स्फूर्ती आत्मचरित्र - 3 Sudhakar Katekar द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्फूर्ती आत्मचरित्र - 3

माझं शिक्षण पूर्ण होणं नोकरी करून त्या करिता पत्नीला सुदद्धा त्याग करावा लागला।याच श्रेय तिला देणं हे माझं कर्तव्य आहे।त्या काळात DEd होणं सोपं होतं तिथल्या तिथे शाळेत DEd होण्याची सोय होती। शाळेत अप्रशिक्षित शिक्षक म्हणून काम करणे आवश्यक होते।पण घरात असणारे कोणीही तेवढया कालावधी करिता वेळ देण्यास तयार नव्हते।कारण त्यांना सगळं ऐत पाहिजे होत। याला काय म्हणणार।जर ती DEd झाली असती तर आज पेन्शन मिळाली असती।

यालाचम्हणतात मूग गिळून स्वार्थ साधने। आमच्यां तिथे सरकार मान्य शिवण क्लास   डिप्लोमा सुरू झाला। तेथे तिने प्रवेश घेतला।व डिप्लोमा पूर्ण केला। त्या करिता घरातील सर्व कामे पूर्ण करून क्लासला जावे लागत असे।

अशाही परिस्थितीत तिने डिप्लोमा पूर्ण केला।

कालांतराने त्याच क्लास मध्ये तिची शिक्षिका म्हणून नेमणूक झाली । त्याच वेळेस बाकीचे दुसऱ्या ठिकाणी राहावयास गेले कारण काम करावयास नको । आमच्या तिथे बाजार आठवड्यातुन एकदा भरत असे। व बाजार साधारण दोन किलोमीटर लांब होता। आशा वेळी घरातील कोणीही जाण्यास तयार नव्हते कारण भाजीचे ओझे कोण आणणार।मग आम्ही दोघे जात असू कारण 5 ते 6 किलो वजन असावयाचे। जरी आम्ही भाजी आणली तरी ती निवडून कोणी ठेवायची तेही करण्यास कोणी तयार नव्हते । तेही काम पत्नीला करावे लागत असे। मोठा प्रश्न म्हणजे गहू निवडून गिरणीवर जाऊन दळण आणणे। हे काम सुद्धा करण्यास कोणी तयार नव्हते। कारणर ऐत पाहिजे होत।

खरं तर थोडी तरी जबाबदारी बाकीच्यांनी उचलायला पाहिजे होती, कोणाला जबाबदारी नको होती।

तो काळ असा होता की कपडे धुण्यासाठी मशीन नव्हते त्यामुळे तिला सगळ्यांचे कपडे ध्वावे.लागत असत।एवढेच नव्हे तर ती कपडे सुद्धा इस्त्री करून ठेवत असे।सण वार हे देखील तिला करावे लागत असे पण हे सर्व होत असताना काही कटु अनुभव सुदद्धा आले। मोठे बंधू हे काही दिवस नाशिकला कमला होते। 

त्यांच्या पत्नीचे जेव्हा निधन झाले हे प्रथम धाकट्या भावास समजले । तो व त्याची पत्नी दोघे तिथे जाऊन आले।त्यांचं कर्तव्य होतं तिथे थांबायचे व निदान मला कळवायाचे पण मला त्यांनी सांगितले नाही मला हे परस्पर समजले

आम्ही उभयतां दोघे तिथे गेलो । याला काय म्हणानार ।आमच्या मातोश्री तिथेच होत्या एक दिवस त्याने तिला घेऊन धाकट्या भावाकडे गेला तो मराठवाड्यात साखर कारखान्यात कामाला होता व ड्युटीवर होता। घरी त्याची पत्नी होती।

पण ती मोठया दिराला व आमच्या मातोश्रीला घरात सुद्धा घेतले नाही। मोठा भाऊ तिला सोडून परत निघाला। धाकटा भाऊ ड्युटीवर होता तो सहा वाजेपर्यंत येई पर्यंत आमच्या मातोश्री घराच्या बाहेर बसून राहिल्या।विशेष म्हणजे धाकटा भाऊ ड्युटीवरुन घरी आला ,त्याला समोर मातोश्री दिसल्या त्याने न पाहिल्या सारखे केले एक शब्द बोलला नाही घरात गेला ,पण स्वतः च्या आईला घरात सुद्धा घेतले नाही।तो तसाच मातोश्रीला घेऊन स्टॅन्ड वर आला व तिला घेऊन पुण्याच्या गाडीत बसला. तिला त्याने एक शब्दांनी सुदद्धा विचरलेनाही किंवा शब्दही तिच्याशी बोलला नाहि मी त्यावेळेस पुण्याला होतो तो तिला घेऊन पुण्यास आला सकाळचे सात वाजले होते बेल वाजली पाहतो ते आमचे धाकटे बंधू मतोश्रीस घेऊन आले मला आश्चर्य वाटले आमच्या मतोश्रीस चोवीस तास जागरण व एक पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नव्हता त्यानेही आपल्या आईस काही खाण्यास दिले नाही,आमच्या मतोश्रीनी त्याच्या समोर सांगितले याने मला खायला दिले नाही मला अतिशय भूक लागली आहे। पहा मुलगा आपल्या आईशी किती निर्दयपणे वागू शकतो, ज्या आईने त्याला लाहण्याचे मोठे केले।खस्ता खाल्ल्या तो मुलगा किती निर्दय आहे। आमच्या मतोश्रीनी थोडे खाल्ले व निवांतपणे झोपली। असा कटू अनुभव सख्या भावाचा आला।

अशात ही माझी पत्नी घराच्या उत्कर्षासाठी

प्रयत्नशील राहिली। घराच्या उत्कर्षाचे व माझ्या प्रगतीचे श्रेय तिचेच आहे.

  प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते .

 माझा हा लेख सर्वांना मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.