजे मी काही टेन्शन देतो का ? स्वतःच विनाकारण घेत असती.
पुढे वाचत असताना, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं accident कसा झाला ? ते नेमके कुठे गेले होते. हे सगळं त्याला आधी मंदार ने सांगितलं होतं सगळं तेच पुन्हा त्याला वाचायला मिळालं. त्यानंतर आर्या ने लिहिलं होतं.
'आज सिद्धांत ज्या परिस्थिती मध्ये आहे त्याला केवळ आणि केवळ मीच जबाबदार आहे', ह्या गोष्टीसाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही!. 'मी उगाचच हट्ट केला बाईक वर जाण्याचा मोह हा क्षणाचा असतो पण तो खूप महागात पडतो'. "जसा सितेला कांचनमृगाचा मोह झाला आणि तिला श्रीरामांपासून दूर जावं लागलं. माझंही अगदी तसच झालं". त्या एका मोहाच्या क्षणामुळे मी माझ्या सिद्धांत ला कायमच गमावून बसले! फक्त फरक एवढाच आहे की तो माझ्या डोळ्यांसमोर असतो. 'पण ते तर अजून च त्रासदायक आहे आपला पार्टनर आपल्या समोर असून आपल्याला साधं ओळखत नाही ह्या पेक्षा अजून काय वाईट असू शकत?' 'ज्याला मी सर्वस्व मानते तो माझं अस्तीत्व च मान्य करत नाही!' 'किती कठीण आहे हे सगळं'!. पुढे काय होणार? 'काहीही माहिती नाही'. 'त्याने मला ओळखावं ह्याचा आग्रह नाही ,पण तो लवकर बरा व्हावा हीच एक अपेक्षा आहे'. माझ्या आयुष्यात माझ्या प्रिय गोष्टी कधीच माझ्या जवळ राहत नाही आधी बाबांवर खूप प्रेम होतं देवाने त्यांनाही नेलं, मग सिद्धांत वर केलं आता तो ही दुरावला मुळात मला तर आता अस वाटतय की मी कधी कुणावर प्रेम करायचंच नाही का? म्हणजे जर मला काही मिळणारच नसेल तर मग का? आणि किती त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा कुणीही नाही समजून घेऊ शकत. दिवस भर सगळे असतात पण रात्र मात्र खायला उठते गेले कित्येक रात्र मला झोप नाही लागत, 'हल्ली आयुष च्या जोक्स वर पण हसायला नाही येत', कुणाशी बोलण्याची इच्छा नाही होत कधी कधी तर वाटत की 'आपण जगतोच का आहे?" पण मग विचार येतो, 'की उद्या जर सिद्धांत ला सगळं आठवलं आणि त्याच्या समोर त्याची आर्यच नसली तर' तो सहन च करू शकणार नाही!. 'फक्त आणि फक्त सिद्धांत ला कधीतरी आठवेल ह्या च आशेवर मी दिवस काढतीये'! ' पण जसे जसे दिवस चालले तशी तशी ही आशाही मावळत चालली आहे'!.
आज सिद्धांत घ्यायला येणार किती छान किती दिवसांपासून मी वाट बघत होते ह्या दिवसाची. तसा सिद्धांत सहसा कुठलीच गोष्ट लवकर मान्य करत नाही पण मग तो मला स्वीकारायला तयार कसा झाला ? हा खरच माझ्या साठी अनुत्तरित प्रश्न आहे. पण ठीक आहे आता होईल सगळं नीट! कितीतरी दिवसानंतर आम्ही सोबत असू ! मला तर कल्पनाच सहन होत नाही आहे . काय बोलू आणि काय नाही असं होतंय.
तिचा तो उत्साह पाहून सिद्धांत ला स्वतःचीच घृणा वाटली. आर्या किती आनंदी होती तेव्हा आणि किती संकटांनंतर चा आनंद होत तो आणि मी काय केलं ? शी असा कसा वागू शकतो मी? तिच्या मनाचा एकदाही विचार नाही केला.
किती पटकन बोलून गेला सिद्धांत की आपलं काहीच नात नाही मी नाही स्वीकारू शकत ! फक्त मला आईला दुखवायचं नाही आहे म्हणून तुला घरात आणलं! एका क्षणात त्याने माझ्या सगळ्या आनंदावर पाणी सांडलं. त्याने एकदाही विचार करु नये मला काय वाटलं असेल. माझं च चुकलं थोड्या जास्त च अपेक्षा ठेवाल्या मी सिद्धांत कडून तसा तो ही त्याच्या जागेवर बरोबर आहे , मुळात चुकीचं कुणीच नाही नियती आणि नशिबाचे भोग दुसरं काहीही नाही! तसा ह्या गोष्टींवर माझा कधी विश्वास नव्हता पण आता भाग पडतंय विश्वास ठेवण. पुढे काय होईल महिती नाही पण सिद्धांत थोडा चांगला वागला त्याने काळजी घेतली की उगाचच पुन्हा कुठेतरी होप्स निर्माण होतात मग पुन्हा वास्तवाची जाणीव होते की हा ह्याचा स्वभाव च आहे. पण त्या मागे प्रेम असेलच अस नाही ना?. पण तो असा वागला की उगाचच अपेक्षा वाढत जातात मग दुसऱ्या दिवशी तस काहीच नसत पुन्हा चिडचिड !! मग वास्तवाची जाणीव होते. की आपण उगाचच अपेक्षा ठेवल्या अस काहीच नाही आहे. त्यामुळे हल्ली माझी ही चिडचिड वाढतीये, मन स्थिर नसत. आणि वाद वाढत जातात.
पुढचे दहा दिवस तो इथे नसणार आहे, कल्पनाच करू शकत नाही मी सिद्धांत शिवाय राहण्याची. कसे काढणार हे दहा दिवस पण शेवटी करियर ही महत्त्वाच आहे. हल्ली खुप सवय झाली आहे त्याची आता तर सिद्धांत ने आवाज दिल्याशिवाय जागही येत नाही. तो सोबत असला की निशिंत असते मी. तो घेतो सगळं सांभाळून. पण त्याला पासून आता दूर नाही जावं वाटत. त्याचे टोमणे, त्याच चिडवणं सगळच मिस करणार आहे मी हे पुढचे दहा दिवस. आणि हो सगळ्यात महत्त्वाच त्याच्या हातच जेवण! हे वाचून सिध्दांत च्या चेहऱ्यावर हसू उमटलं. काहीही लिहिते आर्या जेवण मिस करणार म्हणे. आणि त्याने डायरी बंद केली.
बापरे किती भयानक दुःख आहे! , आर्याचा चेहरा पाहून कधी वाटणारही नाही की ती इतक सगळं सहन करतीये! आणि किती दिवसांपासून, आर्याही ना, इतकं सगळं एकटी सहन करत राहिली एकदा तरी सांगून पाहायचं असत! पण मी विश्वास ठेवला असता? नाही ती परिस्थिती च तशी होती. आणि आजही आर्याला हेच वाट्तय की हे सगळं तिच्या च मुळे झालं.ती वेळ वाईट होती. हे कसं नाही कळत आर्याला . मला आज कळतंय आर्या विषयी मला इतकी का काळजी वाटते, तिला थोडही काही झालं तरी मी नाही सहन करू शकत, तिला डोळ्यात पाणी पाहिलं की आजही मला तोच त्रास होतो, ती जवळ नसली की हरवल्या हरवल्या सारख वाटत, ही फक्त सवय नाही आहे , म्हणजे नेमकं कळत नाही पण काहितरी आहे जे तिच्याच जवळ खिळवून ठेवत. आणि हो पुढचे नऊ दिवस तर आता आणखीन कठीण जाणार आहेत हे सगळं वाचून आताच आर्या कडे जाऊन तिला म्हनावं वाटत होतं की नाही नशीब नियती नसतात च ह्या गोष्टी, बघ तुझा सिध्दांत तुझ्या समोर आहे, आणि तू म्हणत होतीस ना की माझ्या प्रिय गोष्टी दूर जातात पण ह्या वेळेला तस नाही होणार! मी कायम तुझ्या जवळच असेल. हे तर मी तिला फोन वर पण बोलू शकतो पण मला तिची reaction पहायची आहे आणि त्या साठी तर मी wait करूच शकतो.....
misss youu to dear..... !!!! अस म्हणून तो झोपायला निघून गेला.
क्रमशः

©Neha R Dhole