परब्रम्ह श्री स्वामी समर्थ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परब्रम्ह श्री स्वामी समर्थ

कलियुगातील तिसरे अवतार। श्री नृसिंहसरस्वती हे शके १३८३ मध्ये श्री शैल्य पर्वतावर कर्दळी वनात गुप्त झाले.तेथे पहाडांच्या कोपऱ्यात एक गुहा होती. तेथे
वटवृक्ष,औदुंबर अश्वस्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते तेथेंबते ३५० वर्षे समाधी अवस्थेत होते.त्या ठिकाणी एक प्रचंड वारूळ तयार झाले.,तेथे एक जण
लाकूड तोडण्यासाठी आला.त्याने वृक्षावर घाव घातला
तो चुकून वारुळावर बसला.तो त्यांना लागला व
नृसिंहसरस्वतीची शेकडो वर्षांची समाधी भंग पावली.
ते वारुळातून बाहेर पडले.आजानु बाहू व तेजस्वी अंगकांती,भेदक दृष्टी,कमळा सारखे डोळे हे पाहून तो
मनुष्य घाबरला त्यांची क्षमा मागू लागला.त्यांनी त्याला
अभयदान दिले.हेच श्री दत्तात्रेयाचे तिसरे अवतार
श्री स्वामी समर्थ.
त्यांच्या दर्शनास आलेल्या एका पारशी
गृहस्थाने त्यांना विचारले,आपण कुठून आलात.त्यांनी
उत्तर दिले आम्ही कर्दळी वनातून निघून कलकत्ता शहरी
आलो.नंतर बंगला देश तेथे काली मातेचे दर्शन घेतले
नाना तीर्थे हिंडून हरिद्वार येथे आलो.नंतर केदारेश्वर,
नंतर गोदातीरी आलो.मंगळावेढे येथे काही दिवस वास्तव्य केले.येथून अक्कलकोटा प्रति आलो.बारा वर्षे
मंगळवेढ्यास होतो.
चोळप्पाची भक्ती पाहून स्वामी त्याचे घरी भोजन करीत असत.चोळपा निर्धन व निस्पृह होता त्याची पत्नीही स्वामी सेवेत तत्पर होती.स्वामी कृपे मुळे त्यांना
कुठलीही कमतरता भासत नव्हती.
एकदा एका बुवांनी त्यांना प्रश्न केला,ब्रम्ह म्हणजे काय? स्वामी नुसते हसले उत्तर दिले नाही
त्यांनी लोकांना सांगितले हा ढोंगी आहे.हा वेडा संन्यासी आहे याच्या नादी लागू नका.हा ब्रह्मचारी बुवा
स्वामिस तुच्छ मानीत होता.तो रात्री झोपला असताना
त्याला स्वप्न पडले की,त्याच्या अंगावर असंख्य विंचू
चढले असून त्याला दंश करीत आहेत तोंखडबडून
जागा झाला त्याची बोबडी वळली.दुसऱ्या दिवशी
तो स्वामी पाशी आला,स्वामी हसून म्हणाले "स्वप्नी
देखोनि वृश्चिकासी। काय म्हणोनी भ्याल्याशी । जरी
वृथा भय मानीतोशी । मग ब्रम्हपद जाणशी कैसे ।
ब्रह्मपद प्राप्त करणे सोपे नाही हे त्यास समजले.त्याचा अहंकार गळून गेला.व तो स्वामी भक्त
झाला.
मंगळवेढ्यात बसप्पा नावाचा तेली होता,अत्यंत गरीब होता.वनातून जात असतांना स्वामी महाराजांना
त्याने काट्यावर झोपलेले पाहिले,हा कोणी तरी महापुरुष असावा म्हणून त्याने त्यांच्या चरणावर मस्तक
ठेवले.स्वामी चारणांचा स्पर्श होताच तो ज्ञानी झाला.व
तेथेच त्यांची सेवा करू लागला.बसप्पा रात्रीचे समयी
स्वामी बरोबर वनातून जात असतांना त्याच्या पायाला
सापाचा स्पर्श झाला,चहूकडे त्याला सर्प दिसू लागले
स्वामी त्यास म्हणाले भिऊ नकोस जितके पाहिजे तितके घे.वस्त्र सोडून बसप्पाने आपल्या वस्रात साप टाकले नंतर ते गावात एका मंदिरात बसले,वस्त्र सोडून
पाहतो तो त्यात सुवर्ण.स्वामींनी त्याला आज्ञा केली की,
घरी जाऊन सुखात संसार कर.तो बसप्पा रात्रंदिन
"श्री स्वामी समर्थ" मंत्र जपत असे.समर्थांची कृपा झाल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण आहे.
आळंदी क्षेत्रात नृसिंहसरस्वती नावाचे योगी होते.
हठयोग शिकण्याकरिता त्यांनी अनेक जपी, तपी
संन्यासांची भेट घेतली परंतु त्यांना त्याचे ज्ञान मिळाले
नाही.कोणी तरी त्यांना सांगितले की,अक्कलकोटला स्वामी आहेत तेथे जा.नृसिंहसरस्वती भेटण्यास येत आहेत हे स्वामी समर्थाना समजले. ते समोर येताच,आज्ञाचक्र भेदातला एक स्लोक त्यांनी म्हंटला.
तो नृसिंहसरस्वती यांचे कानावर पडताच त्यांची समाधी
लागली.समाधी उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की,
स्वामी साक्षात परमेश्वर आहेत.स्वामींनी त्यांना सांगितले की,सिद्धी करून तुम्ही तुमचा महिमा वाढविला आहे. सिद्धिचा उपयोग करू नका.सिद्धि सोडून द्या.
शके ,१८०० बहुधान्य नाम संवत्सर,
चैत्री कृष्ण त्रयोदशी मंगळवार या दिवशी त्यांनी अवतार संपवला निजरूपी निमग्न झाले. आजही जे
अनन्य भावे श्री स्वामींची भक्ती करतात.त्यांना अनुभुती येते.
"अनन्यश्चिंतयतो मां ये जन:पर्युपासते। तेषां नित्यभियुक्तांन य़गक्षेमं,वहाम्यहम "।।
अनन्य भावाने जो माझी भक्ती करतो.नाम स्मरणात्मक भक्ती योग्य आचरतो त्याचा योगक्षेम मी
चालवेन असे वचन स्वामींनी आपल्या भक्तांना दिले.
हा स्लोक म्हणत ध्यानमग्न अवस्थेत देहाचा त्याग केला.
नित्य नेमाने स्वामी समर्थ हा मंत्र जपणाऱ्या भक्तांना ते आश्वासन देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेस.वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा हे त्यांनी का बरे सांगितले असेल, तर त्याचा मतितार्थ असा की,वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे.हे झाड वाढते
मोठे होते विस्तारते,त्यास अनेक पारंब्या फुटताय,त्या पुन्हा जमिनीत रुजतात.त्याचा पुन्हा वृक्ष होतो.ही
अखंडत्वाची खूण स्वामींनी सांगितली असावी.सदगुरु
कडून नामोपदेश मिळून सर्वांना दिव्य संजीवनी आशा,नामाचे बीज साधकाच्या अंत:,करणात रुजते
वाढते,विस्तारले ते नामोपच्याराच्या सातत्याने.
म्हणून प्रत्येकाने नित्य नेमाने रोज अकरा माळी
"श्री स्वामी समर्थ " ,हा मंत्र जपावा.तसेच तारक मंत्र
म्हणावा.
"श्री स्वामी समर्थ तारक मंत्र"

।। श्री स्वामी तारक मंत्र ।।

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती, ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
।। श्री स्वामी सम।र्थ ।

.,