Sanskar books and stories free download online pdf in Marathi

संस्कार - रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा

"मन" " रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा"

प्रभू रामचंद्र वनवासातात असताना,काष्ठ गोळा करण्यासाठी अरण्यात दूर गेले त्यावेळी
सीतामाई व लक्ष्मण दोघेही परणकुटीत असतात.
सीतामाई अनवाणी चालून थकलेली होती"दगड हीच उशी,त्या मुळे श्रम परिहार होईना म्हणून ती
लक्ष्मण भाऊजींना म्हणते,मला स्वस्थ झोप येण्यासाठी आपल्या मांडीवर डोके ठेऊन जर पडते
मातेसमान मानणाऱ्या आपल्या वहिनीच्या शब्दास केवळ आदर पूर्वक आज्ञा मानून आपल्या मांडीवर
मातेचे शीर ठेवण्यास अनुमती दिली.सितामाईस गाढ निद्राही लागली. या वेळी
आपल्या बंधूंची परीक्षा पाहण्यासाठी, राघवाचा म्हणजे पोपटाचा देह धारण करून,समोरील वृक्षावर बसून मनुष्य वाणीने लक्ष्मणास प्रश्न करतो.
"पुष्पं द्रष्टा,फलं द्रष्टा,द्रष्टा स्त्रीनांच यौवनम ।
त्रिणी रत्नानी द्रष्टवैव कस्य नो चालते मन:।।
अर्थ:-एखादे सुवासिक फुल पाहिल्यास,खण्याजोगे pपक्व फल पाहिल्यास किंवा एखादया स्त्रीचे यौवन
पाहिल्यास कोणाचे मन ढळणार नाही?यावर
लक्ष्मणाने दिलेले उत्तर.
"पितायस्य शुचिर्भूता माता यस्य पतिव्रता ।
उभाभ्यां यस्य संभूति:तस्य नो चलते मन:।।
अर्थ:-ज्याचा पिता शुचिर्भूत आहे व ज्याची माता
पतिव्रता आहे यांच्या पासून निर्माण झालेली जी
संतती तिचे मन ढळणार नाही.
यावर राघवाचे समाधान झाले नाही म्हणून रागावणे आणखी एक प्रश्न विचारला.
" अग्निकुंभ समोनारी धृतकुंभ समोनर :।
यानुस्थिता परस्त्री : चेत तास्य नो चालते मन:।।
अर्थ:--नारी जणू अग्निकुंभाप्रमाणे असून,त्या अग्निसमीप धृतकुंभ ठेवला तर तो विरघळणार,
पाघळणार,नाही का?त्या प्रमाणे ज्याच्या मांडीवर
परस्त्री(रूपवान लावण्यवती) झोपलेली आहे,त्याचे
मन ढळणार नाही का? निश्चितच ढळेल.या वर लक्ष्मणाने योग्य ते उत्तर दिले.लक्ष्मण म्हणतो,
'अरे लुच्चा,पोपटा,माझ्या मातेचे डोके माझ्या मांडीवर आहे ते तुला पाहवलेले नाही वाटते!तर
मग ऐक.
"मन एवं मनुष्यणां मदोन्मत्त गजेंद्रवत.
ज्ञानांकुशे सामुत्पन्ने तस्य नो चालते मन:।।
अर्थ:-माणसाचे मन हे एखाद्या मदोन्मत्त माजलेल्या
हत्ती प्रमाणे आहे.त्याला आवरण्यासाठी अंकुशाची
ज्या प्रमाणे गरज आहे त्याच प्रमाणे मनरुपी हत्तीला
ताब्यात ठेवणेसाठी ज्ञानरुपी अंकुश सदैव त्याच्या मानेवर ठेवला पाहिजे आपोआपच मन ताब्यात राहू शकते.या उत्तराने प्रभुरामचंद्र प्रकट झाले.लक्ष्मणा बद्दल त्यांना पुरेपूर खात्री होतीच
परंतु अखिल मानवासाठी-लक्ष मनासाठी लक्ष्मणाच्या उपदेश केला गेला आहे.गूढ सांगितले
आहे.म्हणून मनावर विजय मिळविणेसाठी ज्ञान संपादन करणे अर्थात सत् सत् विवेक बुद्धीचा वापर
केला पाहिजे

२) "वायू पुत्र हनुमान माता अंजनी चे सामर्थ्य"
रावण वध केल्यावर,प्रभू रामचंद्र आयोध्येस परत जात असतांना वाटेय ऋष्यमूक
पर्वतावर मारुतीरायाची पूज्य अंजनीमाता तपश्चर्या करीत होती,आपल्या मातेस दर्शन द्यावे
अशी मारुतिरायांनी प्रभू रामचंद्रांस विनंती केली,
पण माते जवळ माझी स्तुती करू नका अशी
प्रभू रामचंद्रांस विनंती केली.राम,लक्ष्मण,सीता,व मारुती,अंजनी माते समोर गेले,नमस्कार केला.
रावण वधाचे व समग्र युद्धाचे वर्णन सांगितले
पण बोलण्याचा ओघात,त्यांनी अंजनी माते जवळ मारुतीची खूप स्तुती केली,खर तर आपल्या पुत्राची स्तुती ऐकून तिला आनंद व्हावयास पाहिजे होता,परंतु आपल्या पुत्राने
रावण वाढ स्वतः न करता प्रभुरामचन्द्रांना कष्टीविले याचे अंजनी मातेला खूप दुःख झाले.
तिला अत्यंत क्रोध आला.
'ऐकोनी पुत्राची ख्याती ।अंजनी तुच्छ मानी चित्ती ।
म्हणे का बा रघुपती । वाहसी ओझे ।।
हा कां माझा उदरी आला.। गर्भिहुनी का नाही गळाला ।
आपण असता कष्टविला । स्वामी का राम ।।
माझिये दुग्धाची प्रौढी । कळीकाळाची मुरडी ।
रावणादिक बापुडी । घुगरडी काय?
क्षणामध्ये रावण वधुनी जरि का आणिला राघवपत्नी ।
तरि पुत्राची माझे मनी। उल्हास होता।।
अशी गर्जना करून तिने आपल्या स्थानातील दुधाची धार सोडली तेव्हा समोरील
शीळांची (दगडांची) भिंत भेदून त्रिकखंडात गेली.
आपल्या वेणीने लंकेला वेढा देऊन लंका उचलून
दाखविली.
तेव्हा रामचंद्रासह सर्वांना आश्चर्य वाटले.
सीतामाई अंजनी मातेला म्हणाली,प्रभू रामचंद्राची आज्ञा नसल्याने,मारुतीने एकट्याने
रावणाचा वध करून माझी मुक्तता केली नाही.
आशा तेजस्वी वीर मातेच्या पोटी हनुमंता सारखा
बलशाली पराक्रमी पुत्र जन्म घेईल यात नवल
ते कसले.
मारुतीने इंद्राच्या वज्राचा प्रहार आपल्या
हनुवटीवर झेलला तेव्हापासून हनुमान हे नाव
धारण केले.त्यांना वज्रांग असेही म्हणू लागले त्याचाच अपभ्रंश होव बजरंग हे नाव पडले.


संदर्भ: संस्कार वर्धिनी
श्रीरामरक्षा रहस्य

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED