महाकवी कालिदास - जीवनातील प्रसंग Sudhakar Katekar द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महाकवी कालिदास - जीवनातील प्रसंग

"विवाह व लिखाण
विद्योत्तमा नावाची एक राज कन्या होती.ती
अतिशय विद्वान होती दरबारातील अनेक विद्वानांना तिने वाद विवाद स्पर्धेत हरविले होते.
तुला मुळे दाराबारातील विद्वान लोकांचा अपमान
झाला व त्यांनी बदला घेण्याचे ठरविले.एखाद्या
महामुर्ख व्यक्तीशी विवाह लावून द्यावा असे ठरले. आशा व्यक्तीचा शोध घेण्यास ते निघाले,
जंगलात एका झाडावर कालिदास ज्या झाडाच्या
फांदिवर बसला होता तीच फांदी तोडत होता.
ते विद्वान तिथे आले व कालिदासाच म्हणाले
आम्ही तुझ्या एका सुंदर राजकुमारीशी लग्न
लावून देतो.तुझ्या कल्याण होईल तू फक्त आम्ही सांगतो तसे वागायचे
तो कबूल झाला.त्यांनी त्याला चांगले कपडे दिले.
व सांगितले की तू फक्त मौन पाळावयाचे व आम्ही सांगू तसे कारवयाचे.
त्यांनी त्याला राज कन्या विद्योत्तमा समोर
घेऊन आले व तिला सांगितले की हे आमचे गुरू असून अतिशय विद्वान असून शास्रार्थं करीत आले आहेत.त्यांनी मौन धारण केले असल्या मुळे
ते हातांनीच संकेत करून आपणास उत्तरे देतील.
विद्योत्तमाने सुद्धा हाताने संकेत देऊन प्रश्न
विचारण्यास सुरुवात केली.
तिने पहिला प्रश्न विचारला फक्त एक बोट
दाखविले .म्हणजे ब्रम्ह एक आहे.कालिदासाला
वाटले राजकुमारी म्हणत आहे एक डोळा फोडील, तो मनात म्हणाला मी दोन डोळे फोडील म्हणून त्याने दोन बोटे दाखविली .त्याच्या बरोबर असणाऱ्या विद्वानांनी ब्रम्हा
करिता दुसऱ्याची आवशकता आहे म्हसणजे
जोवाची आवशकता आहे म्हणजे ब्रम्ह व जीव
हे दोन सत्य आहे.
दुसरा प्रश्न विचारला तेंव्हा पाच बोटे दाखविली कालिदासाला वाटले ,थप्पड मारील
असे म्हणत आहे.त्याने आपल्या गालावर पाचही
बोटे ठेवली.
त्याच्या बरोबर असणाऱ्या विद्वानांनी सांगितले की,कालिदास म्हणतो पृथ्वी,आप,तेज,
वायू व आकाश ही तत्वे पृथक,पृथक काही करू
शकत नाहीत.,त्या साठी मनुष्य शरीर धारण करतो ते श्रेष्ठ आहे.
विद्योत्तमा प्रश्नांची उत्तरे ऐकुन खुश झाली.
व कालिदासाशी विवाह केला.
उंटाचा आवाज ऐकुन कालिदासाने उट्र
असा उच्चार केला.तो उच्चार ऐकुन राज कन्येच्या लक्षात आले की,कालिदास अडाणि आहे.ती रागाने बोलली.कालिदास घर सोडून
निघून गेला.काली मातेची तपश्चर्या केली. काली
मातेने प्रसन्न होऊन त्याला विद्या प्रदान केली.
विद्याप्राप्त झाल्यावर कालिदास घरी आला.
घराचे दार बंद होते. तो म्हणाला"कपाटम उद्धाटय" तिला वाटले कोणी तरी विद्वान आला
असला पाहिजे. तिने उद्गार काढले "अस्ति, कश्चित,वाग्विशेष " म्हणजे आदरानी तुमचे स्वागत करावे असे विशेष काही तुम्ही प्राप्त केले आहे का? हे तीन शब्द घेऊन त्याने
कुमार संभव,मेघदूत,व रघुवंश या नाटकांची
सुरुवात केली.
कुमार संभव--अस्त्यु उत्तरस्य दिशो देवात्मा
हिमालायो नाम नागाधीराज.
मेघदूत--कश्चित कांता वीर विगुणा स्वाधिकारात
प्रमत्त:
रघुवंश--वाग्विशेष वागर्थ विवं संपृक्तौ वागार्थ प्रतिपतये जगत:पितरो वंदे पार्वती परमेश्वरी.
कालिदासाने अभिज्ञान शाकुंतल,विक्रमोर्शिय
मालविकाग्नी मित्र ही नाटके लिहिली.रघुवंश
कुमार संभव हे महा काव्य तसेच मेघदूत ही
रचना केली व प्रसिद्ध आहे.
२ "कालिदासाचे गर्व हरण"
कालिदासाला विद्वान होता,त्याला वाद विवाद
स्पर्धेत कोणी हरवू शकत नव्हते. त्याला त्याच्या
विद्वत्तेचाअतिशय गर्व झाला.तो फिरत फिरत शेजारच्या राज्यात आला.दुपारची वेळ होती
त्याला अतिशय तहान लागली होती. तो एका
झाडा खाली बसला होता. समोर त्याला एक
झोपडी दिसली.त्या झोपडी समोर एक विही
होती.त्या झोपडीतून एक लहान मुलगी एक
हंडा घेऊन पाणी भरण्यासाठी विहिरीवर
अली.कालिदासाने तिला पाहिले.तो त्या मुलीला
म्हणाला,मी एक विद्वान असून प्रसिद्ध आहे,मला
सगळे ओळखतात.माझा सगळे सन्मान करतात.
अशी त्याने स्वता:ची स्तुती केली.व म्हणाला
मला खूप तहान लागली आहे.पिण्यास पाणी
दे.मी एक बडा आणि सन्मानीत व्यक्ती आहे.
ती मुलगी म्हणाली तुम्ही खोटे बोलत आहेत.जगात दोनच बडे व विद्वान आहेत.त्यांची
नावे सांगा.
कालिदास म्हणाला,मला माहित नाही.मला
तहान लागली आहे पाणी दे.जगात दोनच बलवान आहेत.एक अन्न आणि दुसरे जल.भूक
आणि तहान यांच्यात इतकी शक्ती आहे की,
चांगल्या लोकांना सुद्धा त्यांच्या समोर झुकावे
लागते.पहा तहानेने तुमची काय हालत केली.
कालिदास चकित झाला.मोठ मोठया विद्वानांना पराजीत करणारा कालिदास एका लहान मुली
समोर निरुत्तर झाला.
ती मुलगी म्हणाली आपण खरे कोण आहात ते सांगा.कालिदास नम्र होऊन म्हणाला
मी बटोही आहे. ती मुलगी म्हणाली आपण म्हणाली आपण खोटे बोलता. या संसारात दोनच
बटोही (प्रवासी) आहेत.एक सूर्य व दुसरा चंद्र,
ते अविरत प्रवास करतात कधीही दमत नाहीत,
बिना थकता चालत असतात.आपण तर तहान
भुकेने व्याकुळ झालेले आहेत. आपण बटोही
कसे? इतके बोलून कालिदासाला पाणी न देता , ती मुलगी मटका घेऊन निघून गेली.
एव्हढे अपमानित जीवन तो कधी जगला नव्हता .तो तहानेने अतिशय व्याकुळ झाला होता. पुन्हा त्याने त्या झोपडी कडे पाहिले,
तो आतून एक वृद्ध स्त्री बाहेर येत होती.ती
विहिरीवरून पाणी काढू लागली.आता पर्यंत कालिदास विनम्र झाला होता.तो त्या वृद्ध
स्त्रीस म्हणाला,माते,मला खूप तहान लागली
आहे,मला पिण्यास पाणी द्या खूप पुण्य लाभेल.
ती वृद्ध स्त्री म्हणाली"मी तुला ओळखत नाही,
आपला परिचय द्या.मी पाणी देते.
कालिदास म्हणाला "मी मेहमान आहे",ती वृद्ध
स्त्री म्हणाली तुम्ही मेहमान होऊ शकत नाही,
या जगात दोनच महिमान आहेत,एक धन व
दुसरे यौवन,हे जाण्यास वेळ लागत नाही.
खरे सांगा,तुम्ही कोण आहेत,हताश होऊन
कालिदास म्हणाला,मी सहनशील आहे,कृपा
करून पाणी द्या. वृद्ध स्त्री म्हणाली सहनशील
दोनच आहेत,एक धरती जी पाप पुण्याचा बोजा
सहन करते. आणि छाती फाडून धान्य देते. दुसरा
वृक्ष त्यांना जरी दगड मारले तरी ते फळ देतातच. खार सांगा तुम्ही कोण आहात.कालिदासाला चक्कर येण्याची वेळ आली,ती तहानेने अतिशय व्याकुळ झाला होता,
रागाच्या भरात तो म्हणाला,"मी मूर्ख आहे"
ती स्त्री म्हणाली तुम्ही मूर्ख कसे होऊ शकता,
मूर्ख दोनच आहेत एक राजा जो योग्यता नसतांना शासन करतो व दुसरा पंडित जो
राजाला प्रसन्न करण्या करता खुशामत करतो.
कालिदास काही बोलू शकला नाही,तो वृद्ध
स्त्रीच्या पायावर कोसळला.
ती वृद्ध स्त्री म्हणाली ,उठ वत्स. व म्हणाली
शिक्षणाने ज्ञान मिळते,अहंकार नाही. शिक्षणाच्या
जोरावर,विद्वात्तेच्या जोरावर,मान व प्रतिष्ठा देतो.
,तुला अहंकार व गर्व झाला.
त्याने मान वर करून पाहिले तर समोर
साक्षात सरस्वती होती.तुला विद्वत्तेचा अहंकार
झाला म्हणून तुला जाणीव करून देण्या करिता
मी आले.
तेव्हापासून कालिदासाचा अहंकात
नष्ट झाला.