प्रत्येक जण जीवनाची वाट चाल करीत
असतांना,तो व्यवसाय करीत असो वा नोकरी
करीत असो,व्यवसाय वाढावा, नोकरीत प्रगती
व्हावी या करिता प्रयत्न करीत असतो किंवा
उत्कर्ष व्हावा असे वाटते.
उत्कर्ष व्हावा,प्रगती व्हावी असे वाटणे,
त्या साठी प्रयत्न करणे,व यश्वस्वी होणे या गोष्टी
ओघाने येतातच.त्यासाठी आपल्या नक्की
काय केले पाहिजे याचा विचार मनाशी पक्का
केला पाहिजे.व्यवसायाचा विचार करतांना
आजू बाजूची परिस्थिती,वातावरण आपली
क्षमता याचा विचार करावा लागतो.कधी कधी
विचार येतो आपण एवढे पैसे गुंतवणार आणिजर
व्यवसाय नाही चालला तर विनाकारण पैसे वाया
जाणार.
तीच गोष्ट नोकरी करणाराची.एखादी व्यक्ती
हुशार,बुद्धीमान असते.तशीच चांगली शिक्षित असते असते.ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी
मुलाखातीस जाण्याचा प्रसंग येतो.त्या वेळेस
त्याच्या मनात विचार येतो,माझ्या पेक्षा कितीतरी
हुशार उमेदवार तेथे येतील,तेथे विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे मला देता येतील का?या साध्या
विचाराने काही वेळेस विनाकारण निराश होतो.
नोकरी करतांना सेवा ज्येष्ठते प्रमाणे वरच्या पदावर बढती दिली जाते.ज्या व्यक्तीचा बढती साठी क्रमांक आहे. अशी व्यक्ती ते पद स्वीकारण्यास तयार होत नाही.कारण ते काम
म्हणजे या ठिकाणी नुसते काम नसून अनेक
जणांशी संबंध येत असतो प्रसंगी कटुता घ्यावी
लागते हे जमेल की नाही,स्वतः द्दल विश्वास
नसतो,म्हणून बढती नाकारतात व पुढच्या व्यक्तीस संधी मिळते कारण एकच हे काम जमेल
हा आत्मविश्वास नाही.प्रत्याक्षात करण्याची क्षमता त्या व्यक्तीत असते.पण याची जाणीव नसते.किंवा हे ती व्यक्ती विसरलेली असते.
प्रत्यक्षात जी गोष्ट घडणारच नाही त्याचाच विचार त्याच्या मनात येतो.यावर थोडा विचार अगर मनन केले तर आपल्या लक्षात येईल.खऱ्याअर्थानेआपल्यातअसणारी कुशलता,आपलीबुद्धीमत्ता याचा विसर पडलेला असतो.किंबहुनाआपल्यातअसणाराआत्मविश्वास जागृत झालेला नसतो.
समाजात असेही काही लोक असतात की, तुम्ही एखादी चांगली गोष्ट करायची ठरविली
तर,अरे! तुला ते जमणार नाही,कशाला विनाकारण प्रयत्न,करतोआणि अशा वेळेस आपले मनखंबीर नसेल तर,आपल्याला वाटते अरे,खरेच हेआपल्याला जमणार नाही .
म्हणून सकारात्मक विचारांची जरूर आहे,याचा अर्थ आपण हे काम करूच हा आत्मविश्वास व दृढ विश्वास पाहिजे.
एक मुलगा एका कार्यालयात शिपाई म्हणून कामास लागला,त्याच वेळी त्याने निश्चय
केला की,मी या ठिकाणी मॅनेजर या पदा पर्यंत
पोहचेल,साधा दहावी झालेला मुलगा,बहिस्थ परीक्षा देऊन ,पदवी प्राप्त केली,व खात्याची
परीक्षा देऊन त्या पदा पर्यंत पोहचला.कारण
त्याचा स्वतः च्या बुद्धी मत्तेवर स्वतः च्या क्षमतेवर
पूर्ण विश्वास होता.त्याच्या आधी असणारे त्याचे
सहकारी त्याच पदावर होते.
पुराणा मध्ये एक गोष्ट आहे,एकलव्य
नावाचा एक मुलगा होता,त्याला गुरू द्रोणाचार्य
कडे,धनुर्विद्या शिकावयाची होती.पण तो राज
घरण्यातला नसल्याने त्याला शिकविण्यास नकार
दिला.पण धनुर्विद्या शिकण्याची त्याला जबरदस्त
इच्छा होती,व जमेल असा आत्मविश्वास होता.
त्याने जंगलात द्रोणाचार्यां गुरू मानून त्यांचा
पुतळा तयार केला. सराव करून धनुर्विद्येत
प्रवीण झाला.एक दिवस द्रोणाचार्य त्या भागात
फिरत फिरत आले असता,त्यांच्या बरोबर अर्जुन
होता.त्याच वेळेस एक कुत्रा एकलव्याच्या दिशेने
भुंकत आला.एकलव्याने भात्यातून बाण काढला
व कुत्र्याच्या तोंडात अशा रीतीने मारला की,त्याला भुंकताही येत नव्हते व जखमही झाली
नाही.तो कुत्रा परत निघाला त्या वेळेस समोरून
गुरू द्रोणाचार्य व अर्जुन येत होता.द्रोणाचार्य व
अर्जुन आश्चर्य चकीत झाले व म्हणाले इतका
निष्णात धनुर्धर कोण आहे?समोरून एकलव्य
येतांना दिसला.त्याला विचारले ही धनुर्विद्या
कोणाकडून शिकलास.तो म्हणाला गुरुदेव आपण मला नकार दिला पण समोर आपली
प्रतिमा ठेवुन मी सराव केला अभ्यास केला.
हे एकलव्याला साध्य झाले कारण, त्याला
धनुर्विद्या शिकण्याची दुर्दम्य इच्छा होती व त्यात यशस्वी होईल हा प्रचंड आत्मविश्वास.
आत्मविश्वास हा आध्यात्मिक शक्ती तसेच
मनाची शक्ती आहे.त्या मुळेच मनुष्य महान कार्य
करतो व सफलता प्राप्त होते.,ज्या व्यक्ती मध्ये
आत्मविश्वास आहे त्याला चिंता असू शकत नाही. ,तो अनेक गोष्टींचा सामना करू शकतो.
" SELF TRUST IS THE FIRST SECRET
OF SUCCESS".
हे खरं यशाचं रहस्य आहे.आपलीआपल्यावर
पूर्ण श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास.आत्मविश्वास
ही ईश्वरी शक्ती आहे. तसेच आंतरिक शक्ती आहे आणि या शक्तीवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे.
म्हणून चांगली संगत पाहिजे,
त्या मुळे चांगले विचार निर्माण होतात.मन हे
नेहमी चंचल असते त्यामुळे बुद्धी स्थिर राहात
नाही,म्हणजे आत्मविश्वास नाही.असा मनुष्य
परावलंबी असतो.
आपल्या मध्ये एक प्रचंड दैवी शक्ती
आहे,हे नेहमी लक्षात ठेवा.मला सर्व गोष्टी शक्य
आहेत हा विचार मनात दृढकरा.तरच आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो.
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार
असतो.हे कधीही विसरू नका.
सुधाकर काटेकर