हे शक्य आहे का? Sudhakar Katekar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हे शक्य आहे का?

समाजात अशी एक विचार धारा आहे की,ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव विचारात घेता त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजाला घेता येतो किंवा घरातील नातू अथवा नात यांना होऊ शकतो,आणि हाच खरा प्रश्न आहे. की खरोखरीच असे सगळ्यांना वाटते का,?हा खरा प्रश्न आहे. बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना नातू अथवा नात असते तर त्यांना. तरी फायदा होऊ शकतो का,?या ठिकाणी काही सत्य घटना,व अनुभव देत आहे.
वायो व्रुद्ध आई वडील मुलगा सून व नातू शिरूर येथे बदलून गेले तेथे त्यांची सून कॉलेज मध्ये नोकरीस लागली.कॉलेजच्या जवळ बांध काम चालू होते.लगेच ती पतिस म्हणाली आपण येथे घर घेऊ.घर विकत घेतले पण घरामध्ये दोन वायोवरुद्ध आहेत
त्यांना एक शब्दाने ही विचारले नाही
त्यांना माहीत होत इथे कायम राहणार नाही.घरातल्या वडील धाऱ्या माणसांना विचारले नाही कारण आमचे पैसे आहेत विचारण्याचा प्रश्नच येत नाही निदान सल्ला घ्यावा असे सुद्धा वाटले नाही.कारण त्यांना याची कल्पना होती.ह्या स्थितीत जर
वृद्ध नाही म्हणाले तर.साहजिकच घरातील ज्येष्ठ वाटणे.त्यांनी मनात विचार केला आपली सून मुलगा चुकीचा निर्णय घेत आहेत जर पैसे खर्चच करावयाचे आहेत तर पुण्या सारख्या ठिकाणी तेवढेच घर घ्यावे म्हणाजे जर घर विकावयाचे असेल पुण्या सारख्या ठिकाणी जास्त किंमत येईल.या ठिकाणी कमी किंमत येईल
याचा आणि एवढा दूरवरचा विचार कोण करणार? वयोवृद्ध अनुभवाने दूरवरचा विचार करतात एवढी क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली असते.त्या अनुभवाचा फायदा मुलाला.सुनेला व्हावा हा एकच चांगला हेतू त्यांच्या मनात असतो.पण त्याचा अशा परिस्थितीत काय उपयोग.कारण
त्यांनी सांगितले तरी एकले पाहिजे हा खरा मुद्दा आहे.
ज्या वेळेस ज्येष्ठ नागरिक एकत्र जमतात त्या वेळेस प्रत्येक जण आपली व्यथा अनुभव मोकळ्या मनाने सांगतात.
असाच एक प्रसंग,मनाला वेदना देणारा,हे ज्येष्ठ तेहतीस वर्षे शिक्षण क्षेत्रात मुख्य पदावर व्यतीत केलेले, असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवले होते.
पण त्यांच्याच घरी ते आपल्या अनुभवाचा,ज्ञानाचा फायदा देऊ शकले नाहीत.
त्यांचा नातू बारावीत होता.ते स्वतः संगणक, वापरत होते.कारण त्यांना
लिखाणाची आवड होती.त्यांनी मी स्वत:चा,ब्लॉग केला आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे सांगितले
ते म्हणाले त्यांची सून म्हणाली तुमचा संगणक नातू पाहतो त्या मुळे त्याचे
अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांनी संगणक वापरणे बंद केले व तो संगणक मुली कडे नेऊन ठेवला.आता एवढ्यावर थांबाव यास
पाहिजे पण तसे झाले नाही त्यांची सून म्हणाली तुमचा मोबाईल तो पाहतो मग त्यांनी मोबाईल वापरणे बंद केले वाईट वाटले अरे अभ्यासाचे महत्त्व काय ज्यांनी आयुष्य त्या क्षेत्रात व्यतीत केले त्यांना सांगावे,जल त्याचा बरवीचा पेपर सुरू असताना,सुनेची एक नाते वाईक आली व म्हणाली एक स्पर्धा परीक्षा आहे ती दिल्यास त्याला परदेशात जाण्याची संधी मिळेल.ती परीक्षा दे.त्यांनी त्या अभ्यासास सुरुवात केली पण त्याचा परिणाम असा झाला की नातू कंटाळून गेला त्याला अभ्यास नकोसा वाटला.बारावी पास झाला पण अभ्यास नको वाटू लागला
मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून ते बरोबर आहे हे सर्व घडत असताना ज्यांनी आयुष्य शिक्षण क्षेत्रात घालवलं त्यांना काय वाटलं?असेल
याचा विचार करा ज्येष्ठांचा अनुभवाचा उपयोग त्यांना वाटून सुधा होऊ शकला नाही.कारण कोणाला त्याची जरूरी. नाही.अशी स्थिती आहे.ज्येष्ठांची.
असाच एक अनुभव एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितला.
ती व्यक्ती सेवा निवृत्त होती.पेन्शन मिळत होती त्यामुळे साहजिकच
ते घरामध्ये काही पैसे देत असत.एक दिवस तिने मुला मार्फत सांगितले की तुमचे पैसे आम्हाला नको.आणि त्या घराती वृद्ध व्यक्तीने दुधाचे बिल दिले होते.तिने त्या व्यक्तीचे मुलास सांगितले की ते बिल परत करा मुलानेही काही विचार न करता
ते बिल परत केले.ती ज्येष्ठ व्यक्ती दुसरे कोणी नसुन मुलाचे वडील,अर्थात सुनेचा श्र्वसुर आता
सांगा ज्यांनी घरातला कर्ता माणूस त्याच कर्तव्य म्हणून म्हणून खर्च.याची जाणीव मुलास होती सून करिता तो काही बोलला नाही पण त्याला किती वेदना झाल्या असतील कल्पना सुद्धा करता येणार नाही.
मग तुम्ही हे वाचल्यावर विचार करा,
"हे बदलने शक्य आहे का?"