Mala Kahi Sangachany - 17-1 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय...- १७-१

१७. नकळत...

बस निघून गेली पण सुजित अजूनही तिथेच थांबून होता ... त्याला जे गुपित डायरी वाचल्यानंतर कळलं होतं ते तिला सांगणं गरजेचं होतं असं त्याला वाटतं होत . ' मी तिला सगळं सांगून टाकायला हवं होतं पण आता वेळ निघून गेली .... का म्हणून मी तिला सांगू शकलो नाही ? कुमारने जर मला कधी कळू दिल नाही तर आणखी कुणाला माहित असणं अशक्य .... शेवटी जे काय झालं ते तसेच कुमार आणि त्याच्या डायरीतच गुप्त राहावं असा नियतीचा कौल असावा ... ' मनातच हे सर्व काही तो स्वतःलाच सांगत होता , त्याचा मोबाईल वाजला ....


" हॅलो सुजित ... मी अनिरुध्द बोलत आहे . "


" हॅलो बोल ना , तू निघाला का ? "


" हो मी बसने येत आहे आणि मला आर्यन ने फोन केला होता ... तिथं आल्यानंतर आम्ही दोघे सोबतच येणार आहोत ..."


" अच्छा , तरी किती वेळ लागणार अजून .."


" मला अर्धा तास तरी लागेल आणखी ... "


" मी भेटतो तुम्हाला बस स्थानक येथे , इथे आले कि मला कॉल करून सांगा . ठीक आहे "


" हो , आता तब्येत कशी आहे कुमारची .."

त्यावर अजून तो बेशुध्द असल्याच आणि उद्या सकाळी ऑपरेशन होणार असं त्यानं अनिरुध्द ला सांगितलं ... बाकी परस्पर भेटल्यावर बोलूया असं म्हणत फोन कट केला .... थोड्या वेळाने पुन्हा परत यावं लागणार म्हणून तो आर्यन आणि अनिरुध्द यांची वाट पाहत तिथंच थांबला.... रस्ताने वाहनांची वर्दळ सुरु होती , तापत्या उन्हामुळे प्रवासी त्रस्त झाले होते पण वेळ काळ आहे तसा सोसून जगावं लागत हेच जीवनाचं सत्य आहे ... स्वतःलाच सांगत डायरीच्या दुनियेत सफर करायला लागला .... ... .. .


अनिरुध्द बस स्थानक येथे पोहोचला , फोन करून त्याने सुजितला शोधलं आणि त्यांची भेट झाली . काही वेळाने आर्यन सुध्दा ऑटोने तिथं आला ... तो ऑटोतून उतरतेवेळी सुजितला दिसला तेव्हा दोघेही त्याच्या जवळ जाऊन त्याला भेटले ..... दुचाकी सुरु करत सुजित म्हणाला .

" चला आता निघूया .."


" अरे सुजित थांब जरा , ऋतुराज येणार आहे ..." आर्यन म्हणाला


" कोण ऋतुराज ? " सुजितने विचारलं


" मित्र आहे , पदवीला असतांना आमच्यासोबत होता , तू ओळखतो त्याला " आर्यन ...


" पण हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतो आहे " सुजित म्हणाला तेव्हा दोघे आर्यन कडे पाहत होते ...


" बरं थांबा पाच दहा मिनिटे , बस येईलच तो " म्हणत आर्यनने त्याला फोन लावला ... फोन लागला पण तो फोन उचलत नव्हता म्हणून फोन कट करून त्याने पुन्हा लावला तोच समोरून दुचाकी चालवत तो तिथं येत असल्याचं त्यांना दिसलं ... दुचाकी वळवून त्याने ते तिघे उभे होते तिथून काही अंतरावर थांबून मोबाईल बाहेर काढला आणि आर्यनला फोन लावला .... तोच आर्यन त्याला आवाज देत असल्याचे त्याने ऐकलं .... मोबाईल खिश्यात ठेवून तो त्यांच्याकडे जायला लागला ...

" अरे मी ओळखतो याला , कुमार सोबत भेटलो होतो एक दोनदा पण याच नाव ... कुमारने काही वेगळंच सांगितलं होतं .... हा आठवलं Rj .. हेच नाव सांगितलं होतं कुमारने " सुजित म्हणाला


" अच्छा अरे कुमारने दिलेलं नाव आहे ते" आर्यन असं सांगत होता तेवढ्यात ऋतुराज तिथं पोहोचला . तिथंच सुजितला ते तिघे कुमार कसा आहे ? कसा काय झाला अपघात ? खूप लागलं का त्याला ? ऑपरेशन झालं का मग ? असे कितीतरी प्रश्न विचारत दुचाकीने दवाखाण्याकडे जायला लागले ...


त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत सुजितने त्यांना कुमारची काय अवस्था झाली ते सांगितले , त्याचबरोबर तो अजूनही बेशुध्द आहे हे ऐकून त्यांना धक्का बसला होता ... खरं तर त्यांनासुद्धा कुमारचा दुचाकी चालवितांना अपघात झाला हे स्वप्न कि वास्तव हे कळत नव्हतं ... पण आपल्या मान्य न करण्यामुळे वास्तविकता बदलत नाही जे घडलं ते नाकारता येत नाही ... शेवटी आपलं मन हे त्याचं गोष्टींवर लवकर विश्वास ठेवतं ज्यात आपला आनंद आहे, ज्यामध्ये आपल्या मनाचं समाधान आहे ...


थोड्याच वेळात ते दवाखान्यात पोहोचले , एकाचवेळी सर्वांना आत प्रवेश देणार नाही हे सुजितला ठाऊक होत. त्याने आधीच प्रशांत आणि आकाशला बाहेर बोलावून घेतलं ... आळीपाळीने आत ICU मध्ये जाऊन त्या दाराच्या काचेतुनच त्यांनी कुमारला पाहिलं ... तिथं आल्यावर त्यांना सर्व जे काय घडलं ते वारंवार ऐकून समजलं आणि त्यामुळे फोनवर ऐकून जितकं दुःख झाल त्यापेक्षा

जास्त कुमारला डोळ्यासमोर या अवस्थेत पाहून त्यांनी अनुभवलं ... आत कुमार अजून तसाच पडून होता , त्याला आत जाऊन भेटावं अस प्रत्येकाला वाटत होत पण कुणालाही परवानगी मिळाली नाही ... बराच वेळ प्रयत्न करून हाती अपयश आले आणि ती नर्स ऐकायला मुळीच तयार नव्हती म्हणून सरतेशेवटी हार मानून ते सर्व कुमारच्या आई वडिलांना भेट देऊन त्यांना धीर देत होते ....


आता सायंकाळ होऊन अंधार पडला , तशी रुग्णांना भेटावयास येणाऱ्यांची गर्दी व्हायला लागली ... मित्र परिवार , नातेवाईक रुग्णाला भेट दिली की काळजी घ्या , देव ठीक करेल , नशीब दुसरं काय ! असं बरंच काही बोलून निघून जात होते ... तसे काही नातेवाईक कुमारला सुध्दा भेट देऊन परत जात होते पण तो बेशुध्द होता त्यामुळे त्याला बाहेरून पाहून त्याच्या आई वडिलांना धीर देत होते ... येतांनी प्रत्येक जण काही न काही घेऊन येत पण ते सगळं तसेच पडून होत ... कुणाला ते खायची ईच्छा होत नव्हती ... परत घेऊन जा म्हणावं तर त्यांना वाईट वाटेल म्हणून ते सर्व एका जागी जमा केल होत...


वेळ अशीच निघून जात होती सर्व कुमार कमीत कमी आतातरी शुद्धीवर येईल या आशेवर होते पण तो होता तसाच निपचित पडून होता ... मग सर्वांनी एकत्र चहा घेतला आणि आत बाहेर आळीपाळीने चकरा मारीत हि रात्र कशीतरी घालवावी लागेल हे लक्षात घेता बाकीच्यांना घरी पाठविलं तर बरं होईल असं ठरवल ... तेव्हा इतके जण तिथं थांबू शकत नाही असं कळलं , मग निदान चार जण तिथंच मुक्कामी राहतील अस ठरलं पण कुमारची आई , प्रशांत दोघेही घरी जायला तयार नव्हते तर दोन्ही वडील मंडळी तिथं असणं आवश्यक असल्याने शेवटी आर्यन , अनिरुध्द आणि सुजित हे रात्रभर ऋतुराज सोबत त्याच्या घरी जायचं , सकाळी लवकर उठून दवाखान्यात परत यायचं ठरवून तिथून निघाले ... त्यांची तिथून बाहेर जायची इच्छा होत नव्हती पण दुसरा पर्याय नव्हता म्हणून ते जरावेळ आणखी प्रयत्न करीत होते पण कुणीही घरी परत जायला तयार नव्हतं .... मग ते चारजण दुचाकी ने त्याच्या घरी गेले ... त्याने घरी फोन करून मित्रांना सोबत घेऊन येत असल्याचे आधीच सांगितलं होतं . हातपाय धुवून ते त्याच्या रूम मध्ये बसले . जवळपास आठ वाजलेले ... पण तरीही त्यांच्याकरिता चहा घेऊन त्याची बहीण आत आली ... चहा घेत ते कुमारबद्दल बोल्त होते , असे व्हायला नको होतं ... हेच वाक्य ते वारंवार बोलत होते ... मधेच उद्या सकाळी ऑपरेशन व्यवस्थित पार पडले की कुमार लवकर बरा व्हायला पाहिजे हीच त्यांची मनोमन ईश्वरचरणी प्रार्थना ...

continue...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED