Naa kavle kadhi - 2 - 32 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 32

काय ग, एवढी का अपसेट आहेस? आयुष च्या आवाजाने आर्या भानावर आली.

काही नाही रे असच!

सिद्धांत ला मिस करतीये?

ती मानेनेच हो म्हणाली.

येईल ना, इतकं काय आणि असला तरी तुझं कोणतं पटत त्याच्यासोबत!

shut up आयुष , ह्या वेळेस माझी कुठलीही भंकस ऐकण्याची इच्छा नाही आहे.

अरे यार काय खोट बोलतोय का मी, तुझं म्हणजे कस आहे न तुझं माझं जमेना न तुझ्या वाचून करमेना!

त्याला येत असेल का रे माझी आठवण?

हे अजिबात नाही, तो तर मस्त मजा मारत असणार तो तर म्हणत असेल बर झालं मला दहा दिवस आर्या पासून सुटकारा मिळाला!

आयुष निदान मला चांगल वाटावं म्हणून तरी चांगल बोल रे!

हे बघ मी खर बोलतो, कुणाला चांगल वाईट वाटावं म्हणून नाही.

तिचा पडलेला चेहरा पाहून आयुष म्हणाला. अरे यार दिदु जस्ट किडींग तो व पण तुला तितकाच मिस करत असणार. आणि तू म्हणजे ना कशाचेही टेन्शन घेऊ शकते हा! आणि इतकं काय आठवत बसायचं आली आठवण की करायचा कॉल.
इतक्यात सिद्धांत चा च कॉल आला.

hii आर्या, काय करतेय?

काही नाही!

मला मिस करत होती ना!

हे का मिस करु तुला?

हे बघ आर्या तू ना जास्त स्मार्ट बनण्याचा प्रयत्न नको करत जाऊ, तुला आधीही म्हणालो तुझा चेहरा कोऑपरेट नाही करत .

काय प्रॉब्लेम आहे यार ह्याचा थोडही खोट बोलले की लगेच पकडतो. ती मनातच विचार करत होती.

'मग बोलायच नाही न खोट',तो म्हणाला. आणि तसही तुला ऑफिस मध्ये एकटीला करमत नसेल ना?कारण आता सवय झाली आहे ना माझी.

अस काही नाही ह, उगाच इतकं स्वतःला ग्रेट समजू नको. मला सवय आहे एकटीला मॅनेज करण्याची.

thats really good! पण मला काय वाटल की आता तुला सकाळी कोण उठवत असणार? तू भांडण कुणाशी करत असणार? आणि सगळ्यात महत्त्वाच तू माझ्या हातच जेवण मिस करत असणार. पण अस तर काहीच नाही. any way मला अस उगीचच वाटलं.

अरे ह्याला कस कळलं की मला exactly काय वाटतय आणि मी तर हे डायरी मध्ये पण लिहिलं होतं.किती चांगलं ओळखतो सिध्दांत मला.

जाऊ दे आर्या तू काही मान्य करणार नाही की तू मला मिस करतीये.

तुला तर येत नसेल ना माझी आठवण त्यासाठी माणूस लक्ष्यात असावं लागतं. आर्या हे बोलून गेली पण त्या नंतर ची सिद्धांत ची शांतता पाहून तिला लक्षात आलं की आपण चुकीचं बोललो .

सॉरी सिद्धांत म्हणजे.......

ठीक आहे आर्या खर बोलतीये तू .....

तो आतून दुखावला गेला हे तिला कळलं, सिध्दांत मला तुला दुखवायचं नव्हतं पण निघून गेल.

ठीक आहे आर्या मला नाही वाईट वाटलं, आणि खर तर ह्या गोष्टीचा सगळयात जास्त त्रास तुलाच होतो, माझ्या पेक्षाही जास्त!

आर्या ह्या वर काहीच बोलली नाही.

आर्या तू का त्या गोष्टीच इतकं टेन्शन घेतीये मी तुला एकदा बोललो ना की मी नाही सोडणार तुला एकटीला नाही आठवलं तरीही ! मग का? आणि आपण नेहमीच सोबत राहू न!

सिद्धांत सोबत राहिल्याने फक्त सवय होते, प्रेमाचं काय?

आता मात्र सिद्धांत गप्प च झाला कारण त्याच्या कडे काही बोलायलाच नव्हतं.

सिद्धांत ऐकतोय ना,

आर्या मे बी इथे रेंज चा प्रॉब्लेम येतोय, will call you back. आणि त्याने कट केला.

किती दिवस असा पळ काढणार तिचा प्रश्न बरोबरच होता. काय चुकीचं बोलत होती आर्या. पण मी काय सांगणार तिला आणि जे काही सांगायचं तर फोन वर तर मुळीच नाही. तिने खरच खूप मनापासून प्रेम केलय माझ्यावर ह्या परिस्थितीत ही ती नाही गेली मला सोडून हेच खरं प्रेम असत.आणि ह्याच तिच्या स्वभावामुळे तिलाही कळत नाही आहे की ती माझ्या आणखीन जवळ येत आहे. पण ह्या नंतर नाही आता मी आर्याला बोलणार ते समोरच, नको आता फोन वर बोलणंच नको.परत काही तरी विषय निघतो पुन्हा ती दुखावली जाणार आणि माझाही मूड जाणार. त्यापेक्षा नकोच!

ठेवला फोन,सिद्धांत कडे कधीच नसतात माझ्या प्रश्नाचे उत्तर, अजून किती दिवस पळणार आहे ह्या प्रश्नांपासून काय माहिती.आणि मी एकटीनेच ह्या गोष्टींचा विचार करून काही फायदाही नाही.

असेच दिवस चालले होते, पण ह्या दिवसांमध्ये सिद्धांत ने आर्याला एकदाही कॉल केला नाही किंवा साधा मेसेज ही केला नाही आर्याने त्याला एकदोन दा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यालाही रिस्पॉन्स दिला नाही.

काय झालंय सिद्धांत ला साधा फोनही नाही करत आहे, बर मी केला तरीही उत्तर देत नाही आहे, काय झालं असेल ह्याला? माझं काही चुकलं का? की माझा कुठल्या गोष्टीचा राग आला, अरे मग सांगायचं ना! अस करत का कुणी ? मी त्याला उगाचच बोलले त्या दिवशी म्हणून तर नसेल टाळत ना? अस असेल तर का बोलले यार मी त्याला ? निदान त्या आधी बोलत तरी होता. एकतर आधीच मला त्याच्या शिवाय करमत नाही आहे आणि त्यात ह्याचा अबोला काय समजायचं माणसाने. पण
माझा थोडा तरी विचार करायचा. आता माझ्या कडे ही वाट पाहण्याशिवाय दुसरा ईलाज नाही आहे. आता फक्त उद्याचा दिवस! हो आणि मला उद्या घरी जायला हवं परवा सिद्धांत येणार न!

किती दिवस झाले आर्याला कॉल ही नाही केला तिला एकदाही बघितलं नाही ठीक असेल ना ती ? असेल च तस ऑफिस मधून आणि आयुष कडून काढून घ्यायचो मी तिची माहिती पण तिच्याशी नाही बोललो एकदाही. किती वाट पहिली असेल बिचारी ने माझी आणि तिला रागही आला असेल माझा साहजिकच आहे म्हणा ! पण मी तरी काय करू आता आणखीन नव्हतं दुखवायचं मला तिला नकळत पणे का होईना पण कुठल्या विषयाचा त्रास होईल सांगता येत नाही. झालं आता इथलं कामही झालं. मी ना उद्याच निघतो म्हणजे आर्या जेव्हा परवा घरी येईल तेव्हा तिला surprise मिळेल. yess मी असच करतो म्हणजे आर्याला किती आनंद होईल. आणि तिचा सगळा रागही निघून जाईल. बस आता फक्त आजची रात्र इथे काढायची उद्या मी घरी आणि परवा मला आर्या भेटणार!
क्रमशः
©Neha R Dhole


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED