त्रिरेकादश योग - संपत्ती योग Sudhakar Katekar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

त्रिरेकादश योग - संपत्ती योग

मनुष्याच्या जीवनात संपत्तीला महत्व आहे.जन्म
पत्रिकेवरून हा योग पाहता येतो.

त्रीरेकादश योग अर्थात धनयोग,संपत्ती योग कसे पाहावे

त्रीरेकादश योग अर्थात संपत्ती योग / धनयोग कसे पाहावे.तूळ लग्न आहे.वृश्चिक राशीत मंगळ आहे.कन्या राशीत गुरु आहे.कन्या रास धरून वृशिक रास तिसरी येते.वृश्चिक रास धरुन कन्या रास अकरावी येते याचा अर्थ मंगळ गुरु या दोन ग्रहांचा त्रीरेकादश योग आहे.तसेच गुरु-चंद्र ,चंद्र व रवी,बुध,रवी,बुध वं शुक्र, शुक्र व शनी या ग्रहांचे ग्रहांचे त्रीरेकादश योग आहेत.अशा योगात सांपत्तिक स्थिती
अतिशय चांगली असते. व्यवसाय असो वा नोकरी आर्थिक उत्कर्ष होतो काहींच्या कुंडलीत दोन ग्रहात हा योग असतो.काहींच्या जन्मपत्रिकेत दोन पेक्षा अधिक ग्रहांचा योग असतो.या प्रमाणे जन्मपत्रिकेत योग पहा.
आपणही आपल्या पत्रीकेत असे योग पाहू शकता.गुरू-चंद्र,चंद्र -मंगळ यांचे धन स्थानाशी,भाग्य स्थानाशी होणारे योग पाहावेत.
कुंडलीतील त्रिकोण योग
कुंडलीत बारा स्थाने आहेत.त्याचे चार त्रिकोण होतात.त्याची फळे निरनिराळी आहेत. पहिला त्रिकोण लग्न,पंचम व नवम स्थान.दुसरा त्रिकोण द्वितीय ,शष्टम ,व दशम स्थान याला अर्थ त्रिकोण म्हणतात.तिसरा त्रिकोण त्रितीय, सप्तम व एकादश स्थान व चौथा त्रिकोण चतुर्थ,अष्टम व द्वादश स्थान.
१) पहिला त्रिकोण म्हणजे लग्न,पंचम व नवम स्थान वंश विस्तार होणे त्याच वेळी आत्मोद्धार करून घेणे हे या त्रिकोणावर अवलंबून आहे.लग्न हे केंद्रस्थान,पंचम हे पणफर व नवम अपोक्लिम.",केंद्र हे बलवान,त्या खालोखाल पंचम व नवम.पंचम यावर वंश विस्तार याचा विचार होतो ऐहीक
उन्नत्ती नवम स्थान.,तसेच या ठिकाणी पारमार्थिक उन्नतीचा विचार करतात.हा पहिला त्रिकोण बलिष्ठ असल्यास प्रगती चांगली होते. या ठिकाणी शुभ ग्रह असणे अधिक चांगले.
२)दुसरा त्रिकोण म्हणजे द्वितीय,षष्टम,व दशम स्थान ,याला आर्थिक त्रिकोण असेही म्हणतात.कोणते स्थान जास्त बलवान त्या प्रमाणे फल मिळते.द्वितीय स्थानावरून संपत्तीचा विचार करतात या वरून आर्थिक स्थिती काशी असेल हे समजते.षष्टम बलवान
असेल तर विरोधी पक्षाचा विचार करतात,तसेच मातुल व पशु धन याचाही विचार करतात.प्रतिष्ठा ,मोठे पद, कीर्ती,नोकरीत उत्कर्ष,व्यासायात प्रगती याचाही विचार केला जातो.दशम स्थान हे केंद्र स्थान असल्यामुळे या स्थानी उंचीचे ग्रह असल्यास नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होते.राज मान्यता.नोकरी मध्ये बढती,अधिकार योग याचाही विचार करतात.
या तीन स्थानात जे स्थान अधिक बलवान त्या प्रमाणे फल मिळते.
तिसरा त्रिकोण त्रितीय,सप्तम,एकादश स्थाम
या लोकांना समाजात मिसळणे आवडते.उद्योग व व्यवसाय या मुळे जन संपर्क.त्रितीय स्थानावरून सागे,सोयरे,नातलग यांचा विचार करतात.संपतं स्थानावरून वैवाहिक जीवनाचा विचार करतात.एकादश स्थान,इच्छा पुर्ती होईल की नाही हे दाखविते

चौथा त्रिकीन म्हणजे चार,आठ व बारा ही स्थाने.चतुर्थ स्थानावरून वाहन शेतीबवादी,
स्थावर संपती याचा विचार करतात.द्वादश
स्थान, विरक्ती दर्शक,अध्यात्मिक प्रगती दाखवितो.अष्टम स्थान गूढ विद्या,तसेच त्यागा
कडे प्रवृत्ती .
संततीच्या प्रश्न पहात असताना दोन,पाच व अकरा विचार करावा.पंचम स्थानाचा उप नक्षत्र स्वामी जर दोन,पाच किंवा अकरा
या पैकी कुढल्या ही एका स्थानाशी संबंधित
अ,,,सेल तर विवाह हमखास होईल .
कुंडलीत सांपत्तिक स्थिती अथवा धन योग कसे पहावेत.
१) लग्न,लाभ,धन व भाग्य यांचे स्थानी उच्च राशीत.
२)धनेश लाभात व लाभेश धनात.
३)लग्नेश धनात धनेश लग्नात.
५) लग्नेश लाभेश
६)लग्नेश" लाभेश भाग्येश
७)लग्नेश धनेश लाभेश
लग्न,रवी,चंद्र यांचा भाग्येश कोणाच्या तरी भाग्यात असतो तेव्हा कीर्ती होते,अध्यात्म जाणतो,जन कल्याण करतो,प्रसिद्धी मिळते, शिक्षण संस्था स्थापन करतो.लोकोपयोगी कार्य करतो. असे योग पाहतांना महादशा व अंतरदशा याचा विचार करावा.
लग्न,रवी,चंद्र यांच्या भाग्यस्थानी ग्रह असणे भाग्याचे लक्षण आह.
भाग्येश दशमेश भाग्यात,भाग्येश पंचमात व पंचमेश भाग्यात हे योगही संपत्ती देणारे आहेत.
अकल्पित धनयोग
मृत्युपत्राद्वारे मिळणारे धन,जमीनीत सापडलेले,देणगी मिळालेले,सट्टा, लॉटरी,लाचालुचपतीने किंवा अकस्मात मिळालेले धन.
१)अष्टमेश लाभात,लाभेश अष्टामात
२)अष्टमेश धनात धनेश अष्टामात
३)अष्टमेश लाभेश व धनेश उंचीचे
४)अष्टमेश अष्टामात,लाभेश लाभात,धनेश धनात.
५) अष्टमेश लाभेश धनेश
सु.गो.काटेकोर
Visharad
Astrological Research institute
Chennai
M O.9653210353